काय ही आली वेळ

काय ही आली वेळ
जिथे तिथे दुष्काळ
असेल ओला कोरडा
आला होऊनी काळ १
निसर्ग रागावला
जो आजवरी भला
मानवे डिवचले
त्यानेच तो कोपला २
उत्क्रांतीं मिळे गुण
तेणें ज्ञान विज्ञान
भूतमात्र कल्याण
निसर्ग अपेक्षिला ३
निसर्गाप्रती मैत्र
शहाणीव सर्वत्र
तरीच भूतमात्र
भूमंडळीं टिकला ४
निसर्गी कुरघोडी
जीवनघाती गोडी
मूर्खपणाची खोडी
करावया धजला ५
मानवा आतातरी
विवेके कृती करी
अनंत कालांतरी
जगीं जीव उरावा ६

field_vote: 
0
No votes yet