सुटका नाही

ज्या प्रश्नांना नसते उत्तर
तेच मला खुणविती निरंतर
अज्ञेयाच्या पल्याडून कुणी
म्हणते,"यातून सुटका नाही"

तीन मितींची भक्कम कारा
तिचे दार किलकिले उघडुनी
बघती प्रतिभावान थोडके
तेही म्हणती,"सुटका नाही"

तुंदिलतनु तुपकट ध्येयांची
हाक ऐकुनी शहारते मन
उनाड भटकी पायवाट मग
बिलगून म्हणते,"सुटका नाही"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आमची पण, या तुंदिलतनु तुपकट देहातून सध्या तरी सुटका नाही, हे घोर वास्तव उमगले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0