Skip to main content

.....

स्वसंपादनाचा लाभ घेतोय.
हळुहळु ईतर धाग्यांवरही बोळा फिरवला जाईल.
धन्यवाद.

.शुचि. Fri, 02/10/2015 - 18:57

काल रात्री काय झालं ते मला माहीत नाही. मी तुमचा "हॉट वाइफ" नावाच द्व्यर्थी धागा वाचलेला त्यावर काही धुराळा उडाला असल्यास मला माहीत नाही.
पण समजा एखाद्या धाग्यावर धुराळा उडाला तरी सोडून जाऊ नये असे वाटते.
अजुनही उडवलेले राहू द्यात पण निर्णय बदलू शकता. पण शेवटी तुमच्यावरती आहे.

XYZ Fri, 02/10/2015 - 19:19

छे छे ! धुरळा वगैरे काही नाही!
कोणीतरी सांगितले होते, आवड वगैरे सारखी असणाऱ्या लोकांत राहीले तर बरे पडते.
तेव्हा योग्य ठिकाणी आम्ही असणार आहोतच.
धन्यवाद.

राजेश घासकडवी Fri, 02/10/2015 - 21:23

ऐसीवर स्वसंपादनाची सुविधा आहे ती लेखकाच्या सोयीसाठी. त्यातून व्यवस्थापनाने सदस्यांवर विश्वास टाकलेला आहे की तुम्ही जर काही लिखाण केलंत तर त्यात बारीकसे बदल करण्यासाठी तुमचे तुम्ही मुखत्यार आहात. त्यासाठी संपादकांचे पाय धरण्याची गरज नाही. या सुविधेचा गैरवापर तुम्ही करणार नाही. तसंच जेव्हा इतर सदस्य कोणाच्या लेखनावर चर्चा करतात, तेव्हा त्यांनीही आपापले विचार मांडताना, त्यांवर इतरांशी चर्चा करताना असा गैरवापर होणार नाही असा विश्वास लेखकावर टाकलेला असतो.

हा विश्वास तोडून 'मला नाही राह्यचं इथे, म्हणून माझं लिखाणदेखील पुसून टाकून निघून जाणार मी' असं जेव्हा एखादा लेखक म्हणतो, तेव्हा तो या व्यवस्थापनाच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेत असतो आणि व्यवस्थापन आणि इतर सदस्य यांचा स्वतःच्या इगोसाठी विश्वासघात करत असतो. आपण कोणाला थांबवू शकत नाही, पण लिखाण काढून घेणं हा एका अर्थाने कृतघ्नपणा आहे, हे सांगण्याची गरज आहे.

पिवळा डांबिस Sat, 03/10/2015 - 00:09

In reply to by राजेश घासकडवी

राजेश घासकडवी यांच्याशी सहमत.
त्याचबरोबर ऐसीवर ही सुविधा चालू ठेवल्याबद्दल ऐसीचालकांचे आभार मानण्यासाठी आणि खास कौतुक करण्यासाठी म्हणून हा अभिप्राय.
(पण त्याचबरोबर आम्हाला आमचं नेहमीचं पिवळ्या डांबिसाचं बेअरिंग सोडून हे असले प्रतिसाद द्यायला लावणार्‍या गुर्जींचा निषेध!!)
:)