"ब्रह्मांडाचे प्रचंड पिठले"

ब्रह्मांडाचे प्रचंड पिठले उकळत राही फतफत फतफत
मात्र तयातील मानवतेची परवड आता नाही बघवत
व्हायरस जेंव्हा चालून येई कधी करोना कधी इबोला
कशामुळे तो देवाने हा धरिला आहे असा अबोला?

निसर्गास जो मानव पिडतो , निसर्ग पिडतो मानवतेला
सांग मला तू असा तमाशा कशासाठी तो उगाच केला ?
गतजन्मीची पापे अथवा या जन्मातिल अहंकार तो?
सारे दुर्बल, कोण ठरविते: अमूक जगला , तमूक मेला ?

अर्धजीव त्या मणिमाळेने वैद्यक मेले, वैद्यही मेले
हताश मानव घरामधे तो मद्याचे मग रिचवि पेले
अता साकडे सूर्याला अन सर्वस्पर्शी प्राणवायुला
"एम आर एन ए" व्हॅक्सिन ला अन मनुजातिल त्या प्रबुद्धतेला !
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही म्हणजे, कवितेमागची कल्पना ठीक आहे, परंतु, शब्दांची निवड जरा बरी करता आली नसती काय? पहिल्याच वाक्यात ते पिठले काय, फतफत फतफत काय... आरारारारारा! काही शैशवी (अक्षरशः!) संकेतांना उगाचच उजाळा मिळाला, नि घाण वाटली!

काही ऑनोमाटोपीयांमध्ये भलभलती चित्रे डोळ्यांसमोर उभी करण्याचे सामर्थ्य असते, आणि, त्यांना तसल्याच 'सामर्थ्यवान' रूपकांची जोड मिळाली, तर परिणाम द्विगुणित होतो. येथे काहीसे तसेच झाले आहे. म्हणूनच ऑनोमाटोपीया काय, रूपके काय, वापरताना काळजी घेणे श्रेयस्कर.

आता, त्यापलीकडे वाचून कोणाला ही कविता 'मस्त' वगैरे वाटली, तर त्याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही; अगोदर म्हटल्याप्रमाणे, कवितेचा आशय तसा वाईट नाही. मात्र, प्रथमग्रासेच असला रसनिःपात झाल्यानंतर, उरलेल्या कवितेतून रससेवनाची मनःस्थिती राहिली नाही. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फतफत, शैशवी संकेत आणि रसनिःपात हे शब्द वाचून नबांविषयी काही तरी वेगळे(च) उमगले. अशीही एक नवी रसनिष्पत्ती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वापरून आमटी बनवावी असे वाटून गेले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0