कधीतरी...

कधीतरी शब्दांचा पुर यायचा आपल्या दोघांच्या मधून. आता शांतताही वाहते आहे तितक्याच निर्धास्तपणे.

कधीतरी हक्काची सलगी आढळायची आपल्या दोघांच्या मधून. आता हे अनोळखीपण वाहते आहे तितक्याच बेमालूमपणे.

कधीतरी अक्षरशः घड्याळ पळायचे आपल्या दोघांच्या मधून. आता अनोळखी क्षणांचे ट्रॅफिक जाम अपरिहार्यपणे.

अशावेळी रडायचे तर रडून घ्यावं धाय मोकलून. आणि चावावीत स्वतःचीच मनगटे रात्री भकासपणे.

जोवर...
कळून येत नाही,प्रत्येकाचंच असते इथे एक आपापले महाभारत. आणि पायाखालची पायवाटच चालवत असते आपल्याला.

तोवर...
शांत चालत राहावे आपापल्या वाळवंटात बागेत चालल्याप्रमाणे, आणि चालताना पहावेत आजवर जपलेल्या धारणांचे उडताना सुरुंग चोहोबाजूंनी.
एकट्यानेच.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडलं हे, अजून लिहा ना....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0