फाळणी आणि ५५ कोटी

भारतीय प्रवृत्ती ईतिहासाचा गमजा करण्याची आणि त्यात अडकुन पडण्याची आहे हे झोबणारं असलं तरी सत्य आहे. मग ते सोन्याचा धुर असो, शिवरायांचा ईतिहास किंवा भारताची फाळणी.

तर "भारताच्या फाळणीला म. गांधींना जबाबदार धरुन काही लोक ऊर बडवताय. त्यांना केलेला प्रश्न की त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान काय? " अशा आशयाची एक पोस्ट १६ ऑगस्टला आली आणि लगेचच दुसरी पोस्ट (शह देण्यासाठी) अवतरली जीच्यात राष्ट्रपित्याच्या फाळणीतल्या भुमिकेबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल बेताल बडबड केलेली होती." या दोन पोष्टींचा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न. हा लेखन प्रपंच फक्त फाळणी ही वाईट कि चांगली आणि का याच्या पुरताच मर्यदीत आहे. तसेच हि माझी व्यक्तिगत मत आहेत. जर कोणाला यात सोयीचेच पुरावे गोळा केले आहे असं वाटत असेल तर सभ्य भाषेत पुराव्यानिशी वाद करण्यास हरकत नाही.

फाळणी ची बीजे.

द्वीराष्ट्र वाद ( Two nation theory) ह्या कल्पनेचा जन्म महंमद अली जीना यांच्या मुस्लिम लिगच्या नावावर खपवला गेला असला (१९४० साली) तरी त्याची बिजे १८ व्या शतकाच्या शेवटीच पेरली गेली होती. आणि आजची हिंदु मुस्लिम संबंधाची परिस्थिती बघता त्यावेळी याला जर कट्टर हिंदु नेत्यांनी समर्थन दिलं नसेल तरच नवल. घरातली एखादी वृद्ध व्यक्ती औषध गोळ्या नाही खाणार म्हणून हटून बसली आणि मग घरातल्या तरुणांनी समजावल्यावर जर ती व्यक्ती गोळ्या खायला तयार झाली तर मग आपण त्यांना शिव्या घालणार कि त्यांनी ऐकलं म्हणून सुटकेचा श्वास सोडणार?

अखंड भारत का?

उजव्या विचारसरणीच्या लोकांना अभिप्रेत असलेली याची कारणं माहीत नाही पण ती भावनिक आणि धार्मिक असावी. आर्थिक किंवा विकासाशी निगडीत तर नक्कीच नसावी.

फाळणी व्हायला नको होती. फाळणीचे परिणाम फारच दुर्दैवी होते. ती हिंसा टाळुन करता आली असती तर चांगलं झालं असतं असं कोणाला वाटत असेल तर तो समंजसपणा म्हणावा. तसं झालं नाही ही वस्तुस्थिती. त्यावेळी झालेली हिंसा ही तात्काळ प्रतिक्रिया होती आणि धुमसत असलेला विद्वेश होता. जर फाळणी नसती झाली तर हा विद्वेश लोकांच्या मनात धगधगत राहीला असता आणि त्याचा भयंकर परिणाम होऊन जिथे भारताचे तीन तुकडे पडले ते ३० पडले असते. गांधीजींनी फाळणीपुर्वी आणि नंतर घेतलेला (बदललेला) पवित्रा हा एका समंजस लोकनेत्याने घेतलेला सुज्ञ निर्णय होता.

(नाही पटत ना? मला पण नव्हतं पटत. मग आता का पटतय मला? थोडा वाणिज्य व्यवस्थापनाचा (financial management) आणि किंमतच्या मोबदल्यातली कमाई (cost benefit analysis) तपासली तर पटायला हवा.)

५५ कोटी का?
सगळ्यांना समजायला सोपा जावा म्हणून घराच्या वाटणीचे उदाहरण घेऊ. जेव्हा घराची वाटणी होते तेव्हा काही फक्त घरात एक रेघ मारून काम संपत नाही तर घराचा बाजार भाव, बँकेतील पैसा, सोनं नाणं, व्यवसाय असेल तर त्याची या सर्व गोष्टींची समान वाटणी केली जाते.

स्वातंत्र्य मिळालं तेंव्हा अखंड भारताच्या खजिन्यात १५५ कोटी रुपये होते. त्यातले पाकिस्तानच्या वाट्याला ७५ कोटी आले होते. पैकी २० कोटीचा हफ्ता देऊन झाला होता आणि ५५ कोटी बाकी होते. त्यावरुन वाद होता. पैसे देण्याची जबाबदारी माऊंटबॅटन साहेबांची होती (कारण भारताला गणराज्याचा दर्जा नव्हता मिळाला; जो २६ जानेवारी १९५२ ला मिळाला) आणि म्हणुन माऊंटबॅटनने गांधींनाहस्तक्षेप करायला सांगितलं.

तर फाळणी हि धर्माच्या आणि धर्म बहुल प्रांतांच्या आधारावर झाली. ब्रिटीश सरकार कोलकाता, मुंबईत आणि दिल्लीत जास्त वेळ तळ ठोकुन असत तेव्हा ओघानेच जास्त सुविधा भारतात निर्माण झाल्या. उदा. रेल्वे, उद्योग धंदे इ. १९३० च्या पाहणी नुसार कराचीत ३० हजार कामगार होते तर बॉम्बेत ( आत्ताच्या मुंबईत) होते ४ लाख. अर्थातच मुंबईत उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होते. काही गोष्टींची वाटणी शक्य नव्हती जसे कि रेल्वेचं जाळं, राष्ट्रपती भवन, संसद भवन, व्हिक्टोरिया मेमोरिअल (कोलकाता) आणि बरेच काही. पाकिस्तानात काय होतं? कराचीतला मोहत्ता राजवाडा आणि फ्रेर हॉल! (या सुविध्या वसाहतीतल्या भारताच्या पैशातून ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी केलेल्या होत्या ज्या नंतर आपल्या झाल्या).

तर आपण हे देणं नैतिक दृष्ट्या लागत होतो ते दिलं. बर ते दिलंय, घेतलेलं नाहीये. खरं तर त्याचा अभिमान बाळगायला पाहिजे तर पश्चाताप का करतोय आपण? तर वृत्ती!

आपल्याला गळु झाला आणि तो पिकून फुटू लागला तर आपण तो पू परत आत भरत नाही तर डॉक्टर कडे जाऊन तो गळु काढून टाकतो. त्याच्या बदल्यात डॉक्टर ला फी देतो. जर कोणी घरी येउन रडत असेल कि माझा गळु मला परत हवाय आणि तो काढला तर काढला डॉक्टर ला पैसे का दिले? तर त्या माणसाला काय म्हणणार?
फाळणी नसती झाली तर?

जर भारताची फाळणी नसती झाली तर आज भारत जगातला सगळ्यात मोठा (क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने) देश असता. अखंड भारताचं स्वप्न जे ऊजव्या विचारसरणीचे लोक बघताय त्यांच्या माहीतीसाठी, आज भारतात १५% मुस्लिम आहेत अखंड भारतात ते प्रमाण ३३% झालं असतं. आपल्या समाजाला सध्याचंच गुणोत्तर झेपत नाहीये तर नविन गुणोत्तरात आपण समतोल कसा राखणार? आजची आपली मुस्लिमेतरांची विविधता सुद्धा आपल्याला झेपत नाहीये. पूर्व भारतातल्या लोकांना आपण अजून पण चीनी आणि नेपाळी संबोधुन खिल्ली उडवतो, आपल्यातलाच दलित, मागास वर्गीय जाती आणि जमातीच्या लोकांना ६८ वर्षांनी पण आपण मुळ प्रवाहात आणू शकलो नाही. (याचे उदाहरण म्हणजे आजपण असलेली आरक्षणाची गरज) त्यात मुस्लीमांसाठीच्या वेगळ्या देशाच्या कल्पनेने झपाटलेल्या लोकांना आपण कसे सामावुन घेतले असते?

आता काही जन म्हणतात पाकिस्तानमुळे संरक्षणावर होणारा खर्च विकासावर वापरता आला असता, भारताची बाजारपेठ वाढली असती वगैरे वगैरे.

जर पाकिस्तान्यांना एवढी अक्कल असती तर त्यांनी १९४७, १९६५, १९७१, १९९९ आणि २६/११ च्या कुरापतीऐवजी युरोपीय महासंघाच्या धर्तीवर काही तरी विधायक संघटना किंवा सार्क संकल्पेनाला यशस्वी केलं असतं. आपापसातली देवाणघेवाण साखर आणि कापसाच्या पुढे वाढवली असती. असो.

दुसरा विवाद असा आहे की ५५ कोटी त्यांनी आपल्या विरोधार कारवाया करायला वापरले. अरेच्चा! ५५ कोटीत त्यांनी ४ युद्ध, ४०,००० कुरापती आणि १२० अणुबॉम्ब बनवलेत? जर समजा ५५ कोटी नसते दिलेत तर ते खैनी मळत वाट बघत बसले असते की पैसे येतील आणि मग आपण युद्ध करू? हा फारच भाबडे पण झाला. ते आत्ताच एवढे रडत आहेत. पैसे नसते दिले तर त्यांना आणखी एक कारण मिळाला असता भोकाड पसरायला नि कुरापती काढायला.

फाळणीत काय गमावलं?

दुर्दैवाने खूप लोकांचे प्राण, जे आता भारत अखंड झाला तरी परत येणार नाही. त्यामुळे चर्चा पुढे सरकवु.

तिकडे कोण गेले? ज्यांना धर्मावर आधारित देश हवा होता. आजही बरेच मुस्लिम भारतात आहेत ज्यांचे काही नातलग पाकिस्तानात गेले आणि काही इथेच राहिले (Google ची जाहिरात). जर घरात एखाद्या वांड मुलाला वेगळा निघायचे असेल तर त्याला घरात ठेऊन फुकट पोसायचा कि वेगळा काढून त्रास कमी करून घ्यायचा? इथे त्रास दोन प्रकारचे.. एक घरात ठेऊन डोक्याला होणारा मनस्ताप आणि बाहेर काढल्यावल तो काढणाऱ्या खोड्या. सध्याचा भारताला होणारा त्रास हा दुसर्या प्रकारातला आहे.

तर आपण काही भूभाग गमावला, झपाटलेले वेडपट लोक गमावले. वाईट नक्कीच नाही झालं? सिंधू नदी गमावली. ठीकाय न! किती दिवस रडणार? गंगा तर आहे. आणि नक्की कोणी काय गमावलं आणि काय कमावलं?

आजची महिंद्र आणि महिंद्र कंपनी १९४५ साली महिंद्र आणि मुहम्मद नावाने होती. यातले मुहम्मद फाळणी नंतर पाकिस्तानात गेले आणि पुढच्या ८ वर्षात वारले. या कारकिर्दीत साहेब अयशस्वी अर्थ मंत्री, अयशस्वी काश्मीर चर्चा आणि दिलेल्या पदावरून अनेकदा हकालपट्टी अशी कमाई करु शकले. कोणी गमावलं?

फाळणी ही पुर्व आणि पश्चिम पाकिस्तान अशी झाली. पुर्व पाकिस्तान म्हणजे आजच बांगलादेश. तोही मुसलमान बहुल प्रांतच. पाकिस्तानी प्रवृत्ती अशी विध्वंसक आहे की बांगलादेशी त्यांच्या सोबत ३० वर्ष सुद्धा राहु नाही शकले. जर आपण तिघे एकत्र असतो तर भारताच्या तुकड्यांचा ३० चा आकडा वाढून नक्कीच ३०० वर गेला असता. कोणी गमावलं?

एक ताज उदाहरण. इंग्लंड मध्ये जवळ जवळ सगळ्या देशाचे लोक राहतात. जगातली फक्त १० / १२ देशच असतील ज्यांच्यावर इंग्लंडने राज्य नाही केलं. तर प्रत्येक देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो आणि सगळेच जण तो इंग्लंड च्या जमिनीवर शांततेत साजरा करतात. पण पाकिस्तानी नागरिक दर वर्षी इथले सगळे नियम धाब्यावर बसवुन, दुसर्याच्या देशात १४ ऑगस्टच्या पहाटेपासून मध्य रात्री पर्यंत भर रस्त्यावर धुडगूस घालतात. भारतीय ऊपखंडात आपल्याला याची सवय आहे. पण हा देश दुसर्याचा आहे आणि इथे सर्व सभ्य लोक राहतात ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. अगदी आफ्रिकेतले लोक सुद्धा अशी वागत नाहीत इथे. तर आपल्याला यांना गमावल्याचा दुःख का आहे?

आज पाकिस्तानात काय परिस्थिती आहे?
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानातील सुशिक्षित तरुणांमध्ये "फाळणी नको व्हायला हवी होती" हा विचार मुळ धरू लागलाय. याचं कारण त्यांना भारताने ६८ वर्षांनतर केलेल्या प्रगतीचा हेवा वाटतो आहे. आपल्या लोकांना या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा. २०१५ मध्ये सुशिक्षित या शब्दाचा अर्थ जर कोणी सही करता येणारा, लिहिता वाचता येणारा किंवा इंजिनीर / डॉक्टर असा घेत असेल तर ते मोजण्याची पट्टी फार जुनी वापरताय. इंटरनेट आणि Google च्या जमान्यात पोर्न शिवाय माहितीचा अतिप्रचंड साठा उपलब्ध आहे आणि त्यात शब्दशः हवी ती माहिती उपलब्ध आहे. आणि ही माहिती चिकित्सकपणे चाळुन जे स्वतःच्या ज्ञानात भर घालतात, स्वतःचा काही मत स्वतःच बनवतात, ते खरे सुशिक्षित न की ते जे वर्षानुवर्षे चालत आलेल्या गोष्टी मेंदूचा वापर न करता आहे तशा स्वीकारतात. यात मोठी विसंगती आहे. पाकिस्तानातील सुशिक्षित तरुणाई जुन्या पिढीच्या विचारांना झुगारून आपण भारतात हवे होतो हा विचार करताय आणि भारतातील तरुण म्हातार्या लोकांचं ऐकून अखंड भारताची मागणी करताय. दुर्दैव त्यांचे. त्यांचेच कारण हा वर्ग फार छोटा आहे.

अमेरिकेकडुन मिळालेल्या प्रचंड आर्थिक मदतीच्या आधारावर पाकिस्तान आज कसाबसा तग धरुन आहे. त्यातला प्रचंड पैसा लष्करी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी, मालमत्ता खरेदी साठी आणि विघातक कृत्य करण्यासाठी वापरला जातोय. आपण मंगळावर पोहोचलो पण ते अजून काश्मिरात पण पुर्णपणे नाही घुसु शकले. ब्रिटन सारख्या देशांत जीवावर उदार होऊन स्थलांतर करणाऱ्या लोकांत आफ्रिकेच्या वर पाकिस्तानचा नंबर लागतो. साक्षरता, जीवनमान, दरडोई उत्पन्न, सकल राष्ट्रीय उत्पन्न या सगळ्यात ते आपल्या मागे आहेत (Unicef.org). जर ते आपल्यात असते तर या विघातक "प्रवृत्तीच्या" लोकांनी आपल्याला अजुन मागे खेचले असते.

एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. हा विषय मुस्लिमांचा नाहीये तर वेगळ्या झालेल्या पाकिस्तानातील जनतेचा आहे. जे गेले ते पस्तावत आहेत आणि जे राहिले ते सुखी आहेत. हे मी नाही, इंटरनेट वरच्या चर्चा सांगत आहेत.. हे विचार भारतातल्या मुस्लिमांचे आहेत. (या विषयावरचे शेकडो blog आहेत).

फाळणीचे दुःख फक्त पाकिस्तान बद्दलच का?
भारतातुन नेपाळ, ब्रम्हदेश, भुतान, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश वेळोवेळी वेगळे होत गेले. बाकीचे सगळे शांततेत वेगळे निघाले. त्यांच्याबद्दल कोणालाच का वाईट वाटत नाही? त्यांचा का कळवळा येत नाही. ज्यांच्या अट्टाहासापायी फाळणी झाली, १ कोटी ४० लाख लोक विस्थापित झाले (जे जगातलं सगळ्यात मोठा स्थलांतर म्हणुन गणलं जातं), जवळपास ५ लाख लोक मेलेत ते लोक परत आपल्यात का हवेत? फाळणी नकोच व्हायला होती. पण नसती झाली तर आज या देशाला खुप मोठी किंमत मोजावी लागली असती.. आर्थिक, प्रादेशिक, मानसिक आणि भारत तुटल्याशिवाय राहिला नसता.

शेवटी पाकिस्तानबद्दल आकर्षण असणार्या भारतातील मुस्लिमांसाठी माहिती -
जगात इस्रायेल आणि पाकिस्तान हे दोनच राष्ट्र धर्माच्या आधारावर वेगळे झालेत. इस्रायेल ज्यू लोकांसाठी (१४ मे १९४८) आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी (१४ ऑगस्ट १९४७). दुर्दैवाने दोघे पण जगात बदनामच आहे. इस्रायेल अजून पण जगभरातून कुठूल्याही ज्यू धर्मीयाला देशात सामावून घेते, नागरिकत्व देते, सुविधा देते. पण पाकिस्तानने हे सर्व १९५५ साली भारतीय मुस्लिमांसाठी बंद केल. त्यांना Indian Muslim , मुझाहीदिन असे म्हणून हिणवतात.
इस्रायेल ने शेतीत प्रगती करून विकास तरी साधला आहे. बिचारा पाकिस्तान घाण्याला जुंपलेल्या बैल सारखा गोल गोलाच फिरतोय. जायचं का?

तर
१. फाळणी अटळ होती. १९४७ ला नाही तर भविष्यात कधी तरी झालीच असती, म. गांधींनी घेतलेला आणि बदलेला पवित्रा हा काळ सुसंगत आणि नैतिक होता. त्याचे संदर्भ १९४७ च्या काळात शोधले पाहिजे नाही कि २०१५ मध्ये.
२. गांधीजी अंथरुणात काय करायचे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. माणुस कितीही मोठा झाला तरी त्याला शरीरधर्म सुटत नाही हे पचवायला आपण शिकला पाहिजे. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर अर्धवट माहीतीच्या आधारे चिखलफेक करण्या आधी आपण स्वतः ईंटरनेटवर किती पाॅर्न बघतो, व्हाॅट्सअॅपवरुन एकमेकांना पाठवुन मजा घेतो, भावना फारच अनावर झाल्या किंवा संधी मिळाली तर बाईच्या सोबत काय काय करतो या प्रश्नांची ऊत्तर स्वतःलाच द्यावीत. (जर समजा लेडी माऊंटबॅटनना नेहरु मित्र म्हणुन आवडले पण पटेल नाही आवडले यात नेहरुंवर रागावण्याचं कारणच काय?)
३. आपण कितीही नकार घंटा वाजवली तरी हे नाकारू नाही शकत कि गेल्या ६८ वर्षांपैकी ८०% काळ कॉंग्रेसने देशावर राज्य केलं आहे आणि आज जे काही फळ आपण खातो आहोत ते त्यांनीच लावलेल्या झाडाचे आहेत. मग ते जवाहरलाल नेहरू असोत, ईंदीरा गांधी किंवा राजीव गांधी असोत.
४. जगद्विख्यात लोकांमध्ये ज्यांचे आदराने नाव घेतले जाते त्यांत गांधींचे नाव आहे, अब्दुल कलामांचे नाव आहे, नेहरूंचे नाव आहे. मुहम्मद आली जिन्ना यांना ते स्थान नाही जे आपल्या लोकांना आहे. पाकिस्तानातील जगप्रसिद्ध गोष्टी म्हणजे अबोटाबाद. एक मलाला फक्त जागतिक आदरच प्रतिक. बाकी मला नाही वाटत गांधी नेहरूंच्या तोडीचा कोणी आहे.
५. एकंदरीत वरील परिस्थिती बघता आणि माझ्या व्यक्तिगत अनुभवातून आणि आकलनातून, फाळणी आणि पर्यायाने पाकिस्तान ( बांगलादेश सह ) हा भारताने नाकातून फेकलेला शेंबूड आहे. त्यासोबत नाकातून थोडं रक्त पण वाहिलं आणि नाक साफ करायला एक ५५ कोटींचा रुमाल खराब झाला असं समजून शहाण्या माणसासारखा पुढे चालायचं कि मग माशी बनून त्या शेम्बडात अडकून पडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
६. जेव्हा आपल्याच मुलाला आपण पिंट्या, गोट्या किंवा मुलीला चिंगी, टिंगी म्हणतो तेव्हा सगळं गाव त्यांना त्याच नावाने हाक मारतं. म्हणुन आवडत नसले तरी जवाहरलाल नेहरू आणि गांधी यांची हलक्या शब्दात अवहेलना करायला नको. घरातली धुणी घरातच धुवा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

क्या बात है| फाळणीनंतरच्या भारत आणि पाकची तुलना पटण्यासारखीच. ५५ कोटींपासून सिंधु नदी गमावणे पर्यत सगळ्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी

मोजाडसरांनी हा लेख गांधीजींच्या समर्थनासाठीच लिहिला आहे ना? असा एक विचार मनात डोकावून गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोन्द घेतल्याबद्दल धन्यवाद. लेख फाळणीच्या समर्थनार्थ लिहिला आहे. म. गान्धीनी केल ते त्यान्च्या कारकिर्दिला साजेस होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी

लेख आवडला पण या विषयावर इतके चर्वितचर्वण झालेले आहे की पुन्हा पुन्हा तेच लिहायचा आणि वाचायचा कंटाळा येतो.
अर्थात इंटरनेटवर दर दोन वर्षांनी नवी पिढी तयार होते म्हणतात. त्यांच्यासाठी ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. खरय तुमच. पण हा माझा लिहिलेला दुसरा आणि प्रकाशित केलेला पहिला ब्लॉग आहे जी खर तर प्रतिक्रिया होती दोन फेसबुक पोस्ट ना. तरीही नोन्द घेतली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी

सदस्यनाम म्हणून email ID का दिलाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जव्हेरगंज, माझ्याकडुन ते अनावधानाने झाले पण मला ते बदलायचे आहे. आपणास काही माहीती असल्यास कृपया कळवा. मी व्यवस्थापकांशी संपर्क केला आहे आणि उत्तरची वाट बघतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी

बदललाय. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ योगी