आरोग्य

मार्क्ड सेफ फ्रॉम कोव्हिड

पुणे येथील डॉ. जयदीप व डॉ. सुषमा दाते यांना नुकताच कोव्हिड होऊन गेला. जनमानसातील भीती कमी करण्यासाठी लिहिण्याची अनेक परिचितांनी विनंती केल्याने त्यांच्या या अनुभवाविषयी डॉ सुषमा यांनी लिहिले आहे.

बखर....कोरोनाची (भाग ६)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.

१५ ऑगस्टला करोना लस उपलब्ध? - डॉ. मृदुला बेळे

आपली ‘स्वदेशी’ लस स्वातंत्र्यदिनाला येणार म्हणून जनता कृतकृत्य झाली आहे. तर अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ मात्र इतक्या कमी कालावधीत ही लस येणं अशक्य आहे, असं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर जरा या दाव्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी हा लेखप्रपंच.

(कायमच) तहानलेल्या अवस्थेत असलेली आताची पिढी

photo 1 आपण आपल्या भोवताली थोडे लक्षपूर्वक पाहत असल्यास बाटलींची संगत जन्मल्यापासून मृत्युच्या दारापर्यंत आहे की काय असे वाटू लागते. बाळ जन्मल्यानंतरचे काही महिने (की दिवस!) वगळता स्तनपानाऐवजी दुधाची बाटली बाळाच्या तोंडात कोंबून आई कामाला जाते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ICMR, लस, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वगैरे

ICMR उर्फ Indian Council of Medical Research ही नामांकित भारतीय संस्था कोव्हिडसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीची लस दि. १५ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देणार अशी बातमी नुकतीच प्रसिध्द होताच अनेक भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणजे एक तर व्हायरसपासून मुक्ती मिळणार, तीही पूर्णपणे भारतीय बनावटीच्या लशीने आणि तेदेखील स्वातंत्र्यदिनी! मात्र काही लोकांनी या जलदगतीविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या, पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष नव्हतं.

पण लवकरच या आनंदाला तडा जाऊ लागला.

लस विकसित करण्याच्या प्रकल्पात सहभागी असलेल्यांना दि. २ जुलै रोजी ICMRने पाठवलेलं एक पत्र लवकरच लीक झालं -

चकचकित जपान

photo 1 जपानमधील एक शाळा. शेवटचा पिरियड संपत आला आहे. दिवसभराच्या 7-8 तासिकांच्यानंतर येणारी मरगळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘इथून एकदा केव्हा बाहेर पडेन व बाहेर पडून मोकळा श्वास घेईन,’ यासाठी सर्व उतावीळ झाले आहेत. सगळ्यांना घरी पळायचे वेध लागले आहेत. परंतु नेहमीप्रमाणे शिक्षिका उद्याच्या अभ्यासाविषयी सांगते व शेवटी “स्वच्छतेसाठी तयार व्हा”, असे फर्मान सोडते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

टांझानियाच्या डायरीतून .......

टांझानिया हा दोन भूभांगाचा देश आहे.त्याची लोकसंख्या ६ करोड म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मी तर क्षेत्रफळ मात्र महाराष्ट्राच्या तिप्पट आहे. हा एक शेती प्रधान देश आहे. टोमॅटो,अननस,फणस,आणि काजू ही इथली प्रमुख पिके .शेतीवर आधारित उद्योगांना इथे खूप वाव आहे.विशेष म्हणजे फक्त ३०% जमिनीवरच शेती होते.७०% जमिनीला अजूनही फाळ लागलेला नाही.जुलै २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाला भेट दिली ,त्यानंतर पहिली मोठी गुंतवणूक श्री.सतीश पुरंदरे या मराठी माणसानी केली.ते साखर कारखाना उभारत आहेत."मराठी पाऊल पडते पुढे......"

सुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने

Taxonomy upgrade extras: 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या अनुषंगाने नैराश्य (डिप्रेशन) या विषयावर अनेक मतमतांतरं व्यक्त होत आहेत. अशा वेळी या आजाराच्या अनुभवातून आलेले हे अनुभवाचे बोल लिहिले आहेत हिमाली कोकाटे यांनी.

करोनाकाळातील वस्त्रहरण

“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase (British Economist and author)
आंतरजालीय माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली साथ म्हणून आपण या कोरोनाच्या साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व विश्वासार्ह माहिती देणाऱ्या स्रोतांचे वस्त्रहरण कसे झाले ते सांगताहेत डॉ. अनिल जोशी.

कोकणची करोना कैफियत

मुंबईहून येणारे माणसांचे लोंढे, वाढत्या स्थलांतराबरोबर कोकणातल्या कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा आणि या सगळ्याला हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलेली सरकारी यंत्रणा यांचा एक दुर्दैवी ग्रहयोग कोकणच्या पत्रिकेत डोकावतोय. त्यामुळे कोकणाचं भविष्य वर्तमानापेक्षा जास्त भयानक होईल की काय अशी शंका मनात डोकावत्ये.

पाने

Subscribe to RSS - आरोग्य