Skip to main content

उदास वाटलं म्हणून मांडलं

मी फार पूर्वीच शिकले, हातात आहे ती गोष्ट सोडायची नाही म्हणजे नाही, खेकड्या-मुंगळ्याची वृत्ती, शिर तोडलं तरी नांगीत पकडलेलं सुटणार नाही. खेकड्याच्या या वृत्तीमुळेच त्या रोगाला कर्करोग नाव आहे का न जाणो. अर्थात ते अवांतर झालं. मुख्य मुद्दा हा आहे की ज्या एन्टिटीमध्ये आपण वेळ, उर्जा, भावना इन्व्हेस्ट केल्या त्या अशा सोडून कशा द्यायच्या. मला नाही ब्वॉ जमणार. आज काही बॅड पॅच असू शकतो, आपला मूड्/मनस्थिती सगळं सोडून देण्याची असू शकते पण उद्या तीच मनस्थिती रहात नाही. मन हे वहाणार्‍या जळासारखं असतं. कधी याचं प्रतिबिंब कधी त्याचं. जॉब, नाती या दोहोत माझी ही पकड मलाच प्रकर्षाने जाणवते.
मराठी संस्थळांवर येण्याआधी एक पाय स्वर्गात तर एक नरकात अशी स्थिती होती. अर्धा रिकामा वेळ उत्तमोत्तम साहीत्य वाचण्यात, ज्योतिष-धर्म-कवितांचा छंद जोपासण्यात व्यतित होत असे. तर उरलेला अर्धा वेळ सवंग , बटबटीत गोष्टी पहाण्यात्/वाचण्यात वगैरे. समजलं असेलच.
.
मग मराठी संस्थळे सापडली, एक मिडल ग्राऊंड मिळालं, किंबहुना क्वालिटी मनोरंजन्/चर्चा/लेखन्/वाचन यांची सोय झाली. प्रथम प्रथम लिहीण्याचा दांडगा सोस होता. प्रतिक्रिया वाचण्याची ओढ असे. आत्ताही सोस आहेच्. पण प्रतिक्रिया मनास फार लागत नाहीत. यालाच कातडी गेंड्याची होणे असे म्हणत असावेत.
पूर्वी अत्यंत अंधश्रद्धाळू होते, ती कमालीच्या प्रमाणात कमी झाली. बौद्धिक (इन्टेलेक्च्युअल) शार्पनेस थोडातरी वाढला किंबहुना आला. भावनाबंबाळपणा (हा शब्द "आणिमंडळी" या आय डी कडून शिकले. पहील्या वाचनातच फार आवडला.) आहे तो आहेच पण थोडा रॅशनल विचार करण्याची सवय लागते आहे. प्रोसेस चालू आहे. एवढं ज्या आभासी एन्टिटीकडून मिळतं ती एन्टिटी सोडायचं माझ्या मनात येत नाही. येणार नाही याची गॅरन्टी नाही पण अजिबात येत नाही. संस्थळांपासून एक दिवसाचाही विरह सहन होत नाही. हे जर व्यसन असेल तर ते राजसिक व्यसनांत येते व मला सहर्ष मान्य आहे. केवढ्या प्रकारच्या विचारपद्धती, सेन्स ऑफ ह्युमर, ऑर्गनाईझ्ड थिंकिंग, मुद्देसूद मांडणी, भावनांची हळूवारता, ललीत लेखनातील वैविध्य काय काय पाहीलं, उपभोगलं, त्यामध्ये "सक्रिय" भाग घेता आला. I am grateful to everyone & everything who contributed this. विविध रीतींनी समृद्ध झाले.
.
प्रत्येक जण वेगळा असतो. काहीजण दुखलं तरी एखादी गोष्ट/स्थळ्/छंद/व्यसन, निग्रहाने सोडू शकतात. माझे तसे नाही. निग्रहाची कमी व अति अ‍ॅटॅचमेन्ट हे दोन गुण/दोष म्हणा किंवा "एकदा धरलं की न सोडण्याची" खेकडा वृत्ती म्हणा पण मी संस्थळ कधीच सोडणार नाही.
बाकी कोणी जर सोडलं तर, खूप वाईट वाटते, एक खलीश महसूस होती है, कमी जाणवते, पोकळी जाणवते. आणि मन सारखे मी तर वरवरही म्हणू शकत नाही की जा बाबा/बाई. अजुन एक - असं कधीच नसतं की सोडलं म्हणजे एखादी जागा/गोष्ट forever सोडली. घरटं सोडून भरारी घेतलेल्या पाखरांना जर परतावसं वाटलं तर जरुर दारं खुलीच असतात.
.
आज मी हे कोणासाठीही किंवा कोणाला उद्देश्युन लिहीलेले नाही. बस्स मनात आलेले विचार उतरवुन काढले आहेत. कोणालाही मला कॉर्नर करायचं नाही की नाव घ्यायचं नाही. मनात विचारांचा कल्लोळ उठला म्हणून हा धागा.

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

तिरशिंगराव Thu, 01/10/2015 - 17:47

लेख वाचून मन विषण्ण झाले. हा लेख केवळ अजो ड आहे.

राही Thu, 01/10/2015 - 18:06

थोडी विषण्णता आली खरी. नोकर्‍या बदलताना हे फार जाणवते. जमलेल्या सेटमधून मध्येच कोणी सोडून गेला की पोकळी जाणवतेच. पण जालवावराचे तसे नाही. जाल ही एक आभासी एंटिटी आहे हे सुरुवातीलाच समजून घेतले तर त्रास होत नाही. शिवाय तसे अनेक लोक गळत असतात. काही या दुनियेतूनच जातात, काही जालावर अदृश्य होतात, लिहायचे थांबतात. आपल्या लक्षातही येत नाही. मग कोणीतरी आठवण काढते; अरे, ते अमुक तमुक बरेच दिवस दिसले नाहीत. मग या दिवसांचे महिने होतात, वर्षे होतात आणि हळूहळू आपण सहजपणे विसरून जातो त्या अमुक तमुकना. जालावर तर ही आवकजावक जरा जास्तच वेगात होते. कारण सध्यातरी हे तरुणांचे माध्यम आहे. तरुणाईच्या जोशात जोशपूर्ण लिखाण होते. एक झिंग असते. दोन ठोसे द्यायचे-घ्यायचे यात मजा वाटते. पण वय वाढतं. नवे मेंबर येतात. त्यांच्या इंटरेस्टचा, एनर्जीचा आणि आपला मेळ बसत नाही. शिवाय आपल्याला जे सांगायचं असतं ते आधीच सांगून झालेलं असतं. नवं लिहिण्याजोगं असं हाताशी काही नसतं. मग आपोआपच जालवावर कमी होतो. दहाबारा वर्षांपूर्वी जे लोक मराठी संस्थळांवर होते, त्यातले किती आज सक्रिय आहेत?
तेव्हा हे नैसर्गिक आहे. फारसे मनाला लावून घेण्याचे कारण नाही.
उदास मूड म्हणालात म्हणून मुद्दामच सविस्तर लिहिले आहे, बाळबोध वाटले तरी.

.शुचि. Thu, 01/10/2015 - 21:37

In reply to by राही

सध्यातरी हे तरुणांचे माध्यम आहे. तरुणाईच्या जोशात जोशपूर्ण लिखाण होते. एक झिंग असते. दोन ठोसे द्यायचे-घ्यायचे यात मजा वाटते. पण वय वाढतं. नवे मेंबर येतात. त्यांच्या इंटरेस्टचा, एनर्जीचा आणि आपला मेळ बसत नाही.

मला बरोब्बर उलटं वाटतं. तरुण लोकांमुळे कुठेतरी आपल्यातील उत्साह, चैतन्य, झिंग नाही म्हणता येणार पण ताजेतवानेपण, फ्रेशनेस टिकून रहातोय असे वाटते.
.
मी तर ६० वर्षाची झाले आणि जगले/वाचले तरी ऐसीवर दिसेन ब्वॉ ;)

राही Fri, 02/10/2015 - 09:33

In reply to by .शुचि.

कोणीतरी जाण्यामुळे उदास वाटणं (त्यामागची कारणपरंपरा समजून घेऊन कसं टाळता येईल) यावर प्रतिसाद होता. दुसरं म्हणजे माझ्या प्रतिसादातले आपण, आपली, आपले हे शब्द जाणार्‍या व्यक्तींचा काय विचार असू शकतो या संबंधी म्हणजे अशा व्यक्तींना उद्देशून लिहिले होते. 'आपल्याला असं वाटतं' म्हणजे निघण्यापूर्वी त्या व्यक्तीला असं वाटत असतं असं म्हणायचं होतं. कदाचित प्रतिसादातून ते पुरेसं स्पष्ट झालेलं नसावं.

.शुचि. Fri, 02/10/2015 - 18:19

In reply to by राही

आपण, आपली, आपले हे शब्द जाणार्‍या व्यक्तींचा काय विचार असू शकतो या संबंधी म्हणजे अशा व्यक्तींना उद्देशून लिहिले होते. 'आपल्याला असं वाटतं' म्हणजे निघण्यापूर्वी त्या व्यक्तीला असं वाटत असतं असं म्हणायचं होतं

ओह आता पटतय :)

पिवळा डांबिस Sat, 03/10/2015 - 00:24

In reply to by .शुचि.

मी तर ६० वर्षाची झाले आणि जगले/वाचले तरी ऐसीवर दिसेन ब्वॉ

तुला उदंड आयुष्य लाभो!
जरूर ऐसीवर दिसत रहा..
पण,
ते दर पाच मिनिटांत सरड्याच्या रंगाप्रमाणे बदलणारे आयडी घेऊन आम्हाला पिकवू नकोस गं!!!
आता म्हातारपणी सोसत नाही ते!!!
:)

.शुचि. Sat, 03/10/2015 - 00:59

In reply to by पिवळा डांबिस

=)) आता कुठे नवे नवे आय डी घेते पिडां?
पण आयुष्याच्या सदिच्छेबद्दल खूप धन्यवाद. विश यु द सेम.
आपल्याला जास्त नको ब्वॉ पण मिळेल तितकं निरामय हवं :(

मारवा Thu, 01/10/2015 - 19:16

नेट चा खास करुन सोशल मीडीया चा अतिरेकी आणि अविवेकी वापर
१- आपली दिर्घकाळ एका विषयावर लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता घालवुन टाकतो.
२- आपला मुलभुत संयम व प्रतिसादाचा अवधी कमी कमी करत जातो.
३- आपल्याला फिजीकली आळशी बनवतो.
४- मेंदु सतत एक स्टीम्युलेशन ची मागणी करत राहतो. असा स्टीम्युलेशन ला चटावलेला मेंदु जेन्युइन अभिव्यक्ती पेक्षा कृत्रिम व ओरीजीनल प्रतिसादापेक्षा मॅनिप्युलेटेड प्रतिसादा कडे नकळत वळत जातो. ( ऑडीयन्स कॉन्शस असलेला मेंदु वेगळा विचार करतो व एकटा चिंतन करणारा मेंदु वेगळ्या रीतीने काम करतो )
५- क्षणागणिक होणार डिसट्रॅक्शन इज काइंड ऑफ न्यु ओबेसीटी. जे प्रचंड व्याकुळता निर्माण करत.
६- खाण्याच्या सवयी व प्रत्यक्ष जीवनातील व्यक्तींशी संवाद करण्याच्या नैसर्गिक शैलीत आमुलाग्र बदल घडतो.
७- थोडक्यात माणूस कामातुन जातो परत एकदा दोन शब्द असतील तर च अतिरेकी व अविवेकी वापर अन्यथा नाही.
उपाय काय ?
मीडीया रोजा करावा जसं वेळा ठरवुन घ्याव्यात कब रोजा छोडनेका कब पकडनेका इ. दिवसाच्या कोणत्या ठराविक वेळेला नेट ओपन करणार कधी बंद करणार
मीडिया एकादशी चतुर्थी ठेवावी आठवड्या पंधरवड्यातुन एकदा पुर्ण दिवसासाठी नेट पासुन दुर राहाव.
कधी जैन स्टाइल निरंकार उपवास किंवा निर्जळा एकादशी तस किंवा ड्राय डे सारख.
व्यक्तीमत्व पुरेस संयमी असेल तर रोज एक पेग दोन पेग तास भर अर्धा तास ठरवुन बिलकुल आणि मग बाजुला
रीवॉर्ड थेरेपी एक ३०० पानी पुस्तक पुर्ण वाचेल मगच नेट ची पायरी चढेल एक किंवा १ तास बगिच्यात काम ऑर एनीथींग वर्कींग वुइथ हॅन्ड्स अस काहीतरी स्कील बेस्ड करुन मग नेट , किंवा हाफ मॅरेथॉन कींवा ५ के १० के कंप्लीट करेल मग अमुक इतके तास नेट मिळेल अस काही तरी.
एक्स्ट्रीमीस्ट स्वभाव असेल तर डी टॉक्सीक कराव ६ महीने ते १ वर्ष पर्यंत
केस टु केस थोडक्यात कुठेतरी निर्बंध आणावा सेम ओल्ड फॉर्म्युला ऑफ विलपॉवर पण काहीतरी केलच पाहीजे.
शॅलोज निकोलस कार
द वर्ल्ड बियाँड युवर हेड- ऑन बिकमींग अ‍ॅन इन्डीव्हीज्युअल इन द एज ऑफ डिस्ट्रअ‍ॅक्शन
आदिंचे वाचन करा हि पुस्तके या विषयाच्या गंभीरतेची जाणीव करुन देतात.
बाकी सहज अर्थाने बोललो बाकी काही हेतु नाही ( आजकाल मला ही पाटी गळ्यात घालुन फिरण्याची शिक्षा फर्मावण्यात आलेली आहे नो हिडनहेतु नो हिडनहेतु या महामंत्राची हि जपमाळ २१६ वेळा (दोन वेळा उलट सुलट करुन जपतो )
टेक इट इझी सहज च बोललोय बर्का.
उद्यापासुन माझाही नेट चातुर्मास सुरु होतोय गांधी जयंती के पावन अवसर पर
१ महिना मी बा बा बो ने पासुन चा हात दुर राहील.

प्रभाकर नानावटी Tue, 06/10/2015 - 10:22

In reply to by मारवा

>> मीडीया रोजा करावा जसं वेळा ठरवुन घ्याव्यात कब रोजा छोडनेका कब पकडनेका इ. दिवसाच्या कोणत्या ठराविक वेळेला नेट ओपन करणार कधी बंद करणार
मीडिया एकादशी चतुर्थी ठेवावी आठवड्या पंधरवड्यातुन एकदा पुर्ण दिवसासाठी नेट पासुन दुर राहाव.

हे कदापि शक्य नाही. उद्या तुम्ही काही ठराविक वेळा, (दिवशी, पंधरा दिवस, चातुर्मास वा वर्षभर ) श्वासोछ्वास बंद ठेवा म्हटल्यास ते कसे शक्य आहे? तुम्ही फारच मोठी शिक्षा देत आहात.

पूर्वीच्या काळी चांदोबातील गोष्टी वाचत असताना एखाद्या क्रूर राजाचा जीव पोपटासारख्या एका प्राण्यात कसा काय असतो याचे आश्चर्य वाटत असे. (पोपटाला मारून टाकले की राजा मरत असे).
आता अशा गोष्टीवर विश्वास बसायला लागला आहे. कारण आजकाल प्रत्येकाचा जीव त्यांच्या मोबाइलमध्ये अडकलेला असतो. मोबाइल नसल्यास ते मृतवत होतात. तसाच काहीसा प्रकार नेटिझन्सचा होत असावा.

त्यामुळे कृपा करून नेटपासून दूर राहण्याची शिक्षा नको.

adam Wed, 07/10/2015 - 12:03

In reply to by .शुचि.

ह्या न्यू यॉर्क टाइम्सच्या लेखाची भाषा सहज समजली. एरव्ही द हिंदू, इकॉनॉमिस्ट ह्यांच्यातले कित्येक लेख वाचायला फारच जड जातात.(मोठ्या, पल्लेदार वाक्यांमुळे मला ते झेपणं कठीण होतं.) स्वामिनाथन अय्यर ह्यांची, किंवा एकूणातच टाइम्स ऑफ इंडियातली (बदनाम / इनफेमस /कुप्रसिद्ध /थिल्लर-स्वस्त म्हणवली जाणारी)देसी इंग्लिश चटकन् समजते. इंडियन एक्स्प्रेसमधले लेखही चटकन समजतात. गब्बरच्या बहुतांश लिंका अतिजड वाटतात. (तरी वाचतोच; कारण इंट्रेस्टिंग असतात. ननि ज्या लिंका देतात; त्या कधी कधी सोप्या,कधी कधी अवघड वाटतात. राघांचं काही वाचावच लागत नाही. ग्राफवरुन नजर फिरवा आणी समजून घ्या; काम सोप्पय ;) . चिंज दृक-श्राव्य लिंका चांगल्या देतात; पण त्यात भाषेपेक्षा इतर बरच काही(म्हणजे कलात्मक किंवा सट्ल् अर्थ असलेलं) असतं; ते अज्याबात समजत नाही(त्यातलं शिक्षण झालेलं नाही; उपजत वृत्तीही नाही ) बॅट्या,श्रीगुरुजी,थत्ते ह्यांच्या इंग्लिश बातम्यांच्या,लेखांच्या लिंका समजतात आणि बहुतांश वेळा नुसतं शीर्षक पाहून आत काय असेल ह्याबद्दल केलेला अंदाज बरोबर ठरतो. धनजंय मराठीत बोल्ला तरी कळत नाही ;) .
पण बहुतेक कैतरी भारी बोलत असावा; कारण पब्लिक त्याच्या ज्ञानाला वचकून असते. कोल्हटकर मराठीत चटकन् समजतात; इंग्लिशमध्ये वाचायला लागलो की झोप लागेपर्यंत जितकं वाचणं होतं; तेवढं समजतं ;) (माहितीपर लिखाण इंग्लिशमध्ये वाचून झोप येते; मराठीत वाचून येत नाही.) )
शुचिचं लेखन वाचून पुरेसं समजत नै; पण न वाचताच त्यातल्या भावुक टोनमुळे, त्यातल्या भावनिक मुद्द्यांमुळे ढसाढसा रडावं असं वाटतं ;)

)

मेघना भुस्कुटे Wed, 07/10/2015 - 12:06

In reply to by adam

प्रतिसाद टिंबात ('शून्यात' असे वाचावे) जाऊ नये म्हणून टिंबाचा सहारा.

चिमणराव Fri, 02/10/2015 - 13:08

सर्वांच्याच टिप्पणाचा विचार केला.ही वेळ कधीना कधी येणारच.सोडण्याच्या विचाराअगोदरचा मुद्दा पाहिला-मी इकडे का आलो?माझ्या वयाचा विचार करता ही माध्यमं येऊन नंतर स्वस्त होईपर्यंत बराच वेळ( वर्षे ) निघून गेली होती.
"".
मी तर ६० वर्षाची झाले आणि जगले/वाचले तरी ऐसीवर दिसेन ब्वॉ"

हे पटलंच.आता कुठे इथे आणि दुसरीकडे लिहू लागलो.आपलं आवडलं तर वाचतात नाहीतर सोडून देतात.लिहिण्याचा आनंद मिळवण्यापासून कोणी थांबवू शकत नाही ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते आहे.पुढे मागे इतकं लिहिणारही नाही.एकेक ओळखी होतात.त्या व्यक्तीला लेखनातूनच ओळखतो.अधाशासारखं वाचतो कारण त्याची आणि आपली आवड एकच असते.त्याने लिहिलं नाही की चुटपुट लागते.कधीकधी आपलंही लिखाण आवडता आवडता कंटाळवाणे होऊ लागेल.सुमोतल्या योकोझुनालाही कोणीतरी हरवतंच .तो खेळत राहतो कारण नवीन सुमोंना आखाड्यात प्रतिस्पर्धी लागतोच.

राही Fri, 02/10/2015 - 13:43

तात्पर्य : सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत.

विवेक पटाईत Fri, 02/10/2015 - 20:17

मी बहुतेक संध्याकाळी संकेतस्थळांवर येतो. (वयाबरोबर स्वभावातहि फरक पडतो. उगाच विवाद करण्यापेक्षा, अश्या स्थळांवर आपली उर्जा खर्च करणे जास्त उचित). शिवाय पन्नासी नंतर मराठी लिहिणे शिकायला मिळाले. (हाही एक आनंद). आभासी जग का असेना, इथे आपले विचार दुसर्यांपर्यंत पोहचवू शकतो. अन्यथा मनातले विचार मनातच राहतात. मला तर वाटते जो विचार करतो, ज्याला मन आहे त्याच्या हृदयात एक कवी दडलेला असतो, पण दुसर्यांसमोर व्यक्त व्हायला त्याला भीती वाटत असते. आभासी जगात ही भीती नाही, कुणीही आपल्यावर हसणार नाही.

चिमणराव Fri, 02/10/2015 - 20:33

**आभासी जगात ही भीती नाही, कुणीही आपल्यावर हसणार नाही.***
--हसले रुसले तरी यातले बरेच दिसत नाहीत.

सोडून जाणाय्राबद्दल वाइट वाटतं परंतू त्याला इथून जाण्यात आनंद वाटत असेल ( सुटलो बुवा एकदाचा यांच्या तावडीतून वगैरे ) तर आपण सुस्कारे कशाला सोडा? अगोदर जे वातावरण होते ते दिसत नसेल म्हणूनही कोणी कल्टी मारत असेल.