दिनवैशिष्ट्य
१२ नोव्हेंबर
जन्मदिवस : संस्कृत कोशकार व भाषातज्ज्ञ मोनिएर-विलिअम्स (१८१९), शिल्पकार ओग्युस्त रोदँ (१८४०), क्रांतिकारी सेनापती बापट (१८८०), पक्षीतज्ज्ञ सलीम अली (१८९६), लेखक, सामाजिक कार्यकर्ते व समाजवादी नेते एस्. एम्. जोशी (१९०४), तत्त्वज्ञ रोलाँ बार्थ (१९१५), अभिनेत्री ग्रेस केली (१९२९), जिमनॅस्ट नादिया कोमानेची (१९६१), लेखिका व सामाजिक कार्यकर्ती नेओमी वूल्फ (१९६२)
मृत्युदिवस : बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक शिक्षणतज्ज्ञ पं. मदन मोहन मालवीय (१९४६), सत्यशोधक पत्रकार व कार्यकर्ते केशवराव जेधे (१९५९), समाजवादी नेते व संसदपटू मधू दंडवते (२००५)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : अझरबैजान
१८९३ : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा म्हणून आज मान्यता पावलेली 'ड्यूरंड लाइन' अस्तित्वात आली.
१९२७ : लेऑन ट्रॉट्स्कीची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी. स्टालिनचा एकछत्री अंमल सुरू.
१९५४ : न्यू यॉर्कमध्ये दाखल झालेल्या स्थलांतरितांसाठीचे केंद्र 'एलिस आयलंड' ६२ वर्षांनंतर बंद.
१९६९ : व्हिएतनाम युद्ध - पत्रकार सेमूर हर्शने माय-लाय हत्याकांडाला वाचा फोडली.
१९७० : सर्वात हानिकारक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ 'भोला' बांगलादेशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) दाखल. तीन लाख मृत.
१९८० : 'व्हॉयेजर १' या यानाकडून शनीभोवतीच्या कड्यांचे छायाचित्रण प्राप्त.
१९८२ : पोलिश 'सॉलिडॅरिटी' चळवळीचे नेते लेक वॉवेन्सा यांची ११ महिन्यांच्या कैदेनंतर सुटका.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.