उजव्यांकडून होणारा सिनेमा बहिष्कार तार्किक आहे का?

मागच्या काही काळापासून काही सिनेमांवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतातील उजव्या गटांकडून / हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडून होताना दिसते.‌

हिंदुत्ववादी सामान्य नागरिक, समर्थक, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री इ. अशा सिनेमांविरोधात बहिष्कारचे आवाहन करताना दिसून येतात.‌

सध्या अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पक्षाची सरकारे आहेत.‌ असे असतानात असे केवळ बहिष्काराचे आवाहन तार्किक आहे का?

दोन पर्याय आहेत -

पर्याय १:
केंद्रीय सेन्सर बोर्डाद्वारे परवानगी देऊन कायदेशीर रीतीने सिनेमा प्रदर्शित होऊ देणे पण, "लोकहो हा सिनेमा थिएटर उपलब्ध आहे पण तुम्ही तो पाहायला जाऊ नका बरं का" असे म्हणत राहणे आणि लोक ते ऐकतील अशी अपेक्षा करणे.

पर्याय २:
स्वतःच्या सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सेन्सर बोर्डाद्वारे त्या विशिष्ट सिनेमाला प्रदर्शित करण्याची परवानगी न देणे. जेणेकरून लोकांना तो सिनेमा पाहण्याची / न पाहण्याची संधीच मिळु न देणे.

वरीलपैकी कोणता पर्याय जास्त तार्किक, प्रभावी आणि व्यवहारिक ठरेल? तुम्हाला काय वाटतं?

---

तुलनेसाठी साठी संदर्भ:
१९८८ मध्ये, तत्कालीन हिंदुत्ववादी नसलेल्या सरकारने सलमान रश्दींच्या "सैतानाची वचने" या पुस्तकावर बंदी घातली होती. तसे करणारा भारत हा पहिलाच देश होता.‌

त्या विचारसरणीच्या लोकांनी, "लोकहो, पुस्तक बाजार उपलब्ध आहे पण तुम्ही ते पुस्तक वाचू नका बरं का" असा आवाहन करण्याच्या प्रयत्न केला नाही; पुस्तक बाजारात उपलब्ध होण्यावरच बंदी घातली. परिणामी ते पुस्तक बाजारात आलेच नाही आणि लोक ते पुस्तक वाचूच शिकले नाही.

---

इथे, एखाद्या सिनेमावर बहिष्कार घालावा किंवा बंदी घालावी किंवा घालू नये ही चर्चा अपेक्षित नाही.

एखादा सिनेमा काही कारणांमुळे लोकांपर्यंत पोहचू देऊ नये असे वाटत असेल तर वरील दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय जास्त तार्किक, व्यावहारीक आणि प्रभावी ठरेल यावर मत अपेक्षित आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

(अवांतर:

१. सर्वप्रथम, ‘सॅटनिक व्हर्सेस’वरील (भारतातील) बंदी मला व्यक्तिशः पटलेली नव्हती (अजूनही पटलेली नाही), परंतु तो मुद्दा येथे पूर्णपणे असंबद्ध तथा अवांतर आहे.

२. ‘सॅटनिक व्हर्सेस’, सलमान रश्दी, ‘सॅटनिक व्हर्सेस’वरील भारतातील बंदी, फार कशाला, अगदी ‘सॅटनिक व्हर्सेस’च्या निमित्ताने अयातुल्लाह खोमेनींनी सलमान रश्दीविरूद्ध काढलेला फतवा, याबद्दलही बरेच असंबद्ध अवांतर गॉसिप करण्याजोगे आहे, परंतु अ. येथे तो मुद्दाही नाही, आणि ब. त्याकरिता लागणारे टंकनश्रम घेण्याइतका उत्साह (निदान तूर्तास तरी) मजजवळ नाही. (पुढेमागे तसा तो निर्माण झाल्यास न टंकण्यास मी वचनबद्ध नाही.)

हॅविंग सेड दॅट,

१. या धाग्याचे लॉजिक प्रचंड गंडलेले आहे, तथा

२. प्रस्ताव बायनरी आहे; केवळ दोनच पर्यायांपुरता मर्यादित ठेवण्यात आलेला आहे — इतर संभाव्य पर्याय (कदाचित अनवधानाने किंवा इतर कारणांस्तव) विचारात घेण्यात आलेले नाहीत — ही त्रुटी जाणवते,

एवढ्या दोनच मुद्द्यांचे सूतोवाच करून तूर्तास आवरते घेतो.

(सध्यापुरते आवरते घेण्याची उद्दिष्टे बहुविध आहेत. एक तर तेवढे सविस्तर टंकण्याचा तूर्तास कंटाळा आहे. दुसरे म्हणजे, यातील मला जाणविलेल्या त्रुटी या उघड (obvious) आहेत, लक्ष दिल्यास कोणालाही जाणवण्यासारख्या आहेत, असा माझा समज आहे. शिवाय, येथील इतर अतिरथी-महारथी कायकाय मुद्दे मांडतात, ते पाहण्यात मला रस आहे. बहुधा कोणाच्या ना कोणाच्या प्रतिसादांत ते (पक्षी: मला जाणवलेले) मुद्दे येतीलच — इन विच केस, (‘बिंगो’ असे टंकण्याहून अधिक) टंकनश्रम मला घ्यावे लागणार नाहीत. नपक्षी, नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी तोवर न आलेले मुद्दे टंकण्याचा पर्याय मी (स्वतःस) नाकारलेला नाही (स्वीकारलेलाही नाही, परंतु that is a different matter.); तूर्तास तो राखून ठेवीत आहे.)

सारांश, तुमचे चालू द्या. तूर्तास मी आवरते घेतो; इतरांनीही थोडे कष्ट घेतल्यास/डोके चालविल्यास उत्तम. (If they deem it worth the effort, that is.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उजव्या गटाने बहिष्कार घालायची मागणी "सिलेक्टिवली" केली आहे, हे सर्वात अतार्किक आहे.
XYZ बहिष्कृत करा - अशी मागणी उजवे "काही ठराविक लोकांसाठीच"करतात. तीचXYZ कृत्ये इतरांनी केली तर उजव्यांना चालतं.

म्हणजे उजव्यांचा बहिष्कार हा कृतीवर नसून कर्त्यावर असतो- पण तसं उघड म्हणायचं धाडस त्यांच्यात नसतं.
आणि कर्त्यावर बहिष्कार घाला कारण तो (काहीही कारणासाठी) आम्हाला आवडत नाही - हे अर्थातच अतार्किक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका बाबतीत मात्र माझे मत मांडू शकतो.
सिनेमे कसे असावेत ह्याची एक नियमावली असावी.
काय दाखवू शकतो काय दाखवू शकतं नाही.
कोणत्या विषयावर सिनेमा बनवू शकतो कोणत्या
विषयावर नाही.

इतिहास शी संबंधित विषय असेल तर
सत्य इतिहास सोडून दिग्दर्शक ल वाटते म्हणून काही ही दाखवता येणार नाही,किंवा पुरावेच नसतील तर तसे प्रसंग दाखवता येणार नाहीत.
कोणत्या धर्माचा,जातीचा,प्रांताचा अपमान होईल किंवा त्यांची बदनामी होईल ह्या वर सिनेमे बनवता येणार नाहीत.
आणि हे सर्व बघण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे असेल.
त्या मध्ये सर्व विषयातील खरे तज्ञ असतील.
कोणत्याच विचारधारा चे पुजारी नसतील.
आणि एकदा का सेन्सॉर बोर्ड नी सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी दिली की त्याला रस्त्यावर,समाज माध्यमात विरोध करता येणार नाही.
पण त्या साठी व्यवस्था (सेन्सॉर बोर्ड हे निःपक्ष असावे) ठीक असावी आणि सार्वभौम असावी.
सरकार ची गुलाम नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतिहास शी संबंधित विषय असेल तर
सत्य इतिहास सोडून दिग्दर्शक ल वाटते म्हणून काही ही दाखवता येणार नाही,किंवा पुरावेच नसतील तर तसे प्रसंग दाखवता येणार नाहीत.
कोणत्या धर्माचा,जातीचा,प्रांताचा अपमान होईल किंवा त्यांची बदनामी होईल ह्या वर सिनेमे बनवता येणार नाहीत.
आणि हे सर्व बघण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे असेल.

https://www.thehindu.com/opinion/interview/%E2%80%98There-is-no-right-no...

Also, a favourite Hitchslap: https://youtu.be/HHwvT4Xl5Uo

बघा पटतंय का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

इथे, एखाद्या सिनेमावर बहिष्कार घालावा किंवा बंदी घालावी किंवा घालू नये ही चर्चा अपेक्षित नाही.

का?

मला वाटते खरे म्हणजे कुणी काय बघावे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. ज्याने त्याने स्वत:च्या वकुबानूसार ठरवावे.
पण
वरील दोन्ही पर्याय फारसे प्रभावी नाहीत.
लोकांपर्यंत सिनेमा पोहोचू नये असे वाटत असेल तर तो मूळात निर्माणच होऊ देऊ नये.
समस्त फिल्लम इंडस्ट्रीमधे गुप्तहेर पेरावेत.. असे काही बनते आहे कळल्यावर तिथेच त्याला संपवून टाकावे.
"न रहेगा बांस - न बजेगी बांसुरी "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

असे केव्हा आव्हान करावे?
त्या साठी प्रथम उदाहरणे.
१) चीन च्या वस्तू वर बहिष्कार टाका
कारण चीन भारत विरोधी भूमिका नेहमी घेतो घेतो आणि भारताचे नुकसान च झाले पाहिजे हेच त्याचे तत्व आहे.
२) पाकिस्तानी काही वस्तू च नाहीत पण त्यांचे कलाकार इथे येवून पैसे कमावतात.
आणि तेच पैसे भारता विरुद्ध वापरले जातात.
बहिष्कार टाका.
३)रशिया वर पाश्चिमात्य राष्ट्र असेच बहिष्कार टाकून कोंडी करतात कारण रक्त पिपासू भांडवल शाही चा रशिया समर्थक नाही.
४)उत्तर कोरिया,इराण ,इराक ,etc asha अनेक देशांची आर्थिक कोंडी केली जाते कारण हे देश आपल्या (इथे कोणी पण असेल) हिताला बाधा आणतात.
जगात बहिष्कार टाकणे हे कॉमन आहे..आपल्या हिताला बाधा आणेल त्याची कोंडी करणे ह्या मध्ये काही गैर नाही.
मानवी. जग स्वार्थ वर च उभे आहे.
विचार,विचारवंत,तत्व,निती हा काही प्रकार नसतो.
ज्याच्या पासुन आपल्या हिताला येईल त्याची कोंडी करणे हाच एकमेव हेतू बहिष्कार च असतो.
डावे,उजवे,मधले असे काही नसते.
हिंदू धर्मा विषयी द्वेष करणाऱ्या लोकांचे चित्रपट बघून त्यांचा आर्थिक फायदा करून देणे हे अयोग्य च आहे.
जागतिक नियम नुसार .
स्व हीत पाहिले.
जे हिंदू च्या पैशावर च कोणत्या ही व्यवसाय मधून पैसे कमावत असतील आणि हिंदू विरोधी कार्यात सहभागी असतील तर त्यांचा बहिष्कार करणे काही गैर नाही
हा युनिव्हर्सल लॉ आहे सर्व स्व हीत च जपत असतात.
उगाचच उदार (उदार मनोवृत्ती हा काही प्रकार अस्तित्वात च नाही) होण्याचे कारण नाही.
इथे हिंदू च्या जागेवर
मुस्लिम,बौद्ध,astik, नास्तिक,निधर्मी,मराठी,हिंदी भाषा असणारे,दक्षिण भारतीय काही ही घालू शकतं बाकी मजकूर तोच असेल.
सहजीवन असावे .
असे कोणत्याच गटाला वाटत नाही.

बहिष्कार चा मुळ हेतू च स्व हीत जपणे हा असतो.
सत्य,असत्य,योग्य ,अयोग्य असे काही नसते.
हे सर्व शब्दीक खेळ आहेतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उजवे किंवा डावे दोघांनाही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा हक्क असावा. मात्र त्यांनी इतरांसाठी निर्णय घेऊ नये. एखादा चित्रपट बघायचा नसेल तर तुम्ही तो पाहायला जाऊ नका बरं का असं सांगण्याऐवजी थिएटरमालकांना मारहाण, तोडफोड, प्रेक्षकांना दमबाजी, सत्तेचा वापर करुन राज्यात तो कुठे प्रदर्शित होऊ न देणे वगैरे पटत नाही.

गेले काही दिवस 'हर हर महादेव' आणि आता 'पठाण' या चित्रपटांवरुन चाललेले वाद भयानक आहेत. इतके दिवस वेगवेगळे देव (खंडोबा, गणपती, राम वगैरे) किंवा छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर यांना जातीपातीत वाटून घेतले होतो आता रंगांच्या मालकीवरुन वाद चाललाय (भगवा रंग आमचा वगैरे). पुढे काय होईल याची कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उजवे किंवा डावे दोघांनाही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा हक्क असावा. मात्र त्यांनी इतरांसाठी निर्णय घेऊ नये. एखादा चित्रपट बघायचा नसेल तर तुम्ही तो पाहायला जाऊ नका बरं का असं सांगण्याऐवजी थिएटरमालकांना मारहाण, तोडफोड, प्रेक्षकांना दमबाजी, सत्तेचा वापर करुन राज्यात तो कुठे प्रदर्शित होऊ न देणे वगैरे पटत नाही.

तोच तो, प्रस्तावाच्या (वगळलेल्या) नॉन-बायनरी पर्यायांचा मुद्दा, वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाप्रस्तावातल्या गंडक्या बायनरीबद्दलही +१.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्याच बहिष्कारांच्या संदर्भात काही आठवड्यांपूर्वी (माझ्या आवडत्या) न्यू याॅर्करनं छापलेला लेख - When the Hindu Right Came for Bollywood
The industry used to honor India’s secular ideals—but, since the rise of Narendra Modi, it’s been flooded with stock Hindu heroes and Muslim villains.

(संध्याकाळी, दुकान बंद केल्यावर, त्यातले महत्त्वाचे वाटलेले परिच्छेदही डकवेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सेक्युलर हा एक शब्द आहे.सर्व मानव जात समान आहे .
असे समजणे म्हणजे सेक्युलर.
ढोबळ पण विशाल व्याख्या.
पण असे कोणी असते का?
भेदभाव फक्त धर्म,जात ह्या वर होत नाहीत.
अधिकार,प्रतिष्ठा ((खोटी) आर्थिक स्थिती,रंग, सुंदरता,body shape, प्रदेश, निष्ठा,श्रद्धा,etc etc etc
अगदी कपडे,चप्पल, शाम्पू,सेंट ह्या वरून पण भेदभाव होतात.
आणि अगदी कट्टर
माणूस सेक्युलर असूच शकत नाही.
प्रतेक व्यक्ती नी स्वतःला विचारावे मी सेक्युलर आहे का?.
एक पण व्यक्ती सेक्युलर मिळणार नाही

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्याय क्रमांक एक हा जास्त व्यवहारिक ठरेल.. कारण कोणत्याही प्रकारची बंदी न घालता लोकांना अशा प्रकारातून समजत आहे की बॉलीवूड सिलेक्टवली आपले मत प्रदर्शित करतोय... उदाहरणार्थ पी के सारखा सिनेमा. हल्ली बॉलीवूडची व्यवसायिक गणिते ढासळत आहेत ती केवळ सरळ धोपट मार्ग सिनेमांच्या मुळे नाही तर त्यामध्ये अशा प्रकारच्या आवाहनांचाही चांगलाच हातभार आहे असे वाटते.

अर्थातच पर्याय क्रमांक दोन प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमीच आहे कारण लोकशाहीमध्ये जास्त करून बहुसंख्यांकांच्या अपेक्षांचा बळी दिला जातो.
अर्थात तुलनेसाठी आपण जो संदर्भ दिलेला आहे तो असंबंध्द आणि अवांतर नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहिष्कार घालणे म्हणजे उलट प्रसिद्धी करण्यासारखेच आहे. लोकांची उत्सुकता चाळवली जाते. का बहिष्कार करायचा म्हणतायत ते बघू असे म्हणून उलट प्रेक्षक चित्रपटाकडे ओढला जातो. आणि काही वेळा त्यांना वाटु शकते.. बहिष्कार करण्यासारखे काहीच नाहीये.. उग्गाच.
निगेटिव्ह पब्लिसिटी का कायतरी म्हणतात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

‘सॅटनिक व्हर्सेस’च्या बाबतीत माझे असेच झाले. बोले तो, अगोदर कॉलेजात असताना रश्दीचे ‘शेम’ वाचले होते. (या पुस्तकात पाकिस्तानची खिल्ली उडविलेली असल्याकारणाने त्यावर पाकिस्तानात बंदी होती, म्हणे. अर्थात, भारतात बंदी असण्याचे काहीच कारण नव्हते, आणि नव्हतीही.) तर ते ‘शेम’ वाचून, ‘हा मनुष्य अतिशय टाकाऊ लिहितो’, इतकीच धारणा झाली होती, नि यापुढे सलमान रश्दीचे कोठलेही पुस्तक हातातसुद्धा धरण्याची गरज नाही, या निष्कर्षाप्रत पोहोचलो होतो. (नाही म्हणायला, उर्दू भाषेत/उर्दूभाषक समाजात एक से बढ़कर एक अशा रोचक शिव्या/शिवीसंकल्पना आहेत, असा अर्थबोध ते पुस्तक वाचून झाला होता, एवढी एकच जमेची बाजू, परंतु, हा फायदा झाला नसता, तरी फारसे बिघडले नसते, नि तेवढ्याकरिता वाचण्याएवढे काही पुस्तक ‘वर्थ’ नव्हते. असो.)

त्यामुळे, ‘सॅटनिक व्हर्सेस’ जेव्हा प्रकाशित झाले, तेव्हा त्याबद्दल अजिबात स्वारस्य नव्हते. परंतु पुढे त्या पुस्तकावर (सर्वप्रथम) भारतात बंदी आली, नि भारतात ते पुस्तक मिळेनासे झाले. तिथवरही ठीक.

पुढे अमेरिकेत नुकताच नोकरीनिमित्ताने आलेलो होतो, पहिला पगारसुद्धा झालेला नव्हता, नि भारतातून येताना कंपनीने ‘अॅडव्हान्स’ म्हणून हातावर टिकविलेले (जेमतेम एखादा आठवडाभर तीही काटकसरीने गुजराण करता येण्याइतपत) तुटपुंजे डॉलरच तेवढे काय ते खिशात होते, अशा काळात एकदा एका बुकस्टोअरमध्ये जाण्याचा योग आला. शेल्फावर ‘सॅटनिक व्हर्सेस’ दिसले. एरवी मी ते विकत घेतले नसते, परंतु, ‘भारत सरकारने एवढी बंदी घातलीय, असे शिंचे आहे तरी काय या पुस्तकात, ते पाहूया’, या कुतूहलापायी मोह झाला, नि (तेव्हा न परवडणारे) दहा डॉलर खर्चून मी ते विकत घेतले. (दहा डॉलर रश्दीच्या XXत सारले, म्हणाना!) घरी गेल्यावर पुस्तक वाचायला घेतले, नि पैसे वाया गेल्याचा पश्चात्ताप झाला. भयंकरच असंबद्ध ट्रॅश लिहितो बुवा हा माणूस! दीड प्रकरणाच्या वर वाचवले नाही. शिवाय, या पुस्तकात इस्लामबद्दल अपमानकारक मजकूर आहे असा जो आक्षेप आहे, तो मजकूर (पुस्तक दीड प्रकरणापुढे न वाचल्याकारणाने) निदान मला तरी आढळला नाही. अर्थात, उर्वरित पुस्तकात असा काही मजकूर नसेलच, असे माझे म्हणणे नाही; परंतु, असा काही मजकूर नजरेस येण्याइतक्या पुढपर्यंत ते पुस्तक वाचून, तो मजकूर प्रत्यक्षात वाचून मग भावना दुखावून घेणाऱ्यांच्या पेशन्सला माझा सलाम!

(यापेक्षा हृषीकेश आर्वीकर बरे लिहितो.)

सांगण्याचा मतलब, भारत सरकारने या पुस्तकावर बंदी घातल्यामुळे माझे दहा डॉलर वाया गेले. (अन्यथा मी हे पुस्तक विकत घेतले नसते. अरुंधती रॉयच्या पुस्तकांवर भारतात बंदी नाही; मी ती विकत घेत नाही, इतकेच नव्हे, तर त्यांकडे ढुंकूनही पाहात नाही.) सबब, भारत सरकारने खरे तर मला दहा डॉलर नुकसानभरपाई म्हणून दिले पाहिजेत. (परंतु, ते देणार नाहीत, याची मला कल्पना आहे, त्यामुळे, मी तशी आशा धरून नाही. असो चालायचेच.)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या बीबीसीच्या माहितीपटाचं काय लफडं झालं म्हणे? सरकारनं बंदी घातली म्हणतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या सिनेमात रॉ एजेंट आतंकवादी दाखविला जातो आणि आयएसआय ही आतंकवादाच्या विरूढ लढणारी संघटना. असा सिनेमा भारत सोडून कोणत्याही इतर देशात बनूच शकत नव्हता. बहुधा असा प्रयत्न करणार्‍यांना जेल मध्ये डांबले असते. मला पहिले आश्चर्य हेच वाटते सेंसर बोर्ड ने हा सिनेमा पास कसा केला. दूसरा फक्त पैश्यांसाठी देशात 9000 स्क्रीन वर सिनेमा मलिक असा सिनेमा दाखवितात. माझ्या दृष्टीने हा सिनेमा म्हणणे आपल्या सुरक्षा यंत्रणांबाबत योजनपूर्वक बहुतेक विदेशी इशार्‍यावर चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ2

ज्या सिनेमात रॉ एजेंट आतंकवादी दाखविला जातो आणि आयएसआय ही आतंकवादाच्या विरूढ लढणारी संघटना.

माझ्या दृष्टीने हा सिनेमा म्हणणे आपल्या सुरक्षा यंत्रणांबाबत योजनपूर्वक बहुतेक विदेशी इशार्‍यावर चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न.

तुम्ही स्वत: पाहिला आहेत काय हा सिनेमा? की असेच सांगोवांगीवरून बनवलेले मत? की 'वरच्यांचा' अपप्रचाराचा अजेंडा पुढे चालविण्याचा प्रयत्न? (पैसे घेऊन वा पैसे न घेता?)

(मी कालच स्वत: जाऊन पाहून आलो. इतकाही काही वाईट अथवा भयंकर वगैरे नाहीये चित्रपट. ('देशद्रोही' वगैरे तर नाहीयेच नाहीये.) हं, बहुतप्रसंगी आत्यंतिक इल्लॉजिकल आहे, अगदी स्टुपिड म्हणण्याइतका इल्लॉजिकल आहे, एवढाच आक्षेप कदाचित घेता येईल, परंतु ते काय, सगळेच हिंदी चित्रपट असतात. अडीच तास डोके बाजूला काढून ठेवून निखळ करमणूक - टाइमपास - म्हणून पाहायला इतकाही काही वाईट नाहीये चित्रपट. इतरांनी हेतुपूर्वक डोक्यात भरविलेली घाण काढून टाकून एकदा स्वत: जाऊन पाहून अजमावून याच, म्हणतो मी.)

ज्या सिनेमात रॉ एजेंट आतंकवादी दाखविला जातो आणि आयएसआय ही आतंकवादाच्या विरूढ लढणारी संघटना.

असे काहीही नाहीये / हा विपर्यास आहे. Nuance नावाचा काही प्रकार असतो, एवढेच सुचवू इच्छितो. (समजण्याची कुवत असेल, तर.) (आणि हो, एखाद्या आत्यंतिक स्टुपिड, इल्लॉजिकल चित्रपटातसुद्धा एखाद्या बारक्याश्या बाबतीत nuance असू शकतो, असे सुचविण्याचे धाडस करतो.)

बाकी चालू द्या. (कालचा गोंधळ बरा होता.)

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0