टी एस इलियट: रोमँटिसिझम चा निर्दालक (पोस्ट क्र . १)

टी एस इलियट: रोमँटिसिझम चा निर्दालक
(पोस्ट क्र . १)

टी एस इलियट वाचायला घेतला आहे. "का?" ते विचारू नका. हृदयात सौंदर्य-भावना उचंबळून आणणारा हा कवी नाही. त्याचे काव्य बरोबर उलट्याच दिशेने जाते.

शेली -बायरन-कीटस यांचे काव्य आणि सभोवतालचे वास्तव याचा शून्य संबंध विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या इंग्लडमध्ये दिसत होता.

इलियट ने हार्वर्डमध्ये आपला इंग्रजी वाङ्मयातील पी एच डीचा प्रबंध लिहून पूर्ण केला होता, पण अचानक साहेबांच्या लक्षात आले, की हा जर "पास " होऊन आपल्याला पी एच डी दिली गेली, तर हार्वडमध्येच प्रोफेसर बनण्याचे प्रचंड प्रेशर आपल्या आप्तेष्टांकडून आपल्यावर येईल. साहेबांना तर इंग्लंडमध्ये जगायचे होते : अमेरिकेला ते काहीसे गावठीच समजत होते. म्हणून मग साहेब प्रबंध सबमिट न करताच इंग्लंडला पळून गेले. पण तिथे सर्व दिशा हरविलेली एक अर्थहीन, भग्न नागर संस्कृती त्यांना दिसू लागली.

The winter evening settles down
With smell of steaks in passageways.
Six o’clock.
The burnt-out ends of smoky days.
And now a gusty shower wraps
The grimy scraps
Of withered leaves about your feet
And newspapers from vacant lots;
The showers beat
On broken blinds and chimney-pots,
And at the corner of the street
A lonely cab-horse steams and stamps.

And then the lighting of the lamps.

(या कवितेचे वाचन: https://www.youtube.com/watch?v=9T-sAaoxy8c)

याच्या लेखनाचे वर्ष: १९०८. टी एस इलियट तेंव्हा विशीच्या सुरवातीच्या वर्षांत होता.
क्रमशः .

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)