"शहार "

सम्राज्ञी च्या अविर्भावात फिरणाऱ्या अतिसुंदर स्त्रिया
इथेही आहेत. काचेच्या उंच पॅनेलवर मूठभर
धारदार हिऱ्याने आपली प्रतिमा अधिकाधिक
सुंदर करण्याचा अशांत प्रयत्न त्या सतत
करीत असतात.
हिऱ्याचा काचेवर कुई कुई
कर्कश आवाज येत राहतो आणि
अंग शहारते .

field_vote: 
0
No votes yet