आरोग्य

आदरांजली - कार्ल जेराझ्झी

कार्ल जेराझ्झी काल गेला. आज बातमी वाचेपर्यंत मला त्याचं नावही माहीत नव्हतं. ती माझीच चूक.

कार्ल जेराझ्झीने १९५१ साली नवीन रेणू आणि त्याचं काम यावर संशोधन प्रकाशित केलं. नोरेथिंड्रोन (norethindrone) असं नाव असणाऱ्या या रेणूने स्त्रियांच्या आणि परिणामतः सगळ्यांच्याच आयुष्यात प्रचंड मोठा फरक घडवून आणला. हा रेणू तोंडावाटे घेण्याच्या संततीप्रतिबंधकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. रोज एक गोळी घेतली की अनावश्यक संततीची भीती बाळगण्याचं कारण नाही. पाश्चात्य समाजात या गोळीने क्रांती घडवली. 'द पिल' नावानेच ही गोळी ओळखली जाते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

आत्महत्येचे गूढ

माणसं आत्महत्या का करतात ही एक जगभरच्या मानसतज्ञांना नेहमीच सतावणारी समस्या आहे. ज्या देशात टोकाचे दारिद्र्य, असह्य वेदना देणारे आजारपण, वा कर्जबाजारीपण ही कारणं आत्महत्येसाठी पुरेसे ठरत असले तरी विकसित देशात अशा प्रकारची कारणं नसतानासुद्धा माणसं आत्महत्या का करतात, हे एक न सुटलेले कोडे ठरत आहे. या विकसित देशासंबंधीच्या एका अभ्यासानुसार अशा देशातील ऍनोरेक्सियाने (anorexia) ग्रस्त असलेल्यांच्यापैकी 20 टक्के रुग्ण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. ऍनोरेक्सियाचे रुग्ण काही कारणामुळे पोटभर खात नसल्यामुळे या रोगाचे बळी ठरतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा

मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोएसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. Smile

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!

प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटीने काम केलेल्या मेरी कोम हा चित्रपट खोर्‍यांने पैसे कमवत असताना किंवा सरितादेवी या महिला बॉक्सिंगपटूच्या अगम्य वागणुकीमुळे माध्यमांना चघळण्यासाठी भरपूर काही मिळत असताना बॉक्सिंग हा खेळच नको अशी भाषा करणार्‍याला वेड्यात काढण्याची शक्यता जास्त आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सन्मानाने मरण्याचा हक्क

जीवन व मृत्यु

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रश्न शौचालयांचा

अलीकडील द न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात गार्डिनर हॅरिस या पत्रकाराने भारतातील शौचालयाच्या समस्येला पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बिहारमधील एका खेडेगावातील घटनांचा आढावा घेत असताना बालकांचे कुपोषण आणि सार्वजनिक स्वच्छता (सॅनिटेशन) यांच्यातील परस्पर संबंधावर त्यानी प्रकाश टाकला आहे. दृष्ट लागू नये म्हणून एका वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात काजळ, गालावर तीट लावून मांडीवर झोपविणार्‍या आईला आपले बाळ कुपोषित आहे हे कसे काय लक्षात येत नाही याचे त्याला आश्चर्य वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अ‍ॅकलेशिया कार्डिया - सुटका-४

लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्‍हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

व्यायाम

काल रात्री मध्येच जाग आली अन बराच वेळ फारेन्ड यांची समीक्षा आठवून हसू येत राहीले. मग एकेका व्यक्तीच्या प्रतिक्रिया आठवू लागल्या अन पैकी उसंत सखू यांची आठवण झाली. याचे कारण मला जे २ विनोद आवडले होते बरोब्बर त्याच २ विनोदांना त्यांनी दाद दिलेली होती. पहीला विनोद तर आठवला पण दुसरा आठवेच ना. खूप वेळ मेंदूला ताण दिला तरी आठवेनी. मग अल्झाइमर्स चा ऑनसेट तर नाही ना :O असं काहीसं वाटू लागलं, अन मग एक आयडीया केली - फरीश्ते या सिनेमाची फारएन्ड यांनी केलेली समीक्षाच आठवू लागले.
कळले आपल्याला? प्रतिक्रिया आठवण्याकरता, स्टोरी-सिक्वेन्स आठवू लागले. २ मिनीटात दुसरा जोक आठवला अन हुश्श झाले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अ‍ॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३

अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२

पूर्वसूत्रः - कोणीतरी परफोरेशन असे म्ह्टल्याचे ऐकू आले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - आरोग्य