दोन कविता

कविता

दोन कविता

कवी - मिलिन्द

"प्रेयसी आणि झुरळ"

("खात्रीचा समय सरुनी ,
येत मिश्शकाल हा …")
प्रिये पहा जनुकावर आधारित एक सुंदर प्रथिन-यंत्र
पाण्याच्या थेंबाला उलटे लटकून उभे आहे, त्या थेंबाच्या
आरशात दिसतायत त्याचे दोन सुंदर डोळे, मिशा, त्याचा
चमकदार चॉकलेटी रंग कसा खुलून दिसतोय बघ आपल्या बेसिनच्या
स्फटिक-शुभ्र पार्श्वभूमीवर. त्याची प्रथिने नीटनेटकी ठेवायला ते
पाणि-ग्रहण करीत होते, आता ते चालू लागेल बघ!
अरे, किंचाळायला काय झालं?
पळून का चालली आहेस?
छे बाबा!

***********

"ये आफ्रिके"

पाच गोळ्यांनी खचत जाऊन
गुडघे टेकलेल्या
काळ्या मनुष्याच्या डोक्यात
सहाव्वी गोरी गोळी
अचूक
शिरते. गोऱ्यांनी पूर्वीच मारून टाकलेले
आफ्रिका खंड
परत परत
भेटायला येते. ये आफ्रिके,
काय करू मी
तुझ्यासाठी?
(काय करू
शकतो मी?)

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

ह्म्म! वेगळीच तिरकस स्टाइल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितु किन्गिने चोचोटे झैदी मशायरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची झुरळ वाल्या कवितेत वापरलेला उषःकाल ला दिलेला ट्विस्ट मिश्शकाल हा शब्द मस्तच.
अफ्रिके वरची कविता तर युनिक वाटली एकदम थोडी विस्तार झाला असता तरी आवडली असती.
इतकी विशाल संवेदनशीलता एखाद्या सबंध खंडाबाबतच म्हणजे विलक्षणच आहे,
तुमचा काही अफ्रिके संदर्भातला वैयक्तिक अनुभव आहे का ?
की संवेदनेच्या पातळीवरच ?
तुमच्या इतर कविता अजुन कुठे वाचता येतील लिंक दिल्यास आनंद होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. आफ्रिकेची फारच संवेदनशील आहे. आज बसस्टॉपवर हीच कविता आठवली. तिचाच विचार करत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0