अपलोड-वेणा

सिंग्युलॅरिटीच्या या गोठल्या वर्तमानकाळात
संगणकेश्वराच्या फतव्याबरहुकूम
माझा सायबोर्गावतार संपविण्यासाठी
अपलोडतोय महास्मृृतिकोषात
माझ्या जाणिवा, नेणिवा,
अन्
होलोग्राफिक अस्तित्वखुणा.

ई-जैवकचरा होऊन वितळेन मग
पुनर्घटनाच्या अखंड धगधगत्या यज्ञात.

हजर होईल
माझा डिजिटलावतार
कधीही, कुठेही.
संगणकेश्वराच्या मर्जीनुसार.

सायबरअमरत्वाच्या
या दुर्धर अटळ अपलोड-वेणा
माझ्या एकेका सर्किटनसेतून
ठिबकू लागल्यायत.
अनावर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कधीपासून होतंय हे असं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या तळटीपाविरहितप्रतिसादारंभमुहूर्तापास्नं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगणकेश्वराचा शॉर्टफॉर्म संकेश्वर होऊ शकेल , कवितेच्या कायेत सुबक दिसायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेच्या कायेला "संकेश्वरी" झोंबेलसे वाटते

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडींग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0