मन्या जोशीच्या कविता

मन्या जोशीच्या कविता
अबब!- मन्या जोशी
१
हे मोठे कुले
हे मोठे
मोठाल्ले मोठाल्ले
आईची गांड हत्ती!
२
हत्ती चरतोय
भाषिक प्रयोग
कालिक आशांचा
योग अयोग
३
प्रचंड मोठा
विनम्र आवाज
हत्ती आरपार
शेपूट अनाथ
४
हत्ती आला
डोंगरावर उडी
प्रचंड कुल्ल्यांची
सुरक्षित दडी
५
हत्ती आला
डावीकडून
उजवीकडून
मोरपिसारा
फाडून
६
चावट मुलं
हत्तीची गांड
आया पळाल्या
ढाणढाण ढाणढाण
७
हत्ती येतो
आपसूक आपसूक
(संग्रह - ज्याम मज्या, अभिधानंतर प्रकाशन)
---
१
बाबा चढले
आई पडली
मुलगी झाली हो
आजी बोल्ली
२
आजोबा चाखतात सिरीयली
मॉड कपड्यातील
स्मार्ट मुली
गुजरा जमाना
वा वा वा
नाकात बोटे
पेन्शन वसूल
३
मुलगी झाली हो
लहानाची मोठी
टीव्ही बघून
चेकाळली
मुलगी शिकली
पुरुषांवर थुकली
४
शरीर कमव
मेंदू,
सीलिंग एवढं
अफाट विश्व
पंखा फिरतो
गरगर गरगर
मुलगी शिकली
उताणी झोपली
५
सचोटीची कसोटी
योनींचा मोनोलॉग
शहाऱ्यांचे
ओरखडे
लिंगबद्ध
देवाणघेवाण
हगण्याला सुटली घाण
आजोबांचे बोट
लांबलचक नाकात
६
आजी चुत्या
बावळट बाबा
वैताग आई
मुलगी हवालदिल
आजोबा, कंदिल.
७
वारा धावतो
हादरते चाळ
पाऊस धटिंगण
पुस्तकांतून घायाळ.
मुलगी शिकली
पुरुषांवर थुकली.
(संग्रह - ज्याम मज्या, अभिधानंतर प्रकाशन)
---
१
कण्डिशन्ड महापुरुष आणि
जय भीम बोलो
गाडी में चलो चा
सांघिक फंडा उचकटतो
बिनबुद्धाचा गडद क्लिशे,
सहा डिसेंबरचं शिवाजी पार्क
लोकप्रियतेची भरती
२
पीडित अवकाशाचा
गुंगीबाज ईश्वर
एमएनसीसच्या जाहिराती फोडताना
फोटोतला महापुरुष ऐकतो
साडेतीन टक्क्यांची झटपट लॉटरी
लगी तो लाट
३
रिझर्व्हड टेम्पोची लाऊड गाणी
हवा प्रदूषित पसरवते अप टू डेट
सिम्युलेशन
मी रॉक ऐकताना
४
टकाटक घरातला सेमिनार
रंगून जातो इंट्रिन्सिकली
लोगोसच्या अष्टांगमार्गीय गोष्टी आणि
चळवळीच्या गाण्यांवर
जीव ओवाळून टाकणारा देव.
(संग्रह - ज्याम मज्या, अभिधानंतर प्रकाशन)
---
अमेरिकन सत्ये १
१
नॉनस्टॉप म्हातारी
खाते खाव खाव
कोकच्या घोटागणिक
अगणित जीवनाची
मल्टिडिमेन्शनल उत्तरे
मैलोन मैल
गोऱ्या थोबड्यांत
माझा चेहरा
रिदमिक च्यावच्याव
२
नॉनस्टॉप म्हातारीचा
अमेरिकन पाय
सिम्बलिक
रिदमचा
पोलाईट सत्यानाश
३
हिपहॉप आईझवाडे
संत वाहते
संतीण अध्यात्मिक
गॉड ब्लेस ओन्ली
अमेरिका एवढी मोठी
४
नॉनस्टॉप म्हातारीचा
खाव खाव कस्टमर
पोस्ट डिकंस्ट्रक्टेड
विशेषणरहित
डायस्पोरा
५
वेडपट व्हिगर नाचतो
नॉनस्टॉप म्हातारी
(संग्रह - ज्याम मज्या, अभिधानंतर प्रकाशन)

---
सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.
विशेषांक प्रकार
साचेबद्ध
नव्वदोत्तरी कवितेच्या साच्यात फिट्ट बसणारे सारे काही.
जरा निराळं काही लिहिलं गेलंच यानंतर, तर त्याला दोनहजारपंधरोत्तरी प्रवाह म्हणून ओळखलं जावं; अशी मी नम्र मागणी करतो आणि प्रस्तुत तत्कालीन-समकालीन नियतकालिकाला 'अभिनिवेशानंतर' असं नाव सुचवण्याचं श्रेष्ठ धारिष्ट्यही जीवीं धरतो.
आमच्या लहानपणी...
...बोले तो साठोत्तरीत, वर्तमानपत्र शिळे झाल्याखेरीज लहान मुलांना त्यावर बसवीत नसत. ताजे वर्तमानपत्र या कामाकरिता सहसा उपयोगात आणले जात नसे, आणि दिवाळी अंकाचा (त्यातही ताज्या कोर्या करकरीत दिवाळी अंकाचा) असा वापर कोणी केल्याचे (वयोमानपरत्वे दगा देणार्या) स्मृतीत तरी नाही.
अर्थात, साठोत्तरी ते नव्वदोत्तरी, तीस वर्षांच्या काळात काही फरक तर पडायचाच. काही सामाजिक, सांस्कृतिक स्थित्यंतरे ही तर व्हायचीच. त्यामुळे... असो.
(ज़माना बदल गया है, हं?)
मन्या जोशीच्या कविता
मन्या जोशीच्याच भाषेत सांगायच तर लैच गांड आपटून कविता पाडलीय पण झाट जमली नाहीये. भाऊ पाध्ये बनायचा प्रयत्न फसलाय. तसेही फकफकीच्या जमान्यात तसलं मराठी लिहिता येणारा दुसरा भाऊ जन्माला येणे अवघडच आणि आला तरी वाचकांना कितपत रुचेल माहित नाही.
असोच.
सणासुदीला गोडधोड खायचं सोडून हाडकं चावायची बुद्धी कशी झाली बॉ ?? उसंत सखूचा लेख आवडला.
संपादकांना नेहमीचाच प्रश्न : पीडीएफ आवृत्ती कधी ??
आपल्या मस्तानी कवितेने माझा एक शुन्य बाजीराव झाला !
लेखणीचे गांडीव हाती धरुन अर्जुनीय आवेशाने या व्यामिश्र जीवनरुपी पक्ष्याच्या अर्थबुब्बुळाचा वेध घेऊनच दाखवतो या अभिनीवेशाने लिहीलेल्या आपल्या कवितेतील
काही ओळी आवडल्या
काही ओळी नडल्या च
काही डोक्यावरुन भुर्रक्कन उडुन गेल्या.
व अकारणच एका जुनाट नव्वदीपुर्व मराठी कवीच्या या ओळी आठवल्या
तुका म्हणे सांडा देखीचा दिमाख
मोडसीचे दु:ख गांड फाडी.
विरोधाभास
ज्या दिवशी पुस्तकातून कविता टंकल्या त्याच सुमारास व्हॉट्सअॅपवर एका स्मरणरंजनी, चुकार समूहात ही कविता येऊन पडली. (आपापल्या जबाबदारीवर वाचणे.) -
" कारण तु घरीच असते "
अग ऐकलंस का.......? आज बंटीची बस येणार नाहीए. मला वेळ नाही. त्याला शाळेतुन तुच आण. कारण तु घरीच असते.....
आग माझ चार्जर सापडत नाही, battery low आहे, तुझा फोन नंतर लाव. तुझ चार्जर मला दे.
कारण तु घरीच असते......
आज मला लवकर office ला जायचे आहे , आधी पेपर मला दे. तु नंतर कधीही वाच.
कारण तु घरीच असते.....
उद्या माझा boss येणार आहे. पिंकीची exam आहे . तिचा अभ्यास तुच घे.
कारण तु घरीच असते......
दोन/तीन दिवस खुप busy आहे . Month end आहे. आई - बाबांचे औषधे तुच आण.
कारण तु घरीच असते ....
बंटी-पिंकीची अंघोळ, त्याचा डबा, माझा नाश्ता, तयारी आधी करत जा. तुझी घाई मधेच कशाला?
कारण तु घरीच असते .....
office मधे work load आहे. मुलांच्या parents meeting ला मला जमणार नाही. तुच attend कर.
कारण तु घरीच असते ....
ए आई, remote दे. मला TV बघायचा आहे. नंतर मला class आहे. तु नंतर बघ ना तुझी serial repeat.
कारण तु घरीच असते .....
आज colleague बरोबर बाहेर जातोए जेवायला. मुलांना तुच garden मध्ये नेउन आण.
कारण तु घरीच असते .....
पुण्याचे मामा-मामी येताए लग्नाला. मी तर office मधे असतो पण त्यांना म्हटलं उतरा आमच्या कडे.
कारण तु घरीच असते ....
मुले शाळेतुन आल्यावर आज पावभाजी कर. पिंकीचा वाढदिवस आहे न! आराम तर रात्री ही होईल. जमलस तर cake पण कर.
कारण तु घरीच असते .....
अग ऐकलस का ? खुप दमुन आलोय. एक कडक चहा दे आणि जेवायलाही लवकरच वाढ. होईल न स्वयंपाक पटकन ?
कारण तु घरीच तर असते.....
घराबाहेर पडणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची.
'ति'च्या प्रत्येक इच्छेला, प्रत्येक आवडीनिवडीला दुय्यम स्थान !!
कारण 'ति' घरीच असते.
खरंच का एवढ सोप्प आहे ?
घरी राहण ??????
Dedicated to all house wives
हे वाचल्यावर आंघोळ करावी इतपत किळस आली. घाईघाईने मन्या जोशींच्या कविता पुन्हा वाचल्या. समजल्या असं नाही म्हणता येत, पण निदान दुसरी कविता वाचून किळस गेली आणि बरंच बरंही वाटलं.
बायका म्हणजे आई, मुलगी, बहीण आणि या बाया कशा प्रेम, आदर, आपुलकीने लिडबिडलेल्या असतात अशी वर्णनं किंवा बायका म्हणजे कशा गर्भातच मारून टाकलेल्या, बलात्कारपीडीता, समाजात दुय्यम वागणूक मिळणाऱ्या असला 'इमोसनल अत्याचार' सोडून, दुनियेची फिकीर करत नाही असं दाखवणाऱ्या पण आजूबाजूच्या बहुतेकांच्या मनात काय चाललंय याची पुरेशी जाणीव असणाऱ्या चंट व्यक्तीही असतात असं काही व्यक्त करणारी कविता वाटली, जवळची वाटली म्हणून आवडली.
कदाचित कवीला यापेक्षा निराळंच काहीतरी म्हणायचंही असेल. पण ते 'नव्वदोत्तरी' आहे म्हणून सोडून देता येईल. ;-)
खरंच का एवढ सोप्प आहे ?घरी
खरंच का एवढ सोप्प आहे ?
घरी राहण ??????
हा इथे र्हेटॉरिकल प्रश्न आहे. अर्थात घरी रहाणे सोप्पे नाही. फार महत्त्वाचे व वेळखाऊ काम आहे - असे उत्तर कविला अपेक्षित आहे.
.
किळस येण्यासारखीच कविता आहे. कारण साध्या कामांना फार फार मोठ्ठेपणा चिकटवुन, बायकांना "स्मग" ठेऊन , पारतंत्र्यात ठेवण्याचा कुटील पण वरवर मधाचे बोट लावलेला डाव आहे.
किंवा
मग घरकामाचे उदात्तीकरण ;) .... ज्याच्या विरोधात टिंकू नेहमी बोलत असे ते.
घरकाम महत्वाचं आहे की नाही हा
घरकाम महत्वाचं आहे की नाही हा प्रश्न माझ्यामते इथे दुर्लक्षण्यासारखा आहे. 'मुलगी शिकली' यानंतर 'किरकीरी झाली' का 'पुरुषावर थुंकली' (म्हणजे स्वतंत्र, स्वयंपूर्ण व्यक्ती बनली, पुरुषांनी म्हणे निर्माण केलेल्या व्यवस्थेवर थुंकून स्वतःचा रस्ता शोधायला लागली) असा प्रश्न पडला.
माझं व्यक्तिगत उत्तर निराळं लिहिण्याची गरज वाटत नाही.
झेपल्या नाहीत. ज्याप्रमाणे
झेपल्या नाहीत. ज्याप्रमाणे काही पेंटींग्ज कोणला उच्च वाटतात पण आपल्याला मात्र रंगमाखल्या पायांनी कोंबडी नाचल्यासारखी वाटते तसे काहीसे वाटले.