कॉमन सेन्स’च्या दुःखद निधनाच्या निमित्ताने..

‘आज आपण एका वेगळ्या दुखवट्याच्या निमित्ताने येथे जमलेलो आहोत.
आज आपल्यातील व आपल्या बरोबर अनेक वर्षे साथ दिलेल्या ‘कॉमन सेन्स’ या अगदी जवळच्या मित्राच्या अकाली मृत्युमुळे झालेले दुःख जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. तो किती वयाचा होता याची आपल्याला कल्पना नाही. कारण त्याचा जन्म दाखला सरकारी फायलीतून केव्हाच गायब झाला आहे.

त्यानी वेळोवेळी आपल्याला दिलेल्या सूचना व सल्ला यांच्यामुळे तो कायमचाच आपल्या स्मरणात राहील. कारण त्याच्या सूचना व सल्ले फारच बहुमूल्य व अफलातल्या असत. कठिण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी त्याच्या सूचना फार उपयोगी पडत होत्या.

-पावसात न भिजता कसे घरी परत यायचे
-गर्दीत वाट काढत बस वा लोकल कसे पकडायचे
-मित्र-मैत्रिणींना वेळ प्रसंगी कसे कटवायचे
-इतरांचा मामा कसा करायचा
यासारख्या गोष्टी आपण त्याच्याकडूनच शिकल्या.

-आपलं जगणं वाटत तितकं सोप नाही,
-चूक झाली असल्यास माफी मागून ती चूक सुधारा,
-कदाचित माझीच चूक असेल, माफ करा,
-फार ताणण्यात काही अर्थ नाही,
-खोटं कधीना कधी तरी उघडे पडणार,
-अती तेथे माती,
-मूर्खासमोर अक्कल चालत नाही,
असं तो काहीबाही बरळत असायचा.

एक साधा सरळ मार्गाने जाणारा तो होता. गरजेपेक्षा जास्त त्याच्याजवळ काहीही नव्हते. तो नेहमीच आपल्याला काटकसरीने राहण्याचा सल्ला देत असे. कुणावर भरोसा ठेवावे व कुणावर ठेऊ नये याची त्याला चांगल्यापैकी जाण होती. केव्हा ताठरपणा दाखवावा, केव्हा माघार घ्यावी, हे त्याला कळत होते. जगात कसे वागावे, इतराशी व्यवहार कसा करावा याची त्याला चांगलीच समज होती. तो कधीही भावनावश होऊन कुठलीही कृती करत नव्हता. कठिण प्रसंगीसुद्धा तो हसत-खेळत त्यातून बाहेर पडत होता. आयुष्यभर त्यानी काही मूल्ये जपली होती. व इतरांनीही ती मूल्ये जपावी असे त्याला वाटत होते. खरे बोलावे, चोरी करू नये, निसर्गावर प्रेम करावे, थोरा-मोठ्यांचा आदर करावा, शक्य असेल तेथे व शक्य होईल तेवढे दुसऱ्यांच्या मदतीला धावून जावे, असे तो नेहमीच सांगत असे. खाण्या-पिण्यात संयम असावे, नको तेथे तोंड खुपसू नये, बोलण्यातून कुणालाही दुखवू नये, असेही काही तरी तो सांगत होता.

परंतु गेली 4-5 वर्षे तो आजारी होता. त्याच्या जगण्यावर नको तितके दडपण आल्यामुळे तो आजारी पडला. एका शिक्षकाने विद्यार्थिनीच्या शाबासकीची कौतुक करत पाठ थोपटली. त्या विद्यार्थिनीने इतका गहजब मांडला की त्या शिक्षकावर खटला भरला गेला, त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हे सगळे कॉमन सेन्सला सहन करण्याच्या पलीकडचे होते. एका मुलाने माउथ वाश वापरतो म्हणून त्याच शाळेने काढून टाकले होते म्हणे. विद्यार्थ्याला खरचटले तरी आयोडिन लावण्यासाठीसुद्धा पालकांची परवानगी घ्यायची म्हणे.

त्याला नेहमीच आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत आहे असे वाटू लागले. कुणाच्या बद्दल काही बोलायची, लिहायची चोरी. सगळे वसकन ओरडत अंगावर धावून यायचे. शाळेत काय काय चाळे चालतात, शिक्षणाचा काय खेळ खंडोबा चालला आहे ते बघून त्याला जीव द्यावेसे वाटत होते. शेतकऱ्यांसाठी काही तरी करा, हकनाक जीव देत आहेत असे म्हटल्यावर मोठ-मोठे आकडे अंगावर फेकून त्याचे तोंड बंद करायचे. एकदा तर गायीला हात लावला म्हणून त्याला रक्तबंबाळ करून तुरुंगात डांबून ठेवले. राजकीय नेत्यांना उर्मटपणाने वागू नका, तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे असे सांगायचा प्रयत्न केल्यामुळे देशद्रोही म्हणून हिणवायचे. कष्ट करून जमवलेली त्याची पुंजी एका रात्रीत (कुणाच्या तरी आततायी निर्णयामुळे) कवडीमोल झाली. शहाणी-सुरती माणसं ज्या प्रकारे मत प्रदर्शन करत होते, लांगूल चालन करत होते ते बघून त्याला वीट आला. लहान मुला-मुलींना, तरुण-तरुणींना त्यांनी कितीही सांगितले तरी ते ऐकायला तयार नव्हते.

नियती, दैव, नशीब, पूर्वजन्म, पाप-पुण्य यात काही तथ्य नाही हे कॉमन सेन्सने हजार वेळा सांगितले तरीही लोक – त्यातल्या त्यात सुशिक्षित म्हणवून घेणारे – बाबा-बुवांच्या नादी लागत होते याचे त्याला फार वाईट वाटायचे. स्त्रियांच्यावर, दलितावर होत असलेल्या अमानुष वागणुकीच्या बातम्या वाचताना त्याला फार कष्ट होत असे. आताची सामाजिक व राजकीय परिस्थिती इतकी विपरीत झाली होती की त्याला जीव नको नकोसे वाटू लागले. घरात घुसून दरोडा घालत असताना चोराने भरपूर मारपीट केली. तरीसुद्धा याच्या विरुद्धच त्या चोराने पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केली म्हणून तक्रार नोंदवली व पोलीससुद्धा त्या दरोडेखोराचीच साथ देत होते.

अगदी शेवटच्या दिवशी तर एका महिलेने मोबाइलवर बोलत बोलत गाडी चालवत असताना त्याला धडक दिली. याला लागलेले असतानासुद्धा तिने चार चौघाना जमवून स्वतःच आरडाओरडा करत तडजोडीची रकम मागू लागली. बघ्यापैकी कुणीही त्याला साथ दिली नाही. या प्रकरणानंतर त्याला आता जिवंत राहावेसे वाटेनासे झाले.

- मला माझे हक्क माहित आहेत,
- मला आताच्या आता पाहिजे,
- दुसरेच कुणी तरी दोषी आहेत,
- मलाच बळीचा बकरा बनवत आहेत,
- काहीही न करण्यासाठी मला (भरपूर) मोबदला हवा,
असे घोशा लावणारे त्याच्या मित्रांचा व नातलगांचा त्याला वीट आला होता.

बहुतेक जणांना हा मेला हे माहितीच नाही. तुम्हाला जर तो आठवत असल्यास त्याच्या निधनाची बातमी इतरांना कळवावी ही माझी कळकळीची विनंती. तुम्हालाही त्याचे अस्तित्व कधी जाणवले नसल्यास तुम्हीसुद्धा, काहीही न करणाऱ्या झुंडीच्या मागे राहून, अशी एखादी व्यक्ती होती हे विसरून जा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तो अजून आहे पण अश्वत्थामा सारखा तेल मागत फिरतोय.पण त्याच्या हितशत्रू नॉनसेन्स ने तो गेल्याची अफवा पसरवलीये

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मार्मिक दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>>>>> नियती, दैव, नशीब, पूर्वजन्म, पाप-पुण्य यात काही तथ्य नाही हे कॉमन सेन्सने हजार वेळा सांगितले तरीही लोक – त्यातल्या त्यात सुशिक्षित म्हणवून घेणारे – बाबा-बुवांच्या नादी लागत होते याचे त्याला फार वाईट वाटायचे. >>>>> !
_________
लेख आवडलेला आहे. विशेषत: विषयाचे, सादरीकरण. लहानपणी छत्रीचे आत्मकथन व तस्मात असायचे तसे हे रिपोर्टिंग जॉनरमधील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला लेख.
सोशल मिडियामुळे आणखीच वाईट अवस्था झाली बिचाऱ्याची.
पूर्वी त्याला वाटत होतं की सभ्य, सुशिक्षित, उच्चशिक्षित अशा गोंडस विषेशणांनी गौरवली जाणारी माणसं नक्कीच त्याचे मित्र असतील.
पण सोशल मिडियाने लोकांच्या मनातला गाळ उपसून वर आणून टाकला- त्याने आणि बिचाऱ्याचा भ्रमनिरास झाला असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त सांकेतिक लेखन. बेमालूम जमलं आहे. अजिबात कळून येत नाही की हे अबक राजकीय पक्षाच्या कारभाराबद्दल आहे म्हणून.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0