गुरु-शनी यांची पिधान युती - Great Conjunction

ग्रहांच्या युती अधूनमधून होत असतात ज्यांना पिधान युती असे म्हटले जाते. गुरू आणि शनि या आपल्या सौरमालेतील दोन सर्वात मोठ्या ग्रहांची पिधान युती 21 डिसेंबरला जगभरातून दिसली. दोन मोठ्या ग्रहांची पिधान युती असल्यामुळे याला ग्रेट कन्जंक्शन (Great Conjunction) असे म्हटले गेले. सुर्यास्तानंतर गुरू आणि शनी एकमेकांच्या अत्यंत जवळ, म्हणजे साधारण एक दशांश कोन इतके जवळ आले.

फोटोत गुरूचे तीन चंद्र, शनी ग्रह, शनीभोवती असणारी कडा आणि शनीचा चंद्र टायटन दिसत आहेत.

गुरु आणि शनी एकमेकांपासून दूर जाऊ लागतील. येत्या दोन तीन दिवसात ही युती पहायची चांगली संधी आहे.

-Nile

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

डोळ्यांनीही बारीक शनि काहींना दिसत होता. 10x46monocular मधूनही पाहिली युती.
तुमच्या फोटोमुळे आनंद झाला. शनीची कडीसुद्धा दिसत आहेत. टाइटन इक्लिप्टिकच्या प्लेनमध्ये नाही. जसे गुरुचे चंद्र असतात.

भारी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

10x is a a decent power to see a few moons of Jupiter. If you can hold steady then you might also see rings of Saturn with 46mm objective. (But 10x42 binocs might be better.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

१) शहरातलं हवामान/आकाश फारच खराब झालं, २)आम्हाला चष्मे लागले, ३)आतले प्रिझम पिवळट झाले, ४)आइपीसही अंधूक झाला. पण पूर्वी गुरुचे दोन चंद्र सहज दिसायचे. आणि टेक्निकली तेवढेच दिसतात असं कळलं होतं.
पण बाइनो ही क्लस्टरसाठी योग्य वस्तू आहे.
फील्डवर एक बाईनो आणि एक टेलिस्कोप लावली तर बाइनोतून पाहण्यासाठी मोठी रांग लागते. मेसिअर क्लाउडस!!

(( मोठ्या रेझलुशनचा फोटो कॉपी होईल म्हणून दिला नसेल ना))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मोठ्या रेझलुशनचा फोटो कॉपी होईल म्हणून दिला नसेल ना

नाही. हेच रिझोल्युशन आहे. बहुतांश भाग काळा असल्यामुले फोटोची साईझ फार नाही. ग्रहांचा आकार फारच लहान असल्याने 8 इंच टेलिस्कोपमधून फार रिझोल्युशन मिळतच नाही (एका फोटोत) अनेक फोटो प्रोसेस करून रिझोल्युशन वाढवता येते- वेळ मिळाल्यास प्रोसेस करेन. चांगलं जमलं तर तो फोटोही देईन इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आलं लक्षात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला बायनॉक्यूलरमधून आयो आणि कॅलिस्टो दिसले; पण युरोपा नाही दिसला. टायटन दिसणं शक्यच नव्हतं.

रस्त्यावरून जाणाऱ्या दोन लोकांनाही ते दाखवलं. करोनामुळे बायनॉक्यूलर दिली नाही, पण दोन्ही माणसांची दृष्टी फार तीक्ष्ण नाही याचा गंड दिला! हे बुद्ध्याच केलं नाही, मीच फार उत्तेजित झाले आणि त्यांना ते दाखवायला लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल 5 इंच दुर्बिणीतून गुरूचे चारही चंद्र आणि टायटन व्यवस्थित दिसले. गुरूचे पट्टेपण मस्त दिसले पण 'जीआरएस' दिसला नाही. (ज्युपिटर फारच प्र्काशमान होता)

आज आठ इंची दुर्बिणीतून गुरूचे पट्टे फारच स्पष्ट दिसले पण जीआरएस आज पलिकडे होता. ग्यानीमीड गुरूवर आल्याने दिसला नाही. 14 इंची दुर्बिण हवी असे वाटू लागले आहे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी ह्या बाबतीत फारच रोंदू झाल्ये. कुठली बायनॉक्यूलर होती, असं विचारलं तर मी 'जड होती' असं उत्तर देईन! Wink

बरा अर्धाही उत्तेजित झाला होता. घराच्या आवारातूनच दिसत होते हे. तर शिडी काढली; शिडीवर पुठ्ठे वगैरे वापरून बायनॉक्यूलर ठेवून पाच मिंटांसाठी का होईना, तीतून बघण्याची सोय केली. म्हणून कॅलिस्टो दिसला. आयो हातात बायनॉक्यूलर घेऊनही दिसला.

गुरूच्या जवळ कुठलाही उपग्रह दिसला की मी त्याला आयो म्हणते. खरं तर ते इतर तीन उपग्रहसुद्धा असू शकतात, आणि आयो गुरूच्या समोर किंवा मागे आल्यामुळे अदृश्य असू शकतो. पण मला ममवपणा करण्याची लहर येते, मग त्यावरून नर्डी जोकही करता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टेलिस्कोप घेऊन टाका एखादा आता. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

डोंबलाचा माज!

वय झालं माझं आता, तुला तर माहीत आहेच. ह्या वयात एवढा उत्साह कुठून आणू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१४इंची आरसा घासून बनवलेली. पुण्यातच पाहिलं. शनी फार जबरी दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

14 इंची न्युटोनियन मधून मस्तच दिसतील. साधारणत: या आकाराचे न्युटोनियन f4.5 किंवा f5 असतात. म्हणजे फोकल लेन्थ = 1778 मिलीमीटर. ग्रहांसाठी सहसा f7 किंवा जास्त फोकल रेशो असलेले टेलिस्कोप जास्त चांगले.

माझा 8 इंची टेलिस्कोप श्मिट-कॅसग्रेन प्रकारचा आहे. F10 असल्याने त्याची फोकल लेंथ 2000 मिमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जमल्यास पुढे महिन्याला एक तरी फोटो द्या. ज्यूल बॉक्स, एम७, एम८, Andromeda वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोसाठी मी सहसा आमच्या गावतल्या अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लबाच्या जागेत जातो. ते सध्या कोव्हीड मुळे बंद आहे. त्यामुळे तेथील 14 इंची श्मिट-कॅसग्रेन (SCT) आणि 22 इंची न्युटोनीयन दोन्ही वापरायलाही मिळालेला नाही या वर्षी.

Celestron कंपनीचा C14 SCT उदाहरणादाखल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तुमच्या गावातल्या क्लबामुळे आणखीच मजा येत असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सुंदर फोटो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0