अमृतांजन पुलाखालची स्मरणशिला.

पुणे-मुंबई रस्त्यावरील घाटामध्ये काही पिढ्या उभा असलेला आणि ’अमृतांजन पूल’ ह्या नावाने माहीत असलेला पूल अलीकडेच काही दिवसांपूर्वी पाडण्यात आला हे आपण सर्वांनी वाचलेले आणि पाहिलेले आहे. हा घाटरस्ता बांधला गेला त्या घटनेच्या स्मरणासाठी एक संगमरवरी स्मरणशिला त्या पुलाच्या खाली मला आठवते तेव्हांपासून उभी होती. त्या पूर्वीहि ती तेथेच असणार. तिचे चित्र खाली दाखवीत आहे.


स्मरणशिला
ह्या लेखात म्हटल्याप्रमाणे दक्षिण पठार आणि कोंकण ह्यांमध्ये चाकाच्या वाहनांची येजा सुरू झाल्याने दळणवळण सोयीस्कर झाले. ह्यापूर्वी माणसांच्या अथवा जनावरांच्य़ा पाठीवरून होत असे आणि ते किती त्रासदायक होते ते ह्या संस्थळावरील ’१८२६ सालातील प्रवासीमित्र’ ह्या माझ्या लेखातील पुणे-मुंबई प्रवासाच्या वर्णनावरून कळून येईल.

पूल पाडल्यानंतर त्याखालील स्मरणशिळेचे काय झाले हे जाणून घ्यायची मला इच्छा आहे. हे कोणास ठाऊक आहे काय? असल्यास खाली प्रतिसाद देऊन कळवावे. हा लेख कोठल्यातरी संग्रहालयात ठेवला जावा जेणेकरून इतिहासाचा हा दुवा पुढच्य़ा पिढ्यांसाठीहि टिकून राहील. इतिहासाचे पुरावे जपण्याबाबतची भारतीय अनास्था प्राचीन आहे. त्या अनास्थेचा बळी हा लेख न व्हावा. संबंधित खात्यामध्ये कोणाचा काही संबंध असल्यास तेथे खटपट करून हे सहजसाध्य आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोड्या खटपटीनंतर मलाच वरच्या प्रश्नाचे उत्तर सापडले. 'हिंदु'मधील ह्या बातमीनुसार ती संगमरवरी शिला बांधकामखात्याच्या लोणावळ्यातील कार्यालयामध्ये सध्यापुरती ठेवली आहे आणि नंतर ती कोठेतरी सुरक्षित स्थळी ठेवण्यात येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्मरणशिलेवरील मजकुरात 'मर्चण्डाइझ' या शब्दाचे स्पेलिंग 'MERCHANDIZE' असे अमेरिकन पद्धतीने केलेले पाहून आश्चर्य वाटले.

बाकी, DECKAN नि CONKAN वगैरे स्पेलिंगे पाहून मौज वाटली, परंतु ती तत्कालीन स्पेलिंगांची क्वर्के म्हणून सोडून देता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाचे जतन -

हा लेख कोठल्यातरी संग्रहालयात ठेवला जावा जेणेकरून इतिहासाचा हा दुवा पुढच्य़ा पिढ्यांसाठीहि टिकून राहील. इतिहासाचे पुरावे जपण्याबाबतची भारतीय अनास्था प्राचीन आहे. त्या अनास्थेचा बळी हा लेख न व्हावा.

नेहरु सेंटर वरळी - डिस्कवरी ओफ इंडिया प्रदर्शन - इथे बरीच चित्रे, माहिती ठेवली आहे. तिथे लेख पिडीएफ देता येईल.(लेखाची लिंक कॉमेंट मध्ये टाकून.) संपर्क इमेल नाही पण फोन आहे.
(फेसबुक पेज

मुख्य साइट
http://www.nehru-centre.org
http://www.nehru-centre.org/library/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख म्हणजे शिलालेख संग्रहालयात ठेवला जावा असे म्हणायचे असेल कोल्हटकर साहेबांना- हा ऐसीवरचा लेख नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या शिळेबरोबर हा ऐसीवरचा लेखही ठेवावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संग्राह्यतेचे निकष व्यक्तिसापेक्ष असतात. तुम्हाला हा लेख संग्राह्य वाटत असेल तर असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संग्रहालये कॉपीराईटमुक्त साधनांच्या, वस्तूंच्या शोधातही असतात. आपण दिले तर ती पीडीएफ प्रिंट करून त्यासोबत ती पाटी ठेवतीलही. कारण बिनपुलाची ती पाटी ठेवणार कुठे आणि कशाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कारण बिनपुलाची ती पाटी ठेवणार कुठे आणि कशाला?

हा काय चेशायर क्याटसारखा काही प्रकार आहे काय?

बोले तो, "स्मरणशिलेविना पूल असू शकतात. परंतु, पुलाविना स्मरणशिला??????" असे काही?
----------

Cheshireचा उच्चार मराठीत आमच्यात असाच करतात. (Courtesy: चिंजं.)

आणि Catचा असा.

आठवा: ॲलिस इन वंडरल्याण्ड. “Well! I've often seen a cat without a grin,' thought Alice 'but a grin without a cat! It's the most curious thing i ever saw in my life!”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

i लहान कसा? का तसं लिहितात तुमच्यात?

ते जौंद्या, पन तुम्ही लै भारी मानूस हेत राव. मला त्या इंग्रजीतलं कायबी कळ्ळं नाय. तुम्हाला कळ्ळंबी आन आख्खं वाक्य आठावलंबी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ऐसी अक्षरे'शी संबंधित असलेले इतिहासतज्ज्ञ शैलेन भांडारे यांचा लोकसत्तेत आलेला हा लेखही वाचनीय आहे.
‘अमृतांजन’ पुलाची गोष्ट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.ती शिळा बांधकाम खात्याच्या कार्यालयात ठेवलीये हे वाचून थोडे तरी बरे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0