जो जास्त बडबड करतो

"जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो, तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो, त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो, त्याला काही तरी मिळून जाते. गप्प राहणार्‍याचे मोती खपत नाहीत, पण बडबड करणार्‍याची वाळूही खपते म्हणतात" या साहित्यिक तत्वज्ञानावर मी भरपेट खूश आहे. मी यात स्वतः ला पडताळलं. तुमचं काय मत आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

सन्जोपराव यांच्या या ब्लॉगवर मी जी एंच्या संदर्भात पुढील वाक्य वाचले होते - " विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते ‘सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही’ असे म्हणतात.

मला ते जास्त पटते.

क्वचित बोलणार्‍या माणसाच्या शब्दांचे मोल जास्त असते. याउलट सतत जो वाचाळतो त्याच्याकडे प्रथमतः फसून जाऊन लोक लक्ष पुरवित असतील पण नंतर नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद दोन ओळी लिहून याविषयी तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारण्याहून अधिक अपेक्षा चर्चाप्रस्तावकाकडून आहेत.

तुम्ही लेखात लिहिलेलं आहे की 'मी यात स्वतः ला पडताळलं.' तुमचे अनुभव तुम्ही चर्चेतच सांगा. वाचकांना त्या अनुषंगाने बोलता येतं. नाहीतर प्रस्ताव खूपच सर्वसाधारण (जनरल) होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत हो गुरुजी.
बाकी जे जे उत्तम ,उदात्त, महन्मधूर तेच घ्यायचे असे आता मी ठरवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

तुम्ही स्वत:ला पडताळलं म्हणजे नेमकं का केलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौन आजकाल किती परिणामकारक ठरत आहे हे पडताळण्यासाठी कृपया वृत्तपत्रे किंवा हजारेंचा ब्लॉग वाचावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौनं सवार्थ साधनम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

>>>>"जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो, तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो, त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो, त्याला काही तरी मिळून जाते. गप्प राहणार्‍याचे मोती खपत नाहीत, पण बडबड करणार्‍याची वाळूही खपते म्हणतात" या साहित्यिक तत्वज्ञानावर मी भरपेट खूश आहे. मी यात स्वतः ला पडताळलं. तुमचं काय मत आहे? <<<<
नुस्ते खुश राहू नका, कृतीत उतरवा, अन वरल्या साहित्यिक उपायान्पेक्षा, जन्मल्या जन्मल्या जो उपाय तुम्ही(देखिल) अम्मलात आणला होतात तो रडण्याचा उपाय आयुष्यभर करत रहा, सगळे काही जागेवर मिळत जाईल, रडले मात्र पाहिजे भरघोस! रडणे हा मूलभूत उपाय आहे, बाकीचे वरचे उपाय म्हणजे उगाच फाफटपसारा, त्यापेक्षा केवळ अन केवळ रडा..... पडताळलय कधी स्वतः रडून? नै ना? मग व्हा तर सुरू Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आवडला.

बाष्फळकाम्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

पहाता पहाता बरीच वाळू विकली गेली की !

(अवांतरः आजकाल वाळू माफिया जोरावर आहेत. अगदी एकमेकांना गोळ्या घालण्यापर्यंत गोष्टी गेल्यात..)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ऐकण्याची सुबुद्धी देवो (आतला आणि बाहेरचा आवाज)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचा आनंदे वाचाल आनंदे

काहीही असले तरी अजूनही ओरडून विकणार्‍याची चलती आहे. जो शांत स्वभावाचा असतो त्याचा फायदाच घेतला जातो.त्याला स्वतःला फायदा घेण्याचे ज्ञान असले तरी शांत राहणार्‍याचे काही चालत नाही. आपल्या आजूबाजूला लेखकाने सांगितलेल्या विविध प्रकारची माणसे असतात. जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतोच. मानवी स्वभाव आहे हा ! काय बडबड करतो हा असे आपण त्याला म्हणत असतो. तो कोठेही गर्दीच्या ठिकाणी आपल्या चटकन लक्षात येतो. त्याचप्रमाणे गडबड करणार्‍या माणसचे असते. त्याची गडबड तात्काळ नजरेत भरते. कडकड करणारे त्या तुलनेने कमी लक्षात राहतात. मात्र अजिबातच कहीही न बोलणारा माणसांच्या गर्दीत हरवून जातो. आपापल्या मस्तीत असणारी माणसे अशा माणसाकडे कशाला लक्ष देतील. वर काही मंडळींनी अण्णा हजारे यांचे उदाहरण दिले आहे. पण अण्णा हजारेसुद्धा वरच्या पट्टीतच बसणारे आहेत. त्यांनी बडबड, गडबड आणि कडकड केली म्हणूनच माणसे त्यांच्या मागे धावली. शांत बसले असते तर त्यांना कोण विचारले असते. भ्रष्टाचार निपटण्याचा विषय घेऊन त्यांनी अख्खा देश आपल्या अंमलाखाली आणला. नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0