घरगुती वापराकरीता वॉटर सॉफ्ट्नर

आमच्या सोसायटीत पिण्याचे पाणी महानगरपालिकेच्या पुरवठ्यातून तर इतर वापरासाठी बोअरवेलचे पाणी वापरले जाते. बोअरवेलचे पाणी हार्ड असल्याने टिपिकल त्रास म्हणजे बाथरूम मधे पांढरे डाग पडणे नळ/शॉवरच्या तोंडाशी जमा होणारे कॅल्शिअम्चे थर आणि वारंवार नळांची दुरुस्ती. टाइल्सवरील डाग तर इतके चिवट असतात की दर वीकान्ताला एक अख्खी हार्पिकची बाटली एक दोन स्कॉचब्राइट्चे स्क्रबर आणि हात दुखेपर्यंत तास तास घासणे हे ठरलेलेच होतं. अशा वेळी घरात असलेली २-३ बाथरूमची 'सोय' नकोशी वाटते. एवढेच नव्हे तर गाड्यादेखिल धुवायला तेच पाणी. गाड्यांवरही तसेच डाग. तिथे तर हार्पिक्/स्कॉचब्राइटदेखिल वापरता येत नाही.

यावर उपाय शोधणे बरेच दिवस चालू होतं पण योग येत नव्हता. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचे बरेच उपाय उपलब्ध आहेत पण सॉफ्टनर हा प्रकार अजुनही घरगुती वापरात जास्त प्रचलित नाही.
त्यानिमित्तानं घरगुती पाणी शुद्धीकरणावर थोडंफार गुगलून माहिती मिळवण्याचे प्रयत्न केले त्यावरून हा लेखप्रपंच.

घरगुती वापराला शुद्ध पाणी मिळणं हे प्रॅक्टीकली अशक्य आहे. कारण कुठलाही पदार्थ विरघळवण्याची पाण्याची विलक्षण क्षमता. पावसाचं पाणी हे त्यातल्या त्यात सर्वात शुद्ध रूप अगदी डिस्टिल्ड वॉटरइतकेच पण एकदा का ते पाणी जमिनीवर पडले की पर्यावरणातले इतर घटक त्यात मिसळायला लागतात. पाण्यातील अशुद्धी मोजण्याचे एक मोजमाप म्हणजे TDS -Total dissolved solids. त्याचे एकक PPM – parts per million. याव्यतिरीक्तही बॅक्टेरिया वगैरे हा प्रकार असतोच.

मनपाने पुरवलेल्या पाण्याचा TDS हा ०-२५ च्या दरम्यान आढळतो. कारण साधारणतः पाणी हे धरण अथवा तलावातले असते. पण पाइपलाइनमधे लीकेज असणे, सांडपाणी त्यात मुरणे अशा शक्यतांमुळे बॅक्टेरीयाचे प्रमाण असू शकते. त्यामुळे अ‍ॅक्वागार्ड्वगैरे प्युरीफायर पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक आहे. बोअरवेलच्या पाण्याचा TDS मात्र नेहेमीच जास्त असतो. आमच्या वापराचे पाणी जमिनीखाली १०० फूटावर आहे त्याचा TDS ३५०-४०० आढळला. साधारणतः पाणी जेवढे खोल तेवढे जास्त पदार्थ घेत खाली जाते त्यामुळे TDS वाढतो. अर्थात जमिनीतल्या क्षारांच्या प्रमाणावरदेखिल अवलंबून असते. कमी पावसाच्या क्षेत्रात जिथे जमिनीखालील पाणी देखिल अतिशय खोल असते तेथे TDS १०००-२००० देखिल आढळतो. अशा पाण्यात शिसे वगैरे जडधातूदेखिल (heavy metals) आढळतात. अशा पिण्याच्या पाण्यामुळे मेंदुचे रोगदेखिल उद्भवतात.

आता TDS जास्त म्हणजे पाणी कठीण (hard) असेलच असे नव्हे. पाण्याचा कठीणपणा हा त्यातल्या कॅल्शिअम व मॅग्नेशिअमच्या प्रमाणावर ठरतो. पांढरे डाग पडणे, साबणाला कमी फेस येणे हे पाण्याच्या कठीणपणामुळे होते. एवढेच नव्हे तर केस गळणे, त्वचा खरखरीत होणे असे शरीरावर दुष्परीणाम होतात. कठीणपाण्यात धुवून कपडे लवकर खराब होतात. कपड्यांची झळाळी जाते.

आता यावर उपाय काय ..
क्लोरिनेशन, ओझोनेशन करुन किंवा UV लाइटमधून पास करून बॅक्टेरिया कमी करता येतात पण TDS कमी होत नाही.

RO (Reverse osmosis) हा तर सर्वात परीणामकारक उपाय. यात पाणी जास्त दाबाने सेमीपरमीएबल मेम्ब्रेनमधून (मराठी शब्द??) गाळले जाते. यात पाण्याचा TDS ०-५ इतका खाली आणता येतो. अगदी रंगकणदेखिल पाण्यात उरत नाहीत. पण मेम्ब्रेन वेळोवेळी बदलणे व अतिरीक्त दाब यामुळे ही प्रक्रीया मोठ्याप्रमाणावर करणे खर्चिक होते.

सॉफ्टनिंगचे सर्वत्र वापरले जाणारे तंत्र म्हणजे 'आयन एक्सचेंज'. यात पाण्याला कठीणपणा आणणार्या घटकांना म्हणजे फक्त कॅल्शिअम व मॅग्नेशिअम वेगळे केले जाते. यात आयन एक्सचेंज रेझिन (एक प्रकारचे पॉलिमर) वापरले जाते. मीठाचे पाणी यातून जाउ दिले असता हे रेझिनचे कण सोडीअम आयन्स धरून ठेवतात. असे सोडिअमने चार्ज केलेल्या रेझिन्समधून कठीण पाणी जाउ दिल्यास कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे आयन्स रेझिनकडे ओढले जातात व सोडीअम आयन्स पाण्यात जातात. अशा प्रकारे कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचे प्रमाण ०-५ PPM पर्यंत खाली येउन पाणी सॉफ्ट होते. पण TDS मात्र कमी होत नाही. पण पाण्याच्या कठीणपणाचे त्रास नाहिसे होतात.

यात रेझिन्मधील सोडिअम संपल्यावर मीठाच्या पाण्याने ते परत Regenerate करावे लागते. अशा प्रकारच्या सॉफ्टनर प्लांट्ची क्षमता OBR ने मोजली जाते. OBR म्हणजे Output between regeneration. एकदा regeneration केल्यावर किती पाणी त्यातून सॉफ्ट केले जाते त्याचे मापन. आता जेवढे रेझिन जास्त तेवढा OBR जास्त. साधारण २०० किलो रेझिनच्या टाकीतून ४०००० लि. पाणी सॉफ्ट् करून मिळू शकते. याप्रकारचा सॉफ्टनर घरगुती वापरासाठी सोयीचा व परवडणारा ठरतो.

या व्यतिरिक्त "मॅग्नेटिक वॉटर सॉफ्टनर" नावाचा एक प्रकार काही ठिकाणी वापरला जातो. त्यात पाणी फक्त मॅग्नेटिक फिल्ड्मधून पास केले जाते, त्याने पाण्यातील कॅल्शिअम पाण्यातच रहाते पण नंतर नळाला वा जमिनीला चिकटून रहात नाही असा दावा केला जातो. पण त्याला मोजमाप करायची सोय नाही. त्यावर "खूप परीणामकारक" व "काहिही फरक पडला नाही" अशा टोकाच्या परस्परविरोधी प्रतिक्रीया वाचनात आल्या. त्यामुळे मला ती पद्धत स्युडोसायंटीफिक वाटली. त्याचा खर्च सर्वात कमी आहे.

सर्व संशोधनांति आयन एक्सचेंज सॉफ्ट्नर प्लांट उभा करु शकेल असा एकजण पुण्यात मिळाला. त्याने केलेले काही प्लांट प्रत्यक्षात बघून त्याचा वापर्/देखभालीची माहिती मिळवल्यावर असा प्लांट उभारायचा निर्णय घेतला.
नशिबाने सोसायटीतील सर्वांचे प्लांट उभारण्याबाबत एकमत झाले, खर्चालाही मान्यता मिळाली. व असा सॉफ्ट्नर प्लांट उभा राहीला.

Softner plant

पाण्याचा सॉफ्ट्नेस मोजायला एक सोपी रासायनिक पद्धत आहे. त्याचे कीट उपलब्ध बाजारात आहे. त्याची खात्रीसुद्धा इतर पद्धतीने करता येते. थोडेसे कठीण (२५०-३०० PPM )पाणी एका पातेल्यात घेउन उकळवून पूर्ण वाफ होउन जाउ दिल्यावर पातेल्यात पांढर्या रंगाचा थर डोळ्याने स्पष्ट दिसू शकतो. हेच सॉफ्ट केलेल्या पाण्यावर केल्यास पातेल्यात असा थर नसल्याचे दिसते.
Hardness measurement kit

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

वा! माहितीपुर्ण लेख आहे!
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सप्रे साहेब, ह्याचा खर्च, आणि महत्वाचे म्हणजे रेझिन बदलायच्या खर्चा बद्दल पण लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा खर्च मुख्यतः रेझिनच्या क्वांटिटीवर ठरतो. जितके जास्त रेझिन तितका जास्त OBR. आमच्या १० फ्लॅटच्या सोसायटीसाठी ४०००० लि OBR च्या प्लांटसाठी १.५लाख खर्च आला. (प्रत्येकी १५०००)
याला साधारणतः आठवड्यातून एकदा regeneration करावे लागते. एका घरासाठी २-३००० ली. OBR चा प्लांटदेखिल करता येतो..
रेझिन बदलावे लागत नाही. पण कालांतराने थोडेसे रेझिन वाहून जाउन कमी होउ शकते. तेवढे ४-५% रेझिन वर्षा/२ वर्षाने रिफिल करावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहीतीत रेझिन बदलावे लागते, पण बर्‍याच वापरानंतर, म्हणुनच विचारले. तुम्ही नक्की चौकशी करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपयुक्त माहिती.

RO करून मिळणाऱ्या पाण्याला चव असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चव असते पण त्यात मिनरल, क्षार वगैरे नसल्याने, नेहमी सारखी लागत नाही.
आरओ करुन जर पीपीम ५-१० पर्यंत कमी आणले असेल तर ते पाणी फार करोसिव्ह होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरतर खूप स्वच्छ पाणी चवहीन असते.
आपल्याला एखाद्या चवीची सवय झालेली असल्याने ते पाणी वेगळे लागते. पण चवहीन पाण्याचीही सवय होउ शकते..

सॉफ्ट केलेल्या पाण्याचा स्पर्शदेखिल काही वेळ गुळगुळीत जाणवतो कारण कठीण पाण्याच्या स्पर्शाची सवय झालेली असते. अंगाला लावलेला साबण अजून पूर्ण गेला नाही असे वाटून जास्त वेळ पाणी वापरले जाते .. सवय होइपर्यंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरओ करुन जर पीपीम ५-१० पर्यंत कमी आणले असेल तर ते पाणी फार करोसिव्ह होते.

याचा अर्थ कळला नाही. करोसिव्ह व्हायला त्यांत एकतर अ‍ॅसिडिटी किंवा अल्कलॅनिटी वाढायला पाहिजे. यापैकी नक्की काय होते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा अर्थ कळला नाही. करोसिव्ह व्हायला त्यांत एकतर अ‍ॅसिडिटी किंवा अल्कलॅनिटी वाढायला पाहिजे. यापैकी नक्की काय होते ?

निसर्गाला कदाचित १००% प्युरीटी मान्य नसावी. प्रत्येक द्रव आणि वायु पदार्थात एका प्रमाणापर्यंत दुसर्‍या पदार्थाला सामावून घेण्याची क्षमता असते, आणि ती क्षमता पूर्ण होई पर्यंत स्थिरता येत नाही. जसे हवेत पाण्याची वाफ एका प्रमाणा पर्यंत असतेच, हवा ड्राय केली की क्षणार्धात आद्रता शोषते.

तसेच पाण्याला काही प्रमाणात इंप्युरिटीज सामावुन घ्यायची क्षमता असते, ते प्रमाण जो पर्यंत भरत नाही तो पर्यंत पाणी शोधत रहाते काहीतरी सामावून घ्यायला.

आरओ करुन पाणी जर एकदम शुद्ध केले म्हणजे त्यातल्या इंप्युरिटीज चे प्रमाण ५ पीपीएम केले तर ते पाणी अनसॅच्युरेटेड होते. म्हणजेच त्या पाण्याला दुसर्‍या पदार्थाला खाउन सॅच्युरेट होयचे असते. आरओ पाणी समजा माइल्ड स्टील च्या टाकीत ठेवले तर ते स्टील ला खाऊन पीपीएम वाढवते आणि सॅच्युरेटेड होते.
आरओ केलेले पाणी कायम स्टेनलेस स्टील च्या टाकीत साठवतात आणि स्टेनलेस स्टील च्या पायपिंग मधुन वाहवतात.

बॉयलर साठी पण शुद्ध पाणी कधी वापरत नाहीत, तर ते सॉफ्ट करुन वापरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निसर्गाला कदाचित १००% प्युरीटी मान्य नसावी.

इथे शिटीच!

प्रत्येक द्रव आणि वायु पदार्थात एका प्रमाणापर्यंत दुसर्‍या पदार्थाला सामावून घेण्याची क्षमता असते, आणि ती क्षमता पूर्ण होई पर्यंत स्थिरता येत नाही.

चार टाळ्या!

जसे हवेत पाण्याची वाफ एका प्रमाणा पर्यंत असतेच, हवा ड्राय केली की क्षणार्धात आद्रता शोषते.

इथे कपाळावर हात!

इक्वीलिब्रीयम, कॉन्सट्रेशन, तापमान वगैरे सगळ्या फिजीकल केमिस्ट्रींच्या नियमांना धाब्यावर बसवून अनुरावांनी नवीच फिलॉसॉफिकल केमिस्ट्री तयार केलेली दिसते!

शुद्ध पाणी हे न्युट्रल असतं, म्हणूनच केमिस्ट्रीच्या प्रयोगात जितकं शुद्ध (डिस्टील्ड) पाणी वापरता येईल तितकं वापरतात.

शुद्ध पाणी करोझीव्ह असतं ही एक शुद्ध 'ओल्ड वाईव्ह्ज् टेल' असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

निळू भाऊ, हे वाचा. गुगल केले तर अजुन मिळेल

---------------
Water that is produced via reverse osmosis tends to be aggressive. This product can affect metallic pipes and other substances that dissolve and ionize in water - not due to its acidity, but because of its high purity and lower levels of dissolved substances. The lower the water's level of dissolved substances, the more aggressive the water is.

When using reverse osmosis, metal pipings should be avoided in systems like plumbing. Instead, plastic pipings should be used, especially if it comes in contact with water that has a high purity.
--------------------------

काही वर्ष प्रोसेस प्लँट डीसाइन मधे खर्च झाली आहेत, आता फार काही आठवत नसले तरी काही कंसेप्ट डोक्यात फीट बसल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुगल हा काही रेफरंस झाला का? असो. मुख्य आक्षेप शास्त्रीय कारणं द्यायच्या ऐवजी निसर्गाला १००% प्युरिटी मान्य नाही वगैरे भोंदू वाटेल अशा भाषेला होता.

RO पाणी पिण्याला वापरायचे असेल तर प्लास्टिक (पीव्हीसी) पाईप खूपच स्वस्त पडतो. लोखंडी (स्टील) पाईप गंजतोच, त्यापेक्षा स्टेनलेस स्टील वापरावा. पण तो प्रचंड महाग पडतो.

बाकी सगळं जाऊ दे. हे का होतं याचं शास्त्रीय कारण असेल तर द्या. माझ्यामते तिरशिंगरावांनी उपस्थित केलेला प्रश्न रास्त आहे. गुगल करून मला तुम्ही दिलेल्याच्या अगदी उलट माहितीही मिळाली. त्याला काही अर्थ नाही.

बादवे, इंडस्ट्रीयल आरओ प्लांटच्या पाण्याची प्युरिटी अन प्यायच्या पाण्याची प्युरिटी यात फार फरक असतो हे तुम्हाला माहित असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अगदी सविस्तर आणि बरोबर आहे माहिती.केवळ चर्चा नसून प्रत्यक्ष फिल्टर प्लांटही दाखवला आहे.धन्यवाद.
चिलेट /रेझिन वापरून सॅाफ्ट करणेच बरोबर आहे त्यानेच कॅल्शम आणि मॅग्नेशम धातू निघतात.याचेच थर भांड्यांवर जमतात,टाइल्स वर डाग पडतात.
मागे एकदा कास पठार-ठोसेघर फिरतांना जाणवलं तिथला पाऊस अॅसडिक वगैरे आहे हाताला तळव्याला प्रचंड खाज सुटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0