एक जूनी कविता

सूचना: आज मोबाईलवर जून्या पोस्टी नोट्समध्ये चाळत असताना एक जूनी मी लिहिलेली कविता सापडली. ( पूर्वी फेसबुकवर पोस्ट केली असावी)
इथे पोस्ट करतोय. वाचा आणि मापं काढा. Wink

आज अचानक कळे न मजला
अगम्य तुझ्या आठवणीत
चिंब होऊन पाऊस थिजला
नसूनही मी खिजगणित….

गुंतता तुझ्या त्या किर्द नयनांत
लटिके हावभाव नृत्यधारांचे
गुरफटलेली आजवरची हयात
मनमंदिरातील अभिसारिकेचे

संततधार मखमली अदांची
उन्मळून गहिवरले रक्तिमा
कुंद भिजलेल्या आठवणींची
भावविश्वाचा लौकिक महिमा

आतुर तुझ्याशी मी बोलाया
काबूत ठेवूनी मनस्वी हिंदोळे
प्रदीर्घ श्वासातील स्तब्धतेच्या
विजिगिषू तारूण्याचे लव्हाळे

स्वप्नांच्या दुनियेतील तू रूपसुंदरी
अश्वारूढ झालेला मी राजकुमार
तुझ्या तिरप्या कटाक्षांची मादुकरी
धुवांधार पर्जन्यात क्षीण धीरगंभीर

मन मोहरले उधळलेल्या विश्वात
नृत्य अभिनयाच्या समग्र संवेदनात
स्वत्वाच्या उणीवेत तुझ्या कल्लोळात
कैफ तूझी एकलकोंड्या सान्निध्यात

----------------------
भूषण वर्धेकर
२००५ - २००६ (याच काळात कधीतरी)
सर परशुरामभाऊ महाविद्यालय
पुणे-३०
-----------------------

( आज १३ जून २०१६ रोजी हे टाईप करताना माझ्या त्यावेळच्या बावळटपणावर प्रचंड हसतोय… किबोर्ड बडवताना त्यावेळचे पेरून ठेवावेत असे संदर्भ आठवले आणि विल्हेवाट लावण्यासाठी पाऊस व प्रसंग सदैव तत्पर असतात याची प्रचिती आली. एकूण मला कधीही काहीही सुचू शकतं आणि लिहीलं जातं अर्थ कळो वा ना कळो !
मथितार्थ काय?
जीर्ण झालेल्या कागदांवर लिहिलेलं सापडलं कि टंकलिखित करून ते चोळामोळा करून भिरकाऊन द्याव. अन् मी किती टुकार लिहित होतो हे जगाला उर बडवून सांगाव आणि गरज नसताना इतरांनी पण वाचलंच पाहिजे या हट्टाने फेसबुकवर पोस्ट करावं.)

कारण फेसबुक म्हणजे -
“बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करण्याचं हक्काचं व्यासपीठ”
#sixwordstory

field_vote: 
0
No votes yet