पॉर्न बॅन आणि गजेंद्र चौहान - एक अन्वयार्थ

Khuli Khidki

कधीकधी काय होतं की घटना सुट्या सुट्या घडत असतात त्यावेळी त्यांचं ‘बिग पिक्चर’ आपल्याला दिसत नाही. किंवा, असं ‘बिग पिक्चर’ पाहण्याचा मक्ता केवळ पूर्वग्रहदूषित मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक वगैरे विचारजंतांकडे आहे असं लोकांना वाटत असतं. पण एखाद्या सुदिनी मात्र वास्तवाचा नवा अन्वयार्थ वगैरे आम्हा पामरांना पण लागू शकतो. आज सकाळच्या दोन बातम्या वाचून माझं असंच झालं.

पहिली बातमी : भारतात पॉर्न साइट्स केल्या ब्लॉक?
दुसरी बातमी : गजेंद्र चौहान यांचा CV एका परिच्छेदाचा!

ह्या दोन बातम्या एकापाठोपाठ वाचताना माझ्या डोक्यात अचानक काही कनेक्शन्स लागू लागली. म्हणजे असं पाहा : आतापर्यंत चौहानांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत ‘जंगल लव्ह’ (१९८६), ‘खुली खिडकी’ (१९८९), ‘दिल का सौदा’ (१९९९, को-स्टार राखी सावंत!!!), झालंच तर ‘वासना’, ‘जवानी जानेमन’ असे अनेक पडाव येऊन गेले. पण वरच्या लिंक पाहिल्यात तर तुमच्या एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येईल की त्या सगळ्या एकजात यूट्यूबवरच्या आहेत. यूट्यूबवर सॉफ्ट पॉर्न चालतं, पण हार्डकोअर पॉर्न चालत नाही. बिचाऱ्या गजेंद्रच्या रेझ्यूमेमध्ये अजून हार्डकोअर पॉर्न आलेलं नाही, म्हणूनच तो एका परिच्छेदावर सीमित राहिलेला आहे. आणि देशाला त्याचं भरदार शरीर दिसलं असूनही तहानलेल्या देशाच्या दृष्टीक्षेपात गजेंद्राचा काही भाग पडलेला नाही म्हणजे देश त्याला पारखा झाला आहे. एकवेळ कोहिनूर परत आला नाही तरी चालेल, पण ही पोकळी भरायला हवी. ही हिरेमाणकं पाहायला मिळाली तर आजच्या ह्या अच्छ्या (ही शिंक नाही; उगीच तक्रार चालणार नाही) दिनांवर चार चाँद लागतील. वेळ तर आलेली आहे, पण काळ? तो कसा साथ देईल? खैर ही तर देशासमोरची फक्त एक समस्या झाली. एकसमयावच्छेदेकरून आणखी काही समस्या सॉल्व्ह करता येतील तर त्यात जास्त व्यापक देशहितसुद्धा साधेल, नाही का?

आपल्यापैकी अनेकांना जाणवणारी आणखी एक समस्या म्हणजे आपल्या देशात दर्जेदार पॉर्न बनत नाही. आता इथे तुम्ही म्हणाल दर्जा म्हणजे काय आणि त्याला काय चाटायचंय? तर इथे मला अनेक प्रॉब्लेम्स दिसतात.
१. देशी म्हणून जे काही मिळतं ते सगळं वेबकॅम, मोबाईल किंवा छुप्या कॅमेऱ्यांनी चित्रित केलेलं असतं. एक तर फोन हातात धरून प्रत्यक्ष कृतीत सहभागी असलेली व्यक्तीच ते शूट करते. नाही तर केवळ एका लांब ठिकाणी वेबकॅम ऑन करून एकाच अॅन्गलमधून ते शूट केलेलं असतं. हे फारच आउटफोकस, ग्रेनी हौशी वगैरे वाटतं. ज्यांना प्रयोगशील रटाळ सिनेमे किंवा नाटकं वगैरे आवडतात त्यांच्यासाठी ते ठीक आहे, पण १०० कोटींचा गल्ला करणारा सिनेमा जो उचलून धरतो, त्या चोखंदळ भारतीय रसिकाला हे असलं प्रायोगिक पॉर्न पाहायला भाग पाडणं म्हणजे एक मोठा ठेंगा दाखवण्यासारखं आहे.
२. रेडट्यूब, एक्सट्यूब, पॉर्नहब वगैरेवर शोधलं तर लक्षात येतं की तिथे भारतीय पॉर्न खूपच कमी असतं. आपली एवढी लोकसंख्या असून आणि त्या प्रमाणात आपण पॉर्नचे कंझ्यूमर असूनही कलानिर्मितीत मात्र आपण मागेच पडतोय. ही पोकळीसुद्धा भरून काढायची वेळ आता झाली आहे.
(टीप : इथे समस्येचा पृष्ठभाग केवळ खरवडून दाखवला आहे, पण खोलात घुसायचं तर प्रत्येक भारतीय वाचक सुज्ञ आहेच आणि सुज्ञांना आणखी काय सांगायचं?)

तात्पर्य म्हणजे काय, तर संख्या आणि दर्जा दोन्ही बाबतीत आपण काही पॉर्न उद्योगात जगाच्या नकाशावर अजिबात कुठे अभिमानास्पद स्थानावर वगैरे नाही. कुठे आपला वात्स्यायन आणि खजुराहो आणि शुकबाहात्तरी आणि कोकशास्राचा समृद्ध वारसा आणि कुठे नेऊन ठेवलाय आज आपण आपला भारत? एका रोमन कॅथॉलिक प्रूडिश बाईच्या हाती सत्ता दिली होतीत ना? त्याचीच ही फळं भोगतोय आपण! शिवाय, पॉर्न हा उद्योगच आज जगात व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ऑनलाइन पेमेंटसारख्या सुविधांचा जनक असल्यामुळे आपण तसल्या तांत्रिक इनोव्हेशनमध्येसुद्धा मागे पडतोय. (आणि बिचारे सरळमार्गी नारायण मूर्ती समजून चाललेत की आयायटियन्स हा प्रॉब्लेम आहे. हे म्हणजे आग रोमेश्वरी आणि...) म्हणजेच आज पॉर्ननिर्मितीमध्ये आपण मागे असणं ही भारताला भेडसावणारी एक फार जगड्व्याळ आणि बहुआयामी वगैरे समस्या आहे. तरी बरं, आता टंबलरबिंबलरमुळे आणि मोबाईल कॅमेऱ्याचा दर्जा एचडी वगैरे झाल्यामुळे जरा परिस्थिती सुधारतेय, पण गब्बरच काय, गावका बच्चा बच्चा सुद्धा सांगेल की नाही, त्यामुळे मार्केट काही कॅप्चर होत नाहीए. मग आता यावर उपाय काय बरं?

(पॉर्नचे घुटके घेत घेत किंवा नुस्तीच कुस्ती खेळत) भारंभार पोरं काढणाऱ्या आपल्या दीर्घ आणि समृद्ध परंपरेकडे पाहता मनुष्यबळाची कमतरता ही आपली समस्या नाहीच. शिवाय आता तर ‘सब का साथ, सब का विकास’ म्हणणाऱ्या सरकारतर्फे ‘मेक इन इंडिया’ कॅम्पेनसुद्धा चालू आहे. त्यामुळे सरकारही मदत करायला कंबर कसून तयार आहे. विरोधकांनी नाकीनऊ आणलेले असले तरीही काही इनोव्हेटिव्ह आणि द्रष्टी पावलं तर उचलायला हवीतच! शेवटी देशाच्या भविष्याला उज्ज्वल करायला आपण सत्तेत आलोय ही टोचणी सत्ताधाऱ्यांची नींद हराम करत असणार. आणि तशीही दिशादर्शक मेंदूंची सरकारात काही कमतरता नाही. उदा : आता आपल्याला ऑलिंपिक पदकंसुद्धा मिळायला लागलीत आणि असाच एक पदकविजेता देशाच्या माहिती प्रसारण खात्याचा राज्यमंत्रीही आहे. हां, एक अडचण मात्र आहे. आता दर्जेदार चित्रपट बनवायचा झाला, तर सगळ्यात पहिली अडचण म्हणजे नुसतं मनुष्यबळ चालत नाही; ते स्किल्ड लागतं. मग देशभरातून अत्यंत चुरशीच्या स्पर्धेनंतर ज्यांची निवड झाली आहे ते फिल्म इन्स्टिट्यूटमधले विद्यार्थी ह्या कामाला लावले तर काय बहार उडेल नाही? असाच दूरगामी विचार करून बहुधा चौहानांची नियुक्ती सरकारनं केली असावी. थोडक्यात काय, तर थोडं योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन मिळालं तर आपले लोक कोणत्याही क्षेत्रात घुसू शकतात तसंच इथेही होईल. आणि गजेंद्रसारखा कर्तृत्ववान माणूसच ते करू शकेल. शत्रुघ्न सिन्हा, अनुपम खेर किंवा हेमा मालिनीचा हा घासच नाही.

मग फक्त एकच प्रॉब्लेम उरतो - तो म्हणजे हे असं सगळं तयार झालेलं जागतिक दर्जाचं सफाईदार पॉर्न लोक पाहतील ह्याची काय गॅरंटी? कारण, देशभरातलं पॉर्नचं कंझप्शन पाहता आपल्यापाशी रेडीमेड मार्केट आहे खरं पण आपण तर सारखे ‘फेअर अॅन्ड लव्हली’ स्किनच्या मागे असतो. मग थोडं इतिहासाकडून शिकलो तर आपण नक्कीच पुन्हा देशी वाणाच्या वात्स्यायन ब्रॅन्डला पॉप्युलर करू शकतो आणि परदेशी जंक फूडला चटावलेल्या भारतीयांच्या नजरांना पुन्हा एकदा सुडौल धष्टपुष्ट भारतीय शरीरांमागे लावू शकतो. आपली केसाळ छाती उघडी दाखवत योगबिग करणारे बाबासुद्धा ह्या नव्या संधीचं सोनं करायला शड्डू ठोकून तयार होतील. आणि अशा प्रकारे मग ह्या ठिकाणी एकविसाव्या शतकातल्या एका नव्या भारताचं सुवर्णस्वप्न आपण सत्यात आणू शकतो. फक्त सरकारी धोरणाचा पाठिंबा जरा हवा आहे. तो म्हणजे कसा? तर, पूर्वी कसा सरकारनं कोकाकोला बॅन केला होता? ‘थम्सप’सारखा जगासमोर अभिमानानं मिरवण्यासारखा ब्रॅन्ड त्या कोकबॅनमुळेच तर बनला. मग आता कॉकबेनची पाळी. जर परदेशी पॉर्नसाईटच बॅन केल्या तर बुभुक्षित भारतीय आपोआप ह्या नव्या हैदोसी थम्सपकडे वळतील. एकदा का १०० कोटींची बाजारपेठ कॅप्चर केली की उर्वरित जगाला आपण आरामात गुंडाळून टाकू. हाय काय नाय काय? आता कळलं ना सरकारी धोरणांमागे किती व्यापक विचार आहे? इथले पूर्वग्रहदूषित मानवतावादी, विवेकवादी, आधुनिक, अपरंपरावादी, नास्तिक वगैरे विचारजंत उगीचच काही अक्कल नसताना सरकारला विरोधासाठी विरोध करत असतात आणि काहीच्या बाही पाजळत बसतात ते मात्र लवकरात लवकर आवरा अशी सगळ्यांना कळकळीची विनंती. नाही तर जग कुठच्या कुठे जाईल आणि आपण मात्र बसू इथे परस्परांशी नुस्त्या कुस्त्या खेळत द्विशतकी आणि त्रिशतकी धागे लोंबवत. चला तर मग देशातल्या ह्या (कच्च्या) कळीच्या उपक्रमाला साथ द्यायला! त्यासाठी कॉकबेनची थोडी कळ सोसाल ना? काही दिवसांचा तर प्रश्न आहे. एकदा का फिल्म इन्स्टिट्यूटमधून पॉर्न फॅक्टरी चालू झाली की मग सदैव सैनिका पुढेच चढाई सुरू मागे बघायचं नाही!

field_vote: 
4.22222
Your rating: None Average: 4.2 (9 votes)

प्रतिक्रिया

आवरा! ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile Smile ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

कोण परवा ट्रोल.इनवर ट्यँवट्यँव करत होतं, म्हणे उजव्या लोकांमध्ये पुरेसे विचारवंत, बुद्धीवादी लोक नाहीत म्हणून. हा पहा आजचा उगवता सितारा, नवविचारवंत आणि मग बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आधी म्यागीबंदी आणि आता पॉर्नबंदी. दोन मिनिटात मजा देणाऱ्या गोष्टींवर सरकारची वक्रदृष्टी का? Wink

(सौजन्यः व्हॉट्सअॅप)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी थोडे विनोद. ह घ्या बरं.

१. 'अच्छे दिन'च्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेची बाकी 'अच्छी राते'ही हिरावून घेण्यात आली आहेत.
२. काँग्रेसच्या 'हाता'वर बीजेपीचा प्रचंड राग असल्याने हाताचे इतर उपयोगही चालवून घेतले जाणार नाहीत. पॉर्नबंदी ही त्यादृष्टीने टाकलेले पुढचे पाऊल.
३. 'मेक इन इंडिया' सोडून आता 'शेक इन इंडिया'साठी आंदोलन करावे लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांची कल्पनाशक्ती वाढावी म्हणून सर्कार प्रयत्न करतंय ते कुठेच गेलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रादर हा तर मेक इन इंडिया साठीचा कृतिशील कॉल फॉर अ‍ॅक्शन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सरकारी अधिकार्‍यांनी पोर्न साइट्सकडून पैशे खाऊन ही बंदीची पुडी सोडली आहे.

ही बातमी आल्याच्या नंतर दोन तीन दिवस त्या साइटींवर दिसणार्‍या जाहिरातींसाठीचे दर पाचपट करण्यात आले होते असे सूत्रांच्या आधारे समजते. बातमी येताच सर्व पोर्न-दर्शक आपापल्या आवडत्या साइट्स चालत असल्याची खात्री करून घेणार आणि त्यामुळे त्या त्या सायटींवर ट्रॅफिक वाढणार हे ठाउक असल्याने हे दर वाढवण्यात आले होते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारीच.
मिळाला त्या गजेंद्राला मोक्ष एकदाचा.
त्याला मोक्षाप्रति नेणार्‍याचे कल्याण असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धमाल स्पिन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

पॉर्नचे घुटके घेत घेत किंवा नुस्तीच कुस्ती खेळत

फार्फार पुर्वी पॉर्नच्या नावाखाली चाललेला दाक्षिणात्य कुस्तीचा प्रकार पाहिल्यानंदर देशी पॉर्नला कायमचा रामराम ठोकला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

थेट्रात पॉर्न बघण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ. त्या फिल्मने आम्हांला हसण्यास उत्तेजन दिलं त्याअर्थी ते तुफान उत्तेजक होतं असे म्हणावयास हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पहाण्यात आलं.

D

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Very HORNy message

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0