तेरी जुस्तजू में बहार है ..

ये हवा, ये रात, ये चाँदनी
तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यूँ ना हो तेरी आरज़ू?
तेरी जुस्तजू में बहार है

आहाहा! तलत मेहमूदचा मखमली आवाज , आसमंतात जादू करत होता. न्यू यॅार्कच्या आटोपशीर पण आरामदायक फ्लॅट च्याबाल्कनीत एकटी शोना बुमबॅाक्स नीट लावत गुणगुणत होती. क्या बात है! राजिंदर कृष्ण यांचे choicest उर्दु शब्द. शोना सुरावटीत पार हरवुन गेली होती. समोर हडसन नदीत निळ्या दिव्यांच्या माळांचेप्रतिबिंब हेलकावे खात होते. आकाशात तरुण चंद्राची कोर उजळून उठली होती. मस्त पश्चिमेचा वारा सुटला होता. पॅटीस, कबाब , बिर्याणी सगळं रेडी होतं. काही वेळात वेळ काढुन घरी बनवलेले तर काही आयतं. अंहं आज थकुन कसं चालले असतं। रवि केव्हाही आला असतां. वेळेला तो पक्का होता. आणि शोनाला आकर्षकच दिसायचे होते.

तुझे क्या खबर है ओ बेखबर,
तेरी एक नज़र में है क्या असर
जो गज़ब में आये तो कहर है,
जो हो मेहरबाँ वो क़रार है

वेगवेगळे ज्युस व फ्रुट पंचेस फ्रीझमधे ठेवतां ठेवतां . गाणे ऐकता ऐकता शोना भूतकाळात कधी जाउन पोचली तिला ही कळले नाही.कॅालेजचे गॅदरींग - पल्लवीने व तिने लवकर येउन पुढच्या जागा पटकावल्या होत्या. रवि आणि संयुक्ता करता सुध्दा रुमाल टाकतांआले होते. ऑर्केस्ट्रा ७ वाजता सुरु होणारं होता ते रात्री ऊशीरापर्यंत. किती उत्साह - रंगीबेरंगी फुलपाखरी तरुणाई. सभोवार नुसताकिलबिलाट. मधेमधे अत्तराचे प्रसन्न धुमारे. कलाकार एक एक गाणे गात होते. नकला- मिमिक्री- गाणी- किस्से- कव्वाली कला प्रदर्शित होत होत्या. मधेच ग्रुपमधे टूम निघाली - सामोसे व कोक कोण आणेल? रवि आणि शोना यांच्यावर बिल फाडले गेले.

फर्ग्युसनच्या मॅथ्स डिपार्टमेंटच्या बाजूला grove / वाटिका आहे. तिथल्या बाकड्यांवर नेहमी मुलेमुली गर्दी करुन असत. आश्चर्य म्हणजे आज ती बाकडी पार ओस पडली होती. रविच्या आग्रहामुळे केवळ ती तिथे टेकायला तयार झाली होती. दोघे जरा टेकले. रातराणीचा दरवळ , धूसर प्रकाश दुरवर गाणे वाजत होते. -

तेरी बात बात है, दिलनशी कोई
तुझ से बढ़के नहीं हसीं
हैं कली-कली में जो मस्तियाँ
तेरी आँख का ये ख़ुमार है

गाणे संपले …… दूर टाळ्या व जल्लोष झाला …… आणि शोनाचा पहिलावहीला अनपेक्षित किसही. आवेग - रोमांच- धुमारेआणि एवढ्या आवेगातही हळूवारपण. काय नव्हतं त्या चुंबनात! It was heady. अगदी नवखा, नवीन अनुभव. नंतरचे अंतर दोघे गप्पगप्प जागेवर आले खरे but it changed them forever.अंतर्बाह्य बदलुन टाकला हलवुन टाकलं या अनुभवाने. पुढे दोघांचे मार्ग दोन दिशांना गेले होते. असे अनुभव काही रोजरोज येत नाहीत आणि एकदा आले की अंतरीच्या कुपीतून जाता जात नाहीत, हे एव्हाना शोना शिकलेली होती............ आणि अशा अनवट अनुभवातून मिळालेला आत्मविश्वासही निव्वळ अनशेकेबल असतो हेसुद्धा. होय!! डिफायनिंग मोमेन्टस.

फेसबुक वगैरे ठिकच आहे, पण आज परत ३० वर्षांनी फेस टु फेस भेटायचा योग जुळून आला होता. किती बदलला असेल रवि. सुटला असेल, यशाने बदलला असेल की आयुष्यात inevitably येणाऱ्या अपेक्षाभंगांनी विझला असेल? कदाचित हे सर्व शिवाय बरेच बदल घडले असतील. अगदी आपल्यासारखेच. आपलीही तर आवडनिवड बदलली. मन मारल्याने तर कधी जगाचे टक्केटोणपे खाउन. ते काहीही असो आज खूप गप्पा मारायच्या. खायचे प्यायचे, जुनी जुनी गाणी लावु यांत. तो ऑर्केस्ट्रा होता विशीतला आणि अर्थात लाईव्ह. आजचा संयत, धीमा एक ठहराव असलेला. बुमबॅाक्सवाला.

ये हवा, ये रात, ये चाँदनी
तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यूँ ना हो तेरी आरज़ू?
तेरी जुस्तजू में बहार है

बेल काय वाजली कसला आलाय ठहराव, शोनाच्या काळजात लक्ककन हलले, ती हरीणीच्या चपळाईने उठली. दार उघडायला, 'त्या'चे स्वागत करायला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet