विचार कोणता असावा

आतापर्यंत या स्थळावर तसेच इतर अनेक स्थळांवर इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम हा विषय चघळून चघळून बाद झाला असावा. माझा प्रश्न इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम नाही. प्रश्न असा -
ज्यांनी ज्यांनी गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या, त्यातील काही जण मराठी माध्यमात शिकलेले होते. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो तिलाच मदत देऊन मोठी करण्याचा विचार केला असता तर सुयोग्य झाले असते. त्या ऐवजी इंग्रजी माध्यमातील शाळ सुरु करावी, असा विचार का आला असावा ?
खाली काही पर्याय देतो. त्यातील तुमच्या दृष्टीने योग्य पर्याय कोणते वाटतात ?
1. काहीतरी नवे करण्याची इच्छा.
२. शिक्षण क्षेत्रात क्रांती इत्यादी घडवण्याची इच्छा.
३. यापुढील काळ इंग्रजीचाच आहे. घ्या वाहत्या गंगेत हात धुवून.
४. महाराष्ट्रातील विद्यार्थी जागतिक पातळीवर कमी पडता कामा नयेत, हा प्रामाणिक विचार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वरील पर्यायच सगळ्यांना लागु पडतो. ईंग्रजी माध्यमाची शाळा फ़क्त व्यावसायिक दृष्टीकोनांतुनच काढली जाते. कोणीही ज्ञानदानासाठी वगैरे असल्या गोष्टी करीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा चा संबंध फक्त नोकरी मिळवणे इथ पर्यंत च आहे.
प्रगती,ज्ञान, उद्योग ,व्यवसाय ह्याचा आणि भाषेचा काही संबंध नाही.
भारतात कारकुनी करण्याची स्वप्न असणारा समाज खूप मोठा आहे त्यांना रिस्क न घेता पैसा हवा आहे..
त्या मुळे इंग्लिश भाषा शिकणे त्या mediam मध्ये शिकणे हे माकड चाळे चालू असतात.
स्वतः काही निर्माण करण्याची भारतात खूप कमी लोकात इच्छा आणि ताकत आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिश शासनाला कारकून पाहिजे होते त्यासाठी शिक्षण होते. दुर्भाग्य आपण शिक्षण व्यवस्था बदलली नाही. बहुधा नवीन शिक्षण नीतीत स्थानीय भाषांत ही डॉक्टरी इंजिनीअरिंग इत्यादि विषयांचे शिक्षण सुरू होईल, ही अपेक्षा. भविष्यात संस्कृत भाषेयचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची गरज असणार आहे. भारतीय शिक्षा बोर्डात संस्कृत ही अनिवार्य भाषा राहणार आहे.

बाकी आपल्या मातृभाषेबाबत अभिमान असेल तर न शिकता माझ्या सारखा टंकू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंधनुकरण करणे हा भारतीय लोकात खास गुण आहे.
जगातील कोणतीही भाषा बोलता येणे लिहत येणे ही काही खूप मोठी अवघड गोष्ट नक्कीच नाही.
जितके बाकी विषय अवघड आणि कठीण आहेत समजून घेण्यासाठी.

पण इंग्लिश आली पाहिजे हे ठीक आहे पण त्या साठी इंग्लिश mediam शाळेची गरज kg पासून पाहिजे असे काही नाही.
आज पर्यंत जी काही सर्व क्षेत्रात प्रगती झाली आहे त्या मधील बहुतेक लोकांचे शिक्षण मातृभाषेतून च झाले आहे.
पण इंग्लिश mediam चे fad आले की सर्व मुल इंग्लिश mediam मध्ये.
Extra class चे fad आले की सर्व च मुल extra class.
सोयाबीन एकाने केले की सर्व च शेतकरी सोयाबीन.
ऊस एकाने केला की सर्व च लोक ऊस.
आवळा चांगला असतो असे कोणी सांगितले की सर्व प्रजा आवळा च खाणार.
तसा काहीसा प्रकार आहे इंग्लिश mediam school वाढण्याचा.
इंग्लिश भाषा कशी जागतिक आहे प्रगती साठी कशी गरजेची आहे ही काही खरी कारणे नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैसे कमवा. इंग्रजीतून किंवा मराठीतून, कसेही. बाकी काहीही डजंट मॅटर. काय म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0