एका डॉक्टरची करोना बखर

Covid-१९ साथीला जरा वेग यायला सुरुवात झाली होती. सरकारी पातळीवर pandemic साथीत असते तसेच किंबहुना या वेळेस जरा जास्तच गोंधळाचे वातावरण!!!

पण proud of profession!!

जरा सावधानतेनेच पेशंट बघत होतो. मधेच सरकारी आदेश... ताप, अंगदुखी, खोकल्याचे पेशंट (महानगरपालिकेच्या) Flu clinicला पाठवा... या आदेशाचे पालन करून रिसेप्शन काउंटरला पेशंटला अपॉइंटमेंट देताना, आधी लक्षणे विचारून अशा पेशंटना अपॉइंटमेंट न देता परस्पर फ्लू क्लिनिकला जाण्याची सूचना देत होतो.

Doctor

पण पेशंट जरा जास्तच हुशार! कान, सर्दी किंवा डोकेदुखीचे कारण अपॉइंटमेंट घेताना सांगून क्लिनिकमध्ये हजर! आणि तपासायला लागल्यावर हळूच थोडासा ताप आला किंवा जरासा खोकला आहे असे सांगत होते. आपल्या नेहमीच्या डॉक्टरकडेच जावे... कशाला उगाच सरकारी फ्लू क्लिनिकला जायचे? शिवाय तिथे रांगेत Covid-१९च्या संसर्गाची भीती!

तेवढ्यात दोन PPE किट्स मिळवण्यात कसेबसे यश आले. त्यानंतर मग PPE किट घालून रुग्णसेवा सुरू केली. सतत PPE किट घालून काम करणे, ते देखील बुद्धी पणाला लावून म्हणजे दिव्य काम! घामाच्या धारा, आतून ओलेचिंब आणि थोडे सफोकेशन! PPE किट वापरायला लागल्यावर सुरुवातीला फार सुरक्षित वाटत होते. पण काही दिवसातच PPE किटबद्दलचे जगभरातील अनुभव ऐकून जरा भ्रमनिरासच झाला. तरीही सामाजिक सेवेची बांधिलकी आणि लोकांनी थाळ्या वाजवून दिलेले प्रोत्साहन यामुळे रुग्णसेवा चालू ठेवली.

६ जुलैला काही संशयास्पद तर काही किरकोळ रुग्णांना तपासले, असेच सात दिवस गेले आणि सोमवारी १३ जुलैला एक मध्यम वयाची, साधारण पन्नाशीची बाई पेशंट म्हणून आली. सहा तारखेला ती डोकं दुखतंय म्हणून आली होती. पण नंतर दोन दिवसातच दुखणं एकदम कमी झालं होतं. आता परत ते दुखणं वाढल्याची तक्रार तिने केली. परत तिचं BP, Temperature तपासलंच, पण सध्याचा scenario बघता तिचा SPO२तपासला - सर्व नॉर्मल. डोक्यात किडा वळवळला. तिला RT-PCR आणि isolation सांगितले. नेहमीच्याच chronic sinusitisच्या पेशंट असल्याने X-ray, PNS इन्व्हेस्टीगेशनला पाठवले. मुलीला दोन दिवस सुट्टी टाकून आईला पूर्ण आराम देण्यास बजावले. त्यांचा X-ray रिपोर्ट संध्याकाळी मिळाला आणि PCRची अपॉइंटमेंट दिनांक १५ जुलै बुधवारची मिळाली.

पुण्यातील COVID -१९च्या पेशंट्सची संख्या फार वाढली होतीच, पण आपल्या वयाची (६२ वर्षे) जाणीव होतीच. एका गूढ विचारात मंगळवारी १४ जुलैला दुपारनंतर क्लिनिक काही काळाकरिता तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला. Retired unhurt (hopefully) अशी मनाची समजूत घातली, पण धाकधूक होतीच.

गुरुवार दिनांक १६ जुलै... दुपारी एक वाजता पेशंटचा फोन आला, COVID -१९ पॉझिटिव्ह.

एका क्षणात पायाखालची जमीन सरकली!!

आजपर्यंत ७८ पेशंट पॉझिटिव्ह निघाले होते, मग आजच काय झालं?

ती महिला म्हणजे, माझ्याच क्लिनिकमधे, माझ्याच केबिनमधे काम करणाऱ्या स्टाफची आई!!
म्हणजे जर ती सहा जुलैपासून COVID -१९ पॉझिटिव्ह असेल तर माझी स्टाफ assistant (पेशन्टची मुलगी) पण asymptomatic carrier असू शकते, जी गेला आठवडाभर माझ्या केबिनमध्ये काम करत होती.

थोड्या हुशारीनेच तिला १३ तारखेपासून रजा देऊन आईला आराम देण्यास सांगितले होते. हे पुढे शहाणपणाचे ठरले. कारण मला, माझ्या इतर स्टाफला, तिच्या उपस्थितीमुळे असलेल्या धोक्याचे प्रमाण जरी रजेमुळे कमी झाले असले, तरी मागच्या आठवड्याचे काय? धास्तावलेल्या अवस्थेतच तिला तिच्या सगळ्या कुटुंबाला COVID टेस्ट करून घेण्यास बजावले. कारण दोन खोल्यांचं घर आणि चार माणसं!!

शुक्रवारी संध्याकाळी त्या सगळ्यांचा रिपोर्ट येईपर्यंत मनावर खूप दडपण होते... आणि... what a relief!! All reports negative!!!

त्या दिवसानंतर मी फक्त विनामूल्य ऑनलाईन consultation करीत आहे. मागील तीन आठवड्यात २२० संशयित रुग्णांपैकी ९४ जणांना COVID -१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

---
डॉ शिरीष चाबुकस्वार.
कान, नाक, घसा तज्ज्ञ
पुणे

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet