सावली
जीवन सहेली सावळी सावली
जोवरी प्रकाश, संगती राहिली
बाल्यात पहिला प्रकाश पाहून
त्यातच गुंतून पडे बालमन
अंधार सावली जाणीव कुठून
निरागस अज्ञाना ‘प्रेम’किरण
सूर्य डोईवर मीपण मानसी
युवातेजच ते स्वयंप्रकाशी
तयांते असह्य सर्व तमराशी
बळें सावली पायीं तुडविसी
मावळतीस, सोसे न प्रकाश
नेत्र चुकविती तेजस्त्रोतास
प्रत्ययास ये सावली अवकाश
जाणीव प्रथम अ-पूर्वच खास
रात्र होतांच अंधार भवताली
वस्तूसावली एकत्व पावली