आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग २

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग २

डॉ. विष्णू जोगळेकर

मागच्या लेखात आपण पाहिले की आयुर्वेदात सिद्धांत हे चार प्रमाणांवर आधारित आहेत. या लेखापासून त्यातल्या प्रत्येक प्रमाणाची बलस्थाने आणि मर्यादा पाहू. ह्या लेखात प्रत्यक्ष प्रमाण पाहू.

सूक्ष्म निरीक्षण किंवा प्रत्यक्ष प्रमाण सर्वांत जास्त महत्त्वाचे. वाग्भटाचार्य म्हणतात की अगदी ब्रह्मदेव जरी म्हणाला की अंबष्ठादि गण जुलाब घडवतो तरी ते मी मान्य करणार नाही; कारण तो गण जुलाब थांबवतो हा रोजचाच अनुभव आहे. अक्ष म्हणजे इंद्रिय. जे इंद्रियांना जाणवते ते प्रत्यक्ष.

.

प्रतिमेचा स्रोत : https://www.psychologywayofpositivelife.com/2020/04/perception.html

हे प्रमाण जगात सगळीकडे मान्य असलेलं प्रमाण आहे. जे दिसत आहे, ऐकू येत आहे, वासावरून चवीवरून कळत आहे, स्पर्शाने कळत आहे ते खरे आहे, हे कोणीही मान्य करेल. पण यात अनेक अडचणी आहेत. आयुर्वेद आठ महत्त्वाचे अडथळे सांगतो.

  • एखादी गोष्ट खूप जवळ असेल तर दिसत नाही. उदाहरणार्थ आपल्या स्वतःच्या पापणीचे केस दिसत नाहीत. आरशात आपण आभासी प्रतिमा पाहू शकतो पण साक्षात केस पाहू शकत नाही.
  • खूप दूरच्या गोष्टी इंद्रिये जाणून घेऊ शकत नाहीत. प्रत्येक इंद्रियाचा आवाका प्रत्येक जीवमात्रात वेगवेगळा असतो. नाग दोन किलोमीटर अंतरावरच्या भक्ष्याचा वास घेऊ शकतो. पण अंतराची मर्यादा असते.
  • वस्तू खूप सूक्ष्म असेल तर दिसत नाही. हवेत पसरलेल्या कणांचे गंध ते कण किती दाटीवाटीने आहेत त्यावर अवलंबून असतात. म्हणजे गंध असतातच पण जाणवत नाहीत.
  • एकसारख्या अनेक वस्तू वेगळ्या जाणवत नाहीत. आपल्यासाठी सगळी कबुतरे सारखीच. धान्याच्या राशीतला एक दाणा दुसऱ्यापासून वेगळा करता येत नाही.
  • वयानुसार किंवा जन्मतः इंद्रिये दुर्बळ असू शकतात.
  • एका वस्तूच्या प्रखरतेमुळे दुसऱ्या वस्तूंची जाणीव पराभूत होते. सूर्यप्रकाशात तारे दिसत नाहीत.
  • एखादी गोष्ट झाकलेली असेल तर जाणवत नाही. हाडे नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत कारण ती मांस त्वचा वगैरेंनी झाकली गेलेली असतात.
  • लक्ष विचलित झाले की इंद्रिये गोष्टी जाणून घेऊ शकत नाहीत. जादूगार मंडळी याचाच फायदा घेऊन आपली कला दाखवतात.

या अडथळ्यांवर गेल्या दीडशे वर्षांत यंत्रे आणि तंत्रज्ञान यांनी मोठ्या प्रमाणावर मात केली आहे. पण तरीही सृष्टी इतकी अवाढव्य आहे की इंद्रिये जाणून घेऊ शकतात अशा गोष्टी मर्यादित आणि अप्रत्यक्ष गोष्टी जास्त हे मान्य करावेच लागते. आणखी एक आक्षेप म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे क्षणभंगुरत्व. इंद्रिये जाणिवांची नोंद ठेवू शकत नाहीत. त्यासाठी मेंदूमध्ये स्वतंत्र यंत्रणा लागते. जाणिवेच्या स्मृती असणे आणि त्या हव्या तेव्हा सादर करणे या भिन्न गोष्टी आहेत. शिवाय स्मृती साठवताना व्यक्ती तितक्या प्रकृती. एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी आठवते. यात डिजिटल तंत्रज्ञान विकसित झाले त्यामुळे खूप फरक पडला आहे. पण त्या क्षमतेलाही मर्यादा आहेत.

आणखी एक म्हणजे आपली कल्पनाशक्ती आपल्याला सत्य पाहण्यात अडथळा आणणे. चंद्रावर आपल्याला ससा, हरिण वगैरे आकृती असल्याचा भास होतो.

या सगळ्यांमुळे अतिशय श्रेष्ठ अशा या प्रमाणाला पर्याय शोधणे अनिवार्य आहे.

इतर प्रमाणांच्या विरोधात प्रत्यक्ष जात असेल तिथे मात्र प्रत्यक्ष हेच मान्य ठरते. युक्तिवाद वाऱ्यावर विरून जातात.

या लेखात आणखी एका प्रमाणाचा विचार करायचा आहे. ते प्रमाण आयुर्वेदात महत्त्वाचे आहे पण तेच आयुर्वेदावर टीका करणाऱ्यांसाठी मोठे हत्यार ठरले आहे. ते प्रमाण म्हणजे आप्तवचन.

पूर्वसूरींचे अनुभव विचारात घेणे आवश्यकच असते. आजही शास्त्रीय संशोधन हे पूर्वी प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा आढावा घेऊनच पुढे जाते. पीअर रिव्ह्यू हे संशोधनामध्ये विश्वासार्हता आणण्यासाठी एक साधन आहे. आजकाल संशोधनाचे मूल्यमापन करण्यासाठी सायंटोमेट्री वापरली जाते. इंम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स, एच इंडेक्स अशी अनेक मापने वापरली जातात. केवळ पीअर रिव्ह्यू अनेकदा भाईभतीजा वादाला स्थान देतो. विद्यापीठात राजकीय पदे धारण करण्यासाठी तीन पेपर्स प्रसिद्ध झाले असले पाहिजेत हा नियम यूजीसीने आणला. तेव्हा अनेक तथाकथित प्राध्यापक राजकारणी मंडळींनी संगनमताने बोगस जर्नल्सचा सुकाळ करून टाकला होता.

डॉ. शुभदा नगरकर आणि डॉ. भूषण पटवर्धन यांनी काही चाळण्या लावून ही जर्नल तपासून बोगस आहेत हे सिद्ध केले. यांत अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सचा समावेश होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी यूजीसीने सुमारे पाच हजार जर्नल्सची मान्यता रद्द केली होती. त्याविषयी त्यांच्याच शब्दांत –

We have developed a protocol with objective criteria for identifying journals that do not follow good publication practices. We studied 1336 journals randomly selected from 5699 in the university source component of the ‘UGC-approved list’. We analysed 1009 journals after excluding 327 indexed in Scopus/Web of Science. About 34.5% of the 1009 journals were disqualified under the basic criteria because of incorrect or non-availability of essential information such as address, website details and names of editors; another 52.3% of them provided false information such as incorrect ISSN, false claims about impact factor, claimed indexing in dubious indexing databases or had poor credentials of editors. Our results suggest that over 88% of the non-indexed journals in the university source component of the UGC-approved list, included on the basis of suggestions from different universities, could be of low quality. In view of these results, the current UGC-approved list of journals needs serious re-consideration. New regulations to curtail unethical practices in scientific publishing along with organization of awareness programmes about publication ethics at Indian universities and research institutes are urgently needed.

अधिक माहितीसाठी पाहा : A critical analysis of the ‘UGC-approved list of journals’

आयुर्वेदात अशा प्रकारे बोगस गोष्टी लिहिल्या जाऊ शकतात याची कल्पना आचार्यांना होती. म्हणूनच चरकसंहितेत शास्त्र कसे तपासावे याचे नियम दिले आहेत. ते आजही रिव्ह्यू करणाऱ्या लोकांना मार्गदर्शक तत्त्व म्हणून उपयोगी ठरतील असे भक्कम आहेत. सायंटोमेट्री त्या दृष्टीने विकसित होऊ लागली आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

चरकसंहितेत एकूण २३ निकष शास्त्र परीक्षेसाठी दिले आहेत. जिला वैद्य व्हावेसे वाटते तिने आधी शास्त्रपरीक्षा शिकावी असा चरकाचार्यांचा आदेश आहे.

सुमहद्यशस्विधीरपुरुषासेवितमर्थबहुलमाप्तजनपूजितं त्रिविधशिष्यबुद्धिहितमपगतपुनरुक्तदोषमार्षं सुप्रणीतसूत्रभाष्यसङ्ग्रहक्रमं स्वाधारमनवपतितशब्दमकष्टशब्दं पुष्कलाभिधानं क्रमागतार्थमर्थतत्त्वविनिश्चयप्रधानं सङ्गतार्थमसङ्कुलप्रकरणमाशुप्रबोधकं लक्षणवच्चोदाहरणवच्च,

चरक संहिता विमानस्थान ८/३

यातील काही निकषांचे वर्णन येथे देत आहे. विस्तारभयाने सर्व निकष येथे देत नाही.

१] सुमहत्: Comprehensive
२] यशस्वी : Result oriented
३] धीरपुरुषासेवितम् : Accepted by people who do not hesitate to raise objections (Experienced Reviewers)
४] अर्थबहुलम् : full of significant findings
५] आप्तजनपूजितम् : Accepted & adopted by other researchers current measures for these are citation index, site score etc.
६] त्रिविधशिष्यबुद्धिहितम् : The user friendly for all kinds of users from novice to expert currently there is no specific measure for this criterion although viewer should statistic can be refined to develop reliable measure for this criterion. The current rate of gathering data about number of downloads should be classified further to include information about who downloads which articles
७] अपगतपुनरुक्तदोषम् : The literal meaning is without repetition & it refers to the internal repetition but we can interpret this criterion as non-plagiarism. Plagiarism or literature theft is on the increase because in this internet era it is very easy to copy any document & paste it in one’s own article without giving appropriate credit to the original author. Even though there are antiplagiarism software they are not full proof.
८] आर्षम् : Originating from accredited person or institution. This is a rather dubious criterion. Although usually reputable institutions & persons are more reliable, it is a circular argument. A person becomes more reliable because his or her previous work was reliable but at the time of previous work that person may be totally new to the field & hence without any reputation. Also, even well-known highly reputed persons & institutions are known to have committed blunders, probably the biggest example of this is double Nobel laureate Linus Pauling. Pauling was without doubt the greatest chemist in the 20th century. He had submitted a paper to the journal Nature, the subject of the paper was “Proposed structure of DNA”, the reviewers found that Pauling’s proposed structure for deoxyribose nucleic acid was not acidic at all & the paper was rejected. So this particular criterion is not reliable & should be used with a large pinch of salt.
९] सुप्रणीत सूत्रम् : Well founded hypothesis

नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आंतरराष्ट्रीय जर्नल्स त्या प्रकाशकांनी Artificial intelligence तंत्रज्ञानाचा वापर बोगस पेपर शोधून काढण्यासाठी सुरू केला आहे. यातील निकषांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. (संदर्भ - Nature NEWS
02 December 2022; Paper-mill detector put to the test in push to stamp out fake science)

आप्तवचन हे प्रमाण मानले जाऊ लागले कारण त्या अनुभवातून सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. No need to reinvent wheel. त्याच त्याच गोष्टी स्वतः अनुभव घेऊन सिद्ध करत बसण्यापेक्षा या २३ निकषांवर उतरलेल्या गोष्टी मान्य करून पुढे जाणे इष्ट. काही काही गोष्टी मुळात कोणी शोधल्या हे देखील शोधणे काही शतकांनंतर अशक्य होऊन बसते. अशा गोष्टी ऐतिह्य या प्रमाणामध्ये येतात. शतकानुशतके अशा गोष्टी रूढ असतात.

सर्व भारतीय दर्शने (तत्त्वज्ञान पद्धती) शब्दप्रमाण मान्य करत नाहीत. लोकायत किंवा चार्वाकदर्शन हे त्यातले मुख्य. न्यायदर्शनात शब्द स्वीकारण्यापूर्वी कडक तपासण्या आहेत. खरा पेचप्रसंग येतो ते शब्दप्रामाण्यवादी लोक पोथीतील शब्दांत कानामात्रावेलांटीचादेखील फरक चालवून घेत नाहीत तेव्हा. विशेषतः वैदिक अशी पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दर्शनांच्या बाबतींत.

जशी दर बारा मैलांवर भाषा बदलते तशीच दर बारा वर्षांनीदेखील बदलते. पण संस्कृत भाषा पाणिनीच्या व्याकरणाने इतकी काटेकोर पद्धतीने बांधली गेली की ती शतकानुशतके न बदलता स्थिर राहिली आणि त्यामुळे शब्दप्रामाण्यवादी मंडळी खूप बलवान झाली, आणि शंकेला स्थान उरले नाही. शंका घेणे हे पाखंडी ठरवले जाऊ लागले. त्यातच परकीय आक्रमणापासून बचावण्यासाठी मौखिक परंपरेने ज्ञान पुढे नेताना कुठलेही बदल मान्य होणे अशक्यच होते. त्याचा अनेक संधिसाधू लोकांनी फायदा उठवला आणि स्वतःच्या मनाच्या श्लोकांना पोथ्यांमध्ये घुसवले. असे प्रक्षिप्त श्लोक आणि पाठभेद भरपूर आहेत.

एक उदाहरण पुरेसे होईल –

स्थावर (वनस्पतिज किंवा खनिज विष) आणि जंगम (प्राणिज) विषे शरीरात कोणत्या गतीने जातात याविषयी चरकसंहितेचे दोन टीकाकार चक्रपाणी आणि गंगाधर बरोब्बर विरुद्ध दिशा सांगतात –

जङ्गमं स्यादधोभागमूर्ध्वभागं तु मूलजम्।

असे चक्रपाणी म्हणतात, तर

जङ्गमं स्यादूर्ध्वभागं अधोभागम् तु मूलजम्।

असे गंगाधर म्हणतात.

शब्दप्रामाण्यवादी लोक सुप्रीम कोर्टातल्या वकिलांना लाजवतील असे युक्तिवाद अशा प्रक्षिप्त गोष्टी सिद्ध करायला वापरतात.

त्यामुळे चरकसंहितेत सांगितली गेलेली पद्धत बरीच मागे पडली. पण चरकाचार्य शब्द प्रमाणाला वैकल्पिक स्थान देतात.

आयुर्वेदाचे टीकाकार नेमक्या याच बदल न करण्याच्या प्रघाताचा आयुर्वेद कसा अशास्त्रीय आहे असा प्रचार करण्यासाठी वापर करतात.

(क्रमशः)
लेखकाचा अल्पपरिचय :
डॉ. विष्णू जोगळेकर आयुर्वेदाचे प्राध्यापक आहेत (आता निवृत्त). पुणे येथील टिळक आयुर्वेद विद्यालयाशी ते संलग्न होते. J-AIMच्या (Journal of Ayurveda and Integrative Medicine) संपादकीय समितीवर ते होते.

field_vote: 
0
No votes yet

ह्या विषयाची मला काहीच माहिती नसल्यामुळे माझे प्रश्न फार प्राथमिक आहेत. वाग्भटाचार्य, चरकाचार्य, चार्वाक, चक्रपाणी, गंगाधर अशा अनेक व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे. ह्या कुठे आणि केव्हा होऊन गेल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

लेख आयुर्वेदातल्या प्रमाणपद्धतीबद्दल आहे आणि तो आयुर्वेदापेक्षा भारतीय तत्त्वज्ञानाच्या विषयातल्या "लॉजिक"संबंधी मंथनाकडे अधिक झुकला आहे असे वाटले. प्रमाणांचा विचार यथायोग्य / शास्त्रीय पद्धतीने केला म्हणजे प्रमाणांच्या मागची विचारसरणीही तितकीच शास्त्रीय असेल असे नाही. (मुळात आयुर्वेदासारख्या सगळ्या प्रणाली "लक्षणां"वर भर देऊन विकसित झाल्या आहेत. लक्षणे म्हणजे रोग नाही आणि लक्षणे बरी / नाहीशी करणे म्हणजे रोग बरा करणे नाही इतके सांगितले तरी पुरे आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाबद्दल आभार.
परंतु पहिल्या या दोन लेखांमुळे फारसा काही बोध झाला नाही हे नमूद करतो. ( दोष अर्थातच माझ्या अशक्त आकलन शक्तीचा, म्हणजे पर्यायाने माझाच हेही नम्रपणे नमूद करतो. )
पुढचे लेख वाचणार आहेच. तेव्हा काही बोध होईल अशी सकारात्मक आशा बाळगून आहे.
एक प्रश्न विचारायचा आहे.
जिवाणूजन्य ( Bacteial )आजार ( व त्याचे निदान, निदानपद्धती, या आजारांवर होऊ शकणारे संभाव्य उपचार ) यावर गेल्या आधुनिक विज्ञानाला जाण गेल्या दोन दशकांमध्ये आली.
विषाणूजन्य ( Viral )आजारांबद्दल हीच जाण येणे गेल्या शंभर वर्षातीलच ( आणि अजून हे काम सुरूच आहे).

याबाबतीत आयुर्वेद काय सांगतो ? आयुर्वेदात जिवाणू किंवा विषाणू यांचे आस्तीत्व व त्यावरील उपाय याबद्दल काय माहिती सांगितली गेली आहे ?( म्हणजे हे असं काही असतं हे या शास्त्राला मान्य आहे का ? )

विचारण्याचे एक कारण म्हणजे अजूनही पूर्णपणे न संपलेल्या विषाणूमुळे पसरलेल्या महासाथीच्या काळात एक प्रख्यात उच्चशिक्षित वैद्यराज " हे असे काही नाहीये . हे फक्त श्वसनक सन्निपात आहे. यावरील प्रतिबंधक लस देणे हे चूक आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत वगैरे प्रचार अजूनही करत आहेत"
( आत्ता हे लिहीत असताना या साथीत सहासष्ठ लाख ९२ हजार एकशे अठ्ठावन्न लोक दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. न नोंदलेले अजून किती असतील हे अज्ञात आहे )

या साथीच्या काळात आधुनिक उपचार विज्ञानाच्या मर्यादा समोर आल्या ( परंतु त्याबरोबर त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न करण्याची क्षमताही पुढे आली )
एका वैद्यराजांच्या मत व प्रचारामुळे आयुर्वेदाला दोष देणे चुकीचे.
म्हणूनच आपणास वरील प्रश्न.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रिया समजल्या. पुढील लेखांमध्ये प्रतिसाद जरूर मिळेल. अजून दोन लेख आयुर्वेदाची विचारपद्धती सांगणारे असणार आहेत. त्यानंतर क्रमशः सर्व आक्षेपांचे समाधान करण्याचा प्रयत्न राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायक्रो बायोलॉजी.
पेशीचे कार्य ,तिचे वर्तन ह्याचा गहन अभ्यास असणारी लोक च सत्य सांगू शकतात.
डॉक्टर्स ह्या मधून सरळ बाद होतात.
आयुर्वेद,आणि आधुनिक allopathy.
ह्या वर .
तीच लोक हक्क नी मत व्यक्त करू शकतात.
बाकी कोणी नाही.
ज्यांचा पेशीचे वर्तन ह्या वर खूप खोल अभ्यास आहे.
बाकी कोणी नाही.
डॉक्टर तर नाहीच नाही
पदार्थ शास्त्र पण त्याच तत्व वर आहे.
इलेक्ट्रॉन etc .
हे कोणत्या स्थिती मध्ये काय वर्तन करतील हे त्या पदार्थाचे गुणधर्म असतात.
कोणी ही ऐर्या गबळ्या नी आत्मविश्वास नी काहीच मत व्यक्त करू नये.
विषय अतिशय कठीण आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा धागा घेऊनच काही प्रश्न विचारतो. काही गोष्टी मलाही करोनाच्या निमित्ताने कळल्या (म्हणजे समजल्या असे नाही - कानावर पडल्या) आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव निदर्शनास आल्यापासून आधुनिक वैद्यकातील/विद्न्यानातील विविध शाखांमध्ये चालणारा अभ्यास कळला. उदा.

विषाणूची रचना, त्यावर असलेले स्पाइक प्रोटीन
ते विषाणू पेशीच्या कोणत्या रिसेप्टर्सवर जाऊन चिकटतात.
हे रिसेप्टर्स कोणत्या प्रकारच्या व्यक्तींमध्ये अधिक ॲक्टिव्ह (?) असतात?- उदा बीपीची औषधे घेणारे
विषाणूचा प्रसार कसा होतो?
.
.
.
वगैरे

हे सर्व अभ्यास करणारे वेगवेगळे लोक असतात आणि विषाणूच्या प्रादुर्भावानंतर महिन्याच्या आत यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली होती.

आधुनिक शास्त्रात इतके विविध तपशीलात अभ्यास करण्याची शक्यता अस्तित्वात आहे.

याउलट (माझ्या डोळ्यासमोर तरी) आयुर्वेदातले जनरल प्रॅक्टिशनरच दिसतात.
वरच्या गोष्टीना समांतर आयुर्वेदात काही अभ्यास होत असतो का? (होतही असेल. तर तसे सांगावे).
वर लिहिलेल्या गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे हे आयुर्वेदातील वैद्य लोकांना मान्य तरी आहे का?
की आयुर्वेद ही जीवनपद्धती आहे त्यामुळे आधुनिक निकष लागू नाहीत हे म्हणण्यातच ते खूष आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आयुर्वेद नुसार जे वैद्य पूर्वी उपचार करायचे .ते औषध पण स्वतःच बनवायचे .

बनावट गिरी ही शक्यता झीरो(कफ syp पिल्या मुळे मुलांचे मृत्यू झाले ते भारतात बनले होते.
बनावट औषध जगात खूप मोठ्या प्रमाणात बाजारात आहेत)
लक्षण ,उपचार ,आणि रिझल्ट.

हीच गुणवत्ता.
रिझल्ट काय येतो कोणत्या ही उपचार पद्धती नी हे सर्वात महत्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुर्वेद नुसार जे वैद्य पूर्वी उपचार करायचे .ते औषध पण स्वतःच बनवायचे .>>>>

वैद्यराज नमस्तुभ्यं, यमराज सहोदर
यम: हरति प्राणानि,वैद्य: प्राणान धनानि च

हे सुभाषित कोणत्या शतकातील आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या मते या लेखमालेचे शीर्षक

आयुर्वेदाचीतली शास्त्रीयता असे हवे.

ची प्रत्यय लावल्यास दोन अर्थ प्रतीत होतात - एक म्हणजे आयुर्वेद हे शास्त्रीय कसे आहे हे समजावून देणे. किंवा आयुर्वेदात शास्त्रीयता म्हणजे काय हे समजावून देणे
तली मुळे दुसरा अर्थ स्पष्ट होतो. ही लेखमाला मला आयुर्वेदातल्या शास्त्रीयतेविषयाची वाटते. ते आधुनिक शास्त्रीयतेच्या कसोट्यांवर तंतोतंत उतरेलच असे नाही. परंतु आयुर्वेदांतर्गत काय कार्यकारणभाव असतात आणि शास्त्र म्हणून एका विस्तृत भारतीय मींमासापरंपरेत आयुर्वेद कसे फिट बसते किंवा त्या परंपरा/संकल्पना आयुर्वेदात कशा इम्पोर्ट केल्या आहेत/ बसवल्या आहेत/ अप्लाय केल्या आहेत याविषयी ही लेखमाला आहे. म्हणून 'प्रत्यय' महत्त्वाचा!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

++११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************