दि प्रेस्टीज नावाच्या 2006 साली गाजलेल्या चित्रपटातील एका दृश्यात एक जादूगार अमेरिकेतील बर्फाळ प्रदेशातील वैज्ञानिकाच्या कार्यशाळेत येतो. बाहेरच्या उघड्या हिरवळीवर बर्फमध्ये 10-12 बल्बमधून प्रकाश येत असतो. जादूगार आश्चर्यचकित होऊन बघू लागतो. गंमत म्हणजे या बल्बमध्ये विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी तारा-केबल यांची सोयच नव्हती!
गाभाऱ्यातील शिवलिंगाची पूजा अजूनही केली जात असलेले, तेर गावातील उत्तरेश्वर मंदीर, एक गाभारा सोडला तर आज पूर्णपणे भग्नावशेष स्वरुपातच दिसते. एके काळी मंदिराच्या बाह्य प्रवेशद्वाराचा भाग असलेली लाकडी चौकट मात्र अजूनही उभी आहे. इतकेच म्हणता येते की 1901 मध्ये, हेनरी कुझेन्स याने जेंव्हा या मंदिराला भेट दिली होती तेंव्हा मंदिराचे एकूण स्वरूप आजच्यापेक्षा थोडे जास्त उजवे होते आणि त्यामुळे कुझेन्सला काही निरीक्षणाची नोंद करणे शक्य झाले होते. कुझेन्स आपल्या निरीक्षणात म्हणतो:
याच काळात इंग्लंड दुसऱ्या जागतिक महायुद्धात पूर्णपणे फसलेला होता. इंग्लंडमधील बहुतेक वैज्ञानिक ब्रिटिश सरकारच्या युद्धोपयोगी प्रकल्पात भाग घेत होते. ऍलन ट्युरिंगही ब्लेचली पार्क येथील कोडब्रेकिंग प्रकल्पात सहभागी झाला. मुळातच ऍलन ट्युरिंगला व्यवहारोपयोगी प्रयोगात रुची होती. अनेक वेळा आकाशाकडे पाहून तो अचूक वेळ सांगत असे. ब्लेचली पार्क येथील नोकरी त्याला फार आवडली.
दोन वर्षांपूर्वी, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात असलेल्या आणि सह्याद्री पर्वतराजीच्या कुशीत दडलेल्या बौद्ध लेण्यांना भेटी देण्याचा बेत मी यशस्वी रितीने पार पाडला होता. सह्याद्री आणि सातमाला पर्वतांच्या दर्यांमध्ये असलेली ही लेणी म्हणजे एकेकाळचे बौद्ध मठ होते. या पैकी बहुतेक मठांमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध भिख्खूंचे वास्तव्य एके काळी होते. या बौद्ध लेण्यांचे त्यांच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे दोन गट करता येतात. यापैकी पहिला म्हणजे दक्षिणेकडे असलेल्या कार्ले, भाजे, शेलारवाडी, जुन्नर, कोंडाणे या लेण्यांचा एक गट होतो.
अबॅकससारखे गणितीय मशीन पुरातन काळापासून असले तरी आता आपल्याला अभिप्रेत असलेल्या संगणकाची संकल्पना कशी उदयास आली याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केल्यास संगणकाच्या ढोबळ रचनेचा विचार 1820 साली चार्ल्स बॅबेज यानी केला होता, हे लक्षात येईल. परंतु त्या काळातील वाफेवर चालणारे इंजिन, बॉल बेरिंग्स, गीअर्स इत्यादींचे तंत्रज्ञान फारच प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे संगणकाची रचना होऊ शकली नाही. परंतु केवळ तंत्रज्ञानाला दोष देऊनही चालणार नाही.
नाठाळ बकरीप्रमाणे इकडे तोंड घाल, तिकडे थोडा पाला ओरबाड असे जालावर करीत असतांना काही मनोरंजक पुस्तके दिसतात. कॅ. जॉन क्लून्स, १२वी रेजिमेंट, बॉंबे नेटिव इन्फन्ट्री अशा नावाच्या लेखकाने लिहिलेले Itinerary and Directory of Western India, Being a Collection of Routes अशा शीर्षकाचे आणि १८२६ सालामध्ये छापलेले पुस्तक माझ्यासमोर आले. कसलीहि यान्त्रिक वाहने आणि अन्य साधने, तसेच कसलेही रस्ते - पक्के वा कच्चे - नसण्याच्या काळामध्ये पालखी, घोडागाडी आणि क्वचित उंट वापरून १९व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्या भागात प्रवास कसे गेले जात असतील ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या पुस्तकावरून येते.
एखादे तंत्रज्ञान योग्य त्या चाचण्या केल्यानंतर व त्याची आर्थिक बाजू तपासून यशाच्या पायरीवर चढण्यापूर्वी अनेक प्रकारचे, चित्र विचित्र कल्पना त्या तंत्रज्ञानाच्या संबंधात लढवल्या जात असतात. काही कल्पना कचर्याच्या डब्यात फेकल्या जातात व काही मोजक्या कल्पना तगून राहतात व त्यांचा पाठपुरावा केला जातो. अनेक डिझाइन कल्पनामधून एखादी कल्पना यशस्वी ठरते व त्या कल्पनेच्या जोरावर डिझाइनर वा डिझाइन टीम/कंपनी भरपूर पैसे कमावू लागते. हे यशस्वी तंत्रज्ञान बघता बघता गरजेची होऊन जाते.