'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ?

ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. Smile

संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे. सध्या सगळीकडे क्लाउड कंप्युटिंगचा नारा ऐकू येतो आहे. कंपन्यांच्या IT डिपार्टमेंट्समध्ये तो एक बझवर्ड झाला आहे. तर काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. चला तर मग बघुयात काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग...

समजा तुम्ही एक संगणक तुमच्या वैयक्तिक वापरासाठी विकत घेणार आहात. त्यासाठी तुम्ही इंटेलचे हार्डवेयर असलेला संगणक फायनल केलात. त्या हार्डवेयरच्या डिव्हाइस ड्रायव्हर्सची एक DVD तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला एक ऑपरेटिंग सिस्टीम लागेल, ती तुम्ही मायक्रोसॉफ्ट विंडोज ठरवलीत. त्यासाठीही तुम्हाला एक OS DVD मिळेल. त्या DVD साठवण्यासाठी तुम्हाला एक बॉक्स घ्यावा लागेल.
आता संगणक घेतलात तर त्यावर तुम्ही काही अ‍ॅप्लिकेशन नक्कीच चालवणार असाल (म्हणजे त्याचसाठी तुम्ही संगणक घेत आहात हे गृहीत धरले आहे Smile ) तर त्या अ‍ॅप्लिकेशन्सच्याही DVD मिळतील व त्या तुम्हाला संभाळून ठेवाव्या लागतील. त्यासाठी आधिचा DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठा DVD बॉक्स घ्यावा लागेल. काही वर्षांनंतर तुमचे हार्डवेयर जुने झालेले असेल त्यातले काही भाग तुम्ही बदलायचे ठरवले. पुन्हा नविन डिव्हाइस ड्रायव्हर्सच्या DVD तुम्हाला मिळाल्या. परत DVD बॉक्स तुम्हाला लहान पडतो आहे, त्यामुळे पुन्हा नविन बॉक्स. आता तुमच्या अ‍ॅप्लिकेशनचे नवे वर्जन आले आहे आणि तुम्ही ते विकत घ्यायचे ठरवले. त्याच्या पुन्हा नव्या DVD. आता तुम्ही तुमच्या मुलाकरिता अजुन एक नविन संगणक घ्यायचे ठरवता. काही आप्लिकेशन्सची जुनी वर्जन्स तुमचा मुलगा वापरणार आहे. परत नविन बॉक्स मुलासाठी. ह्या प्रत्येक वेळी तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार. ह्यात मध्येच काही DVD ऐनवेळी खराब झाल्या तर मग तुम्हाला पुन्हा नविन DVD मिळविण्याची मारामार करावी लागणार. पुन्हा तुमच्या संगणक विक्रेत्याला मदतीसाठी बोलवावे लागणार आणि त्याला सर्विस चार्ज द्यावा लागणार.

येवढी यातायात जर एक-दोन संगणकांसाठी असेल तर शेकडो / हजारो कर्मचारी काम करत कंपन्यांचे काय होत असेल याचा विचार करा. ह्या सर्व हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर विकत घेण्याच्या आणि त्याच्या मेंटेनंन्ससाठी येणार्‍या खर्चाला 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप (TCO)' म्हणतात. मोठ्या मोठ्या कंपन्यांची ही कॉस्ट अतिशय प्रचंड असते, त्यासाठी जे कुशल मनुष्यबळही लागते तेही प्रचंड महाग असते.

'क्लाउड कंप्युटिंग' नेमके ह्याच समस्येवर उत्तर आहे. आजच्या युगात क्लाउड कंप्युटिंग पुढे रेटण्याचा मुख्य मार्केटिंग मंत्र म्हणजे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' पासून सुटका. 'तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आमचे' हे क्लाउड कंप्युटिंग सेवा पुरवठादारांचे ब्रीदवाक्य आहे. Smile

क्लाउड कंप्युटिंग म्हणजे सर्व, ऑपरेटींग सिस्टीम, अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर आणि डाटा (माहिती) हे एका मध्यवर्ती, प्रचंड आकाराच्या (लॉजिकली) संगणकावर ठेवायचे. त्या मध्यवर्ती संगणकाची संगणनशक्ती वापरून ती OS, अ‍ॅप्लिकेशन्स त्या संगणकावर रन करायची आणि डाटा/डॉक्युमेंट्स (माहिती) त्याच मध्यवर्ती संगणकाच्या मेमरीत साठवून ठेवायचा. ह्या मध्यवर्ती संगणकासाठी लागणार्‍या हार्डवेयरची जबाबदारी ह्या मध्यवर्ती संगणकाची सेवा पुरवठा करणार्‍याची असणार. आता नविन हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर तुम्हाला आपसुकच अपग्रेड होऊन मिळणार. थोडक्यात सॉफ्टवेयर आणि हार्डवेयर ह्या तुम्हाला सेवा म्हणून मिळणार. तुम्ही फक्त त्या सेवा वापरण्याचा मोबदला सेवा पुरवठादाराला द्यायचा. एकढाच तुमचा खर्च. बाकीची सगळी यातायात तो सेवा पुरवठादार तुमच्यासाठी, तुमच्या वतीने करणार.

क्लाउड कंप्युटिंग ही काही नविन टेक्नॉलॉजी नाहीयेय. ते डाटा सेंटर्सच्या रूपात होतेच. पण दिवसेंदिवस जलद होत जाणार्‍या इंटरनेच्या प्रभावी वापरामुळे त्याचे एक नविन मॉडेल बनवण्यात आले ज्याद्वारे संगणकीय रिसोर्सेस प्रचंड मोठ्या स्केल मध्ये प्रभाविपणे वापरता येणे शक्य होईल. बरं ठीक आहे, पण मग त्याला 'क्लाऊड' असे नाव का? तर जेव्हा इंटरनेट आले तेव्हा वेगवेगळया आकृत्यांमध्ये इंतरनेट दर्शवण्याची खूण होती ढग, क्लाउड.


(चित्र आंतरजालावरून साभार)

क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे इंटरनेट. त्यामुळे क्लाउड हे नाव 'रूपक' म्हणून वापरले गेले आहे, मध्यवर्ती संगणकाच्या अमूर्त रुपासाठी. तर हे असे आहे अमूर्त रुप क्लाउड कंप्युटिंगचे:


(चित्र विकिपीडीयावरून साभार)

क्लाउड कंप्युटिंग हे प्रामुख्याने ३ मुख्य प्रकारांत विभागले गेले आहे.

  • इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
  • प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
  • सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)

इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस (IaaS)
इन्फ्रास्ट्रक्चर हा क्लाउड कंप्युटिंगचा पाया आहे. ह्यावरच सगळा डोलारा उभा आहे. ह्या प्रकारात सर्व प्रकारचे सर्व्हर्स, नेटवर्क डिव्हायसेस, स्टोरेज डिस्क्स तत्सम हार्डवेयरचा समावेश होतो. इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा घेतल्यावर, आपल्याला फक्त हार्डवेयर कोणते हवे ते ठरवायचे असते, बाकीच्या किचकट गोष्टी सेवा पुरवठादार आपल्या वतीने करतो. ही सेवा 'जेवढा वापर तेवढे बील' अश्या तत्वावर चालते. वापर वाढला तर बील जास्त वापर कमी झाला तर बील कमी अशी 'इलास्टिक' सेवा असते ही. त्यामुळे 'टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप' मध्ये प्रचंड बचत होते.

IBM® Cloud ह्या नावाने IBM ही इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवते.

प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस (PaaS)
उद्या जर मला एक ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस देणारी वेब साईट चालू करायची असेल तर मला आधि एक डोमेन नेम विकत घ्यावे लागेल, मग सर्व्हर स्पेस विकत घ्यावी लागेल, डाटाबेस विकत घ्यावा लागेल आणि मग साईट चालू होईल. जर साईट खूप चालली आणि खुप युजर्स मिळाले तर मला जास्त सर्वर स्पेस विकत घ्यावी लागेल आणि असेच बरेच काही. हे सर्व झेंगाट मलाच बघावे लागेल. पण हे सर्व नको असेल तर मी क्लाउड वर प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस ही सेवा विकत घेऊ शकतो. ज्यामुळे माझे अ‍ॅप्लिकेशन ह्या प्लॅटफॉर्मवर होस्ट केले जाईल आणि सर्व प्रकारची अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह जबाबदारी सेवा पुरवठादाराची असेल. म्हणजे मी नोकरी संभाळून आता ग्रिटींग कार्ड पाठवण्याची सर्विस चालू ठेवू शकतो. Wink

अ‍ॅमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, याहु ह्या प्लॅटफॉर्म अ‍ॅज अ सर्विस सेवा पुरवणार्‍या कंपन्या आहेत.

सॉफ्टवेयर अ‍ॅज अ सर्विस (SaaS)
ह्या प्रकारात मध्यवर्ती संगणकावर सॉफ्टवेयर सेवा (अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेयर), सेवा पुरवठादार पुरवतो आणि आपण आपल्याकडचा संगणक किंवा मोबाइल वापरून ही अ‍ॅप्लिकेशन्स वापरू शकतो. गुगलच्या सर्व सेवा (डॉक्स, ड्राइव्ह, पिकासा, कॅलेंडर ई.), ई-मेल सर्विसेस, मायक्रोसॉफ्ट्ची ड्रॉपबॉक्स सेवा, ब्लॉगर.कॉम, वर्डप्रेस.कॉम ह्या सर्व सेवा सॉफ्ट्वेयर अ‍ॅज अ सर्विस ह्या प्रकारात मोडतात.

तर असे आहे हे क्लाउड कंप्युटिंग, कळले का रे भाऊ! Smile

कळले म्हणताय ? तर मग ह्या भाऊंना आता कोणीतरी समजावून सांगा

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

"सुटकारा"
जास्तीचा "रा" जोडण्याची गरज नव्हती. Smile ते हिंदीतून मराठीत भाषांतर झालं. काहीसं हल्लीच्या वर्तमानपत्रांसारखं...
व्हिडीओ मस्तच... ह ह पु वा Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉइंटाचा मुद्दा पटला! Smile
आवश्यक तो बदल केला आहे.

- (जे पटते ते घेणारा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोप्या शब्दांत उपयुक्त माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशी तांत्रिक माहिती मराठीत येणे फार महत्त्वाचे आहे असे समजतो. त्यासाठी आधी अभिनंदन आणि आभार!
बाकी उपयुक्त माहिती, आमच्यासारख्यांना समजेल अशा शब्दात देणं म्हंजे काय पिऊ (दर वेळी खाऊच का? अन ते ही सोत्रींसमोर!! Wink ) नाही हे आम्ही जाणतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम रे सोकाजी. तुझ्यासारखे सॉफ्टवेयर तंत्रज्ञ किल्ष्ट संकल्पना आमच्या सारख्या लोकांना समजावून सांगत आहेत हे आमचे भाग्य.
अशी ही सेवा पुरवायला खर्च कितीसा येतो रे सोकाजी ?
(व्यवहारी) रमाबाई

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'क्लाउड' म्हणजे काय ते आता कळले. आतापर्यंत मी असे समजत होतो की इंटरनेट कोठेतरी वरती आकाशात आहे असे चित्र बहुतेकांच्या मनात अभावितपणे असते (अपलोड-डाउनलोड ह्या शब्दांत तोच अर्थ गर्भित असावा) आणि म्हणून हे 'आकाशातले' अशा अर्थी 'क्लाउड' शब्द वापरत असावेत.

(अवान्तर- 'चला तर मग बघुयात काय आहे हे क्लाउड कंप्युटिंग' येथील 'बघुयात' थोडा खटकला. हल्ली बघूयात, करूयात, मी तिकडे गेलेला, तो मला तसे बोललेला असे प्रयोग खूप ऐकू येतात. त्या सर्व जागी बघू या, करू या, मी तिकडे गेलो अथवा मी तिकडे गेलो होतो, तो मला तसे बोलला इ. हवे असे वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तिकडे गेलेला

खरंय! 'असा बेभान हा वारा' पासून याची सुरवात असावी का? त्यात नाही का "नदीला पूर आलेला"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो सोकाजीराव,

सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहीला हो. नुसते सर्वर्स वर सर्वर्स लावले म्हणजे क्लाउड काँप्युटींग होत नाही. हे तर पुर्वी पासून याहू आणि इतर कंपन्या करताहेतच.

सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एका सर्वर वर अनेक ऑपरेटीग सिस्टीम्स (किंवा एका ऑपरेटींग सिस्टीमचे अनेक प्रतिरुप (Instances) ) चालू शकतात. त्यामुळे एकच हार्ड्वेअर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरता येते. जर अशा असंख्य सर्वर्सचा संच (Pool of servers) असेल तर नवीन प्रतिरुप चालू करणे अथवा काम संपल्यावर ते प्रतिर्य्प काढून टाकणे अतिशय सोपे असते. याला तांत्रीक भाषेत Virtualization असे म्हणतात. VMWare आणि Citrix या दोन कंपन्या अशा प्रकारची प्रणाली बनवण्यात आघाडीवर आहेत. आता समजा तुमच्या कडे १०० सर्वर्स असतील (ज्याची क्षमता खुप जास्त आहे असे) तर त्यावर एका वेळेस साधारणतः १०० ते ५०० प्रतिरुप चालवणं अतिशय सोपे आहे. आता जर ३०० प्रतिरुपं आधीपासूनच चालू असतील तर ३०१वे प्रतिरुप चालू करणं अतिशय सहज शक्य आहे. आणि त्याचे काम संपले तर ते बंद करणे हे देखील सोपे असते. त्यासाठी तो पुर्ण सर्वर बंद करावा लागत नाही.

या मुळे जेव्हा हवे तेव्हा प्रतिरुप तयार करणे आणि बंद करणे करता येते. आणि हे सगळे सॉफ्टवेअरने नियंत्रीत करता येत असल्यामुळे दुर-नियंत्रण शक्य आहे. यामुळे विजेची बचत होतेच पण तुम्ही सांगीतल्या प्रमाणे नवीन सर्वर आणा तो बसवा इ. इ. इ. या कटकटींपासून सुटका होते. ह्या Virtualization मुळेच क्लाउड काँप्युटींग शक्य झाले आहे. नुसते टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप पासून सुटका हवी असेल तर याहू सर्वर भाड्यावर मिळतो...

- नाटक्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरुदेव,

छान मुद्दा मांडलात. Virtualization हा कळीचा भाग आहे क्लाउड कंप्युटिंगचा. पण ते फारच तांत्रिक आणि क्लाउड कंप्युटिंग कसे राबवले जाते ह्याचा भाग झाला. लेखाचा उद्देश क्लाउड कंप्युटिंग काय आहे आम जनतेला (लेमॅन) कळावे हा होता. क्लाउड कंप्युटिंग आणि Virtualization ह्यांचा परस्पर संबंध हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यावर एक लेख नक्कीच लिहीन.

बाकी साकिया मालिकेत पुढचे कॉकटेल कधी टाकताय?

- (नाटक्याजींचा एकलव्य असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0