Skip to main content

व्यथा एका कठपुतळी राजाची

कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार. हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतलीनाचविणार्याचे हात दिसायचे. क्षणात स्वप्नभंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची.

एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो. प्रजेला कष्ट देणार्यांना चोर, डाकू,तस्कर, काळाबाजार करणार्यांना धडा शिकवितो. सर्वत्र आनंदी आनंद. लोक हि टाळ्यावाजवूनराजाची प्रशंसा करतात. खेळ संपतो.

एकदा असाच खेळ सुरु होता. पांढरे शुभ्र स्वच्छ वस्त्र धारण करून, पांढर्या शुभ्रघोड्यावर स्वार इमानी राजा मंचावर अवतारला. येताच त्याने आरोळी ठोकली, प्रधानजी कुठे आहात. अचानक, काळ्या घोड्यावर स्वार एक काळाकुट्ट माणूस मंचावर प्रगटला. राजाने विचारले, कोण रे तू, आणि एवढा काळा का.? लोक तुला पाहून घाबरतील. त्याने राजाला मुजरा करीत म्हंटले, महाराज, मी तुमचा प्रधान. पूर्वी मी असा काळा नव्हतो. काळ्याकुट्ट अमावस्याच्या रात्रीत मी काळ्या लक्ष्मीची कठोर अघोरी उपासना केली. काळ्या लक्ष्मीची कृपा मजवर झाली.त्यामुळे मी असा काळा आहे. मला आपल्यासोबत राज्याच्या दौऱ्यावर घेऊन चला, काळ्या लक्ष्मीची कृपा तुमच्यावर हि होईल. त्याचे बोलणे ऐकून, राजाची तळपायाची आग मस्तकात गेली. या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण राजाने असे काहीही केले नाही. माणसाच्या हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या नशीबात होते. तेवढ्यात संगीत सुरु झाले, घोड्यांच्या टापा आणि माणसाचा आवाज गुंजला, आधीच उशीर झाला आहे, चला प्रधानजी निघू या, टप टप, दुड दुड करत राजा काळ्याकुट्ट प्रधानासोबत दौर्यावर निघाला, प्रजेच्या कल्याणासाठी ????

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

सुरवंट Thu, 17/12/2015 - 21:08

या दुष्ट माणसाला मंचावरून खाली फेकून द्यावे, पाहिजे, असे राजाला वाटले. पण राजाने असे काहीही केले नाही. >>>>why?

माणसाच्या
हातांच्या तालावर नाचणे, हेच त्याच्या नशीबात होते.>>>>how?

if he is king, he can do anything.

प्रधान्या कोण लागून गेला? काढून टाकायचा कामावरुन. कुणीतरी दुसरा पांढऱ्या कपड्यातला घावलचं की.

मग करा कल्याण.

विवेक पटाईत Sat, 19/12/2015 - 09:23

In reply to by सुरवंट

अरे बाबा कठपुतलीचे धागे-दोरे, माणसाच्या हातात असतात. तो इमानदार कठपुतली राजा हि हाताचा तालावर नाचत होता, त्याला प्रधानाला मंचावरून फेकणे शक्य नव्हते . बाकी वर्तमान पत्र वाचा.

तिरशिंगराव Sat, 19/12/2015 - 14:53

नाही हो, त्यांना अमित शहा म्हणायचंय!

तिरशिंगराव Sat, 19/12/2015 - 18:04

नुसती कींव करण्यापेक्षा उलगडून सांगा म्हणजे आम्ही कींवनीय उपकृत होऊ.

विवेक पटाईत Mon, 21/12/2015 - 19:51

खालील विचार करा -
हातांचा तालावर नाचणारा
१. इमानदार राजा कोण - ज्याच्या जवळ इमानदारीचे प्रमाणपत्र वाटण्याचे कापी राईट आहे.
२. त्याला डाग असलेला प्रधान सचिव का निवडावा लागला?
३. निवडणुकीच्या आधी , मी पूर्व सरकारचे शेकडो घोटाळे उघडकीस आणणार आहे असे म्हणणारा.

राजेश घासकडवी Tue, 22/12/2015 - 10:51

मला याच्यात काहीतरी काळ्या धनाबाबतीतलं कळलं. म्हणजे ते स्विस बॅंकेतला काळा पैसा परत आणूून प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देऊ वगैरे म्हटलं होतं त्याच्याविषयी आहे का? अहो पण ते जुनंसुद्धा झालं. जनता विसरून पण गेली क्षणभर इतक्या पैशांचं स्वप्न पाहून. इतक्या जुन्या गोष्टीवरनं मोदींना कशाला शिव्या द्यायच्या? नवीन काहीतरी शोधा की पटाइतकाका.

राजेश घासकडवी Wed, 23/12/2015 - 22:39

In reply to by अनुप ढेरे

साधू साधू. म्हणजे त्यावर ६००० कोटींचा टॅक्स मिळेल (कदाचित). म्हणजे माणशी ५० रुपये. आता फक्त चौदा लाख नऊ हजार नऊशे पन्नासच राहिले. तरी पटाईतसाहेब त्यावरून विडंबनं का लिहितात कळत नाही.

अनुप ढेरे Thu, 24/12/2015 - 09:40

In reply to by राजेश घासकडवी

अनिवास्यांना ते पैसे मिळणार नाहीत म्हणून तुमची चिडचीड होतिये का गुर्जी? :ड

ऑन सिरियस नोट- याच्या पाचपट पैसे अजून बाहेर निघाले तर मी नक्की ते यश मानीन.

विवेक पटाईत Fri, 25/12/2015 - 11:04

In reply to by राजेश घासकडवी

गुरुजी सरकारी नौकरीत आहे, प्रत्येक कथा कोड्यात लिहावी लागते.

प्रत्येक माणसाला १५ लाख रुपये दिल्या जातील असे कुठलेच विधान केलेले नव्हते. बाकी काळ्या पैश्या विरोधी मोहिमात बाबा रामदेव नेहमी म्हणायचे एवढा काळा पैसा विदेशात आहे कि प्रत्येक माणसी १५ लाख रुपये येतील.
बाकी एक स्वच्छतेच्या चष्म्या बाबत रूपक लिहिले होते.

नितिन थत्ते Fri, 25/12/2015 - 22:56

In reply to by विवेक पटाईत

https://www.youtube.com/watch?v=EbdFJ2vg3ic

https://www.youtube.com/watch?v=qvNPMBMC1mI

ते बोलले आहेत. (आता राजनाथ सिंग म्हणजे मोदी नव्हेत असे म्हटले जाऊ शकतेच. संघ आणि भाजप वेगळे आहेत या चालीवर)

राजेश घासकडवी Mon, 28/12/2015 - 00:01

In reply to by विवेक पटाईत

गुरुजी सरकारी नौकरीत आहे, प्रत्येक कथा कोड्यात लिहावी लागते

फार टेन्शन नका घेऊ काका. आम्हीही गंमतच करत होतो. तुम्हाला काय म्हणायचं आहे याचा अंदाज आला तरी मुद्दाम वेड पांघरून पेडगावला जायचं. मजा येते. तुम्ही लिहीत राहा.

नितिन थत्ते Thu, 24/12/2015 - 09:24

In reply to by अनुप ढेरे

१६००० कोटी "परदेशातून परत आणले" या अर्थाचं लिंकमधील बातमीत काही दिसलं नाही. सुमारे ४००० कोटी रु परदेशी उत्पन्न लोकांनी स्वेच्छेने जाहीर केलं असं दिसतंय.

राही Thu, 24/12/2015 - 10:24

In reply to by नितिन थत्ते

देशामधलाच काळा पैसा (काही सवलतींमुळे कदाचित,) बाहेर येतोय.
तश्या तर आतापर्यंत अनेकदा अ‍ॅम्नेस्टी योजना जाहीर केल्या गेल्या होत्या आणि त्यांना थोडेफार यश मिळाले होते.

नगरीनिरंजन Thu, 24/12/2015 - 12:33

In reply to by राही

काँग्रेसच्या व्हीडीआयएस योजनेत दहा हजार कोटी ट्याक्समध्ये जमा झाले होते असे म्हणतात. तेही १९९७ मध्ये.

http://indianexpress.com/article/explained/in-fact-18-years-ago-a-tax-amnesty-scheme-that-worked-and-why/

But there was outrage too at what many perceived to be attempts to “legitimise” money laundering, leading to a case in the Supreme Court. Up against criticism, Singh and the government had to commit to the court that there would not be any more tax amnesty schemes.

हे आऊटरेज वाले कोण होते कोण जाणे?

अतिशहाणा Wed, 30/12/2015 - 22:17

In reply to by नितिन थत्ते

आणि या सर्व कोटीच्या कोटी उड्डाणांमध्ये सरकारला २५०० कोटी टॅक्स मिळणार आहे. आता त्याचे वितरण केले तर पर माणशी १५ लाख रुपये येतील असे वाटत नाही.