शतकामृत २

सुदामा- कृष्णास

हरी कशितरी करालं सुटका मलाना दिसे
सख्या मज कळेलका 'अभय' हे जिथेरे वसे?
कधी भुलवला नव्हे सुपथ तरी सर्व धुके
कुठे ढवळला नव्हे अरस तरी पोहे सुके

कृष्ण-सुदामास
भल्ला भैताड आय बे तू! एव्हडा कठीण विचार करत असते का बावा?आता पोह्याचच पाय नं...

गोड पोहे चावत चावत तिखट मरिचा यावा
तोच जिभेवर फुंकर मारत निंबूही लागावा
तशी अचानक दाढीत फुटती कटुबीजे तयाची
खारट,तुरट,मेदूर,बिकट साद घालित नाची

तसे सुदामा जीवन असते सर्व रसांची माला
शोक कशाला? मिसळूनी घेऊ निज गोपाळ काला

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

(काही नाही, नुकतीच बकरी ईद झालीय (चूभूद्याघ्या.), हलाल होणारा बकरा अंमळ बोंबलून राहिलाय, इतकेच.)

बादवे,

गोड पोहे चावत चावत तिखट मिरचा यावा
तोच जिभेवर फुंकर मारत निंबूही लागावा

मिरची ही चीज मुळातली अमेरिका खंडातील. कोलंबियन एक्सचेंजद्वारे प्रथम युरोपात पोहोचली, आणि तेथून पोर्तुगीजांबरोबर हिंदुस्थानात आली. सबब, (तुमचे कृष्ण-सुदामा हे वास्को द गामाचे समकालीन किंवा त्यानंतरचे असल्याखेरीज) सुदाम्याच्या पोह्यांत मिरच्या आढळते निव्वळ अशक्य.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे तुमचं
बघावे लागेल हे. काहीतरी वेगळं तिखट घालावे लागेल पोह्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शृंगवेर अथवा पिप्पलीमूल वापरून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला 'मरिचा' (pepper) सापडला, तिखटही आहे.
chilli च्या आधी वापरात होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0