ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.

ललित

ऋणनिर्देश : खुप भयानक आहे.

आपण एका भयंकराच्या दारात उभे आहोत - ऐसीचा आणखी एक दिवाळी अंक येऊ घातला आहे. नेमानुसार त्यातही भयभीषण लेखन आहे. मूळ मराठी लोकांनी केलेलं लेखन कमी (बोजड) वाटतं म्हणून की काय, ह्या वर्षी इंग्लिश-हिंदीतून भाषांतरित केलेले लेखही आहेत. संबंधित आवाहनाला प्रतिसाद देऊन भाषांतराचं काम करणाऱ्या अवंती, आदूबाळ, ए ए वाघमारे, आरती रानडे, उज्ज्वला, नंदन, सोफिया, मुक्तसुनीत, चिंतातुर जंतू ह्यांचे आभार.

लेखांचं मुद्रितशोधन अमुक, मिहिर, मृण्मयी, आदूबाळ, चिंतातुर जंतू, राजेश घासकडवी, अमोघ प्रभुदेसाई ह्यांनी केलं. जडजड मराठी शब्द, किचकट वाक्यरचना आणि खुपसारीविरामचिन्हं वापरण्याबद्दल ह्या लोकांना जबाबदार मानावं.

दुवे न उघडणं, चित्रं वेडीवाकडी लागणं, तांत्रिक त्रुटींची जबाबदारी ३_१४ विक्षिप्त अदितीची आहे.

दिवाळी अंकाचं शीर्षक, मुखपृष्ठ आणि आतली व्हिज्युअल्स संदीप देशपांडेनं केली आहेत. मुखपृष्ठासाठी तांत्रिक मदत करण्याबद्दल साकेत कानेटकरचे आभार.

सगळ्यात मुख्य - अनेक लेख मिळवण्याचं आणि अंकाला दिशा देण्याचं काम रोचना आणि शैलेन ह्यांनी केलं.

दिवाळी अंकाचं सूप वाजल्यानंतरही काम असतं. अबापट ते काम लपूनछपून करतात.

दिवाळी अंकाच्या कामातून दरवर्षी काही तरी नवीन मिळतं. 'ऐसी'वर समूहाच्या शहाणपणावर विश्वास ठेवला जातो. योगदान देणारा समूह जेवढा मोठा तेवढा शहाणपणा आणि शिक्षण जास्त. ह्या समूहात नव्या लोकांचं नेहमीच स्वागत होईल.
बघताय काय सामील व्हा.
अंक निदान वाचाल तरी! वाचलाच आहात तर समाजमाध्यमांवर जरा जाहिरातही करा... कसं?

ह्यावर प्रतिक्रियांसाठी काही पर्याय पुढीलप्रमाणे -
१. I m agree
२. +१
३. आवडलं असेल तर शेअर करा
४. बघतोस काय रागानं, लाईक केलंय वाघानं

अंकाच्या मुखपृष्ठाचा दुवा.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

भयंकर आहे सगळा ऋणनिर्देश

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंक खूप महत्त्वाचा अन वाचनीय असणार .
खूप शुभेच्छा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मसाप पुणे यांची दिवाळी अंक स्पर्धा आहे . त्यामध्ये ऑन लाईन चाही
विभाग आहे .
साहित्य संपादक टीमला योग्य वाटल्यास त्यामध्ये अंक पाठवता येईल .
शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I am in.
लपुनछपून काम का करतात? दारे_स_लाम'ला मदरशा'त शालेय शिक्षण झालंय का त्यांचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंते जार कर ऱ्या हूं.‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

भारी ऋणनिर्देश.

पूर्वी जसपाल भट्टी यांचा फ्लॉप शो कार्यक्रम असायचा त्याची क्रेडिट टायटल्स आठवली. Production Damager, Misdirection वगैरे असायची क्रेडिट्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिला दिवाळी अंक काढला तेव्हा फार कृतकृत्य वगैरे वाटलं होतं. मग पुढचा अंक काढताना मागच्या अंकातल्या त्रुटी दिसायला लागल्या. आता आठवा अंक काढण्याचं काम सुरू आहे आणि ते सुरू करण्याआधीच स्वतःच्या उणिवा माहीत आहेत; आणखी किती काय करता येईल ह्याची जाणीव असते.

सुदैवानं ही काही स्पर्धा नाही; ही शेवटची संधी नाही. म्हणून समूहाचं शहाणपण, more the merrier वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिक्रियांसाठी पर्याय ५:

फार मोलाची माहिती दिलीत मैडम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

करता आहात तेच खूप आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुमोदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतोय!
मुखपृष्ठ ह्यावेळी चलचित्र आहे - हे सही.
पण ते नक्की काय आहे?
आणि रंगसंगती लाल-काळा-राखाडी हे नाझी जर्मनीला उद्देशून आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण ते नक्की काय आहे?

काहीच अर्थबोध झाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थबोध झाला तर तो ऐसीचा दिवाळी अंक कसला??

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला जो अर्थबोध झाला ऐसीच्या चलचित्रा चा तो असा आहे

१-
राष्ट्रवाद आणि ळ हा वेगळा दाखवलाय यातुन नेहमीच्या राष्ट्रवाद सारखा सध्याचा भारतात जाणवणारा राष्ट्रवाद हा नसुन हे एक म्हणजे हा जो सध्याचा राष्ट्रवादाचा जो काह प्रकार चालु आहे हा हे एक वेगळच जन मानसात घोंघावणार वादळ आहे. राष्ट्र वाद शब्दातील वाद आणि ळ यातुन जे वादाचं मोहोळ उठलय ते दाखवण्यात हा शच्द विस्कळीत करुन दाखवुन मोठं कौशल्य साधलेलं आहे.

रंग लाल आहे म्हणजे बहुधा यातुन या तथाकथित राष्ट्रवादळातुन निर्माण होत असलेली सध्याची हिंसा दर्शवायची आहे. हा राष्ट्रवाद कसा रक्तरंजित आहे हे दाखवण्यासाठी रक्तवर्णाचा वापर केला आहे.

सभोवताल चा काळा रंग प्रामुख्याने वातावरण उदास कलुषीत झाल्याचे दाखवत आहे. समुहमन हे उदासीन नैराश्यात आहे असे किंवा एकुण समुह मानस राष्ट्रवादाच्या काळ्या गर्तेत अडकलेल आहे. वगैरे किंवा अजुन अलंकारीक म्हणजे राष्ट्रवादळ ही नव्या अंधारयुगाची नांदीच आहे जणु

ढासळणारी सतत ढासळणारी वाळु बहुधा दिसते ती सातत्याने ढासळत असलेल्या सद्य समाजातील मुल्य व्यवस्थेचे प्रतीक असेल. बर त्यात एक सातत्य आहे म्हणजे ह्रास जो आहे तो सातत्याने होत आहे.

STATE of mind यात जो साधा मनाची अवस्था अर्थ निघतो त्याला कलाटणी देउन मुद्दाम स्टेट ला STATE कॅपिटल लेटर मध्ये दाखवुन शासनाकडे शासनशक्ती कडे सुचक निर्देश केलेला दिसतो. पुन्हा प्र्श्नचिन्ह लावुन हे शासन हे स्टेट ला माइंड आहे का ? असा टिळक स्टाइल मध्ये सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा बहुधा सवाल केलेला दिसतो

यानंतर जे काय आहे ते बौद्धिक आकलना पलीकडचे आहे म्हणजे ( माझ्या ) यानंतर जे आहे ते आत्म्यावर परीणाम करणारे आहे
किंवा असे म्हणु या की भावनेला हात घालणारे आहे
की आहे हे असे आहे
भेसुर संदिघ्द अस्पष्ट अनामिक भय निर्माण करणारे वा करणारी सध्याच्या वातावरणातील मनोवस्था
भय इथले संपत नाही वा ही दरी येइ हळु हळु मागे सारखे कायतरी फिलींग्
बाकी खरा काय हेतु होता हे निर्मात्याने सांगितल तर जाणुन घ्यायला आवडेल्
असो
ताजा कलम -
ळ च्या हातात खंजीर दिला आहे का ? मला तो भास होतो आहे ? हे मोठ कन्फ्युजन आहे
निर्मात्यांनी खुलासा केल्यास बर होइल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

रंग लाल आहे म्हणजे बहुधा यातुन या तथाकथित राष्ट्रवादळातुन निर्माण होत असलेली सध्याची हिंसा दर्शवायची आहे. हा राष्ट्रवाद कसा रक्तरंजित आहे हे दाखवण्यासाठी रक्तवर्णाचा वापर केला आहे.

तुमच्या अर्थनिर्णयनाबद्दल आभार! रक्त म्हणजे केवळ हिंसाच नव्हे. उदाहरणार्थ, आजच प्रकाशित झालेल्या ‘रक्त’ शीर्षकाची राणामामाची गोष्ट वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझं इंटरप्रिटेशन (विद्वान हाच शब्द वापरतात.) वेगळं आहे.
१- सहमत. वाद नव्हे तर वादळ.
.
२ - संपूर्ण लाल-काळा-राखाडी ही रंग संगती मला तरी फॅसिष्ट प्रवृत्ती दर्शवणारी वाटते. सद्यस्थितीतला तथाकथित राष्ट्रवाद = फॅसिष्ट असं ह्यातून ध्वनित करायचं आहे.
पहा - हे
अ - https://en.wikipedia.org/wiki/Fascist_symbolism
.
४ - हा, हे रोचक आहे. खाली पडणारा काळा द्रवपदार्थ काय आहे? दिसायला छान दिसतं म्हणून ते तसं आहे- एवढंच स्पष्टीकरण पुरेसं नाही का? ह्याला काहीच सिंबॉलिझम नसेल.
तसा सिंबॉलिझम शोधता येईलच, येतोच.
आठवा - मा. आदूबाळांनी मागे "गोली मार भेजे मे" हे गाणं खलप्रवृत्तीदर्शक नसून भगवंताची आळवणी करणारं मधुराभक्तीचं प्रतीक आहे हे सहोदारण सिद्ध केलं होतंच.
.
५- साधारण सहमत. STATE ह्या शब्दावर कोटी आहे.

शेवटी संदीप देशपांड्यांनाच खरं खोटं माहिती. पण सदा सरवणकर ह्यांच्याकडून १८००० मतांनी पराभव झाल्यामुळे ते ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला उपलब्ध होतील असं वाटत नाही.
किंवा पराभूत झाल्याने आता तसं काय काम - तेव्हा होतीलही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(संकल्पना /राष्ट्रवाद) गोइंग डाउन द ड्रेन/स्युअर?
--------
भोंडल्याची खिरापत ओळखणेही सोपं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या 'लोकसत्ता'मध्ये अंकाची दखल घेतली आहे. इपेपरचा दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.