वाया गेलेली बाई..!! (फेसबुक वर सात जणांनी शेअर केलेली आणि साठ कॉमेंट आलेली....माझी 'फेसबुक बाईची' कविता :))

वाया गेलेली बाई

रंगून मजेने बाई fbवर बसते ....नि घरदार वैरी होते
बाई तहान भूक विसरते ...
बाई वय विसरते
नि बाई fb च्या तंबूत घुमते ...!!!!!

पोरगं शाळेतलं काहीबाही रंगवून सांगतं
बाई नुसताच हुं हुं करते
पोरगं वरमून खालमानेनं ..थेट घराबाहेर जातं
बाई फ्रेंडशी नवा च्याट मांडते.......!!!!!!

बाई पोक काढून स्क्रीन मध्ये घुसते
नवरा गपपणी ताक घुसळतो
डावं उजवं नको जिभेचे चोचले नको
म्हणत बाई भात नि वरण उकडते .....!!!!!!!

लोग इन होईस्तोवर बाई डाळ तांदूळ धुते
पासवर्ड टाकते नि ग्यास पेटवते
चार शेरे वाचते ग्यास बारीक करते
मधेच खुदू खुदू खुसू खुसू हसते ........!!!!!!

नेट बंद पडलं तर बाई वेडीपिशी होते
याच्या त्याच्यावर मग राग ओकते
लाईनवाल्याच्या नावाने बोंबा नि शिमगा
बाई व्यसनाच्या झोम्बित अडकते ......!!!!!!

डाव्या हाताने खाते बाई उजव्याने कि बोर्ड बडवते
इस्त्रीको कपडा नही भैयाला बिनधास्त सांगते
पाहुण्यांना..... घरी नाहीच्या
रोज नव्या थापा मारते .....!!!!!!

बाईचे मित्र नवे बाईच्या गप्पा नव्या
नवरा अधून मधून पाठून डोकावतो
फोर अ चेंज बाई काही सांगायला गेली तर
नवरा ब्लेंकपणी मुंडी हलवतो........!!!!!!

बाईला रविवार दिसे ना बाईला सुट्टी कळे ना
बाई जळमटं गोळा होऊ देते
बाई कपड्याचे बोळे नि केसाच्या पिना
अलगद कोपऱ्यात सारते......!!!!!!!

बाई ज्योक गोळा करते बाई कविताही 'पाडते'
थोडं इथे तिथे हात मारून घेते
डोळे बारीक करत बाई नव्या पोस्ट वाचते
लोकांच्या लाईक वर ज्याम खुश होते .........!!!!!!!!

कोण, काय बोललं का .....तुला काही हवंय का
बाई भ्रमात एकटीच बरळते
बाई निजायला गेली तरी
उशाशी चिटोर्यावर..उद्याचे रंगीत प्लान बनवते ......!!!!!!!
बाई रंगून मजेने fbवर बसते नि घरदार वैरी होते
बाकी सारा सन्नाटा ...जणू कर्फ्यूच्या वाटा
पण बाई fbच्या पाळण्यात झुलते
बाई fbच्या तंबूत घुमते ...!!!

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

'सात शेअर आणि साठ कॉमेंट' हे वाचून मला एकदम आमच्या कणेकर गुर्जींचे 'सात गाणी आणि अकरा खून असलेली प्रेमकहाणी' आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हुह ..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा!
फेसबुक या विषयावर, एका फेसबुक सभासदाने लिहिलेली आणि फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय ठरलेली कविता ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाईक करणार्‍यांपैकी किती (फेसबुकवरच्या हे गृहितच) बाया होत्या हो? Wink

(स्वगतः आजकालच्या मॉडर्न बाया सासूला कशा प्रकारे घालून पाडून बोलतील काय सांगता येत नाही ब्वॉ!) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ह्म्म ह्म्म्म्म Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता गमतीशीर आहे खरी; पण फारच एकांगी चित्रण करणारी. कवितेमधे "एफ्बी" या प्रकाराचे दुष्परिणाम बाईमधेच दिसतात/बाईमुळेच घरादारावर होतात इत्याइत्यादि मजकूर अंमळ लिंगभेद दर्शवणारा. कविता मिष्कील भावामधे लिहिलेली असली तरी (बहुदा अनवधानाने) एकांगी झाली.

दुसरं असं की, विनोदी म्हणून जरी एखादी गोष्ट केली जाते त्यामधे भाषेचा डौल, काही एक लय, रचनेतला किमान नेमकेपणा याचं भान राखलेलं इथे दिसलं नाही. सबब, काहीशी निराश करणारी कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

@मुक्तसुनीत

मित्रा प्रतिसादा बद्दल धन्यवाद . कविता एकांगी झाली आहे म्हणण्यापेक्षा त्या एका बाजूबद्दलच लिहिली आहे कारण तीच बाजू तीव्रतेने समोर येत दिसली आहे . अगदी प्रत्येक 'प्यारा' एक एक करत वाचला तर बघ ना ...नवऱ्याचं 'बसणं' आणि बाईचं 'बसणं' ...यात नक्कीच फरक आहे ...मग ते कुठेही असो. इथे आपण फक्त fb वर बसण्याबद्दलच बोलतोय .

आज नवरे बायकांना मदत बिदत करतात मान्य करूनही ...ढोबळ नजरेने बघता घरदार आवरणे सावरणे बाईचेच काम मानले जाते ...आज ही .
अन्न उकडणं..पोरांच्या कथा ऐकणं , डबे , बायांची म्यानेजमेंट , आला गेला पै पाहुणा, आजारपणं , घरादाराची स्वच्छता आणि सरते शेवटी ....तुला काय हव्वं ते कर ...पण ही यादी डिस्टर्ब न करता कर ...अशी थोर परवानगी सुद्धा ..!!

बरेचदा बऱ्याच अगदी उच्च विद्याविभूषित वगैरे सुद्धा बर का ) मैत्रिणींशी यावर बोलणे होते ...आणि थोड्याफार फरकाने हा च सूर उमटताना दिसतो .
आणि मी नेहमीच म्हणते ...मी ही बाजू मांडली ...आता या.... दुसरी पण कोणीतरी मांडा ना !!

बाकी शब्द आणि भाषेची गम्मत हवी असेल तर येणाऱ्या कविता नक्कीच वाचत रहा Smile

या कट्ट्यावर मी नवी आहे . इथे ट्याग कसे करायचे मला ठावूक नाही ..ते कळले तर नक्कीच करेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीब, टिळकांनी "ब्रिटीशांकडून पुरेशी सूट मिळाली, खूप झालं" असा विचार केला नाही.

फेसबुकाप्रमाणे इथे टॅग करता येत नाही. इथला इंटरफेस आणि एकूणच संस्थळाचं वर्तन यातही बराच फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फेसबुकवर भारतात किती स्त्रिया आहेत याचा काही अंदाज आहे का? त्यावरून हे वर्णन किती गांभीर्याने घ्यायच आणि किती गंमतीने घ्यायच हे ठरवता येईल Smile
बाकी मुक्तसुनीत यांच्याशी सहमत. असा एकांगीपणा जे कोणी करतात त्यांच वर्णन वाचायला जास्त आवडत. असा वाहवत जाण्याचा मूर्खपणा फक्त स्त्रिया करतात हे न पटणारे आहे. करणारे करतात - त्यात स्त्रियाही असतात आणि पुरुषही असतात; न करणारेही असतात - त्यातही स्त्रिया असता आणि पुरुषही असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली, कविने सगळ्याच बाजू विवेकाने मांडण्याचा अट्टहास केला तर ती कविता कविता उरेल काय?

@मुक्तसुनित, आतिवास -असहमत.

कविकल्पेनेचे प्रतिबिंब सरसकट वस्तुस्थितीत बघितलेच पाहिजे असा नियम काय कामाचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवीने निर्णायक बाजू घेतल्या/ली की सहसा गोंधळ होतो..बाकी फेसबुकवर पडून असणार्‍यांची संख्या भयावह आहे..अधून मधून चक्कर टाकली की मधल्या काळात या पडीक लोकांनी अपडेटींचा धुमाकूळ घातलेला असतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0