कायगाव टोका, प्रवरासंगम येथिल शिल्पे: भारतीय दृष्यकलेचा आगळा नमुना

कायगाव औरंगाबादपासून तीसेक किलोमिटर अंतरावर आहे. अजंठा आणि वेरूळच्या लेण्यांनी या मंदिराला फुटेज मिळण्याची संधिच दिली नसल्याने असेल. पण गोदावरी नदीच्या काठावरचे हे भलत्याच सुंदर लोकेशनवर असलेले हे मंदिर थोडेफार प्रसिद्ध व्हायला हरकत नाही. भारतभर मंदिरे पाहत हिंडणाऱ्या वास्तुविशारद मित्राने मला जवळजवळ ढकलत हे मंदिर दाखवायला नेले म्हणून अन्यथा माझ्या इनर्शियाला सीमा नाही. या मंदिराचा त्याने घेतलेला व्हिडिओ येथे: https://youtu.be/RZ06VNlpboM प्रथमतः पाहिले तेव्हाच ह्या मंदिरातल्या शिल्पांनी मन मोहून घेतले होते. काल परत जाणे झाले तेव्हा त्या शिल्पांमधले साधे पण मोहक सौंदर्य मनभर ठसले. प्रचेतस यांचा 'मिसळपाव'वरचा या मंदिरावरचा अतिशय सुंदर लेख वाचलात तर खुप उत्तम माहिती मिळेल दुवा. मी मात्र येथील काही विशिष्ट शिल्पांवरच भर देत वास्तुशिल्पींच्या आगळ्या कारागिरीवर चार गोष्टी खरडत आहे. पेशवेकालिन मंदिरांमध्ये इतकी कलाकुसर केलेली मंदिरे फार नसावीत असे वाटते. मुख्य हेतू रोचक छायाचित्रे दाखवणे आणि यापैकी काही शिल्पांच्या मागच्या प्रेरणा काय असाव्यात हे जाणून घेणे हा असेल. ऐसीवरच्या जाणकारांनी अधिक माहिती देणेचे करावे. विनंती विशेष.

१.
नंदी

सर्वप्रथम नंदी. किती नाजूक कोरीवकाम आहे. घंटा, वशिंड, पायाचे खुर, इतर दागदागिने बारकाईने कोरलेत.

२.
विश्वरूपदर्शन

इथे कृष्णाने विश्वरूपदर्शन दाखवले तो आणि कालियामर्दन केले तो असे दोन देखावे एकत्रीत कोरलेले दिसतात. विश्वरूपदर्शन छानच वठलेय, पण वर ते बैलाचे तोंड का बरे आहे? कालियाशी झोंबी घेणारा किशोरवयीन कृष्ण भारी जमून आलाय.

३.
भिमाचे गर्वहरण

भिमाचे गर्वहरण करायला शेपटी पसरून बसलेला वृद्ध वानर झालेला मारूती.

४.
Kanha

हा कृष्णाच्या लिळांचा फक्कड जमलेला शीन. दे रे कान्हा चोळी-लुगडी वाला. बहुतेक तेच असावे.

५.
योगी १

योगासनात मग्न योगी. दाढी वेगळीच दिसतेय ना! योगमुद्रा नेमकी कुठली हे कळले नाही.

६.
शिल्पपट्टीका१

चित्रात चित्र असावे तसे इथे शिल्पात शिल्प कोरलेय. हेच मंदिर आहे हे उघड आहे. हत्तीचा डौल पहाण्यासारखा. मधल्या शिल्पातले पेशवे दिसतात, बसण्याच्या स्टाइलवरून तसे वाटते.

७.
शिल्पपट्टीका२

मुख्य शिवमंदीराच्या बाहेरच्या भिंतीवरची शिल्पपट्टीका. कृष्णलिला तसेच गणपती अशी बरीच रोचक शिल्पे इथे कोरली आहेत.

८.
काली

ही बहुतेक काली किंवा चंडिका. हातातल्या मुंडक्यावरून तसेच पायाखालच्या दैत्यावरून तसे वाटते.

९.
वराही

देहरचनेवरून ही वराही वाटते. तिचे वाहनसुद्धा वराह असे कसे कळले नाही.

१०.
१०

हा बहुतेक इंद्र. कि गजांतलक्ष्मी? मुर्तीच्या उजव्या हातात काय आहे कळले नाही.

११.
लक्ष्मी

हे विष्णू व गरूड. कि लक्ष्मी व गरूड?

१२.
कौमारी

कौमारी.

१३.
माहेश्वरी

माहेश्वरी

१४.
शुकवाहिनी

पोपट वाहन असलेली ही देवता कोण?

१५.
लक्ष्मी

रक्तांबुजवासिनी लक्ष्मी. कमळ काय सुंदर चितारलेय.

१६.
नारसिंही

सिंह वाहन असणारी नारसिम्ही. कि महिषासुरमर्दिनी?

१७.
लघुशिल्प १

ह्या शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आकार. ह्यातली प्रत्येक चौकट ३ ते ६ इंच उंचीची असेल. खुप नाजुक कोरीवकाम आहे.

१८.
लघुशिल्पे २

वरीलप्रमाणेच लघुशिल्पांच्या चौकटी, दुसऱ्या भिंतीवरच्या.

१९.
नरसिंह

खांब फाडून आलेला व हिरण्यकश्यपूचे पोट फाडणारा नरसिंह. प्रल्हाद बघत उभा आहे.

२०.
वराहावतार

पृथ्वी सुळ्यावर तोलून घेतलेला वराहावतारी विष्णू. त्याने फेकून मारलेली गदा असुराच्या गदेवर आदळलेली दिसते. पृथ्वीवर प्राणीमात्र कोरलेले आहेत. दिसली मुर्ती की फास शेंदूर या आपल्या देदीप्यमान परंपरेला अनुसरून सुंदर शिल्पाचे बरेचसे वाटोळे करून झाले आहे.

२१.
गणेश

गणेश

२२.
योगी २

प्रमाणबाह्य मापीचे लिंग हे या मुर्तीचे वैशिष्ट्य. पण स्त्रीयांप्रमाणे असणारी स्तनाग्रे, लांब केस, भुवया यामुळे हे शिल्प पुरूषाचे वाटत नाही.

२३.
शारदा

मोर, हातातली विणा व वेद यावरून स्पष्ट आहे ही सरस्वती.

२४.
स्वयंवर

इथे स्वयंवरे रेखलीयेत. अर्जुनाचे व रामाचे स्वयंवर स्वयंस्पष्ट आहे.

२५.
peshwe

हे बहुतेक पेशवे असावेत.

२६.

La

लक्ष्मी-नारायण?

२७.

माकडचाळे१
माकडचाळे१

२८.
माकडचाळे२

माकडचाळे२

२९.
माकडचाळे३

माकडचाळे३

३०.
सिंहत्ती

सिंहत्ती.

३१.

मंदिर

टॉप व्ह्यु.

भारतीय शिल्पकर्मींची धाडसी अभिव्यक्ति पाहण्यासाठी ह्या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी. ही शिल्पे पहाताना मला भारतीय दृष्यकलेसंबंधी आणखी खोलवर विचार करता आला.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

फोटोज आले नाहीत का!! Sad
काय चुकले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पुंबा, जर क्रोममध्ये, ओपन इमेज इन न्यु टॅब केले ना तर सगळ्या इमेजेस उघडतायत. बेटर येट, नबांच्या खफवरच्या सूचना अंमलात आणा. सर्वं सूचना नव्हे फक्त या इमेजेस बद्दलच्या हाहाहा!

इथे कृष्णाने विश्वरूपदर्शन दाखवले तो आणि कालियामर्दन केले तो असे दोन देखावे एकत्रीत कोरलेले दिसतात. विश्वरूपदर्शन छानच वठलेय, पण वर ते बैलाचे तोंड का बरे आहे?

बैलाचे तोंड मोजता, ही मूर्ती दशमुखी आहे. शिवाय २ योद्धे या मूर्तीवरती धनुष्य-बाण रोखून आहेत. मग ते राम-लक्ष्मण असावेत का? पण रावण काही सहस्र्बाहू नव्हता. बरं तुम्ही म्हणता तशी विश्वरुपदर्शन असती तर समोर हात जोडलेला अर्जुन हवा. तो पण नाही.
बरं सहस्रबाहू कार्तवीर्य म्हणावा तर त्याला एकच तोंड होते.
ही मूर्ति कळत नाहीये.

ही बहुतेक काली किंवा चंडिका. हातातल्या मुंडक्यावरून तसेच पायाखालच्या दैत्यावरून तसे वाटते.

काली असती तर लोलजिव्हा असती म्हणजे जीभ लोंबणारी. दुर्गा आहे ती.

हा बहुतेक इंद्र. कि गजांतलक्ष्मी? मुर्तीच्या उजव्या हातात काय आहे कळले नाही.

गजसमारुढा ऐंद्री आहे ती.

देहरचनेवरून ही वराही वाटते. की वराह? तिचे वाहनसुद्धा वराह असे कसे कळले नाही.

वाराही आहे ती.
दुर्गेचे युद्ध चालू होते तेव्हा तिच्या शरीरातून ज्या शक्ती निघाल्या त्या - ऐंद्री, वाराही, कौमारी, नारसिंही, वैष्णवी, ब्रह्माणी वगैरे ( अन्य देवांच्या) शक्ती होत्या. त्या त्या देवाचे वाहन व शस्त्र त्यांच्याकडे होते.

नृत्यगणेश व शारदा सुंदरच आहेत.

भीमाचे गर्वहरण कसली मस्त आहे. अवाढव्य भीम आणि इवलासा आपला हनुमान.

लक्ष्मी नारायण आहेत की विष्णुचे द्वारपाल जय-विजय आहेत?

अर्जुनाचे व रामाचे स्वयंवर?

फक्त अर्जुनाचे आहे. बाकी ४ भाऊ आहेत. व अर्जुनाने मत्स्य-चक्षु-वेध घेतला आहे.

दिसली मुर्ती की फास शेंदूर या आपल्या देदीप्यमान परंपरेला अनुसरून सुंदर शिल्पाचे बरेचसे वाटोळे करून झाले आहे.

सत्य आहे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न बा यांनी खरडफळ्यावर दिलेल्या सूचना पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथे कृष्णाने विश्वरूपदर्शन दाखवले तो आणि कालियामर्दन केले तो असे दोन देखावे एकत्रीत कोरलेले दिसतात. विश्वरूपदर्शन छानच वठलेय, पण वर ते बैलाचे तोंड का बरे आहे? कालियाशी झोंबी घेणारा किशोरवयीन कृष्ण भारी जमून आलाय.

तो रावणवधाचा प्रसंग आहे. दहा मुखे आणि वीस हात. रावणाचे दहावे मुख गर्दभाचे होते असा पुराणांत उल्लेख आहे. अगदी वेरुळच्या २१ व्या क्रमांकाच्या रामेश्वर लेणीतही रावणाचे गर्दभ मुख दाखवलेले आहे. बाजूला राम, लक्ष्मण आहेत आणि वृक्ष उपटून रावणावर धावून जाणारा हनुमान आहे.

योगासनात मग्न योगी. दाढी वेगळीच दिसतेय ना! योगमुद्रा नेमकी कुठली हे कळले नाही.

पुराणे आणि महाकाव्यात एका पायावर उभे राहून तप करणाऱ्या ऋषींचे खूप उल्लेख आहेत त्यातलाच अग्नीसाधन तप करणारा ऋषी.

देहरचनेवरून ही वराही वाटते. तिचे वाहनसुद्धा वराह असे कसे कळले नाही.

ही वाराहीच,पण हीचे वाहन हे महिष दाखवले आहे.

हे विष्णू व गरूड. कि लक्ष्मी व गरूड?

ही सप्तमातृकांपैकी एक- वैष्णवी

पोपट वाहन असलेली ही देवता कोण?

पोपट हे मदनाचे वाहन आहे, दक्षिणेत मीनाक्षी देवीचे वाहनही शुक हेच आहे. इथली बहुधा कुठलीतरी योगीनी आहे.

सिंह वाहन असणारी नारसिम्ही. कि महिषासुरमर्दिनी?

दुर्गा किंवा नारसिंही. नारसिंही इकडे अगदी अभावानेच आढळतात.

इथे स्वयंवरे रेखलीयेत. अर्जुनाचे व रामाचे स्वयंवर स्वयंस्पष्ट आहे.

संपूर्ण प्रसंग द्रौपदीस्वयंवराचा आहे. मत्स्यभेद करणारा अर्जुन, शेजारी त्याचे ४ भाऊ, सिंहासनावर बसलेला द्रुपद, वरील बाजूस असलेले कृष्ण, बलराम.

लक्ष्मी-नारायण?

ह्या मंदिरावर दिक्पाल आहेत. डावीकडचा एडका हे वाहन असणारा अग्नी आणि उजवीकडे हत्ती हे वाहन असणारा इंद्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रचेतस, सामोजी, धन्यवाद!!
खुप गोष्टी क्लियर झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

फोटो मस्त आलेत. हे सांगायचेच राहीले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो सुंदर आहेत; आधी माहीत नव्हतं ...

प्रचेतस ह्यांच्या लेखाचा दुवाही लेखातच द्याल का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद.
दुवा लेखात समाविष्ट केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************