विज्ञान

संख्याजगताच्या अद्भुत कथा...4

ऑयलर संख्या (e): ठेवीची रकम वाढतच का जात नाही?

या पूर्वीचेः लेख 1, लेख 2, लेख 3

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

संख्याजगताच्या अद्भुत कथा...3

कल्पित संख्या (i): एक वेगळेच जग
या पूर्वीचेः लेख 1, लेख 2

गणितातील नियमाप्रमाणे +1ला +1ने गुणिल्यास त्याचे उत्तर +1 येते. त्याप्रमाणे -1ला -1ने गुणिल्यास त्याचे उत्तरसुद्धा +1 असते. जर हेच खरे असल्यास -1 हा वर्ग मिळण्यासाठी आपल्याला कुठल्या संख्येची निवड करावी लागेल? हे काही कोडं नसून ही सर्व प्रक्रिया फक्त काल्पनिक आहे हे लक्षात आणून देण्यासाठी सुचलेला प्रश्न आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

संख्याजगताच्या अद्भुत कथा...2

या पूर्वीचेः लेख -1
अर्किमिडिस स्थिरांक 'पाय्' (π): भूमितीचा आधारस्तंभ

10 वी 12 वीपर्यंत शाळा शिकलेल्यांनासुद्धा पाय् (π) ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. ( निदान एवढे तरी बहुतेकांना माहित असण्याची शक्यता आहे.)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

संख्याजगताच्या अद्भुत कथा...1

गणितातील अनेक संकल्पना आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहेत म्हणून किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांचा काडी इतकाही उपयोग होत नाही म्हणून आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आलो आहोत. गणिताचे जगच अमूर्त अशा अनेक संकल्पनांवर आधारित असल्यामुळे ते अत्यंत भासमय, विस्मयकारक, अंतःप्रेरणेला कस्पटासमान समजणारी, तर्काच्या जंजाळात अडकवून ठेवणारी असे वाटण्याची दाट शक्यता आहे. परंतु या अमूर्त जगाची तोंडओळख करून घेतल्यास वा जमल्यास या संख्याजगाची सफर केल्यास आपण एखाद्या अलीबाबा सदृश गुहेत तर नाही ना असे वाटू लागेल. गणितातील अशाच काही संकल्पनांचा वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न..

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

नव‌व्याच्या शोध‌क‌ळा

गेल्या काही दशकांमध्ये दुर्बिणींच्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आकाशगंगेतील सूर्याव्यतिरिक्त इतर अनेक ताऱ्यांभोवती ग्रहांचा शोध लागला आहे. १९९२ मध्ये पहिल्या परग्रहाचा शोध लागल्यानंतर आत्तापर्यंत असे हजारो परग्रह सापडले आहेत. त्याच वेळी २००६ साली प्लूटोला बटुग्रहाचा (ड्वार्फ प्लॅनेट) दर्जा देण्यात आला आणि आपल्या सूर्यमालेने एक ग्रह गमावला. त्यामुळे सध्या आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह आहेत. पण २०१६ मध्ये अमेरिकेतील कॅलटेक या नामांकित संस्थेतील खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यून आणि प्लूटोच्याही पलीकडे सुदूर क्षेत्रात नववा ग्रह असण्याची शक्यता वर्तवली आणि खगोलशास्त्रज्ञांच्या समुदायात खळबळ उडाली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बायपोलर डिसॉर्डर - माहिती

https://cdn.psychologytoday.com/sites/default/files/blogs/89816/2012/06/98951-96374.jpg
.
बायपोलर डिसॉर्डरचे अजून एक नाव आहे ते म्हणजे मॅनिक-डिप्रेसिव्ह इलनेस. अवसाद किंवा ज्याला नैराश्य म्हणतात त्या आणि उन्माद या २ टोकांच्या मध्ये हेलकावे खाणारा मूड. या डिसॉर्डरची अगदी सर्वसामान्य लक्षणे व माहिती पाहू यात.
(१) बायपोलर डिसऑर्डर म्हणजे उन्मादाचे शिखर आणि अवसादाची खोल गर्ता यामध्ये हेलकावे खाणारा मूड हाच मुख्य आजार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पी ओ एस आणि पी ओ सी !

सध्या POS'' उपकरणांची चलती आहे.
POS = Point of Sale
याच्याशी साम्य असणारा वैद्यकीय विश्वातील एक शब्द सांगावासा वाटतो :
'POC ' = Point of Care
मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण ' Glucometer' ( रक्तातील ग्लुकोज घरबसल्या मोजण्याचे उपकरण) शी परिचित असतील.
तर काय, '' point of '' म्हणजे 'च्या जवळ'. POS हे ग्राहकाच्या जवळ आणले जाते , तर POC हे रुग्णाच्या जवळ.
आपल्या रक्ताच्या (व लघवीच्या)बर्‍याच तपासण्या आता रक्तनमुना प्रयोगशाळेत न पाठवता रुग्णाजवळ बसूनच करता येतात.त्याला म्हणतात ' POC testing'.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मायग्रेन साठी सहज सोपी योगासने

सहज सोपी योगासने
मूळात योगासने ही संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उत्तम असतातच, पण काही विशिष्ट आजारांसाठी, काही ठराविक आसने थोडा अधिक काळ केल्यास, त्यांचा त्या व्याधीपासून आराम मिळण्यासाठी फायदा होतो. अशा काही आसनांची येथे माहिती दिली आहे.
डोकेदुखी व मायग्रेन
मनावर येत असलेला वा घेत असलेला प्रमाणाबाहेरचा ताण, तणाव यातून डोकेदुखी उद्भवते. नियमित वेळेवर जेवण

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सांख्यिकी : प्राथमिक अभ्यास

सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स हा विषय विज्ञानाचा एक भाग आणि विज्ञान, समाजशास्त्रं अशा विषयांचा अभ्यास करण्याचं एक तंत्र आहे. शाळेत आपण सरासरी, टक्केवारी अशा संकल्पना शिकतो. म्हटलं तर कोणत्याही दोन आकड्यांची सरासरी काढता येते. तरीही आजचं तापमान २४ अंश सेल्सियस आणि आजच्या दिवसात मी सव्वा लिटर पाणी प्यायलं, यातले दोन आकडे, २४ आणि १.२५ यांची सरासरी काढली जात नाही. मुद्दा असा की वेगवेगळ्या आकड्यांचा आपसांत संबंध कसा लावायचा यासाठी निरनिराळे नियम वापरले जातात. जे आकडे गोळा केले जातात त्याबद्दल काही प्राथमिक अंदाज, माहिती असणं आवश्यक आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

बुधाचे अधिक्रमण

बुध हा ग्रह या क्षणाला सुर्यावरून जात आहे. त्याचा टिपलेला एक क्षण खाली देत आहे. नीट दिसावा या करता फोटोवर संस्कार करून तीन वेगवेगळे फोटो दाखवत आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - विज्ञान