लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला?

"जांभया कसल्या देतोयस? नऊ वाजले. पहाट झाली."

"अरे काल यूएसबरोबर काॅल होता. त्यांच्या दुपारी बारा वाजता."

"न्यूयाॅर्क आठनऊ तास पाठी ना आपल्या? तू दहाला झोपतोस सांगू नको मला!"

"आमचं यूएसचं ऑफिस ॲन्करेजला आहे भेंजो. अलास्कामधे."

"मग तिथल्या कलीगला तू काय म्हणतोस - अरे वा, तू अलास्का?"

"एकदम चूप! एकतर झोप येतेय आणि त्यात तुझे पीजे. भेंजो हा टाईम डिफरन्स कमी करायची कायतरी ट्रिक पाहिजे."

"ॲक्चुअली सगळी माणसं एका उभ्या रेषेवर राहत असती तर बरं झालं असतं."

"उभी रेषा म्हणजे?"

"अक्षांश नायतर रेखांश यातली जी काही उभी रेषा असते ती. म्हणजे तू भारतात अस नायतर कझाकस्तानमध्ये, पण वेळ सेम, असं."

"पृथ्वी गोल असायच्या ऐवजी लांब आणि अरुंद सिलेंडरसारखी हवी होती. म्हणजे सगळ्यांना एकच वेळ किंवा अगदी थोडा टाईम डिफरन्स."

"म्हणजे पृथ्वीला परिवलनाला वेळपण कमी लागला असता. दिवसच आठ तासाचा असता तर ऑफिस फक्त तीन तास!"

"भेंजो पण झोपपण तीनच तास!"

"हो रे. आणि परिभ्रमणाला लागणारा वेळ तेवढाच राहिला तर बर्थडेसाठी नायतर न्यू ईयरसाठी जास्त दिवस वाट बघावी लागणार."

"आणि सिलेंडर जेवढा लांब तेवढे ध्रुवांकडे सूर्यकिरण तिरपे. म्हणजे मिडनाईट सन अजून जास्त वेळ. तिथले एस्किमो आणि पेंग्विन अजून पकणार."

"खरंय भेंजो. सिलेंडरचा प्लॅन कॅन्सल. पृथ्वी आहे तशीच राहू दे."

"डन. आता चहा आणि ब्रूनमस्का मागव."

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क्लास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मज्जा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंच मस्त !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या निमित्ताने माझ्या लहानपणातल्या एका आवडत्या पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्दल आभार!
लोकांनी पृथ्वीचा आकार कसा शोधला? - अनातोली तोमीलीन

संतापलेल्या चिनी सर्पराक्षसाने खांब वाकवून तारे एका बाजूस घरंगळवणे, जंबूद्वीप, चपट्या भाकरीच्या सावलीची सिद्धता, पाय डोक्यावर धरून छत्रीसारखा वापरणार्‍यांची टोळी, शून्य याम्योत्तर वृत्त, आफ्रिगीर, एरातोस्थेनीस, इब्न इद्रीसी, इब्न खोर्दाबेख, इलेसवीग-होल्स्टीन, गोत्तोप्स्+र्क* वगैरे नावं.. सगळं वाचून काहीच्या काही अद्भुत वाटायचं.

*कळपाटाची मर्यादा. प्+स्+र्क = प्स्र्क होतं पण प्स्+र्क अपेक्षित आहे. चार व्यंजनांचा जोडशब्द बहुधा मी प्रथमच वाचला होता; उच्चारताना कसरत होई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Zwnj - zero width non joiner वापरून पाहा.

प्स्‌र्क, हे असं हवंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्स्‌र्क हे तत्त्वत: योग्य पण जोडाक्षर म्हणून आलं तर आदर्श. म्हणजे पाय न मोडलेला अर्धा 'स' हा 'र्क'ला जोडलेला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोत्तोर्प्स्क!

ह्या किल्ल्याचं नाव विकिपीडियावर ‘Gottorf’ असं दिलेलं आहे, आणि त्यात ठेवलेल्या लाकडी पृथ्विगोलाचं डेनिश भाषेतलं नाव Den gottorpske kæmpeglobus असं दिलं आहे. याचा अर्थ ‘गोत्तोर्प्स्क’ हे किल्ल्याचं थेट नाव नसून ह्या नावाची षष्ठी विभक्ती असणार. सिरिलिक ते देवनागरी प्रवासात कुठेतरी थोडी गफलत झालेली दिसते.

पण असो. ह्या अनिल हवालदारांबद्दल उत्सुकता आहे. लहान मुलांची कित्येक पुस्तकं त्यांनी रशियनमधून मराठीत आणलेली आहेत. ते मॉस्कोत राहायचे की भारतात राहूनच हा उद्योग करायचे? मुळात या फंदात पडले कसे? कम्यूनिस्ट वगैरे होते की काय? कुणाला काही ठाऊक असेल तर प्लीज लिहा. काही असलं तरी माझ्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ह्यांचं आत्मचरित्र मुलखावेगळा.
---
'गोत्तोर्प्स्क'बद्दल आभार! पुस्तकात असंच छापलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0