होर्हे लुई बोर्हेस चा शुभ्र बोका "बेप्पो"

लख्ख आरशाच्या नजरेत न्याहाळतो आहे
ब्रह्मचारी शुभ्र बोका स्वतःलाच
न जाणताच , की समोरचे अद्भुत गोरेपण ,
घरभर उंडारताना कधीच न दिसलेले सोनेरी डोळे
म्हणजे तो आहे स्वतःच .
त्याचे ते दिसणे : आरशाला पडलेले एक स्वप्न मात्र!
ही दोन मांजरे: एक उष्ण रक्ताचे , एक काचेरी, त्यांना
या विश्वाने आवर्तण्याची मुभा दिलेली दिसते आज!
(परतही येतीलच ती कधीतरी , या अनंत काळात!)
प्लॉटिनसने विचारलेच होते ना की कोणत्या,
स्वर्गनिर्मितीच्याही आधीच्या आदिम मानवाची ,
किंवा अनाकलनीय विश्वनियंत्याची
या विश्वाच्या भग्न आरशातली
प्रतिबिंबे आहोत
आपणही ?
xxx
मूळ स्पॅनिश कवी : होर्हे लुई बोर्हेस (आर्जेंटीना)
English translation: Alan S. Trueblood
मराठी भाषांतर: मिलिंद पदकी

Beppo

The celibate white cat surveys himself
in the mirror's clear-eyed glass,
not suspecting that the whiteness facing him
and those gold eyes that he's not seen before
in ramblings through the house are his own likeness.
Who is to tell him that the cat observing him
is only the mirror's way of dreaming?
I remind myself that these concordant cats —
the one of glass, the one with warm blood coursing —
are both mere simulacra granted time
by a timeless archtype. In the Enneads
Plotinus, himself a shade, has said as much.
Of what Adam predating paradise,
of what inscrutable divinity
are all of us a broken mirror-image?
xxx

Beppo

El gato blanco y célibe se mira
en la lúcida luna del espejo
y no puede saber que esa blancura
y esos ojos de oro que no ha visto
nunca en la casa son su propia imagen.
¿Quién le dirá que el otro que lo observa
es apenas un sueño del espejo?
Me digo que esos gatos armoniosos
el de cristal y el de caliente sangre,
son simulacros que concede el tiempo
un arquetipo eterno. Así lo afirma,
sombra también, Plotino en las Ennéadas.
¿De qué Adán anterior al paraíso,
de qué divinidad indescifrable
somos los hombres un espejo roto?
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आदम ओळखीचा, पण एन्नियड कुठले आणि त्यांचा प्लोटिनस कोण, ते कळायला पुस्तके धुंडाळावी लागली.
.
बोर्हेसची उद्धरणे आणि संदर्भ त्याच्या काळातील सुविद्य लोकांच्या ओळखीचे होते - मात्र आताच्या सुविद्य लोकांच्या ओळखीचे नाहीत. पण त्या संदर्भांशिवाय बोर्हेसचा मथितार्थ नीट कळतही नाही...
.
तर एन्नियडांमधील प्लोटिनसचा आरशांबाबतचा उतारा (इंग्रजी भाषांतर) येणेप्रमाणे :

The reflections in the mirror are not taken to be real, all the less since the appliance on which they appear is seen and remains while the images disappear, but Matter is not seen either with the images or without them. But suppose the reflections on the mirror remaining and the mirror itself not seen, we would never doubt the solid reality of all that appears.
If, then, there is, really, something in a mirror, we may suppose objects of sense to be in Matter in precisely that way: if in the mirror there is nothing, if there is only a seeming of something, then we may judge that in Matter there is the same delusion and that the seeming is to be traced to the Substantial-Existence of the Real-Beings, that Substantial-Existence in which the Authentic has the real participation while only an unreal participation can belong to the unauthentic since their condition must differ from that which they would know if the parts were reversed, if the Authentic Existents were not and they were.

.
मला वाटते, की हा संदर्भ वाचल्यावर मिलिन्द यांना पटेल की प्लोटिनसबाबतचे कवितेतील वाक्य आणि आदमाबाबतचे कवितेतील वाक्य वेगवेगळे आहे. प्लोटिनसने आदमाविषयी काहीही विचारलेले नाही - प्लोटिनस तर रोमचे ख्रिश्चनीकरण होण्यापूर्वीचा. त्याने आरशाचा दृष्टांत ठामपणे प्रतिपादन केलेला आहे - afirma (Spanish) said as much (English). आदमाबाबतची विचारणा खुद्द कवी बोर्हेसची आहे. आणि paradise म्हणजे स्वर्ग नव्हे, तर आदम राहात होता ते इहलोकातीलच नंदनवन (वा जन्नत) होय.
.
आदमाची जन्नत इहलोकातच होती, म्हणूनच तो अतिकाल्पनिक परिपूर्ण "खरा" आदम जन्नतेच्याही पूर्वीचा होता, अशी भाषा बोर्हेस वापरतो. मला मिलिन्द यांचे भाषांतर पटलेले नाही. माझ्या मते त्यांनी पुन्हा भावानुवाद का होईना, मूळ तत्त्वज्ञानाला आणि कथावस्तूला धरून भाषांतर करावे.
---
--- (अर्थ ठेवणारे, पण वृत्त, वगैरे न सांभाळणारे कच्चा खर्डा भाषांतर) ---
शुभ्र आणि विरक्त बोका बघतो आहे
आरश्याच्या तेजःपुंज चंद्रबिंबात
आणि कळत नाही त्याला की ही सफेदी
आणि हे सोनेरी डोळे - न पाहिलेले कधीच
खुद्द आपल्या घरात - प्रतिबिंब आहेत आपलेच.
कोण त्याला सांगणार, की त्याला निरखणारा
केवळ आरशाचे स्वप्न आहे, तो दुसरा?
मी म्हणतो मलाच, हे संवादी बोके
एक काचेचा, एक उष्ण रक्ताचा,
दोन उपर्‍या प्रतिकृती दिल्या आहेत काळाने
एका कालातीत साच्याच्या. सांगितलेच आहे
- तोही सावलीच म्हणा - एन्नियाडात प्लोटिनसने.
जन्नतेपूर्वीच्या कुठल्या आदमाचा,
कुठल्या अनाकलनीय दैवताचा
मोडका आरसा आहोत आपण माणसे?
------
------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धनंजय :
तुमचे भाषांतर अधिक चांगले आहे. आणि मुक्तछंदात वृत्त वगैरे कोण सांभाळतो ? (ते "टेनिस" नेट शिवायच खेळले जाते!). माझी कविता डिलीट करायची आणि तुमच्या नावाखाली तुमची कविता टाकायची एव्हढेच आता बाकी आहे. करून टाकू !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कविता सुंदर आहे मिलिंद आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मुक्तछंदात वृत्त नसल्याचा भास असतो. पण अक्षरे मोजून न गवसणारी लय उच्चारताना अनायासे सापडली तर ते हवेच असते. वृत्तबद्ध पद्यरचनेपेक्षा मुक्तछंद कसब अधिक पणाला लावतो. Anyone can make a formal tucked in shirt and tie look OK - neither eyecatching, nor an eyesore. Informal clothes can span a wider range. They can look effortlessly pleasing, or can hang one's poor taste for all to see!)

बेप्पो
-----------------
शुभ्र विरक्त बोका बघतो स्वतःला
तेजःपुंज चंद्रबिंबात आरश्याच्या
नि कळेना त्याला - ही सफेदी
नि सोनेरी डोळे - न पाहिलेले कधी
घरात - प्रतिबिंबच आहे आपले.
कोण त्याला सांगणार, की निरखणारा तुला
तो दुसरा आहे मात्र आरश्याचा स्वप्नातला?
म्हणतो मलाच, हे बोके वादी-संवादी
एक गरम रक्ताचे, नि एक बिलोरी,
टिचक्या प्रतिकृती दिल्या आहेत काळाने
एका कालातीत साच्याच्या - म्हटल्याप्रमाणे
एन्नियाडात (पुसट बिचार्‍या) प्लोटिनसने.
जन्नतेच्याही पूर्वीच्या कुठल्या आदमाचा,
कुठल्या अनाकलनीय दैवताचा
फुटका आरसा आहोत आपण माणसे?
-----------------
बोर्हेस आणि बेप्पो बेप्पो
बोर्हेस आणि त्याचे मांजर, बेप्पो
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0