कोविड १९ की कोविड २१?

xxxज्याप्रकारे करोनाचे विषाणू भारतात आता हाहाकार माजवित आहेत त्यावरून गेले वर्षभर साथ पसरू नये यासाठी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे व गर्दी न करणे इत्यादी नियमांचे (अर्धवटपणे का असेना!) पालन करणे हे सर्व करूनसुद्धा दुसऱ्या लाटेतील जीवित हानी आपण थांबवू शकलो नाही व यानंतर काही दिवसानी तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागतो की काय असे वाटण्याची दाट शक्यता निर्माण आहे. गेल्या २-३ महिन्याच्या कोविड रुग्णांची वाढत्या संख्येकडे पाहिल्यावर करोनाचे उत्परिवर्तन होत असलेले कोविड १९ विषाणू नसून सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे - कोविड २१ - विषाणू असावेत की काय असे वाटत आहे. त्यामुळे या अलीकडील रुग्णांसाठी अत्यंत वेगळी उपचार पद्धती शोधून काढावी लागेल की काय हा विचार डोकावत आहे. फेब्रुवारी-मार्च २१ मधील आकडे सौम्य वाटावेत इतके एप्रिलमधील रुग्णांच्या आकड्यात वाढ झाली आहे. २४ एप्रिल या एकाच दिवसाची भारतातील रुग्णसंख्या ३४६७८६ होती. जगाच्या रुग्णसंख्येच्या २० टक्के भारतातील रुग्णसंख्या आहे.

दिल्ली व चेन्नईसारख्या मेट्रो शहरातील ३-४ महिन्यापूर्वीची रुग्णसंख्या (व मृतांची संख्या) तपासल्यास आपल्याला यानंतर या विषाणूंना घाबरण्याचे कारण नाही असेच संशोधकांसकट इतरांनासुद्धा वाटले असावे. आता मात्र या क्षेत्रातील सर्व संशोधक, अभ्यासक व उपचारतज्ञ या भूतो न भविष्यती अशा दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेची आपापल्या परीने कारणं शोधत आहेत. विषाणूचे २-३ वेळा झालेले उत्परिवर्तन की बेजबाबदार सामाजिक वर्तन की लशीकरणातून वाढलेल्या अपेक्षेतून निर्माण झालेली बेफिकिरी इत्यादी घटकांची सरमिसळ झाल्यामुळे हा भयानक प्रसंग आपल्यावर ओढवला आहे की काय याची चाचपणी घेतली जात आहे. फ्रान्स व जर्मनीतसुद्धा लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णसंख्या नक्कीच जास्त आहे. कोविड -१९ ने बाधित झालेल्यांची उच्चांक गाठलेल्या अमेरिका व ब्राझिल मधील रुग्णसंख्या आता ७० हजार असून भारताने मात्र तीन लाख ही संख्या केव्हाच ओलांडली आहे. हा ३ लाखांचा उच्चांक तर अमेरिकेत २ जानेवारी रोजी नोंदला गेला होता. सप्टेंबर महिन्यात एक लाखाच्या आसपास असलेली रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत गेली. परंतु हाच आकडा मार्चमध्ये वाढू लागला व सर्वांचे धाबे दणाणले. आताचा हा उच्चांक यापूर्वीच्या उच्चांकापेक्षा दुप्पट आहे.

मुंबईतीतल हिंदुजा हॉस्पिटलचे झरीर उडवाडिया या डॉक्टराने नेचर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत आताच्या दुसऱ्या लाटेची तीव्रतेची पहिल्या लाटेशी तुलना केल्यास पहिली लाट ही बाथटबमधील लाटेसारखी वाटेल असे म्हटलेले आहे. आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली असून खाटांची अपुरी संख्या, प्राणवायुच्या सिलिंडर्सची कमतरता, व रुग्णाचे प्राण वाचविणारी म्हणून मागणी होत असलेली रेमडेसिविरसारख्या औषधांची उणीव इत्यादीमुळे रुग्ण मरणोन्मुखी ढकलले जात आहेत. या गोष्टी आपण कुठल्या गंभीर परिस्थितीतून जात आहोत याची झलक दाखवत आहे. अशोका विद्यापीठातील शहीद जमील या विषाणुतज्ञालासुद्धा दुसऱ्या लाटेची प्रतिक्षा होती. परंतु ती इतकी भयानक असू शकेल याची कल्पना नव्हती.

yyy
कुठल्याही विषाणूपासून पसरणाऱ्या साथीची तीव्रता त्या विषाणूंना काबूत ठेवणाऱ्या शरीरातील प्रतीपिंडांच्या प्रमाणावरून मोजली जाते. SARS-CoV-2 या विषाणूसंसर्गाच्या संबंधातील अभ्यासात डिसेंबर-जानेवारीपर्यंत आपल्या देशातील अर्धे-अधिक लोकसंख्येत या विषाणूची लागण झाली होती. तरीसुद्धा रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे काम करत आहेत, असे चेन्नईतील विषाणूतज्ञांचा अंदाज होता. त्या सुमारास २७ कोटी भारतीयांना या विषाणूची लागण झाली होती. ही संख्या संपूर्ण लोकसंख्येच्या २० टक्के होती. त्यामुळे यानंतरच्या साथीची तीव्रता तेवढी असणार नाही असेच वाटत होते. परंतु ज्या प्रकारे विषाणू या महिन्यात धुमाकूळ घालत आहे त्यावरून सर्व अभ्यासकांना अंतर्मुख होऊन पुनर्विचार करण्याची पाळी आली आहे.

दोन आठवड्याच्या टाळेबंदीतून आपण कोविड विषाणूना पळवून लावू असे वाटत होते. कोविड १९ची रोग लक्षणं पंधरा दिवस नव्हे तर महिनोन महिने राहू शकतात याची कल्पना कुणालाच नव्हती. रोगाणू हा प्रकार कधीच स्थिर नसतो. पॅथोजिन्स बदलतात, शरीर बदलत जातो व वातावरण बदलते. कोविडच्या बाबतीत तर या तिन्ही गोष्टी २०२०मध्ये बदलले होते. सुरुवातीच्या १० कोटी कोविडग्रस्तामधून ही साथ नवे नवे रूप घेत वेगवेगळ्या प्रकारे त्याचा संसर्ग होत गेला. आपली रोग प्रतिकारक शक्ती बदलली, आपली जीवनपद्धती बदलली व सामाजिक-राजकीय परिमाण बदलत गेले. त्याच अनुषंगाने सार्वजनिक आरोग्यातील सोई-सुविधा व वैद्यकीय उपचारही बदलत गेले.

काही तज्ञं शहरातील गरीब वर्गच पहिल्या लाटेचे शिकार होतील, असे मत व्यक्त करत होते. परंतु त्या काळी प्रतिपिंडांचा अभ्यास नीट न केल्यामुळे काही गटामधील तीव्रता वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिपिंडांच्या मर्यादित विदावरून विषाणूंच्या असमतोल प्रसाराचा अंदाज आला नसेल. गंगादीप कांग या वेल्लोरच्या क्रिश्चियन मेडिकल कॉलेजच्या विषाणूतज्ञाच्या मते यापूर्वीचा सुरक्षित समजलेल्यांच्यात कदाचित हा विषाणू आता घुसला असेल. त्यामुळे शहरी श्रीमंत वर्ग दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बळी जात आहे. परंतु काही संशोधकांच्या मते ज्या प्रकारे व ज्या वेगाने हा विषाणू पसरत आहे त्यावरून या विषाणूत वेगळेच घटक असावेत. डॉ. उडवाडियांच्या नीरिक्षणानुसार या पूर्वीचे विषाणू कुटुंबातील एकेकट्यावर हल्ला चढवत होते; आता मात्र कुटुंबच्या कुटुंबच या (नव्या) विषाणूचे बळी ठरत आहेत. कुटुंबातील एखादा जरी पॉजिटिव्ह असला तरी काही दिवसातच पूर्ण कुटुंब पॉजिटिव्ह आहेत हे कळल्यावर आश्चर्य वाटायला नको.

रुग्णांच्या जनुकीय विदांचे विश्लेषण केल्यानंतर पंजाबमध्ये ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळलेला B.1.1.7 हा विषाणूचा प्रकार आढळला. महाराष्ट्रात B.1.617 हा प्रकार आढळला आहे. हा प्रकार दोन वेळा उत्परिवर्तन झालेला विषाणू असून त्याच्यात प्रसार होण्याची क्षमता जास्त आहे व शरीरातील प्रतिकारशक्तीला न जुमानता तो प्रवेश करू शकतो. या प्रकारचा विषाणू आतापर्यंत वीस देशात आढळला आहे. भारतातील प्रयोगशाळेत अशा प्रकारच्या विषाणूंचे कल्चर करून लशीकरण झालेल्या व्यक्तीत यांची लागण थांबविण्याची क्षमता आहे की नाही यबद्दलचे प्रयोग केले जात आहेत.

भारतातील आताची स्थिती मागच्या वर्षीच्या ब्राझिलच्या स्थितीशी मिळतीजुळती आहे. विषाणूचा P.1 हा प्रकार रोगप्रतिकारशक्तीला टाळून पसरत आहे. डेव्हिड रॉबर्ट्सन या ग्लास्गो विद्यापीठातील विषाणुतज्ञांच्या मते आता उपलब्ध असलेल्या महितीतून कुठलेही निष्कर्ष काढणे दुरापास्त ठरणार आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत जनुकीय क्रमनिर्धारणाची (सीक्वेन्सिंग) संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे कुठलेही निष्कर्ष काढण्यापूर्वी जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे ठरत आहे. काही तज्ञांच्या मते हा नवीन विषाणू प्रकार देशातील अगदी कमी भागात पसरलेला आहे. बहुतांश भागातील जनुकीय क्रमनिर्धारणाशी त्या जुळत नाहीत, असे मत भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे (सीएसआयआरचे) अनुराग अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

दिल्लीस्थित विषाणूतज्ञ, श्रीनाथ रेड्डी यांनी आताच्या भयानक परिस्थितीस सर्व नियमांची पायमल्ली केल्यामुळे उद्भवली आहे, असे स्पष्ट मत नोंदवली आहे. आपले शारीरिक अंतर न पाळणे, झुंडीने प्रवास करणे, मास्क न घालता गर्दी करणे, रॅली, क्रिकेटच्या स्पर्धा वा धार्मिक उत्सव इत्यादीमुळे होणाऱ्या गर्दीचा अंदाज न येणे, हे अनुचित वर्तन कुठल्याही साथीला आमंत्रण देणारी ठरू शकते, याचे भानच आपण ठेवले नाही. सप्टेंबरपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत गेल्यामुळे आपण कोविड १९ वर मात केली म्हणून आत्मसंतुष्ट राहिलो व आपण कोविड १९ ला जिंकलो ही भाषा वापरू लागलो. व हीच बेफिकिरी आपल्याला आता भोवत आहे. या बेफिकिरीमुळे इमारतींच्या आत व बाहेर गर्दी उसळू लागली व धार्मिक सण-उत्सवांना उधाण आले, मोठमोठे (विवाह) कार्यालयं तुडुंब भरल्या. व साथ आटोक्याबाहेर गेल्यामुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढू लागली.

जानेवारीपासून लशीकरण देण्यात येईल हे जाहीर विधानसुद्धा जनतेच्या बेफिकिरवृत्तीला खतपाणी घालत प्रादुर्भाव वाढण्यास मदत केली असेल. त्यातही जनता दुसऱ्या लाटेचा इशारा गंभीरपणे घेतली नाही. ही वृत्तीच या महासाथीच्या गंभीर परिस्थितीस कारणीभूत ठरत आहे. आतापर्यंत १५ कोटी जणांनी ही लस टोचून घेतली आहे. ही केवळ पूर्ण लोकसंख्येच्या केवळ १० टक्के असून आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. लस टोचून घेण्यासाठी दवाखान्यात जमलेल्या गर्दीमुळेसुद्धा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आपण पत्करत आहोत.

हे सर्व कधी संपणार याची निश्चिती नाही. करोनाचा उसळणारा रौद्रालेख शून्यापाशी येऊन कधी थांबणार हे सांगता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक अनुभवावर आधारित वा ऐकीव, अवैज्ञानिक व कॉमन सेन्सला न पटणारे उपाय टाळून वैद्यकीयरित्या जे प्राथमिक उपाय सुचविले जात आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे हे आपल्या हातात आहे व तेवढे करत राहणे सोपेही आहे.

संदर्भः
Scientific American
The Atlantic

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

CORONA साथीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्यांच्या मध्ये समन्वय असायला हवा होता पण दुर्दैवाने तसा समन्वय नाही.
त्याचा मोठा फटका देशाला पडला आहे.
दुसरा घटक म्हणजे इथली लोक त्यांना एक वर्ष होवून गेले मास्क वापरा,distance ठेवा,sanitizer वापरा हे सांगितले गेले तरी लोक गंभीर पने त्या सूचना घेतच नाहीत.
तिसरा महत्त्वाचा घटक यूट्यूब, सारखी समाज माध्यम.
Corona ha रोगच नाही.
गरम पाण्याची corona व्हायरस मरतो.
CORONA ni मृत्यु होतच नाहीत हा अंतर राष्ट्रीय कट आहे.
हे आणि अशाच अर्थाचे अनेक व्हिडिओ प्रक्षेपित केले जातात आणि ज्यांना विचार करायचीच सवय नाही ते ह्या व्हिडिओ मधून मिळणाऱ्या ज्ञाना लाच खरे समजतात आणि सर्व नियम तोडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सप्टेंबर २० नंतर निर्बंध कमी करून जवळपास पूर्ववत केल्यानंतरही सुमारे चारपाच महिने रुग्णसंख्या घटतच होती. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये जी झपाट्याने वाढ झाली ती जनतेच्या गैरशिस्तीमुळे किंवा अंतर न पाळल्यामुळे झाली यावर विश्वास ठेवता येत नाही. हा उत्क्रांत विषाणू आहे, याचा पसरण्याचा वेग जास्त आहे असंच म्हणावं लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोविड भारतात कितपत पसरलेला आहे हे फक्त शहरांतल्या, आरोग्य सुविधांना ॲक्सेस असलेल्या लोकांमध्ये यावरुन ठरवणे धोकादायक आहेत. पंप्रंचे शास्त्रिय सल्लागार म्हणाले की लाट इतकी तीव्र असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. चाचण्यांची उपलब्धता आणि अधिकृत बाधितांची संख्या हे वापरुन अंदाज करता येतिल. शीघ्रसंक्रमित विषाणु उत्क्रांत होऊन टिकण्यासाठी त्याला बरेच यजमान मिळाले असतिल. खेड्यातल्या म्हाताऱ्यांना आरोग्य सुविधांचा ॲक्सेस नाही तर तरुण थोड्याफार त्रासाने बरे होत राहीले. असेही भारतात अधिकृरित्या खूपच कमी (तुलनेने ग्रामीण भागात) मृत्यु नोंदवले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसऱ्या धाग्यावर राजेश१८८ म्हणतात तेही कारण विचारात घेण्यासारखं आहे. ग्रामीण भागांतल्या लोकांचे गैरसमज, त्यांच्याकडून होत राहणारा संसर्ग मोजलाच न जाणं, वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ग्रामीण भागातच नव्हे शहरांतूनही जे मृत्यू घरी, हॉस्पिटलच्या बाहेर होत आहेत त्यांची गणना कोव्हिड बळींमध्ये होत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************