सूचना
सध्यापुरतं अपडेटचं काम झालेलं आहे. याचे कुठलेही दृश्य बदल नाहीत.
दिनवैशिष्ट्य
१० डिसेंबर
जन्मदिवस : गणितज्ञ एडा लव्हलेस (१८१५), कवी निकोलाय नेक्रासोव्ह (१८२१), कवयित्री एमिली डिकिन्सन (१८३०), ड्यूई दशमान ग्रंथवर्गीकरण पद्धतीचा जनक मेलव्हिल ड्यूई (१८५१), इतिहासकार जदुनाथ सरकार (१८७०), वास्तुरचनाकार अडॉल्फ लूस (१८७०), स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न सी. राजगोपालाचारी (१८७८), लेखक, प्राच्यविद्या संशोधक डॉ. श्री. कृ. बेलवलकर (१८८०), नाट्याभिनेते, गायक बापूराव पेंढारकर (१८९२), पुरातत्त्वज्ञ हसमुख सांकलिया (१९०८), कथाकार सखा कलाल (१९३८), शिल्पकार जसुबेन शिल्पी (१९४८), अभिनेता व दिग्दर्शक केनेथ ब्रॅना (१९६०), अभिनेत्री रति अग्निहोत्री (१९६०), स्क्वॉशपटू जहांगीर खान (१९६३)
मृत्युदिवस : इतिहासतज्ज्ञ जदुनाथ सरकार (१८७०), नोबेल पारितोषिकाचा जनक अल्फ्रेड नोबेल (१८९६), नोबेल पारितोषिकविजेता नाटककार लुईजी पिरांदेल्लो (१९३६), डॉ. द्वारकानाथ कोटणीस (१९४२), इस्लामतज्ज्ञ व भाषांतरकार अब्दुल्ला युसुफ अली (१९५३), गांधीवादाचे भाष्यकार, 'साधना' साप्ताहिकाचे संपादक आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (१९५५), सूचिकार शंकर गणेश दाते (१९६४), अभिनेता अशोक कुमार (२००१), संगीतकार श्रीकांत ठाकरे (२००३), कवी दिलीप चित्रे (२००९)
---
जागतिक मानवी हक्क दिन.
जागतिक प्राणी हक्क दिन.
१५१० : आदिलशाहीकडून पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा मिळवला.
१७६८ : 'एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका'च्या पहिल्या आवृत्तीचा पहिला खंड प्रकाशित झाला.
१७९९ : दशमान (मेट्रिक) एककपद्धती स्वीकारणारा फ्रान्स हा जगातला पहिला देश ठरला.
१८६८ : जगातले पहिले वाहतुकीचे सिग्नल लंडनमध्ये बसवण्यात आले.
१८८४ : मार्क ट्वेनची 'हकलबरी फिन' कादंबरी ब्रिटनमध्ये प्रकाशित.
१९०१ : पहिली नोबेल पारितोषिके वितरित.
१९०९ : सेल्मा लागरलॉफ ही नोबेल पारितोषिक प्राप्त करणारी पहिला महिला साहित्यिक ठरली.
१९४८ : संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा संमत केला. त्याप्रीत्यर्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
१९६४ : लेखक व तत्त्वज्ञ जाँ-पॉल सार्त्रचा नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास नकार.
१९८१ : समलिंगी किंवा सुई टोचून घेऊन मादक द्रव्यांचे सेवन करणारे यांच्यात एक नवा रोग पसरत असल्याचे वार्तांकन बीबीसीने केले. यथावकाश हा रोग एड्स म्हणून ओळखला गेला. आजतागायत या रोगाने सुमारे अडीच कोटी बळी घेतले आहेत. सहाराखालच्या आफ्रिका खंडात आज एड्स हा सर्वाधिक मृत्यूंमागचे कारण आहे. अद्याप या रोगावर औषध किंवा लस निर्माण झालेली नाही.
१९८६ : वोले सोयिंका हे नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले आफ्रिकन साहित्यिक ठरले.
१९९६ : दक्षिण आफ्रिकेचे नवे संविधान कार्यरत. वंशद्वेषाचा काळ समाप्त.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- पॉर्न ओके प्लीज
- भाऊ