Skip to main content

वर्तणूक चलने

.

XYZ Sun, 20/09/2015 - 23:29

विषय पोहोचला.
वरच्या काही प्रसंगात व्यक्त होण्यासाठी चलन वापरले असे आपण म्हणू शकतो. पण अशी चलने वापरताना एक प्रकारचा कृत्रिमपणा जाणवतो. अर्थात त्या चलनाच्या किंमतीवर त्याचा कृत्रिमपणा किती हे ठरविले जाते.

माझ्याबाबतीत सांगायचे तर कुठल्याही कामात आपण अगदी 'ढ' आहोत हे दाखवायचे. (कधी कधी दाखवायची पण गरज पडत नाही ते वेगळे)
पण एखाद्यादिवशी आपण त्या विषयातले मास्टर असल्यासारख एकच दणका द्यायचा की सगळे चाटच पडले पाहीजेत. अशा वेळी मला त्यांचा भ्रमनिरास केल्याचा असुरी आनंद मिळतो. येथे मी 'ढ' असणे हे चलन वापरत असतो.

अवांतर: " पण तो मनुष्य त्या स्त्रीला तितके महत्त्व देइनासा झाला तर काही काळ तरी ती सैरभैर होइल, परत त्याचे अटेन्शन मिळविण्याचा प्रयत्न करेल, कारण तिला व्यसन लागले आहे.">>>>>>> यावरुन एक जुना प्रसंग आठवला. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

नगरीनिरंजन Mon, 21/09/2015 - 17:20

विषय आवडला.
वर्तणूक चलन वापरायचा धसका घेतला आहे कारण परतावा काय पाहिजे हे न सांगताच समोरचा योग्य ती परतफेड करेल या गृहीतकातून अनेक झटके बसलेले आहेत. हे चलन वापरण्याच्या भानगडीत नको त्या लोकांसाठी खूप काही केल्याचे असाध्य दु:ख पदरी पडण्याची शक्यता असते.
पीपल प्लीजर असण्यापेक्षा रोखठोकपणाचे अधिक फायदे आहेत.

नगरीनिरंजन Tue, 22/09/2015 - 17:56

In reply to by .शुचि.

चलन या शब्दातच देवाण-घेवाण अभिप्रेत आहे. त्यागात दुसर्‍याकडून काही मिळत नाही; स्वतःचं स्वतःला समाधान वाटलं तरी आणि जिच्यासाठी त्याग केला ती व्यक्ती वेळ आल्यावर आपल्यासाठी त्याग करेल या भ्रमात राहिल्यास झटका बसू शकतो.

मेघना भुस्कुटे Mon, 21/09/2015 - 18:05

मस्त आहे विषय.

स्तुतीचं चलन अगदीच 'ह्या:'. माझी कुणी स्तुती केली, तर मी उलट तत्काळ सावध होते वा संकोचते. मग माझ्याकडून काही मिळण्याची शक्यता कमी.

मी कुठलं चलन वापरते? मजेशीर प्रश्न आहे. पण त्याचं उत्तर मी इथे का बरं लिहीन? मला इथले बरेच लोक भेटतात नियमितपणे. त्यांना चलनाचा दर कळता नये!

अंतराआनंद Mon, 21/09/2015 - 20:37

अरे काय मस्त निरिक्षण आहे. आणि छान मांडलय.
मला असं कुठलं चलन वापरता येत नाही. :( ( ऐकतेयस ना मेघना?)
पण खरोखरचं कोणाची फार स्तुती करायची झाली तरी आधीच मलाच वाटायला लागते की मी हे का करतेय अशी समोरच्याला शंका येईल. एवढंच काय मला एखाद्याचं गाणं फार आवडलं तरी मी जाउन सांगत नाही कारण मला मनातून वाटतं की त्या गायक/गायिकेचा तो त्या कलाकाराला स्वतःलाच फारसा न आवडलेला परफॉर्मन्स असला तर?

त्याग हे चलन फार वापरलं जातं का? आणि मजामस्ती हे स्वभावात असल्याशिवाय नुसतं कसं बरं वापरायचं?
तसही कुठलंही चलन खिशात असलं तरच वापरता येईल. तसंच चलनी वागणं थोडं तरी स्वभावात असावं लागेल ना?

हं ढ असण्याचं चलन मात्र कळत नकळत मी बरेचदा वापरते ( म्हजे..... तुम्ही समजत असाल मला बुद्धू पण मी ढ नाही ;) )
(हे आणि या आधीचं वाक्य याचा संबध जोडू नये ;) )

.शुचि. Tue, 22/09/2015 - 20:41

In reply to by अंतराआनंद

त्याग या चलनात आपल्याच खिशाला जास्त चाट पडत असावी ;)
मजामस्ती करणारे, विनोदी, टवाळ, वात्रट, धमाल, मिष्किल, इरसाल लोकं मला अतिशय आवडतात. कारण स्वतःला अज्जिबात ते जमत नाही. अशांच्या सहवासात आले की प्रेमात पडण्याचा प्रचंड धोका (त्यांना माझ्याकडून ;)) असतो. म्हणजे माझ्याकडून भरपूर सावज लुटण्याची संधी या चलनात आहे.
.
बाकी स्वतःचं असं चलन काही आठवत नाही. :( अन ते असं खोटंखोटं वापरताही येत नाही.
____

हं ढ असण्याचं चलन मात्र कळत नकळत मी बरेचदा वापरते ( म्हजे..... तुम्ही समजत असाल मला बुद्धू पण मी ढ नाही (डोळा मारत) )

"येडा बन के पेढा खाना" म्हणतात त्याला.

.शुचि. Tue, 22/09/2015 - 18:14

मैत्रिणी ने एक मस्त चलन पाठविले आहे - पुरुष स्त्रियांच्या स्वयःपाकाचे वारेमाप कौतुक करतात म्हणजे मग ताटात आयतेच चांगलेचुंगले पदार्थ येतात.
.
मला एकदम १००% पटलं. तिला एक झप्पी देऊन टाकली.

धर्मराजमुटके Tue, 22/09/2015 - 21:33

In reply to by .शुचि.

मलाही एका मित्राने मस्त चलन पाठविले आहे - बायकांना एखादी गोष्ट मागूनदेखील मिळत नसेल तर रडण्याचे चलन वापरले जाते. हे चलन हवे ते साध्य करुन देण्यास समर्थ आहे. तस्मात कोणत्याही देवतेची पुजा करण्यापेक्षा बायकांनी रडतलक्ष्मी चे व्रत करावे. व्रतविधी लिहायला उसंत असेल तेव्हा सखूला (सखूला आदरार्थी हाक कशी मारावी ?) सांगावे.

गब्बर सिंग Wed, 23/09/2015 - 23:20

In reply to by धर्मराजमुटके

बायकांना एखादी गोष्ट मागूनदेखील मिळत नसेल तर रडण्याचे चलन वापरले जाते. हे चलन हवे ते साध्य करुन देण्यास समर्थ आहे. तस्मात कोणत्याही देवतेची पुजा करण्यापेक्षा बायकांनी रडतलक्ष्मी चे व्रत करावे.

याच्या उलट करून बघा.

पुरुषांना एखादी गोष्ट मागुन (किंवा ट्रेड करून) मिळत नसेल तर पुरुष बलाचा प्रयोग करतात व मिळवतात. गेली अनेक दशकं, शतकं पुरुष मंडळी हनुमंताची उपासना, पूजा, प्रदक्षिणा करित आलेली आहेत.

गब्बर सिंग Thu, 24/09/2015 - 00:39

"चलन" म्हणजे माझ्याकडे गरजेपेक्षा जास्त असलेली वस्तू देऊन मी मला हवी असलेली अन्य वस्तू विकत घेते.

चलनाची व्याख्या कै बरोबर नाही. ही व्याख्या सरप्लस ची आहे.

विवेक पटाईत Sun, 27/09/2015 - 17:40

आमची सौ. सुद्धा तिला स्वैपाकाच कंटाळा आला कि- तुम्ही बटाट्याची चव वेगळीच असते. मला काय ते कळते... चुपचाप स्वैपाकघरात जातो.