प्रॉब्लेम क्या है?
काव्या
ऐसीकरांना, माझी कविता आवडल्यास जरुर लाइक द्या. फेसबुकवरती जरुर शेअर करा.
.

.
भरतीच्या उन्मादी आवेगात,
वेगाने आदळून, फुटून विखुरणाऱ्या,
मला जर तू, अडवलं नसतास,
किंबहुना एखाद्या भुसभुशीत
ढेकळासारखा तूच फुटून विरला असतास, तर....
हजारो, लाखो फ़ेनपुष्पातील, कोवळ्या थेंबांच्या हृदयातील ,
इंद्रधनुष्यी छटांनी ,
अन लहान लहान तुषारांच्या कारंज्यांनी
ना मी फुटून विखुरले असते, ना विखरून पुनः उसळले असते.
ना उसळून तुझाकडे झेपावले असते,
ना तू परत अडवलं असतंस,
ना मी परत फुटले असते,
ना इंद्रधनुष्य उमलले असते.
.
.
पण माझे झेपावणे मी जितके थांबवू
शकत नाही
तितका तू तुझा अचलपणा
सोडू शकत नाहीस.
.
.
तो प्रॉब्लेम क्या है?
Let the game continue. ;) :D
.
.
भरतीच्या उन्मादी आवेगात,
वेगाने आदळून, फुटून विखुरणाऱ्या,
मला जर तू, अडवलं नसतास,
किंबहुना एखाद्या भुसभुशीत
ढेकळासारखा तूच फुटून विरला असतास, तर....
हजारो, लाखो फ़ेनपुष्पातील, कोवळ्या थेंबांच्या हृदयातील ,
इंद्रधनुष्यी छटांनी ,
अन लहान लहान तुषारांच्या कारंज्यांनी
ना मी फुटून विखुरले असते, ना विखरून पुनः उसळले असते.
ना उसळून तुझाकडे झेपावले असते,
ना तू परत अडवलं असतंस,
ना मी परत फुटले असते,
ना इंद्रधनुष्य उमलले असते.
.
.
पण माझे झेपावणे मी जितके थांबवू
शकत नाही
तितका तू तुझा अचलपणा
सोडू शकत नाहीस.
.
.
तो प्रॉब्लेम क्या है?
Let the game continue. ;) :D
मी किनई, जुम्मे-के-जुम्मे,
मी किनई, जुम्मे-के-जुम्मे, कविता टाकत जाईन. Stay tuned folkes ;)