बातमी

डॉ. नरेंद्र दाभोळकांच्या कार्याचा पाकिस्तानच्या वर्तमान पत्रात गौरवपुर्ण उल्लेख

एका बातमीवर आधारीत सदर छोटेखानी धागा इथे हलवला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सन्मानाने मरण्याचा हक्क

जीवन व मृत्यु

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे

अधिवेशन गीत स्पर्धा

हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे.

गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी.
विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..

आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्‍याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत

भारतात दहाव्या का बाराव्या दिवशी गोडाचं जेवण देतात; आफ्रीकन योरुबा जमातीत दहाव्याला जवळपास लग्नाच्या कार्यक्रमा सारख वातवरण असत म्हणजे नातेवाईकांना नवे कपडे देणे जेवण संगीत आणि नृत्य का ? तर, मयत हा फक्त शरीर बदलण्या पुरता वर गेलेला असतो आणि लहान मुलांच्या स्वरुपात त्याच कुटूंबात पुन्हा जन्मणार असतो. आपल्याकडेही आधीच्या पिढीतल्या माणसांचच नाव पुन्हा नवीन जन्मणार्‍या लहान मुलांना देण्याची प्रथा होतीच. पुर्नजन्मावर विश्वास ठेवणे हे भारतीयच करतात असे नव्हे. इराकच्या निनेवेह प्रांतातील (अत्यल्पसंख्यंक) याझिदी जमात सुद्धा शरीर म्हणजे कपडे आणि मृत्यू म्हणजे केवळ कपडे बदलणे असा विचार करते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गुरुत्वीय लहरी - अलिकडे काय संशोधन सुरू आहे?

मार्च महिन्यापासून खगोलशास्त्राच्या क्षेत्रात बरीच खळबळ सुरू आहे, आणि याचं कारण काही स्कॅम नाही. उलट आत्तापर्यंत जो प्रचलित सिद्धांत होता त्यात दोन मोठ्या आणि इतर बऱ्याच बारीक उणीवा आहेत. त्यातली एक उणीव काही प्रमाणात भरून काढणारं हे संशोधन आहे. या संशोधनाचं महत्त्व असं की कोणत्याही मानवनिर्मित उपकरणातून, अगदी 'सर्न'मध्येही, अतिप्रचंड ऊर्जा-तापमान तयार करता येत नाही, त्यामुळे त्या परिस्थितीत भौतिकशास्त्राचे नियम तपासता येत नाहीत, अशा अतिप्रचंड प्रक्रियेचं निरीक्षण केल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. सकृतदर्शनी हा दावा मान्य करण्यासारखा आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अमेरीकेतील सायकल शर्यत- भारतीय सायकलपटू!

अमेरीकेत होणार्‍या रेस अक्रॉस अमेरीका या ३००० (होय, हजार) मैल सायकल शर्यतीत सुमित पाटील नावाच्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे. भारतात असाल तर याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले असेल. शर्यतीदरम्यान होणार्‍या खर्चाकरीता सुमितला आर्थिक मदतीची गरज आहे. या धाग्याचा उद्देश केवळ त्यांची मदतीची हाक अनेकापर्यंत पोहोचवण्याचा आहे. मदत करण्याकरता किंवा आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या दुव्यावरती संपर्क करावा.

https://www.indiegogo.com/projects/india-at-race-across-america-2014

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - बातमी