(गोष्ट) मित्रांमधील इर्षा

ही गोष्ट आहे, चीनच्या पेइचिंग शहरातली! पेइचिंग शहरात दोन मित्र राहत होते. एकाचे नाव व्होचिन तर दुसर्यामचे वांगचू. दोघेही लंगोटी यार! शिक्षण एकत्रच, एकाच शाळेत, एकाच कॉलेजात. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही नोकरीच्या शोधाला लागले.
रोज सायंकाळी दोघे एकत्र येत. एकमेकाच्या नोकरीबाबत चौकशी करत. नोकरी नाही मिळाली की, हळहळ व्यक्त करीत. पण आतून दोघेही खूश होत. या बेकारीला वैतागून व्होचिनने स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरवले. आईचे दागदागिने विकून पैसा उभा केला. वांगचूनेही त्याचेच अनुकरण करून आपल्या घराचा निम्मा हिस्सा विकला व भांडवल उभे केले.
ज्या ठिकाणी व्होचिनने भाड्याचे दुकान थाटले, अगदी त्या दुकानासमोरच वांगचूनेही एक दुकान भाड्याने घेतले. दोघांनीही एकच व्यवसाय निवडला. लोकही त्यांच्या सच्चा मित्रत्वाची महती गायला सुरुवात केली. दोस्तीचे दाखले दोघांवरून दिले जाऊ लागले.
दोघांचा व्यवसाय उत्तम चालला. भरभराट होत होती. पण दोघेही आतून दु:खी- कष्टी होते. याचा परिणाम असा झाला की, एक दिवस दोघेही आजारी पडले. आजार बरे होण्याचे नाव घेईच ना! उलट आजार दिवसेंदिवस बळावू लागला. त्यांची प्रकृती खालावत चालली. अनेकांनी दुकानदार मित्रांना एका निष्णात वैद्यबुवांचा सल्ला दिला. दोघेही त्याच्याकडे गेले. त्याने दोघांनाही चांगले व्यवस्थितरित्या तपासले. दोघांच्यात कसलाच दोष आढळून आला नाही. पण त्यांनी व्होचिन व वांगचूवर उपचार सुरू केले. उपचार बरेच दिवस चालला. परंतु, गुणही आला नाही. त्यांची प्रकृती खंगतच चालली. आता त्यांच्या आयुष्याची दोरी थोडीच राहिली आहे, असे सगळ्यांना वाटू लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आतून दोघेही खूश होते.
लिपिंग हा त्यांचा हितचिंतक. त्याला दोघांच्या मानसिक आजाराबाबत शंका आली. त्याने त्यांना मानसोपचाराविषयी दोघांना सल्ला दिला. शहरात मध्यवर्ती ठिकाणी कुनफ्युशियस नावाचा एक प्रसिद्ध तत्त्वज्ञानी राहत होता. त्याने बर्यालच गुंतागुंतीच्या केसेस सोडविल्या होत्या. त्याने व्होचिन व वांगचू यांना मानसोपचारासाठी या तत्त्वज्ञानी व्यक्तीकडे पाठविले.
कुनफ्युशियसने व्होचिन आणि वांगचू यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यांचा अंतस्थ आवाज ऐकून घेतला. आणि त्यांना सल्ला दिला. दोघांनीही आपापल्या दुकानात न थांबता एकमेकांचा व्यवसाय सांभाळायचा. त्यांचा आजार घालविण्याची त्याने हमी दिली. आजार बरा होईल, या आशेने व हितचिंतक आनि कुटुंबांच्या आग्रहाखातर त्यांनी हा सल्ला मानला. व एकमेकाची दुकाने सांभाळू लागले.
आणि काय आश्चर्य! काही दिवसांतच त्यांची प्रकृती ठणठणीत झाली. आजार पळाला. आता त्यांना खर्या अर्थाने आपण एकमेकांचे मित्र आहोत, असा साक्षात्कार झाला. यापूर्वी ते दोघेही अंतस्थ एकमेकांचे द्वेष करीत होते. या द्वेषाधिनतेमुळेच त्यांनी एकमेकांच्यासमोर दुकान टाकले. एकमेकांची संपत्ती पाहून आतल्या आत इर्षेने जळत राहिले. खंगत चालले. चेहर्यावर मात्र मैत्रीचा खोटा मुखवटा होता. त्यांना कळून चुकले की, द्वेष विनाशाला कारणीभूत ठरतो.
www.machindra-ainapure.blogspot.com

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

गोष्ट चांगली आहे. मुलांसाठी लिहिताना अधिक सोप्या पद्धतीने लिहिता आली तर अजून मजा येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बोधकथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छोट्यांसाठी आलेली ही पहिली गोष्ट! धन्यवाद!
ऋषिकेश यांच्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे पाहता प्रत्येकजण इतका एकमेवाद्वितीय असतो, की त्याची जागा अन्य कोणी घेऊच शकत नाही. तरीही लोक एकमेकांची ईर्ष्या का करतात कळत नाही. सगळेजण एकाच छापाचे गुळाचे गणपती बनले तर आयुष्य किती रसहीन होऊन जाईल.
दुसरी गोष्ट संपत्ती, तारुण्य, प्रसिद्धी वगैरे गोष्टींना अवास्तव (out of proportion) महत्त्व देऊन त्यांच्याकरता झुरणे, आणि हातात असलेले सोन्यासारखे क्षण मातीमोल करणे.
गोष्ट लहानांकरता आहे की मोठ्यांकरता ते माहीत नाही पण आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालकथा छान आहे. अशा कथा संकेत स्थळावर यायला हव्यात. ऐनापुरेजी, ही कसर तुम्हीच भरून काढा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या लहानपणी वाचली असती, तर कदाचित त्यांच्या आजाराचे "द्वेष" हे रहस्य आधीच सांगितले असते, तर आवडले असते. तज्ज्ञाची युक्ती ही तितकीच आश्चर्यकारक ठरली असती - म्हणजे नीरगाठीच्या उकलीमध्ये रहस्य राहिलेच असते.

एकमेकांचे दुकान सांभाळल्यामुळे द्वेष कमी कसा होतो, ही बाब तशी गुंतागुंतीची आहे. अति-स्पष्ट न करतासुद्धा ती जरा उकलून सांगितली असती तर माझ्यासारख्या मठ्ठ बालकांकरिता बरे झाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0