पूर्तता (गझल)

पूर्तता आहे खरी की फक्त आहे सांगता
ही तुझी आहे व्यथा की व्यर्थ केवळ आर्तता?

मांडतो आहे कधीचा मी हिशेबी आकडे
दूरवर आहे जरी येथे कधीची शून्यता

शब्द का यावेत ओठी या क्षणी तू सांग ना
आज वाचूया पुनः डोळ्यांतली ही मुग्धता

शोधतो आहे मला माझ्या मनी मी सारखा
का तुला समजेल माझी ही फुकाची व्यग्रता?

गोवले आहे स्वतःला भोवऱ्यांच्या आत अन्
वाटते की जाणतो मी जीवनाची भव्यता...

- कुमार जावडेकर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शेवटचा शेर विशेष आवडला.. अतिशय सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile