फुसके बार (२० नोव्हेंबर २०१५ पासून पुढे.... संकलित)
फुसके बार – २० नोव्हेंबर २०१५
१) सुब्रमण्यम स्वामी नेहमीच राहूल आणि सोनिया गांधींवर बेछूट आरोप करतात. त्यातलाच अगदी ताजा म्हणजे या दोघाकंडे अडीच लाख कोटी (अडीच लाख की कोटी नव्हे) आहेत. याआधीही १) सोनिया त्यांचे जे शिक्षण झाल्याचे सांगतात ते कसे तद्दन खोटे आहे, २) राहुलच्या कोलंबियन गर्लफ्रेडचे वडील कसे ड्रग्जच्या व्यापारात आहेत व त्यांचे केजीबीशी असे संबंध आहेत, ३) याच ड्रग्जच्या व्यवहारातील लाखो डॉलर्ससह राहूलला अमेरिकेच्या विमानतळावर कसे पकडले होते व वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी त्याला कसे वाचवले, ४) सोनियांनी भारतातून स्मगल केलेल्या वस्तु त्यांची इटलीतील बहिण तिच्या छोट्याशा दुकानात विकते, असे नेक आरोप ते नेहमी करत असतात. आता गंमत अशी आहे की अशा आरोपांबद्दल राहूल वा सोनिया हे कधीही स्वामींवर बदनामीबद्दल किंवा तत्सम काहीही कारवाई करत नाहीत, ना स्वत: स्वामी या आरोपांची आणखी शहानिशा करून या जोडगोळीला गजाआड पाठवायचे मनावर घेत नाहीत. याचे गौडबंगाल काय असावे?
२) कास्ट अवे या सिनेमात विमानअपघातानंतर एका निर्जन बेटावर पोहोचलेल्या टॉम हॅंक्सची कथा किती कौशल्याने फुलवलेली आहे. एखादी कथा सिनेमाच्या अंगाने कशी फुलवायची याबाबतच्या केस-स्टडी असलेली पुस्तके आहेत का?
टॉम हॅंक्स कधी भेटला तर त्याला त्या बेटावरचे अनुभव विचारावेसे वाटेल, त्याने चेकमध्ये हेराफेरी करणा-या लिओनार्दोला कसे पकडले त्याची कथा ऐकाविशी वाटेल. खरोखरच भूमिका जगलेले आहेत असे वाटावे असे लोक आहेत हे.
३) एका राजीवने (साने) दुस-या राजीवच्या (दीक्षित) दुष्प्रचाराचा भेद करणे ही बाब लक्षणीय. उठसुट विज्ञानाचे नाव घेत पाश्चिमात्यांवर टीका करणे आणि आपल्या दैदीप्यमान संस्कृतीचे (यात पुराणातली विमानेही आलीच) दळण दळत बसणे, हाच राजीव दीक्षित यांचा निरंतर उद्योग होता. गंमत म्हणून ऐकावे म्हटले तरी वीट येतो थोड्या वेळाने. अनेक वेळा तर ते तद्दन खोटे बोलून लोकांची दिशाभूल करतात. राजीव दीक्षितांच्या या दुष्प्रचाराचा त्यावेळीच कोणी प्रभावीपणे प्रतिवाद न केल्यामुळे खूप लोक त्यांच्या या प्रचाराला बळी पडले. हे आपलेच अपयश मानले पाहिजे.
४) कोणास ठाऊक, थ्री इडियट्स सारखे काही संदेश देऊ पाहणारे, पण सवंगपणा न करणारे सिनेमेही लोकप्रिय होऊ शकतात, तर परिवर्तनवादी कविताही बटबटीत न राहता चांगल्या होऊ शकतील. तेव्हा परिवर्तनवादी कविता जर बटबटीत वाटत असतील, तर आम्ही इतकी शतके काय भोगले आहे हे तुम्हाला कसे कळणार, असे न म्हणता तो त्या कवीचा दोष समजला पाहिजे. किंबहुना दोष म्हणण्यापेक्षा त्याच्या मर्यादा समजल्या पाहिजेत. अनेकदा अशा कविता प्रचारात्मकही असतात. तेही त्यांच्या रूक्षपणाचे कारण असावे.
५) सार्वजनिक स्वच्छतेच्या नावाने सेवा करात केंद्र सरकारने ०.५ टक्क्याची वाढ केलेली अहे. कर लावूनही प्रत्यक्ष काही फरक पडत नाही, या अनुभवामुळे अशा करवाढीला विरोध होतो. मागे रेल्वेतील सुरक्षाव्यवस्था देण्यासाठी व सुधारण्यासाठी काहीवेळा दरवाढ केली. पण रेल्वेप्रवासाच्या बाबतीत काहीही सुधारणा झालेली दिसत नाही. याव्यतिरिक्त कितीतरी क्षेत्रांमध्ये अशी बेशिस्त दिसत आहे. वाहतुक व्यवस्था हे एक असे उदाहरण. स्वच्छता ठेवणे - कमीत कमी अस्वच्छता न करणे, वाहतुक नियमांचे पालन या गोष्टी तुम्ही-आम्ही करतोच. पण या नियमांची पर्वा न करणा-यांना, जे आज बहुसंख्येने आहेत, गुलाबाचे फूल देऊन सुधारण्याची अपेक्षा ठेवण्याचे दिवस गेले. नियम न पाळणा-यांच्यावर कारवाई करण्याची कोणतेच सरकार हिंमत करत नाही. कारण मग लोकप्रियता घसरण्याची धास्ती. त्यामुळे नवे कर लावूनही प्रत्यक्षात काही फरक पडत नाही.
६) आपल्याकडील एकूणच घोळ लक्षात घेता सीएफएल बल्बसारखे तंत्रज्ञान आपल्याकडे का येऊ दिले हे कोडेच आहे. वीजबचत होते हे मान्य असले तरी त्यात असलेल्या पा-यामुळे पर्यावरणावर त्याचा किती वाईट परिणाम होतो हे कोणाच्या लक्षात येत कसे नाही? आपल्याकडे निकामी झालेले असे दिवे व्यवस्थित गोळा करण्याची वेगळी यंत्रणा नसल्याने त्यातील पारा कोठे पोहोचत असेल याची काही माहिती आहे का कोणाकडे? देशाचे पर्यावरण खाते व राज्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना याबाबतीत काही माहिती आहे काय? आता १०० रूपयांना एलइडी बल्ब देत आहेत खरे, पण ही सबसिडाइझ्ड किंमत आहे. सगळीकडे या कमी किंमतीने एलइडी बल्ब विकणे शक्य नाही. त्यामुळे एलइडी दिव्यांची किंमत तातडीने सीएफएल दिव्याच्या बरोबरीने आणणे हाच त्यावरचा उपाय दिसतो.
(व्यवस्थापकः व्यवस्थापकीय सोयीसाठी सर्व धागे या एका धाग्यात हलवले आहेत. यापुढील 'फुसके बार' प्रकारचे लेखन या धाग्यावर करावे ही विनंती)
साक्षेपी, समर्थ आणि सुज्ञ वर
साक्षेपी, समर्थ आणि सुज्ञ वर साधलेला त्रिकार गहन, गूढ च्या पुढे गंडला. उगीच आपलं काहीतरी विरोधासाठी विरोध करून लिहायचा उद्देश त्यावरूनच कळून आला. तुम्ही अस्वलरावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठे नेम धरताय आणि कोणाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहात हे आम्हाला कळत का नाही? तेव्हा उगाच खोटा पुळका आल्याची नाटकं बंद करा. आधीच एका सदस्याने तुम्हाला किती समज आहे हे दाखवून दिलेलंच आहे - त्यांनी चक्क तुमची बॉटबॉयशी तुलना केली! त्यावरूनच समजून घ्या की तुमचे प्रतिसाद किती गिरे हुए आहेत ते.
काय हे?
आजमितीस विश्वात असलेल्या अनेक गहन, गूढ आणि मानवी मतीला कुंठीत करून टाकणार्या प्रश्नांचा यथायोग्य उहापोह व्हावा अशा हेतूने सुरू केलेल्या ह्या प्रश्नावलीला "(लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)" असं उत्तर दिल्याबद्दल खेद वाटला. अर्थात, मी माझ्यापरीने यथाशक्ती प्रयत्न करीतच राहीन.
असो.
हे पहा ...
हे पहा, तुम्हाला गैरसमजच करून घ्यायचा असेल तर कसंही करून तुम्ही तो करून घेणारच. तुमच्या या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आड मी येणार नाही.
पण मी हसले होते ते आमच्या लाफ्टर क्लबाची वेळ झाली म्हणून. तुम्हाला तेव्हाच प्रतिसाद देण्याची उबळ आली यात माझी काहीही चूक नाही. तुम्ही उभे केलेले प्रश्न गहन, गूढ आणि काय ते अलाणे-फलाणे आहेत याबद्दल मला किंचितही संशय नाही. (फेकतोय साला! मी पण टेपा मारून घेते.) पण तुमची शक्ती वाढून प्रयत्न कमी न पडण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
>> असो.
असोच.
फुसके बार – ०९ जानेवारी २०१६
फुसके बार – ०९ जानेवारी २०१६
‘
१) नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर नॅनो कारची कहाणी दाखवली. बंगालमध्ये नॅनो कारचे उत्पादन काही आठवड्यांवर येऊन ठेपलेले असताना ममता बॅनर्जींच्या बेजबाबदारपणामुळे टाटांना नॅनोचा कारखाना तेथून हलवावा लागला. त्यानंतर त्यांनी विक्रमी वेळात म्हणजे केवळ एका वर्षात गुजरातमध्ये या कारचे उत्पादन चालू केले.
गुजरातमध्ये हा कारखाना हलवण्याचे ठरल्यावरचे सर्वात मोठे आव्हान होते ते तेथे असलेल्या मनुष्यबळाचा विकास करणे. तेथील स्थानिक लोकांना नटबोल्ट टाइट करण्यापासूनचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना कामाच्याबाबतीत आत्मविश्वास मिळावा, कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य व्हावे याकरता त्यांना ध्यानधारणेचेही शिक्षण देण्यात आले.
अखेर इतक्या विक्रमी वेळात हा प्लॅंट गुजरातमध्ये कार्यांनवित करण्यात आला.
कम्युनिस्ट जाऊन तृणमूल कॉंग्रेस येणे म्हणजे बंगाली लोकांच्या नशीबी आगीतून सुटका झाली तरी फुफाट्यात जाणेच असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सिद्ध केले. गुंडांच्या जागी महागुंड आले. दळभद्रीपणाचे दुसरे नाव ममता बॅनर्जी.
२) माल्दाचा हिंसाचार
पूर्वी बंगालमधील माल्दाचे नाव गनिखान चौधरी या कॉंग्रेसी खासदाराच्या या मतदारसंघामुळे प्रसिद्ध होते.
यावेळी मात्र ते चुकीच्या कारणासाठी प्रकाशझोतात आले आहे.
उत्तर प्रेशातील हलकट नेता आझम खाने याने संघाच्या नेत्यांना होमोसेक्स्युअल म्हटल्यावर हिंदू महासभेचा नेता म्हणवणा-या कमलेश तिवारीनेही प्रेषिताबद्दल तसेच अनुद्गार काढल्याबद्दल माल्दामध्ये मुस्लिमांचा जवळजवळ अडीच लाखांचा मोर्चा काढण्यात आला व त्यात सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान करण्यात आले. हे नुकसान आपण कल्पनाही करू शकत नाही इतके प्रचंड आहे. त्या परिसरातले पोलिस ठाणेही त्यात जाळण्यात आले. पोलिसांची व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची वाहने जाळली गेली. जवळच्या रेल्वे स्टेशनची नासधूस करण्यात आली. परिसरातील काही हिंदू मंदिरे जाळली गेली वा त्यांची नासधूस करण्यात आली असेही काही ठिकाणी वाचण्यात आले.
या तिवारीला द्वेषमूलक भाषणे करण्यावरून हा हिंसाचार होण्याच्या आधीच अटकेत टाकल्याचे कळते.
इतक्या प्रचंड प्रमाणात झालेला हा हिंसाचार पाहता अडीच लाखांच्या हिंसक जमावाकडून काय होऊ शकते याचा प्रत्यय आला. सलग तीन दिवस कमीअधिक तीव्रतेने हा प्रकार चालू होता असे दिसते.
बांगला देशातील घुसखोरांमुळे बंगालची मान वाटावी अशा या भागातील काही जिल्हे मुस्लिमबहुल झालेले आहेत असेवाचण्यात येते. त्यांना भारतीयत्वाशी काहीही घेणेदेणे नाही. हा भाग टाइमबॉंबवर बसलेला आहे.
ममता बॅनर्जीसारख्या दळभद्र्या व स्वार्थी राजकारण्यांमुळे देशहिताला प्राधान्य मिळणे शक्य होणार नाही. केन्द्र सरकार जीएसटी सारख्या प्रलंबित बिलांमुळे बॅनजींसारख्याची मनधरणी करत आहे. त्यात देशहिताला तिलांजली दिली जात आहे.
विधानसभेत अर्थमंत्री अमित मित्रा व संसदेत डेरेक ओब्रायन हे त्यातल्या त्यात सभ्य चेहरे पुढे करून ममता बॅनर्जी मागच्या दरवाजाने केंद्र सरकारपुढे व पर्यायाने देशापुढे खूप घातक आव्हान निर्माण करत आहेत. कारण तेथील मुस्लि मतदार ही त्यांची व्होटबॅंक आहे.
केन्द्र सरकारने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काबूत न राहणारी राज्य सरकारे बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रकार अलीकडे जवळजवळ बंदच झालेला आहे. ते हत्यार वापरायचे झाले तर तातडीने बरखास्त करण्याच्या योग्यतेचे म्हणावे असे ममता बॅनर्जी यांचेच सरकार असेल असे म्हणता येईल.
आपल्याकडे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा ठेका परंपरेने शिवसेनेकडे आहे. अलीकडे शेतकरी संघटनांच्या काही आंदोलनांमध्येही अशी नासधूस होताना दिसते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या सर्वात अभ्यासू म्हणवल्या जाणा-या शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांचे व त्यांचेच दुसरे एक नेते नार्वेकर यांच्यातले एस.टी. महामंडळाची बस जाळण्याबद्दलचे संभाषण कैद करण्यात आले होते. त्यावर आजतागायत काही पक्की कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
माल्दाचा हा भयंकर प्रकार काहीही प्रभावी कारवाई न होता विसरला गेला तर भविष्यात अशा प्रकारांची वारंवार पुनरावृत्ती होईल यात शंका नाही. मागे म्यानमारमधील मुस्लिमांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता व त्यात बरेच अभद्र प्रकार झाले होते. आताही सदर वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेशात झालेले दिसते तर त्याची अशी भयानक प्रतिक्रिया झालेली दिसेते ती बंगालमध्ये. त्यातला मतितार्थही लक्षात घेतला पाहिजे.
३) माधव विद्वांस यांच्या दिनमहिमा या सदरामधून काही इंटरेस्टिंग आठवणी कळत असतात.
“१९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.”
बाकी कोणी नाही, पण थेट अण्णादुराईंनी पोरतुगालमधील तुरूंगात खितपत पडलेल्या मोहन रानडेंच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे हेही विशेष. वर इंटरेस्टिंग आठवणी असे म्हटले, तरी रानडे व त्यांच्याबरोबर ही शिक्षा सोसणा-यांनी सोसलेल्या हालांची कल्पनाही करू शकत नाही.
“१८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्ची न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.”
याच यादीमध्ये ८ जानेवारीचा वरीलप्रमाणे आणखीही एक उल्लेख आहे. अशा बाबींमध्येही न्यायालयाची मोहर लागते हे आज कदाचित आश्चर्यकारक वाटेल. तेव्हा मात्र या बातमीचे महत्त्व फार मोठे असणार.
४) अॅबर्डीनला नुकताच गेलेलो असताना आपल्याकडे जसे पावभाजी किंवा वडापावचे स्टॉल्स दिसतात; अगदी तेवढे नाहीत तरी तशा फिश अँड चिप्सच्या ब-याच गाड्या दिसत. त्यावरून तिथल्या माझ्या ब्रिटिश मित्राला रोजचे इंग्लिश फुड कशाला म्हणता येईल असे मोठ्या उत्सुकतेने विचारले.
त्याने आवंढा गिळल्याचे स्पष्ट दिसले. थोडा विचार करून तो म्हणाला की वेऽऽल, वुई हॅव करी, वुई हॅव पास्ता, वुई हॅव पिझ्झा. वुई हॅव ग्रेट व्हरायटी, यु नो!
५) पुन्हा एकदा लग्न – जेवणाचा मेनु ठरवणे
बाकी सारे जमले तरी लग्नात मेनू काय ठेवायचा यावरून दोन पक्षात वाद होऊ शकतात. त्यातही जर वधुपक्षाने सगळा खर्च करायचा असेल तर वरपक्षाचा ताठा पाहण्यासारखा असतो. भाजी-उसळ कोणती हवी याबरोबरच गोड पदार्थ कोणता हवा हा वादाचा मुद्दा असतो. एका बैठकीत एका सासुबाईंचे मला हा पदार्थ आवडतो, आमच्या याला (म्हणजे नवरदेवाला) तर हा गोड पदार्थ चालतच नाही, असे चालले होते. तेव्हा अमुकच हवे, तमुकच हवे असा प्रकार चालला होता. अर्थात त्या प्रकारात वधुच्या पित्याचा खिसा आणखी रिकामा होणार होता. अगदी मान्य होणार नाही इतपत exploitation चालले होते.
यावरून सहसा लग्न मोडण्याचा धोका नसतो, पण तरी वधुकडचे कोणीतरी खमके लागतेच. विविध प्रकारे सांगूनही सासूबाई ऐकत नाहीत हे पाहिल्यावर वधुकडचे एक काका म्हणाले की ‘तुमचे म्हणणे अगदी मान्य’. सासूबाई खुष. पणे ते पुढे म्हणाले, ‘नाही तरी नवरदेवासह तुम्ही शेवटीच जेवायला बसणार. त्या पंगतीला अगदी पंचपक्वान्ने ठेवू. तुमच्या व जावईबापूंच्या आवडीचे सगळेच त्यात येईल. मग तर झाले?’
स्वत:च्या व मुलाच्या आवडीच्या नावावर आपल्याकडच्या सगळ्या व-हाडींना तो महागाचा मेनू वधुकडच्यांना द्यायला लावून स्वत:चा ताठा मिरवू पाहणा-या सासूबाईंचा चेहरा खर्रकन उतरला. त्यांना बोलायला जागाच राहिली नाही.
राकुंना काही कारणामुळे ममता
राकुंना काही कारणामुळे ममता बॅनर्जी आवडत नाहीत हे समजलं. लग्न समारंभांचं फेटिश असावं हा संशय पक्का होत आहे.
ममता बॅनर्जीसारख्या दळभद्र्या व स्वार्थी राजकारण्यांमुळे देशहिताला प्राधान्य मिळणे शक्य होणार नाही. केन्द्र सरकार जीएसटी सारख्या प्रलंबित बिलांमुळे बॅनजींसारख्याची मनधरणी करत आहे. त्यात देशहिताला तिलांजली दिली जात आहे.
याबद्दल ऋषिकेश, नितिन थत्ते, अशा राजकारणात लक्ष घालणाऱ्या सदस्यांचं अभ्यासपूर्ण मत वाचायला आवडेल.
फुसके बार – १० जानेवारी २०१६
फुसके बार – १० जानेवारी २०१६
‘
१) समांतर सिनेमाची लाट अली होती त्या काळात रंग नावाचा एक सिनेमा आला होता. दूरदर्शन हे एकमेव चॅनल असण्याच्या काळात. हो, बहुधा रंग हेच नाव होते त्याचे. कलाकार वगैरे कोण होते ते मात्र अजिबात आठवत नाही.
रंगाच्या कारखान्यात काम करणा-या कामगारांची दयनीय अवस्था त्यात दाखवली होती. तेथील भयंकर operating practicesमुळे त्यांना विविध रोगांनी ग्रासलेले असते, एवढेच नव्हे तर तेथील मशिनरीमुळे त्यांच्या जीवालाही रोजचा धोका असतो.
कारखान्याच्या मालकाला लाल रंग तयार करायचा असतो. बरेच प्रयत्न करूनही त्याला हवा त्या शेडचा लाल रंग तयार होत नसतो, म्हणून तो नाखुश असतो.
एके दिवशी कारखान्यातल्या एका कामगाराचा हात मशीनमध्ये अडकतो. जवळपास रक्ताचा सडा पडतो. नेमके त्याच दिवशी कारखान्याच्या मालकाची तेथे भेट ठरलेली असते. त्यामुळे अपघाताची जागा घाईघाईने स्वच्छ केली जाते.
मालक तेथे फिरत असताना त्याला फरशीवर काही थेंब पडलेले दिसतात. तो खाली वाकून त्यांना बोट लावतो. साकाळल्यामुळे ते रक्त थोडे दाट झालेले असते. त्यामुळे त्याला थोडीशी तार येते. मालक खुश होऊन म्हणतो की हाच मला हवा असलेला रंग. कोणी तयार केला हा?
आणि सिनेमा संपतो.
२) पुन्हा रंग
रंग हा शब्द सर्वात अधिक वेळा कोणत्या हिंदी गाण्यात आलेला आहे? क्ल्यु हवा असेल तर त्या सिनेमात अमरिश पुरीची भूमिका होती.
३) वेळ अमावस्या
कालची मार्गशीर्षातली अमावस्या ही शेतक-यांसाठी महत्त्वाची असते. त्या दिवशी शेती बटाईने दिलेली असली तरी मालकाने शेतात असणे महत्त्वाचे समजले जाते. शेतातील गड्यांसाठी तर ती महत्त्वाची असतेच असते.
या दिवसात शेतात पीक उभे असते.
शेताचे रक्षण करणा-या विविध प्रकारच्या आसरा असतात. आसरा म्हणजे यक्षिणी किंवा देवता. जलदेवता, वायुदेवता, भुदेवता, सर्पदेवता अशा विविध देवतांचे प्रतिक म्हणून पाच दगड पुजले जातात. काही ठिकाणी हे पाच दगड पाच पांडव म्हणूनही पुजले जातात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते.
या पुजेचा उद्देश एकच, शेतात काम करणा-यांचे रक्षण होऊदे, समृद्धी येऊ दे, इडा-पिडा टळू दे.
गंमत म्हणजे अलीकडे हॅपी संक्रात (म्हणजे काय याचा विचार न करता) असे मेसेज पाठवले जातात, तसाच हॅपी वेळ अमावस्या हा मेसेजही आज आला.
तिकडे शेतकरी नेमाने वेळ अमावस्येला पूजा करतो, पण या देवता काही प्रसन्न होत नाहीत, उलट त्यांना शेतक-याच्या रक्ताचीच तहान आहे जणू. शेतक-यांच्या घामाने ती भागताना दिसत नाही.
शेतक-यांनी या दिवशी भावनांच्या आहारी न जाता यापुढे या देवतांना प्रसन्न करण्याऐवजी खरी समृद्धी येण्यासाठी काय करायला हवे, याचा गंभीरपणाने विचार करायला हवा. मागच्या वर्षात निसर्गाची अवकृपा झाली असेल/नसेल तरी त्याव्यतिरिक्त आपल्या हातून काय चुका झाल्या, कोणत्या सुधारणा करता येतील, इतरत्र कोणते नवीन प्रयोग चालू आहेत या व अशा गोष्टींचा आढावा घेण्यासाठी, यावर चर्चा करण्यासाठी या दिवसाचा उपयोग करण्यास सुरूवात करावी.
अन्यथा आजवर जेवढ्या वेळ अमावस्या आल्या न गेल्या, शेतकरी होता तेथेच आहे, किंबहुना मागेच गेला आहे, तसाच राहील.
४) तुम्ही केसात घातलेला गजरा तुम्हाला दिसतो का? नाही ना? मग तो तुम्ही का घालावा? दुस-यांना वास यावा म्हणून तुम्ही तो तुमच्या केसात का माळावा?
याच न्यायाने तुमच्या गळ्यातले नेकलेस, कानातले वगैरे दुस-यांना दिसते तसे तुम्हाला दिसते का? नाही ना? मग ते पहायचेच असेल स्वत:च्या हातात न धरता गळ्यात, कानात का घालावे?
अशा किती गोष्टी आपण आपल्याकरता न करता दुस-याकरता करत असतो? तसेच करत रहावे का?
केवळ दुस-याला दिसणा-या अशा कोणत्या गोष्टी पुरूष करत असतात? करतात का?
५) अमृतसरजवळच्या वाघा बॉर्डरवर दररोज ध्वज उतरवण्याच्यावेळी भारतीय व पाकिस्तानच्या जवानांचा स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे खरे तर तमाशा चालतो. यावेळी पाय जेवढे ताणता येतील तेवढे ताणून उंच करताना वगैरे कोणत्याही बाजुच्या जवानाचा तोल गेला, तर कोणाचे हसू होईल? पण एकमेकाला खुन्नस देण्याचा हा प्रकार अजूनही चालू आहे.
तर सांगायचे म्हणजे या कार्यक्रमात प्रथमच पाकिस्तानच्या बाजूने एक गैर-मुस्लिम जवानाने भाग घेतला. पाकिस्तानकडून एका शीख रेंजरने भारतीय रेंजरशी हस्तांदोलन केले.
६) कच्चा कांदा खाणारे आपण पाहतो. पण कच्चा बटाटा खाणारे दिसतात का? (किती जणांनी तसा प्रयत्न तरी केला आहे?) आणि तेच याला उकडा, की याने मानवांची मोठी लोकसंख्याच त्याच्यासारखी बनवल्याचे दिसते.
खालचा सुंदर फोटो कोणत्या फुलाचा आहे? क्ल्यु देण्याची पद्धत असल्यामुळे एवढेच सांगतो की याच्या मांडवात फिरलात तर कपड्यांना जो वास येईल त्यामुळे या फुलापासून होणारे फळ खाण्यावरची तुमची वासनाच उडेल. पण तेच हे फळ शिजवा, बरेच जण खाण्याचा विचार तरी करतील. बरेच जण असे म्हणण्याचे कारण असे की याच्या भाजीला न्याय देणारे तसे कमीच असतात.
कच्च्या पदार्थावर साधी उकडण्याची प्रक्रिया केली की गुणधर्म कसे बदलतात याचे हे आणखी एक उदाहरण.
येथे एखादी इमेज टाकण्यासाठी केवळ वेबयुआरएल देता येते असे दिसते. त्यामुळे त्या फुलाचा फोटो येथे कसा टाकयचा ते कळत नाही.
खरंय
हो, हल्ली स्वतंत्र धागा का काढला ह्याचे जस्टीफिकेशन द्यावे लागते.
+१
खरं तर उडन खटोला यांचा चर्चाप्रस्तावही एक फुसका बारच आहे. मात्र राकुंना वेगळी ट्रीटमेंट केवळ व्यवस्थापनाशी पंगा घेतल्याने मिळते आहे असे वाटते. त्यांनी लिहिले तर चालते पण त्यावर चर्चा करु नका हा अजब प्रकार आहे.
-१ इतर सदस्य असे धागे रोज
-१ इतर सदस्य असे धागे रोज प्रसवत नाहीत असे वाटते. सदर नियम केवळ 'क्वालिटी'साठी नसून वारंवारीतेसाठी आहे. आणि हे या संस्थळावर नवे नाही. प्रत्येक बातमीचा वेगळा धागा काढण्याइअवजी एकाच धाग्यावर त्या दिल्या जातात, तसेच काय खाल्ले, वाचले, बघितले इत्यादी गोष्टी देखील! आता कोणी फुलबाजीरावांनी वारंवार धागे काढल्यावर त्यांचे एकत्रीकरण संपादकांनी केले आहे. आता ते आपणहून नवे लेखन त्या धाग्यावर करतात.
फु.बा. सोडून राकुंच्या अन्य लेखनावर कारवाई केलेली नाही तसेच राकुंच्या लेखनस्वात्र्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही याची नोंद माझ्यासह अनेक सदस्यांनी घेतली आहेच.
(सदस्य) ऋ
अभ्यास वाढवा.
आता कोणी फुलबाजीरावांनी वारंवार धागे काढल्यावर त्यांचे एकत्रीकरण संपादकांनी केले आहे. आता ते आपणहून नवे लेखन त्या धाग्यावर करतात.
ही माहिती चुकीची आहे. वाटेल त्या गोष्टीचे क्रेडिट उगीच संपादकांना देऊ नका. फुलबाजीरावांनी केवळ एकच धागा विणला आहे आणि नेहमी त्याच धाग्यावर लेखन केले आहे. बाकी चालू द्या.
वारंवारितेचा प्रश्न सुटलेला नाही
एक तर मुळात राकुंचे लेखन हा एक प्रश्न आहे हेच पटलेले नाही. त्यांचे लेखन एक दोन ओळींचे वगैरे नसून बराच विचार करुन प्रयत्नपूर्वक केलेले दिसते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करण्यासाठी त्यांना हे संकेतस्थळ योग्य वाटले. त्यांची मते पटणारी नसली तरी किमान त्यांच्या मतांवर काही सदस्यांना प्रतिसाद देऊन चर्चा करावीशी वाटू शकते. ज्यांना त्यांचे लेखन दुर्लक्षित करायचे आहे त्यांना ते करता येईलच. वारंवारिता हा ही एक प्रश्न आहे असे वाटत नाही. दिवसाला एक धागा ही फार मोठी वारंवारिता नाही. शिवाय ज्या स्वरुपाची कारवाई होत आहे त्यानंतरही राकुंच्या धाग्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही. त्यांना लिहू देण्यामागे 'आम्ही कोणावरही बंदी घालत नाही' हे हाय मॉरल ग्राऊंड मेंटेन करायचे हाच केवळ आग्रह दिसतोय.
राकुंच्या प्रतिसादातील आक्रमक भाषा अनावश्यक आहे मात्र माझे मत केवळ त्यांनी सुरु केलेल्या धाग्यांपुरतेच आहे.
अहो, एरवी माझा सहभाग माझ्या
अहो, एरवी माझा सहभाग माझ्या पोस्टपुरता असतो. कारण या लोकांचे एकूण वर्तन पाहून इतरत्र जाऊन काही कमेंट करण्याची इच्छाही होत नाही. प्रत्येकवेळी हेटाळणी, आता हे श्रेणीचे नाटक. मला काही आक्रमक प्रतिसाद देण्याची हौस नाही. हे संपादक आहेत म्हणजे आकाशातून पडलेत असा यांच्यापैकी काहींचा समज झालेला दिसतोय आणि त्यातून मला हरॅस करण्याचा प्रकार चालू आहे. या पोर्टलचा उद्देश इतरत्र लिहिलेला आहे, यांचे वर्तन त्यातल्या कशाशी सुसंगत आहे हे तपासून पाहता येईल.
हास्यास्पद.
एरवी माझा सहभाग माझ्या पोस्टपुरता असतो.
हो? लब्बाड!
हे संपादक आहेत म्हणजे आकाशातून पडलेत असा यांच्यापैकी काहींचा समज झालेला दिसतोय आणि त्यातून मला हरॅस करण्याचा प्रकार चालू आहे.
अहो,
ते मालक आहेत इथले. तरीही तुमची आयडि आहे शिल्लक. तुम्ही तुमचे स्वतःचे राकुस्थान काढा पाहू वेगळे. मग तिथे संपादकही तुम्हीच अन लेखकही तुम्हीच. पोर्टलचा उद्देश ठरवणार्यांनाच तुम्ही असे बोलू लागलात तर कसे चालावे? एल ओ एल.
दिवसाला एक धागा ही वारंवारिता
दिवसाला एक धागा ही वारंवारिता फार नाही? एका माणसासाठी नसेल पण उद्या दहा जणांनी येऊन हे सुरु केले तर?
शिवाय मुद्दा क्वालिटीचा का नाही?
प्रयत्नपूर्वक लिहीणे म्हणजे क्वालिटी असे होत नाही. पेपरमध्ये त्याच बातम्या वाचल्यावर आधीच हे किंवा यापेक्षा जास्त विचार उमटून गेलेले असतात मनात. त्याच बातम्यांवर त्रोटक टिप्पण्यावाचण्यात काहीही रस नाही.
बाकी प्रयत्नपूर्वक लिहीणारे कविता/कथा/ललित लिहितात. त्यावर तर कधी विश्लेषणात्मक चर्चा झाल्याचे दिसत नाही फारसे. फुटकळ गोष्टींसाठी मात्र संघर्ष.
मुळात मनातले विचार किंवा बातमीतल्या धाग्यावर लिहीणारे विचार करुन किंवा प्रयत्नपूर्वक लिहीत नाहीत असं गृहीतक आहे का?
विचारपूर्वक लिहीलेल्या धाग्यांवर पाच ते सातपेक्षा जास्त प्रतिक्रिया येत नाहीत असा वैयक्तिक अनुभव आहे. इतरत्र फार प्रतिक्रिया व्यक्त न करणार्यांना राकुंच्या धाग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आतुरता असेल तर एकतर राकु लकी आहेत किंवा त्यांच्याकडे स्पेशल पात्रता/लेखनकला आहे.
असो. लवकरच माझाही प्रतिदिन एक धागा प्रसवण्याचा विचार आहे.
च्यालेंज!
असो. लवकरच माझाही प्रतिदिन एक धागा प्रसवण्याचा विचार आहे.
नाही म्हणजे, (ठरवून) टुकार का होईना, पण दररोज, नित्यनेमाने, न चुकता एक धागा तुम्ही पाडून दाखवाच!
वाटते तितके सोपे नाही ते! (नाहीतर मीच नसता पाडला?)
तुकोबांनी (मला वाटते; चूभूद्याघ्या.) कोठेसे म्हटले आहे: 'बोल बोलता सोपे वाटे| करणी करता टीर फाटे||'
तेव्हा उचलाच तुम्ही हे च्यालेंज! (If you can't beat him, join him.)
हृषिकेश, खोटे बोलणे थांबवा.
तुम्हाला हवं ते करतच आहात, ते करत रहाच, फक्त खोटे बोलू नका.
तुम्ही संपादकमंडळी वेगवेगळ्या तोंडांनी बोलता. एकानंतर एक असा प्रत्येकाने वेगवेगळा मुद्दा काढायचा ही तुमची पद्धत आहे.
आता म्हणताहात की प्रश्न वारंवारितेबद्दलचा आहे. क्वालिटीबद्दल (दर्जाबद्दल) तुम्ही वेगवेगळ्या वेळी काय म्हणालेले आहात ते दाखवून देऊ का? हॉटेल रुवांडा या सिनेमाच्या निमित्ताने लिहिले तर तुमच्या संपादक-मालक म्हणतात, यात काय विशेष, हे तर इथल्या सर्वांनाच माहित आहे. तुम्ही सर्वज्ञ आहातच की, पण सगळ्यांच्या वतीने बोलण्याचा व त्यावरून वर माझ्या लिखाणाचा दर्जा ठरवण्याचा भोचकपणा कशाला?
मासिकाच्या संपादकांप्रमाणे जे लिखाण तुमच्याकडे येते त्याचा दर्जा पाहून ते प्रसिद्ध करू द्यायचे की नाही असे करा म्हटले, तेही तुम्ही करत नाही.
तुमच्या दुस-या एका संपादकांनी माझे फेसबुकवरचे लिखाण पाहूनच मला येथे लिहिण्याबद्दल सांगितले, तेव्हाही फुसके बार व माझ्या इतर पोस्ट्स दररोज प्रसिद्ध होत होत्याच, पण येथे लिहू लागल्यावर मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला.
मी वाचत नाही केवळ लिहितो, हेही मला अनेकदा सुनवून झाले. येथे कोणी नव्याने सदस्य झाला म्हणजे जणू नाही तो इयत्ता पहिलीच काय, नर्सरीसाठी प्रवेश घेतलेला आणि तुम्ही संपादक पीएचडीधारक असा तुमचा समज. त्यामुळे त्याला स्पूनफिडींग करायला सगळे झाडून तयार.
तुमच्या संपादकांनी माझ्या कितीतरी पोस्ट्सवर काय लिहिले आहे न पाहता न समजता भलत्याच मुद्द्यांवरून टीका केलेली आहे. माझा ‘अजेंडा’ काढण्यासही कमी केलेले नाही.
मध्येच कोणीतरी माझ्याच लाउडस्पीकरचा आवाज इतरांपेक्षा कसा जास्त हे भलतेच तर्कट लावले गेले. जसे काही इतरांचे लाउडस्पिकरच सोडा, मी त्यांची नरडीही दाबून ठेवलेली आहेत. एरवीची विद्वत्ता एखाद्याला पाडण्याच्यासाठी कशी वापरली जाते याचे हे उदाहरण. त्यांनीच मागे या पोर्टलचा दर्जा ढासळत चालल्याची आवई उठवली होती. त्याबद्दल मी लिहिले तर या येथे अनेक वर्षे राहून आपले स्थान कमावलेल्या या ‘ज्येष्ठ’ सदस्याची उघडपणे बाजू घेऊन संपादकांनी माझ्यासारख्या अतिअतिकनिष्ठ सदस्याला ऐकवण्याचा प्रकार केला होता. हे असले या पोर्टलचे निष्पक्ष संपादक.
तुम्ही स्वत:ही मागे स्त्रियांवरील अत्याचारांच्या बाबतीत कुठल्यातरी सर्व्हेचे बाड फेकून तेच अंतिम सत्य आहे असा आव आणला होता. माझ्या पोस्टमध्ये कितीतरी मुद्दे होते. तरीही तोकडे कपडे हाच केवळ त्यातला एकमेव मुद्दा आहे असे समजून त्याबद्दलच कमेंट्स केल्या गेल्या. वर या विषयावर कितीतरी चर्वितचर्वण झाले आहे असा आव आणायलाही कोणीतरी मोकळे. येथे इतकी स्टिरियोटाइप चर्चा पाहिली की महाराष्ट्रटाइम्सच्या बातम्यावरील ऑनलाइन कमेंट्स असाव्यात की काय (त्यातल्या शिव्या व इथली थोडी पॉलिश्ड भाषा सोडता) अशी शंका वाटावी अशा त्या कमेंट्स आहेत. आणि भाषा करताहेत दर्जाची.
फेसबुकवरील लेखन व त्यावर मिळणा-या प्रतिक्रिया कमी दर्जाच्या हे या मंडळींच्या डोक्यात पक्के बसलेले दिसते. त्यामुळे माझ्या लिखाणाला तेथे चांगला प्रतिसाद मिळत असला तरी इथे त्याची किंमत फार नाही, हा एक असाच विचित्र आविर्भाव.
वेगळे धागे नकोत हा तुमचा आग्रह, पण कितीतरी पोस्ट्वरील कमेंट्सच्यास्वरूपात मूळ विषय सोडून तुम्ही कसे बागडता (बागडता हाच शब्द यासाठी योग्य आहे) हे तुमचे तुम्हीच पाहू शकाल. तेव्हा मात्र तुमचा दर्जाचा आग्रह सोयीस्करपणे विसरला जातो. तेव्हा तुमचे पाच किंवा दहा जणांच्या कंपूचे व कंपूसाठी हे प्रायव्हेट लिमिटेड पोर्टल आहे की कसे हे एकदाचे ठरवा.
फुसके बार सारखी सदरे तुमच्या पोर्टलमध्ये व्यवस्थित अकोमोडेट कशी करायची याची सोय तुमच्या पोर्टलवर नाही हा मुख्य मुद्दा आहे. तेव्हा त्याबाबत काही न करता एकावर एक माल टाकण्याची तुमची पद्धत. एक-दोन सदस्य अशा परिस्थितीतही ते आवर्जून वाचतात असे सांगतात. तरीही मुळात ती पद्धत वाचण्यासाठी गैरसोयीची आहेच. एकाच वेळी अनेक सदस्यांच्या कमेंट्स आलेल्या असतील व त्याचे नोटिफिकेशन आले की तपासायला जा तर कोणत्यातरी एका कमेंटवर आपोआप नेले जाते. इतर नवीन कमेंट्स कशा शोधायच्या, तर प्रत्येकवेळी स्क्रोल करत रहा. अशा अडचणींबद्दल तुम्ही काही करणार नाही, मात्र अनेक पोस्ट्स एकावरएक टाकायचे स्वातंत्र्य असल्याचा आव आणायला मात्र तयार.
कालच्याच फुसके बारमध्ये मी लिहिलेले आहे की अनेकदा फुसके बारमध्ये एकाच मुद्द्यावर विस्ताराने लिहिलेले असते, तेही तुमच्या पद्धतीने व कृपेने वाचनमात्र होते. तेव्हा यापुढे एखादी स्वतंत्र पोस्ट जरी असली तरी मी ती फुसके बार या सदराखालीच टाकणार अहे. म्हणजे तुम्हालाच तुम्ही काय करत अहात याची जाणीव होईल.
असो. तुम्हाला काय करायचे ते करत रहा. फक्त आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काय करायचे ते करू, त्याबद्दल कोणी विचारायचे नाही एवढे सांगा. तसेही मी त्याबाबतीत काही करू शकत नाही. एवढेच सांगतो, की जे करत आहात ते योग्य नाही. अर्थात तरीदेखील तुम्हाला हवे तेच तुम्ही करणार याबाबतीत मला तीळमात्र शंका नाही.
अतिशहाणा यांनी मी केवळ इथल्या संपादकमंडळाशी पंगा घेतल्यामुळेच असे करत अहात असे सुचवलेले आहे. मला तरी त्यात काही शंका वाटत नाही. येथे पंगा घेण्याचा प्रश्न नाही. माझ्या पोस्टवर कोणी खोडसाळपणे, मुद्द्याला सोडून माझ्या हेतुवरच शंका घेऊन कमेंट करत असेल तर मी त्यावर त्या पद्धतीनेच उत्तर देईन हे नक्की. पंगा समजायचा की काय तुम्ही ठरवा. तुमच्या रे ला का रे विचारणारा तुम्हाला इतक्या वर्षात दुसरा कोणी भेटला नाही की काय असे वाटावे असे तुमचे एखाद्या सदस्याशी ठरवून केलेले हे विचित्र वर्तन आहे. चालू द्या. माझ्याही सहनशीलतेला काही मर्यादा आहेत हे मी संपादकमंडळापैकी एकाला सांगितल्याचे स्मरते.
तेव्हा एकच करा. माझ्यावर कारवाई केल्याची बाळबोध व मिसलिड करणारी कारणे सांगणे थांबवा. तुमचा आहे दहाएक जणांचा कंपू. एकेकाने असे काही तरी खोटेनाटे लिहिले तर मला प्रत्येकवेळी प्रतिवाद करायला तेवढा वेळ मिळेलच असे नाही.
अजिबात आश्चर्य वाटले नाही. वर
अजिबात आश्चर्य वाटले नाही. वर लिहिल्याप्रमाणे फारच प्रेडिक्टेबल वागलात. या श्रेण्या देणारेही तुम्हीच मोजके महाजन. तुमचा दर्जा हाच विनोद करून ठेवला आहेत तुम्ही. मग आश्चर्य काय त्यात!
श्रेणी देण्याबद्दल पुढील वाचले. "सध्या मर्यादित लोकांना ही सुविधा उपलब्ध आहे. उत्तम वाचक आणि प्रतिसादक असणार्या सदस्यांचा यात समावेश असावा मुख्य विचार आहे."
या स्वत:च स्वत:ला दिलेल्या खास सोयींचा करा दुरूपयोग. माझ्या पोस्टला किंवा कमेंटला श्रेणी देणारे तुम्ही कोण शहाणे लागून गेला?. संपादक झाले म्हणून हे असले विशेषाधिकार घेता आणि असा भेदाभेद करता. वर त्याच शहाणपणाने विनोदी श्रेणी दिल्याचे थोबाड वर करून सागत आहात. थूत तुमच्यावर व तुमच्या या धारिष्ट्यावर. तुमच्या श्रेण्या घातल्या चुलीत. निर्लज्जपणा असा रस्त्यावर तरी आणू नका.
जाऊदे हो ढेरेसाहेब.माझ्या
जाऊदे हो ढेरेसाहेब.
माझ्या पोस्टवर श्रेणी देण्याचा अधिकार यांच्यासारख्या अर्धवटाला नाही हे सांगूनही पुन्हा खाली उगीउगी - उपेक्षित हे नाटक चालूच आहे. याच अर्धवटरावांनी मागे डुकराची पिलावळ वगैरे शब्दप्रयोग वापरले आहेत, त्याच्याआधीचे त्याचे उद्योगही सविस्तार सांगितलेले आहेत. तरीही ते संपादकमंडळावर आहेत. इतके विद्वान संपादक असल्यावर माझ्याकडून जेन्युइनपणाची अपेक्षा ठेवत आहात. या संपादकांचे बेजबाबरदारपणाचे वर्तन पाहूनही वर ऐसीअक्षरेनी केलेली सूचना यांच्यासाठी नाहीच जणू. संपादक मंडळाला माझी विनंती आहे की या अर्धवटरावांना माझ्या पोस्टपासून दूर ठेवावे व श्रेणी वगेरे देण्यापासून पराव्ृत्त करावे. यांना माझ्या पोस्ट वा कमेंटबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याची माझी इच्छा नाही. मुळात हे श्रेणी देण्याचे नाटक भेदाभेद करण्याचा प्रकार आहे हे संपादकामंडळाने लक्षात घ्यावे. येथे या अधिकाराचा सर्वस्वी दुरूपयोग केला जात आहे. यांना कधी काही विनोदी वाटते अाहे कधी उपेक्षित वाटत आहे. यांचे डोके ठिकाणावर आहे का हे एकदा तपासून पाहिले जावे.
कित्ती गोड!
कित्ती गोड शब्द आहेत !
आत्तापर्यंत कुठल्याही मराठी संस्थळावर संस्थळाच्या संपादकमंडळाची इतकी तारीफ केलेली मी कधीही पाहिली नाही.
इथे मराठी म्हणी आणि वाक्प्रचार असा धागा असल्यास - 'थूत तुमच्यावर' , 'अमुक घाला चुलीत' , 'निर्लज्जपणा रस्त्यावर आणणे' इत्यादी शब्दसमुच्चय तिथे गौरवपूर्ण पद्धतीने नोंदवून ठेवण्यात यावेत अशी संपादक मंडळाला माझ्याकडूनही लाडिक विनवणी.
राकु, तुम्हीपण ना या गोडगोड लोकांना अजून गोडमिट्ट धडा शिकवा. चार पाच दिवस फिरकूच नका इकडे (मग हळूच 'भॉक्क' करा हवंतर!)
मग नक्की 'आज राकु हवे होते' अश्या शोकविव्हल पोष्टी पडतील बघा.
थोडे आकडे, थोडा विचार
सध्या ट्रॅकरवर ५० धागे असतात. त्यांपैकी ९ धागे राजेश कुलकर्णी यांचे आहेत. राजेश कुलकर्णी ऐसीवर लिहायला लागल्यापासून ट्रॅकरवरचे साधारण २०% धागे त्यांचेच असतात. अंदाजे ५० लोक ऐसीवर (अ)नियमितपणे लिहित असतील; म्हणजे सरासरी ट्रॅकरवर एका वेळेस एका सदस्याचा एक धागा दिसेल. (सध्या माझ्या नावाचेच ४ धागे ट्रॅकरवर दिसत आहेत. इतर अनेक दिवस असतात जेव्हा मी सुरू केलेला एकही धागा ट्रॅकरवर नसतो.)
- ऐसी अक्षरे हे संस्थळ राजेश कुलकर्णी यांचा खाजगी ब्लॉग, संस्थळ अथवा फेसबुकची भिंत नाही.
- राजेश कुलकर्णी हा ऐसीचा चेहेरा नाही; वा कुलकर्णी यांच्या लेखनात, विचारांत काही विशेष स्पष्टता, अभ्यास आहे म्हणून ऐसी व्यवस्थापनाला कुलकर्णी यांच्या लेखनाला विशेष प्राधान्य मिळावं असं वाटत नाही. उदाहरणार्थ, विशेष महत्त्वाचे वाटलेले धागे तारे देण्याची सुविधा वापरून आर्काईव्ह केले जातात, त्यांतले काही ऐसीच्या मुखपृष्ठावरही लावले जातात. ही सुविधा सर्व श्रेणीदात्यांना, म्हणजे नियमितपणे लिहिणाऱ्या ऐसीच्या बहुतांश सदस्यांना आहे. त्यांनीही कोणी कुलकर्णी यांचे धागे पाच तारे देऊन विशेष असल्याचं दर्शवलेलं नाही. त्यावरून व्यवस्थापन आणि बहुतांश सदस्यांमध्ये एकमत आहे हे दिसतंय.
त्यातूनही राजेश कुलकर्णी यांना (फेसबुक वगळता) ऐसीवरच हे लेखन प्रसारित करायचं असल्यास लेखनासाठी छोटेमोठे प्रश्न, ही बातमी वाचली का अथवा स्वतःच्या लेखनाचाच स्वतंत्र धागा असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय वापरायचे सोडून कुलकर्णी यांनी कायमच 'तुम्ही फलाणी गोष्ट का करत नाही' किंवा 'इतर लोक रोजच्या रोज प्रकाशित करत नाहीत हा माझा दोष नाही' अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका घेताना त्यांनी अनेकदा शिष्टपणाची मर्यादाही ओलांडली आहे. आजही त्यांनी आपल्या अशिष्ट भाषेचा हिरीरीने पुरस्कार केला आहे. लोकांकडून भलत्या अपेक्षा ठेवताना आपण वापरत आहोत ही जागा खाजगी मालकीची आहे, त्या जागी आधीपासूनच बरेच लोक, काही नियम बनवून गुण्यागोविंदाने राहत आहेत याची भीडमुरवत न बाळगता, 'माझ्यासाठी तुम्ही तुमचे नियम बदला कारण छापील माध्यमांत हे असं-असं होतं' अशा प्रकारची भूमिका मांडत आहेत. या भूमिकेमागचा तर्क काय तो मला (आणि व्यवस्थापनालाही) अजूनही समजलेला नाही.
राजेश कुलकर्णी यांच्याशी गोडीगुलाबीने बोलण्याचा प्रयत्न व्यक्तिगत निरोप लिहूनही झाला. त्यातून विपरीत अर्थ काढून, त्या निरोपांमधल्या सोयीस्कर गोष्टी ते स्वतःच्या शब्दांत जाहीर करत आहेत. याला काही प्रमाणात बदनामीचाही वास आहे.
---
यापुढे माझी व्यक्तिगत भूमिका, त्रागा, चरफड किंवा काय म्हणाल ते -
राजेश कुलकर्णी यांना धागे काढायचे असल्यास काढू द्यावेत. पण त्यांचे धागे आपसूक ट्रॅकरवर येऊ नयेत. त्यांचे धागे वाचनमात्रही होऊ नयेत. ज्यांना त्यांचे धागे वाचायचे आहेत त्यांनी 'सदस्याचे लेखन'मध्ये जाऊन वाचावेत. एखादा धागा बरा असेल तर तो ट्रॅकरवर आणण्यासाठी कोणाला खरड/व्यनी करायचे हे ऐसीच्या सदस्यांना माहीत आहेच.
ही व्यक्तिगत भूमिका आत्तापर्यंत अन्य व्यवस्थापकांसमोर मांडून झालेली आहे. यात राजेश कुलकर्णी यांच्या अभिव्यक्तीवर टाच येते म्हणून ती नाकारली गेलेली आहे. अर्थातच, माझ्या हातात किल्ल्या असूनही अन्य व्यवस्थापकांच्या मताचा आदर मी करते.
पण आता या नेहेमीच्या पकडापकडीचा कंटाळा आला आहे. कोणत्यातरी टुकार मालिकेत काय दाखवलं आहे याचं वर्णन, फेसबुकावर कोणीतरी काहीतरी म्हणालं त्याची यादी, पुण्यातल्या हेल्मेटसक्तीला वाहिलेले एकाच सदस्याने काढलेले चार धागे, टीव्हीवर लिक्विड बायॉप्सी हे दोन शब्द ऐकले की 'लिहा आता यावर निबंध', रोहित वेमुलासारख्या संवेदनशील प्रकरणावरून केलेलं असंवेदनशील प्रसारण हे फार रटाळ आहे. हा सुमारपणा ऐसीचा चेहेरा बनू नये अशी माझी इच्छा आहे. पण सध्या व्यक्तिगत मतप्रदर्शनच सुरू आहे तर या बौर्यावर किती वेळ फुकट घालवायचा? आणि का?
१) ५०पैकी ९ धागे माझेच दिसत
१) ५०पैकी ९ धागे माझेच दिसत असतील तर तो माझा प्रश्न नाही. इतरांनी अधिक लिहिण्यास किंवा आणखी सदस्यांनी लिहिण्यास मी कोणाचे हात धरून ठेवलेले नाहीत. शिवाय खाली उल्लेख केलेले तुम्ही सांगितलेले जे तीन प्रकार आहेत तेथे फार स्क्रोलिंग करावे लागलेले तुम्हाला चालते आणि येथे ५०पैकी ९ ठिकाणी केवळ माझे नाव दिसते म्हणून स्क्रोल करावे लागते याचे तुम्हाला संकट वाटते याची संगती कशी लावता पहा. प्रश्न माझे नाव दिसण्याचा नाही, तर येथे लिहिणारे मोजकेच आहेत याचा आहे. तुम्ही तुमचा राग माझ्यावर काढता आहात एवढेच.
२) ऐसीचा चेहरा म्हणजे काय असते? सक्य झाल्यास ऐसीचा चेहरा म्हणून जे सदस्य आहेत त्यांचे प्रत्यक्ष फोटो लावलेत तरी माझी हरकत नाही.
३) श्रेणी देणे हा बोगस प्रकार अाहे. आम्हाला अधिकार अाहेत म्हणून आम्ही श्रेणी देऊ म्हणत इतर वाचकांचा त्यातले अनेक जण जे केवळ वाचक असतील, त्यांची वाचनाची संधी तुम्ही हिरावून घेत आहात. इथे सगळे इक्वल व त्यातले काही मोअर इक्वल असे समजणे चालू आहे. हा भेदाभेद करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या अधिकाराचा काही संपादक कसा गैरवापर करत आहेत हे मी वेळोवेळी दाखवलेले आहे. श्रेणी द्यायचीच झाली तर ती सर्वांना देता यायला हवी. तेव्हा मला कोणी पाच स्टार दिले नाहीत म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटू देऊ नका.
४) काही संपादकांची वेगळी बदनामी करण्याचे मला प्रयोजन नाही. ते स्वत:च्याच कर्माने ते करत आहेत.
५) विचारात स्पष्टता किंवा अभ्यास नाही हा तुमचा आताचा कांगावा आहे. जेव्हा इथल्या एका संपादकांनी फेसबुकवर माझ्याशी संपर्क साधून येथे लिहिण्याबाबत सुचवले होते तेव्हा माझा लिहिण्यातील विचारांचा उथळपणा आवडला व येथे रोज हेटाळणी करायला एक बकरा हवा म्हणून तसे सुचवले होते की काय? की तिथले लिहिणे आवडले होते म्हणून?
६) दर्जा, अभ्यास, विचारांची स्पष्टता या सगळ्या सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत. यांच्यासंबंधी तुमचा काय समज असेल तो असो, माझ्यावर व इतर सदस्यांवर ते लादू नका. मी म्हटले तसे तुमच्या दहा जणांचा गुडीगुडी कंपू सांभाळत बसा. ही जागा खाजगी मालकीची आहे याचा उल्लेख केलात म्हणून हे सांगतो आहे. येथे केवळ तुमचा कंपू नाही, इतरही सदस्य अाहेत याचे भान ठेवा. तुमच्या वर्तुळाबाहेरील जबाबदारी ओळखून वागायला शिकाल तर इतर सदस्यांचा योग्य तो मान ठेवू शकाल, तुमच्या द्ृष्टीने ते ऐसीचा चेहरा नसले तरी त्यांची हेटाळणी करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही.
७) मी स्वत:हून कधीही कोणाबद्दल वेडेवाकडे लिहिलेले नाही. तेव्हा शिष्टपणाची मर्यादा खरे कोण ओलांडते आहे हे तुम्ही पहा. खोडसाळ उपहासाकडे व हेटाळणीकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. तुमच्या पॉलिसीमध्ये 'सदस्याची प्रसंगी कठोर टीका सहन करायची तयारी हवी' असे काहीसे विधान आहे. त्यातल्या कठोर या शब्दाचा अर्थ मी मागेच विचारला अाहे, त्याचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही. कठोर टीकेला कठोर प्रत्युत्तर चालत नाही काय?
८) "छोटेमोठे प्रश्न, ही बातमी वाचली का अथवा स्वतःच्या लेखनाचाच स्वतंत्र धागा असे तीन पर्याय उपलब्ध आहेत." असे जे म्हटले आहेत, त्यातल्या कोणत्याच प्रकारात फुसके बार हा प्रकार बसत नाहीत. हे तिन्ही प्रकार एकाठिकाणी कोंबण्याचा प्रकार आहे. कमेंट करणे, कमेंट्सचा ट्ृॅक ठेवणे, पोस्ट्स टाकणे, पोस्ट्सचा ट्रॅक ठेवणे या सर्वच गोष्टींसाठी ते अतिशय क्लिष्ट व गैरसोयीचे आहे हे मी याआधीही सांगितले आहे. शिवाय तेथे टाकले तर मुळात मी ऐसीचा चेहरा नसल्यामुळे ऐसीचा चेहरा खराब किंवा विद्रुप होणार नाही काय? तेव्हा प्रश्न इतर काही नसून मी उलटे प्रश्न विचारतो हा आहे हे स्पष्ट आहे.
----
तुमच्या व्यक्तिगत भूमिकेबद्दल. एरवी मी त्यावरही माझ्या पद्धतीने लिहू शकलो असतो. परंतु तसे न करता त्यात तुम्ही ज्या पोस्टसंबंधीच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहेत त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू शकतो. तुमची इच्छा असेल तर. १) टीव्हीवर लिक्विड बायॉप्सी हे दोन शब्द ऐकले की 'लिहा आता यावर निबंध - यावर कोठे निबंध लिहिला आहे दाखवा. आनि जो लिहिला अाहे तो निबंध अाहे काय? प्रश्न कॅन्सरशी संबंधित निदानपद्धतीचा आहे, तो किती गांभीर आहे याची तुम्हाला कल्पना आहे काय? त्या पद्धतीच्या अचूकपणाबद्दल चौकशी करणे यात काही गैर आहे काय? २) रोहित वेमुलासारख्या संवेदनशील प्रकरणावरून केलेलं असंवेदनशील प्रसारण: इथे भारतात राहणा-या माझ्यासारख्यासाठी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्हाला त्यात काही असंवेदनशील वाटत असेल, रटाळ वाटत असेल, तर तो तुमचा प्रश्न आहे. तीच गोष्ट हेल्मेटसक्तीची. तुम्हाला या गोष्टींशी घेणेदेणे नसेल तर मी काय करू शकतो?
आज संध्याकाळी माझ्या घरी प्यार्टी आहे.
कसं आहे ना राकु,
तुम्हाला नाही आमचा कंपू आवडत, नाही आम्ही लोक आवडत, नाही या संस्थळावरच्या सोयीसुविधा पुरेशा वाटत, तर नका लिहू इथे. नाहीतरी फेसबुकावर तुम्ही रोज लिहिताच. ज्यांना तुमचं लेखन वाचायचंय ते तिथेही येतील. हे तुम्हाला आधीही सांगितलं होतं, तेव्हा तुम्ही निरुत्तर झाल्याचं सत्राशेसाठ वेळा तुम्हीच सांगितलंही आहे. ते पुन्हा नाही सांगितलं तरी चालेल.
विचारात स्पष्टता किंवा अभ्यास नाही हा तुमचा आताचा कांगावा आहे. जेव्हा इथल्या एका संपादकांनी फेसबुकवर माझ्याशी संपर्क साधून येथे लिहिण्याबाबत सुचवले होते तेव्हा माझा लिहिण्यातील विचारांचा उथळपणा आवडला व येथे रोज हेटाळणी करायला एक बकरा हवा म्हणून तसे सुचवले होते की काय? की तिथले लिहिणे आवडले होते म्हणून?
ह्याच सदस्यांनी तुम्हाला, मोजकं लेखन संपादन करून, घासूनपुसून ऐसीवर प्रकाशित करा, असंही सुचवलं आहे. त्याला तुम्हीच वाटाण्याच्या अक्षता लावल्यात. त्यातून जो काही गच्चागोळ होतो, तो करू नका म्हटल्यावर वर कांगावा करताय.
बाकीचं चालू द्या. ह्या, वरच्या प्रतिसादात किमान शिष्टसंमत भाषा वापरलीत, शिवीगाळ केली नाही, याबद्दल आज संध्याकाळी माझ्या घरी प्यार्टी आहे. येणारात का?
शिष्टसंमत भाषा वापरली तर तसेच
शिष्टसंमत भाषा वापरली तर तसेच उत्तर मिळेल हे तर याआधी कितीतरीवेळा सांगितले आहे. तेव्हा कितीवेळा पार्टी करायची ते तुम्ही ठरवा.
निरूत्तर होण्याचा पुन्हा उल्लेख केलात म्हणून पुन्हा सांगावे लागतेय. ज्यांना हे निरूत्तर होणे कशासंदर्भात आहे हे कळले नसेल त्यांच्याबाबत.
तर येथे इथले संपादक मंडळी जेथे पोस्ट टाकायला सांगतील, तेथे त्या टाकल्या नाहीत, तर ते त्या पोस्ट्स हलवतील, अशा ठिकाणी टाकतील की तेथे केवळ कोंबाकोंबीच होईल, वाचनमात्र करतील किंवा आणखी काही करतील. तर हे सगळे सहन करायचे नसेल, तर येथून चालते व्हा, कारण हे एक खासगी पोर्टल आहे, वर मोफत आहे. दुस-या एका संपादकांनी अमुकच करायचे असेल तर येथे लिहू नका असे सुचवले होते, त्यावर मी पुरता निरूत्तर झालो होतो, त्याचा येथे संदर्भ आहे. तेव्हा बॉटमलाईन अशी आहे की तुमचे येथे पटत असो किंवा नसो, तुम्ही 'आमच्या गल्लीत आहात, पटत नसेल तर येथून सुटायचे'. अर्थातच संपादक कम मालकांनी तोच निरोप पुन्हा देऊन पुन्हा एकदा निरूत्तर केले आहे. प्रश्न एवढाच आहे संपादकमंडळ एखाद्याला निरूत्तर करण्याचा हा मार्ग ठळकपणे टाकतील का? अन्यथा एखाद्याला आमंत्रण देऊन येथे लिहा म्हणून सुचवायचे आणि नंतर त्याने काही प्रश्न विचारायला सुरूवात केली की या पद्धतीने निरूत्तर करायचे हा प्रकार काही फार भुषणास्पद वाटत नाही. मान्य आहे का?
एकंदरीत ऐसीचे नाव फार रोशन करत अाहात. करा.
जेव्हा इथल्या एका संपादकांनी
जेव्हा इथल्या एका संपादकांनी फेसबुकवर माझ्याशी संपर्क साधून येथे लिहिण्याबाबत सुचवले होते
राकु - तुम्हाला इथे येण्याचे आवताण देणारा कोण तो प्रचंड धाडस असणारा संपादक? कृपया त्याचे नाव सांगा. त्या संपादकाच्या आगीत ( किंवा शेणात ) हात घालण्याचा बेडरपणाबद्दल कधी भविष्यात भेट झाली तर त्याला शेरी देण्यात येइल.
सध्या ट्रॅकरवर ५० धागे असतात.
सध्या ट्रॅकरवर ५० धागे असतात. त्यांपैकी ९ धागे राजेश कुलकर्णी यांचे आहेत. राजेश कुलकर्णी ऐसीवर लिहायला लागल्यापासून ट्रॅकरवरचे साधारण २०% धागे त्यांचेच असतात. अंदाजे ५० लोक ऐसीवर (अ)नियमितपणे लिहित असतील; म्हणजे सरासरी ट्रॅकरवर एका वेळेस एका सदस्याचा एक धागा दिसेल. (सध्या माझ्या नावाचेच ४ धागे ट्रॅकरवर दिसत आहेत. इतर अनेक दिवस असतात जेव्हा मी सुरू केलेला एकही धागा ट्रॅकरवर नसतो.)
राही, चार्वी, धनुष, आदूबाळ, अतिशहाणा अशा लोकांच्या गळ्यात पडून लिहिण्याची विनंती केली जाते. ते फार दाद देत नाहीत. आणि दुसरीकडे ...
डनिंग क्रूगर परिणामाचं उदाहरण म्हणावं काय!
विकीपीडीयावरून -
The Dunning–Kruger effect is a cognitive bias in which relatively unskilled persons suffer illusory superiority, mistakenly assessing their ability to be much higher than it really is. Dunning and Kruger attributed this bias to a metacognitive inability of the unskilled to recognize their own ineptitude and evaluate their own ability accurately. Their research also suggests corollaries: highly skilled individuals may underestimate their relative competence and may erroneously assume that tasks which are easy for them are also easy for others.
सं- फुसके बार - १२ फेब्रुवारी
सं- फुसके बार - १२ फेब्रुवारी २०१६ (कदाचित याच धाग्यात पुढील वर्षीचा , याच तारखेचा फुसका बार येइल म्हणून वर्षही नोंदवत आहे)
दारु लोक चवीकरता पीतात? - हे मी नवीनच ऐकतेय. कोणीतरी प्रकाश टाकावा की लोक दारु का पीतात - चवीकरता बासुंदी प्यावी ना दारु कशाला?
___
लान्स नायक हणमंतप्पा चे कळकळीने लिहीले आहे पण मांडणी विस्कळीत वाटली. एव्हरेस्ट सिनेमाचा व या घटनेचा संबंध नीट कळला नाही.
कोणीतरी प्रकाश टाकावा की लोक
कोणीतरी प्रकाश टाकावा की लोक दारु का पीतात - चवीकरता बासुंदी प्यावी ना दारु कशाला?
शुचे, माशांचा विषय निघाला की एखाद्या जीवाला संपवण्याजागी तू गाजरं का खात नाहीस? चहाची तल्लफ आल्यावर गरम पाणी का पित नाहीस? त्याच कारणासाठी मी दारुची आठवण आली की दारू पिते. बासुंदीची आठवण आली की बासुंदी पिते.
लान्स नायक हणमंतप्पा चे कळकळीने लिहीले आहे पण मांडणी विस्कळीत वाटली. एव्हरेस्ट सिनेमाचा व या घटनेचा संबंध नीट कळला नाही.
आणि त्यांनी गुरुत्वीय लहरींबद्दल काय लिहिलंय ते मला समजलं नाही. जी एम आर टी बघून लोकांची निराशा झाल्याचं मला तरी कधी दिसलेलं नाही; तिथे तीन वर्षं विज्ञान दिनाच्या वेळी आवाज बसेस्तोवर बडबड करूनही!
या ग्रॅव्हिटेशनल लहरी या प्रकाशापेक्षा अधिक किंवा तेवढ्याच वेगाने प्रवास करतात हेही कळले आहे.
हा अधोरेखित भाग राकु म्हणतात म्हणजे बरोबरच असणार ... छापाचा आहे.
राकुंचा आणखी एक अनभ्यस्त दावा
हा विषय मुळात क्लिष्ट आहे. त्यांचा कृष्णविवरांशी संबंध आहे, त्यामुळे बिग बॅंगचे भाकित कमकुवत होऊ शकेल इतका हा शोध महत्त्वाचा आहे. विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे, ब्रह्मांडाचे ज्ञान मिळण्यासाठी नव्याने कवाडे उघडतील, अशा शक्यता यामुळे निर्माण झाल्या आहेत.
याबद्दल राकुंनी अधिक माहिती द्यावी. कृष्णविवरांशी गुरुत्वीय लहरी सापडण्याचा नक्की काय संबंध? बिग बँगचं भाकीत गुरुत्वीय लहरी सापडल्यामुळे कसं कमकुवत होतं? नक्की कुठे धक्का लागतो? विश्वाच्या उत्पत्तीची कोणती नवी कवाडं उघडतील?
बातम्या वाचायला आपण सगळेच पेपर उघडतो. बातम्यांमध्ये जे लिहिलेलं नसतं, जे शास्त्रज्ञही म्हणत नाहीत ते राकुंना कुठून समजतं? ते बिनधास्त लिहून टाकायचा आत्मविश्वास कुठून येतो? हे सगळंच कुठून येतं?
(ज्या संस्थळावर खगोलशास्त्रात पीएच.डी केलेल्या किमान तीन व्यक्ती वावरतात तिथे यांचे हे दावे. फार न शिकलेल्या लोकांसमोर किती थापा हाणत असतील कोण जाणे!)
तुमच्यासारख्या
तुमच्यासारख्या ब्रह्मांडाविषयी सर्वज्ञ असलेल्याबद्दल मी काही लिहू शकत नाही.
दुर्बीण म्हणून पहायला जाणा-याला तेथे डिश दिसल्यावर त्यांचा अपेक्षाभंग होतो. तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे खरे तर तुम्हाला जीएमआरटीचीही गरज नाही.
क्ृष्णविवरातून बाहेर पडलेल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज डिटेक्टकरण्याबद्दल वाचण्यात आले. परंतु तुम्हाला जे वाटत नाही पण शास्त्रज्ञ जे म्हणतात किंवा तुमच्या जे वाचनात येत नाही असे काही जर शास्त्रज्ञ म्हणत असतील तर ती शास्त्रज्ञांचीच चूक आहे. अगदी मान्य.
मूळ पोस्टची वासलात लावून येथे दुसरीकडे त्याबद्दल बोलणे यामागचा तर्क मला कळला नाही.
तेव्हा तुमचा कुचाळक्या करन्याचा छंद चालू ठेवा. तुमचेच मैदान आहे. मी मात्र येथे येऊन उत्तर देण्याच्या फंदात पडणार नाही.
काहीही हं रा!मूळ पोस्टची
काहीही हं रा!
मूळ पोस्टची वासलात लावून येथे दुसरीकडे त्याबद्दल बोलणे यामागचा तर्क मला कळला नाही.
तुम्ही स्वतःही हे इथे करताय की! तुम्ही त्या थ्रेड्सबद्दल काही बोलत नाहि आहात असे कुठाय? त्यापेक्षा मुळ धागा (फुसके बार)वेगळ्या थ्रेडवर लिहिलात तर कित्ती श्रम वाचतील नै? तुमचे आमचे सगळ्यांचेच!
आता कोठे या शोधाची घोषणा झाली
आता कोठे या शोधाची घोषणा झाली आहे.
त्याचे तपशील अजुनही येत आहेत. अगदी एकाच आठवड्यापूर्वी ही निरिक्षणे चुकीची अाहेत असेही प्रसिद्ध झाले होते.
तेव्हा थोडा दम धरणार का?
माझ्यावर थापेबाजीचा आरोप करताना तुम्हाला थोडीही शरम वाटत नाही का? की इथल्या मालक झाल्यावर तुम्ही काहीही करू शकता?
कृष्णविवरांशी गुरुत्वीय लहरी सापडण्याचा नक्की काय संबंध? http://www.bbc.com/news/science-environment-35524440
तुमच्यासारखी मनोव्ृत्ती असलेल्या व्यक्तीचे समाधान करण्यासाठी माझा वेळ घालवायची मला तरी काही गरज वाटत नाही.
"ज्या संस्थळावर खगोलशास्त्रात पीएच.डी केलेल्या किमान तीन व्यक्ती वावरतात तिथे यांचे हे दावे. फार न शिकलेल्या लोकांसमोर किती थापा हाणत असतील कोण जाणे!"
तुम्ही या तिघांपैकी असाव्यात असे दिसते. बाकीच्या दोघांबद्दल बोलत नाही. तुम्ही सर्वज्ञ व इतर अडाणी ही तुमची स्वत:चीच मनोव्ृत्ती दिसते. खगोलशास्त्रच काय जगातल्या सगळ्याच विषयांमध्ये पीएचडी असल्यासारख्या वावरता की. मागे फेसबुकवरील माझ्या पोस्टवरील कमेंट्सची लोकप्रियता वगैरेवरून माझी मानसशास्रीय चिकि्त्सा करायचा प्रयत्न केला होता. आता मी करतो. स्वत:च्या विद्वत्तेवरून दुस-यांची परीक्षा करू नका. तुमच्या विद्वत्तेबद्दल आदर दिसायचा असेल तो इतरांकडून दिसू दे. मी सर्वज्ञ म्हणून मिरवत व वर इतर 'न शिकलेल्यांच्या' वतीने काही बोलू नका.
तेव्हा हे जे सतत इठसुट दर्जा, वेचारिक ताकद वगैरे म्हणत असता, ती किती बाष्फळ व पोकळ बडबड आहे ते स्पष्ट होते आहे.
तिकडे या विषयावर भला मोठा लेख टाकलाहेत. किती पकवता हो इथल्या वाचकांना? इथल्या वाचकांना गुरूत्वीय लहरींबद्दल सगळे माहित आहे, त्याबद्दलची माहिती अनेक ठिकाणी उपलब्ध आहे, २१वे शतक आहे माहित अाहे ना? काहीतरी चॅलेंजिंग टाका की.
दारूवर होणारा खर्च,
दारूवर होणारा खर्च, आरोग्यावरचे दुष्परिणाम व कुटुंबाची होणारी वाताहत यांपैकी कोणता भाग येथे लागू होतो ते पहा. त्यामुळे येथे दारूच्या चवीचा प्रश्न नाही. मला तरी अभिप्रेत नव्हता.
बर्फात शरिराचा एखादा अवयव रात्रभर राहिल्याने शरीरावर कसे परिणाम होऊ शकतात, तर ५-६ दिवस राहिल्याने किती आशा ठेवता येणार होती, तो संदर्भ आहे.
मात्र ‘आपल्याला चवीचे ज्ञान
मात्र ‘आपल्याला चवीचे ज्ञान नसते तर’ हा विषय माझ्या पाहण्यात नाही.
दारूमुळे कुटुंबे उध्वस्त झालेली आपण पाहतो. चवीबद्दलच्या अत्याग्रहामुळे घरची बाई कायम दावणीला धरलेली आपण सभोवताली पाहतो. डोक्यावर कर्जाचा डोंगर असो, तरीही या चवीच्या खुळापायी दर आठवड्याला बाहेर खाण्यावर हजारो रूपये उधळणारेही आपल्या पाहण्यात असतात. तेव्हा या ‘व्यसना’वर किती खर्च होतो हे कोणी उधळपट्टीमध्ये गृहित धरतच नाही.
हा आपला उतारा. यात दारु आणि चव मारणे या दोन गोष्टी एका वाक्यात लिहीले आहे (एका वाक्यात चा शब्दशः अर्थ घेऊ नका)
वर अदितीने लिहिल्याप्रमाणे
वर अदितीने लिहिल्याप्रमाणे ऐसीचा चेहेरा काय असावा हा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. नवीन सदस्यांसमोर ऐसीची प्रतिमा काय असावी, कोणाचं लेखन ट्रॅकरवर वर दिसावं आणि त्यातून ऐसी म्हणजे काय? याबद्दल वाचकाच्या कल्पना कशा प्रकारे दृढ व्हाव्यात हे ऐसीच्या पुढच्या वाढीसाठी महत्त्वाचं ठरतं. आत्तापर्यंत कधीच कुठच्याच सदस्याला त्याबद्दल सांगण्याची गरज पडली नाही. पण बारीकसारीक धाग्यांचा ट्रॅकरवर पसारा होऊ नये म्हणून ही बातमी ऐकली का, सध्या काय वाचताय, इत्यादी संकलनं केलेली आहेत. आणि बहुतांश सदस्य आपल्या लिखाणाचा आवाका आणि विषय पाहून योग्य त्या सदरात टाकतात.
मात्र राकुंनी आत्तापर्यंतच्या सुमारे ७५ दिवसांत ८३ लेख लिहिलेले आहेत. त्या काळात इतर सर्वांनी मिळून २०० ते २२० लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे ट्रॅकरवर पंचवीस ते तीस टक्के जागा त्यांच्याच लेखनाने व्यापलेली दिसते. कधीकधी ट्रॅकरवर त्यांचे पन्नासपैकी पंधरा ते वीस लेख दिसायचे. असा एकच एक लेखक सतत समोर दिसणं हे ऐसीच्या भल्यासाठी नाही. त्यामुळे जसं 'सध्या काय वाचताय'चे स्वतंत्र धागे तयार केले तसे फुसके बार सदरासाठी संकलित धागे तयार केलेले आहेत. ही सोय करून दिली तरीही व्यवस्थापकांच्या इच्छेचा, सूचनेचा मान न राखता त्यांनी हट्टाने स्वतंत्र धागे काढलेले आहेत. त्यांना काही समजावून सांगितलं तर ते तुसडेपणे दुरुत्तरं करतात.
मलाही असं वाटतं की राकुंचे धागे ट्रॅकरवर न दिसता त्यांच्या लेखनात दिसले, आणि तिथे लोकांना चर्चा करता आली तर सगळेच प्रश्न सुटतील. हा उपाय विचारार्ह आहे.
ऐसीचा चेहरा, राजेश कुलकर्णी फोबिया व इतर गोष्टी
ऐसीचा चेहरा, राजेश कुलकर्णी फोबिया व इतर गोष्टी
तुम्हा सर्वांना टक्केवारी दाखवण्याची फार हौस आहे असे दिसते. कालच्या २०-२५%चे तुम्ही तीस टक्के केलेत. अर्थात मला काही त्यात आनंद वाटत नाही.
एेसीच्या चेह-याच्या खुळाबद्दल आधीच लिहिले आहे. पुन्हा लिहित नाही. मायबोली या पोर्टलवर म्हस्के नावाचे एक कवी तडका नावाच्या सदराखाली रोज एक स्वतंत्र कविता टाकतात. कविता चार ओळींपासून दहा-बारापर्यंत असते. चांगली की वाईट यात मी जात नाही. परंतु त्यामुळे मायबोलीचा चेहरा काळवंडल्याचा दावा कोणी करत नाही. तिथला लिहिण्याचा ट्रॅफिक इथल्यापेक्षा अधिक असतो, तरी वाचक स्क्रोल करून आपली सोय पाहतात.
फुसके बारच्या पोस्टच वेगळ्या ठेवायच्या पण ट्रॅकरवर दिसू द्यायच्या नाहीत हा तुमच्या द्ृष्टीने उत्तम उपाय दिसतो. आधीचे वाचक कधीतरी नावावरून शोधत भेट देतील मात्र नवीन वाचकांना मी येथे आहे हे कळून नये यासाठी हा अगदी उत्तम उपाय ठरेल. त्यावरून सुचले, 'तडीपार लेखन' हा एक वेगळा विभागच करा.
मी तुम्हाला दुसरा उपाय सुचवतो. मी सुचवतो म्हणून पटणार नाहीच. तुमच्या मुख्य ट्रॅकरऐवजी काही सबस्टॅंडर्ड लिखाणासाठी वेगळा ट्रॅकर काढा. त्यात पन्नासच्या पन्नास माझ्याच पोस्ट्स दिसल्या तर तुमची काही हरकत नसावी. तुमचा चेहराही तुम्हाला हवा तसा शाबूत राहील. वेगळ्या ट्रॅकरचे कारण आणखी अशासाठी की मी फुसके बारशिवायही इतर काही पोस्ट टाकतो. त्यादेखील तुमच्या मेन ट्रॅकरमध्ये येउन तो विटाळायला नको. शिवाय उद्या मी फुसके बारशिवाय स्वतंत्र दीर्घ पोस्ट्स टाकायला सुरूवात केली तर त्यानेही तुमच्या 'चेह-याला' काही फरक पडायला नको. त्या स्वतंत्र पोस्ट्सदेखील कोणालाच दिसू नयेत अशी इच्छा असेल तर गोष्ट वेगळी.
श्रेणीचे नाटक बंद करणार आहात का? अभिरूचीच्या, श्रेष्ठतेच्या भलत्याच कल्पनांवरून सरळसरळ भेदभाव करण्याचा तो प्रकार आहे. एवढेच नाही तर संपादकांपैकी एक अर्धवटराव संपादक त्यावरून चेकाळत मला माझी जागा दाखवण्याचा उद्योग करत असतात. हे तर भेदभाव करण्याच्याही पलीकडचे हरॅसमेंटचे साधन. संपादकांकडे निष्पक्ष राहण्याची जबाबदारी नाही हे तर केव्हाच दिसलेले आहे. यामुळे तुमची शोभा होते आहे. ऐसीचा चेहरा या प्रकारामुळे, मुळात असा भेदभाव करण्यामुळे काळवंडतो आहे का ते पहा.
किंवा आणखी एक उपाय सांगतो. मी सुचवतो म्हणून पटणार नाहीच. माझ्याफोबियावर बाजारात काही औषधाची गोळी मिळते का पहा. एक आठवडाभर घ्या. गोळ्या घ्यायचे बंद केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की केवळ माझे नाव दिसते यावरून इथले नवे-जुने वाचक कसलाही ग्रह करून घेत नाहीत. त्यांना आवडले तर ते जरूर वाचतील, नाही तर स्क्रोल करतील. फोबिया तुम्हां संपादकीय कंपूला झालेला आहे, वाचकांना नाही. नाही का? काही गोष्टी वाचकांवर सोडाल की नाही?
जितके अधिक वाचक येथे लिहायला लागतील, तेवढे माझ्या पोस्ट्सचे प्रमाण विरळ होईल व तुम्हालाही प्रश्न पडेल नक्की प्रश्न काय होता आणि आपण त्यावेळी या एका सदस्याच्या मागे हात धुवून का लागलो होतो?
बघा पटले तर.
कालच्या २०-२५%चे तुम्ही तीस
कालच्या २०-२५%चे तुम्ही तीस टक्के केलेत.
अहो, काल अंदाजे आकडा वापरत होतो, आज मोजमापं केली. ८३/३०० म्हणजे २८ टक्के होतात की नाही? आणि काहीकाही वेळा धागे वरखाली झाल्यामुळे पन्नासात वीस दिसलेले आहेत.
परंतु त्यामुळे मायबोलीचा चेहरा काळवंडल्याचा दावा कोणी करत नाही.
मायबोलीवर दिवसाला पंधरा ते वीस धागे येतात. त्यामुळे तिथे कोणीच दिवसाला एक धागा टाकून चेहरा काळवंडू शकत नाही. आणि त्याहीपलिकडे मायबोली कसं चालवायचं हे तिथले व्यवस्थापक ठरवतात, ऐसी कसं चालवायचं ते आम्ही ठरवतो. तुम्हाला एकाच धाग्यावर लिहीत राहाण्याचा पर्याय दिलेला आहे. तो धागा जर खूप मोठा झाला तर त्याचा भाग २, भाग ३ काढू. पण व्यवस्थापकांनी दिलेल्या सूचना तुम्ही पाळत नाही. मग व्यवस्थापकांना इतर पर्याय राहात नाहीत. ही ऐसीची धोरणं पसंत नसतील तर सतत तक्रार करत का लिहीत राहावं?
मायबोली!
मायबोलीचा चेहरा काळवंडल्याचा दावा
मायबोली मला खुप आवडत - आता हेच पहा न
शस्त्र व शस्त्रपरवाना धारकाची कैफियत
अशी मजा ऐसिवर नसते
एक विभाग बनवला तर ?
एक विभाग बनवला तर ?
"सदरं."
करंट इव्हेंट्स / बातम्यांविषयी, विनोदी, उपरोधिक खुसखुशीत टिपणी करणारी अशी सदरं यात लोकांना सुरु करता येतील. चांगले कॉलम रायटर तयार होतील आणि प्रोत्साहितही होतील.
त्यात ज्या सदस्याकडून विनंती येईल त्याच्याकडून "सदर" नावाचा भाग सुरु करता येईल. बंधन ठेवायचं असेल तर प्रतिसदस्य एका वेळी एकच सदर चालवता येईल अशी मर्यादा असावी.
दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक किंवा अनियतकालिक, ज्याला जसं शक्य आहे तशा फ्रीक्वेन्सीने धागे काढण्याची सोय असावी. यात धाग्याचं मुख्य शीर्षक एकच असेल पण उपशीर्षकात किंवा पोस्टफिक्समधे त्या त्या तात्कालिक विषयाचं नाव असेल.
हा विभागच पूर्ण वेगळा असल्याने मुख्य बोर्डावर अधिकाधिक धागे येणार नाहीत. उजव्या समासात या विभागाची लिंक द्यावी.
Rakul Preet Singh यांना
Rakul Preet Singh यांना अनुल्लेखाने मारण्याचा क्षीण यत्न केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये, आबा ?
कोणी सांगावं, तंबीदुराई, उलटा
कोणी सांगावं, तंबीदुराई, उलटा चष्मा, कथा अकलेच्या कायद्याची, मानव विजय अशा प्रकारची आणि दर्जाची सदरं इथेही सुरु होऊ शकतील.
सध्या विश्वाचे आर्त ही धागेरुपात प्रसिद्ध होतेय, ती आणि तशा इतर मालिका सदररुपात सादर केल्या तर पुढेही एकत्र पाहण्यासाठी चांगलं होईल. पुढच्यामागच्या लिंका आपोआप दिसणं असं काहीतरी शक्य असल्यास करता येईल (कारण सदराचा पुढचा भाग कोणत्या ठिकाणी, कोणत्या यूआरएलने उत्पन्न होईल यावर नियंत्रण शक्य असल्याने अशी ऑटोमॅटिक लिंक इन्सर्ट होण्याची सोयही शक्य व्हावी.
हा विभागच पूर्ण वेगळा
हा विभागच पूर्ण वेगळा असल्याने मुख्य बोर्डावर अधिकाधिक धागे येणार नाहीत. उजव्या समासात या विभागाची लिंक द्यावी.
मुळात राकुंना एकाच वेगळ्या धाग्यावर लिहिण्यास कोणीही मज्जाव केला नव्हता. त्यांनाच मुख्य ट्रॅकरवरच धागे काढायचे आहेत.
या व अशा सोयी करून द्यायला कधीच कोणी नाही म्हटलेले नाही. सुरूवातीला संपादकमंडळाने आपणहून त्यांचे फुसके वार एका धाग्यात हलवले होते. जेणे करून त्यांचे सदर त्यांना त्या धाग्यात चालवता यावे. पण त्यांना ते मान्य नाही. त्यांना मुख्य ट्रॅकरवरच रोज नवा धागा प्रसवायचा आहे.
तुम्ही म्हणताय तसा वेगळा विभाग काढून दिला तरी त्यांना तिथे लिहिणे मंजूर होईल की नाही कल्पना नाही.
ऋ, मी सुचवतोय त्या पद्धतीत
ऋ, मी सुचवतोय त्या पद्धतीत एकाच धाग्यावर लेखकाचं लिखाण अॅड होत जाणार नाही. "सदरे" नावाच्या वेगळ्या विभागाची लिंक मुख्यपृष्ठावर असेल. त्यामुळे पुरेशी "व्हिजिबिलिटी" असेलच. आणि त्या विभागावर क्लिक केलं की सदरांची नावं (प्रत्येक सदर एका सेंट्रल थीमभोवती) दिसतील. पण प्रत्येक लेख हा नवा धागा (लेख) म्हणून येणार, फक्त तो त्या त्या सदराच्या सीरीजमधे येणार. यात मुख्य बोर्डाला वारंवार येणार्या एकाच लेखकाच्या "रिपीटेड" लिखाणामुळे मोनोटोनी येणार नाही किंवा काहीच डिस्टर्बन्स होणार नाही. यात सर्वांचेच हेतू साध्य होतील.
लोकसत्ताचं उदाहरण पाहता येईल. त्यावर "संपादकीय" अशा लिंकवर क्लिक केलं की त्या उघडणार्या विभागात उदा:
-"अग्रलेख" (सदर क्र. १)
-"दखल" (सदर क्र. २)
-"मानव विजय" (सदर क्र. ३)
अशी सदरांची नावं आणि त्यातल्या लेटेस्ट लेखाची लिंक दिसते. त्या सदरावर क्लिक केलं तर त्या विशिष्ट सदराखाली आलेले पूर्वीपासूनचे सर्व लेख (लिंक्स)एकाखाली एक दिसतात.
अगदी असंच नव्हे, पण टेक्निकली शक्य, फीजिबल असलेलं काहीतरी तत्सम करायला हरकत नसावी.
+1
ते फार उच्चकोटीचे लिखाण असते, असा दावा नाही (तसे फार थोड्यांचे असावे), परंतु (1) टाकाऊही नसते, आणि (2) चुकीची किंवा बरोबर, पण काही निश्चित अशी विचारप्रक्रिया त्यामागे असते, असे जाणवते.
किंबहुना, ऱ्याण्डम दैनंदिन घटनांवरील 'म्यान ऑन द ष्ट्रीट'च्या प्रतिक्रियांचा ('एक्सपर्ट कमेंट्स'चा नव्हे, माइंड यू; तसा त्यांचा दावाही नसावा.) आरसा, अशा अर्थाने असे सदर उपयुक्त ठरेल, असे वाटते.
(पण मग 'छोटे मोठे विचार'मध्ये का नको? तर, छोमोविमध्ये कोणाचेही तात्कालिक विचार असू शकतात, तर येथे एकाच व्यक्तीचे परंतु प्रातिनिधिक असे - आणि मुख्य म्हणजे सातत्यपूर्ण - विचार आहेत. सबब, सदर योग्य ठरावे.)
सरतेशेवटी, कोणत्याही संस्थळाची ओळख, त्याचा 'चेहरा' हे प्राथमिकत: तेथील सदस्य असतात, असावेत, एवढेच नम्रपणे नमूद करून गप्प बसतो.
गवि, अतिशहाणा, थत्तेसाहेब,
गवि, अतिशहाणा, थत्तेसाहेब, ‘न’चीबाजू,
तुमच्या सूचनांबध्दल धन्यवाद.
अशा प्रकारची सूचना आतापर्यंत कमीत कमी तीन वेळा केलेली आहे. माझ्या पाहण्यात अनेक टेक्निकल पोर्टल्समध्ये कोणी लीड घेत असेल तर त्यांना पोर्टलचाच भाग म्हणून वेगळा ब्लॉग काढून दिलेला आहे. तुम्ही म्हणता हे थोडे पोर्टलमध्येच ब्लॉग उपलब्ध करून देण्याचा प्रकार आहे. थोडाफार फरक आहे. पण माझ्या 'कच-या'साठी आम्ही ब्लॉग उपलब्ध करून का द्यायचा या कल्पनेने कोणी बिथरू नये म्हणजे मिळवली. हे का करायचे हा प्रश्न विचारलेला पाहिला मी. ते मलाच उद्देशून आहे असे वाटते. असो.
येथे इतक्या वर्षांत असे 'सदर' प्रकारचे कोणी खरोखरच केलेले नाही याचे आश्चर्य वाटते. की करायची इच्छा असली तरी त्यांना मला दिले तसे दोन 'पर्याय' दिले असावेत व त्यांनी ते मान्य केले असावेत. पण आहे त्यात मॅनेज करा या मानसिकतेतून नवीन काही घडत नाही. यातून पोर्टलचाच विकास होणार असतो हे लक्षात येत नाही. शिवाय आहे तेच किती काळ न बदल करता किती काळ चालू शकेल याचा विचार असायला हवा असे वाटते.
त्यात हे थोडे मी सांगतो म्हणून मान्य करायचे नाही असा थोडा प्रकार दिसला. शिवाय श्रेष्ठतेच्या आमच्याच कल्पना बरोबर व फेसबुक व इतर माध्यमे आमच्या दर्जाची बरोबरी करत नाहीत असा दुराग्रह दिसला. त्यात मी पडलो नवीन. मग शाळकरी मुलाला सांगावे असे 'समजावून' सांगण्याचा प्रकार सुरू. वाद असले तरी दुसरा सांगतो त्यातले मेरिट पाहता यायला हवे. एका गोष्टीसाठी मी इथल्या संपादकमंडळाला क्रेडिट नक्की देतो, की त्यांनी माझे सदस्यत्व रद्द नाही केले. (मला मिसळपाववर तो अनुभव आला. मला तेथेही तिथले संपादक काही सदस्यांच्या टवाळखोरीत सामील झालेले दिसले. अर्थात तिथल्या मानाने इथली बरीच कमी. मायबोलीवर तिथल्या संपादकांचा त्यांचे अस्तित्व न जाणवण्याइतका त्यांचा कमी सहभाग दिसतो. तेथे फुसके बारच्या वेगळ्या पोस्ट्स टाकण्यावरून संपादकांशी कधीच वाद झाला नाही.) पण सदस्यत्व रद्द केले नाही तरी येथे ही कोंडी फुटत नव्हती. आज तुमच्या या सूचना पाहिल्या व आजच योगायोगाने मी संपादकांना माझ्या पोस्ट्सचे जे काय करायचे ते करा, मी त्यावर टीका करणार नाही, असा निरोप पाठवला आहे.
संपादकांना यापूर्वीही मी सांगितले आहे की अनेक सुधारणा करता येण्यासारख्या आहेत. जसे एकाच वेळी दहा नवीन कमेंट्स आहेत असे दिसल्यावर त्या आकड्यावर क्लिक केले तर तो त्यातल्या कुठल्यातरी नव्या कमेंटवर घेऊन जातो. त्यानंतर दुसरी नवीन कमेंट कोणती हे पहावे म्हटले तर ते शक्य होत नाही, त्यासाठी खालच्या-वरच्या सगळ्या कमेंट्स धुंडाळाव्या लागतात. हे अतिशय गैरसोयीचे होते. त्याबाबतीत फेसबुकवर जी फिचर्स आहेत ती उपयोगी पडतील. मी स्वत: आयटीची पार्श्वभूमी नसलेला असूनही हे सगळे सहज करणे शक्य असल्याची खात्री आहे. संपादकांपैकी ही पार्श्वभूमी असलेले नक्कीच कोणीतरी असेल. प्रत्यक्ष असले-नसले तरी सल्लागार म्हणून तरी. पण या सगळ्या नंतरच्या गोष्टी. असो.
जसे एकाच वेळी दहा नवीन
जसे एकाच वेळी दहा नवीन कमेंट्स आहेत असे दिसल्यावर त्या आकड्यावर क्लिक केले तर तो त्यातल्या कुठल्यातरी नव्या कमेंटवर घेऊन जातो. त्यानंतर दुसरी नवीन कमेंट कोणती हे पहावे म्हटले तर ते शक्य होत नाही, त्यासाठी खालच्या-वरच्या सगळ्या कमेंट्स धुंडाळाव्या लागतात.
राकु जर तुमची सॉर्ट मेथड, जुन्या कमेंट्स वरती व खाली नव्या नव्या अशी असेल तर, जेव्हा तुम्ही नव्या कमेंटसच्या आकड्यावरती क्लिक करता, तेव्हा सर्वात पहीली जी कमेंट येते ती त्या पानावरची पहीली कमेंट असते.
त्यामुळे अन्य कमेंट्स या वरती असतच नाहीत, खालीच असतात व त्या सहज सापडतात जर तुम्ही नम्बेर ऑफ कमेंट्स = १००० ठेवले असेल तर.
लेखांच्या ट्रॅकरच्या
लेखांच्या ट्रॅकरच्या पानावर '१ नवीन' वगैरे दिसत असेल तर त्यावर क्लिक केल्यावर नव्या प्रतिक्रियेवर जाता येते.
प्रतिसादांच्या ट्रॅकरच्या पानावर नवीन प्रतिसाद आणि तो कुणी दिलाय हे दिसलं आणि जर तो प्रतिसाद मूळ लेखावर दुसऱ्या पानावर असेल तर नेमक्या प्रतिसादाच्या दुव्यावर जात नाही.
त्यासाठी रिकामटेकडा यांनी उपक्रमवर एक हॅक दिला होता. ब्राउजरमध्ये नवीन बुकमार्क अॅड करुन त्यात हा कोड पेस्ट करा. नवीन प्रतिसाद जर दुसऱ्या पानावर असेल तर पहिले पान उघडल्यावर फक्त बुकमार्कवर क्लिक करा. नेमका प्रतिसाद दिसेल.
javascript:(function(){loc=location.href.split(%27#%27);fin=(loc[0]%20+%20%27?page=1#%27%20+%20loc[1]);window.location=fin;})();
या टॅबखाली मला कुठल्याही
या टॅबखाली मला कुठल्याही धाग्यावर नविन प्रतिक्रीया कुठली आलीय आणि कुणी दिलीय ते कळते पण तिथे क्लिक केल्यावर त्या धाग्याचे पहिले पानच उघडते.
याकरिता , म्हणजे क्लिक केलीय तीच प्रतिक्रीया दिसण्याकरिता सेटींगमध्ये काय बदल करावे लागतात?
कंप्यूटर तरोताजा असेल, म्हणजे रॅम बरी असेल आणि इंटरनेटचा स्पीड बरा असेल तर एका पानावर २५० प्रतिक्रिया असं सेटींग ठेव. त्यापेक्षा अधिक प्रतिक्रिया असणारे धागे फारच कमी असतात; एका पानावर ९० प्रतिक्रिया एवढंही सर्वसाधारणपणे पुरेल. पहिली नवीन प्रतिक्रिया दिसेलच; पुढे 'नवीन' असं टेक्स्ट पानात शोधायचं. बहुतेकशा ब्राऊजर्सना ctrl+f हा शॉर्टकट असतो. फोन ब्राऊजर्समध्येही हे बटण असतं.
सगळ्या नवीन प्रतिसादांच्या डोक्यावर, हेडरमध्ये उजव्या बाजूला, लाल अक्षरात 'नवीन' असं लिहिलेलं दिसतं.
मायबोलीसारख्या एकाखाली एक प्रतिक्रिया बघायच्या असतील तर धाग्याच्या खाली 'डिस्प्ले: : फ्लॅट' असं निवडायचं. मिसळपावसारख्या तिरक्या प्रतिक्रिया तिरक्या बघायच्या असतील तर 'डिस्प्ले : थ्रेडेड' निवडायचं. एका ब्राऊजरमध्ये, एका सेशनसाठी एकदाच हे सेटींग करावं लागेल. लॉगिन केलं तर सेशन बदललं म्हणून फरक पडत नाही.
पाहिलाय. तेथे विविध
पाहिलाय. तेथे विविध प्रतिसादांची समरी असते. एकाच पोस्टवरील प्रतिसाद एकत्र दिसत नाहीत. ते तारखेप्रमाणे किंवा पोस्टप्रमाणे ेकत्र करता येतात का माहित नाही. मात्र प्रत्येक वेळी त्या प्रतिसादावर क्लिक करावे लागते. अशा अडचणी येतात. तुम्ही फेसबुकची पद्धत पाहिली तर ती अगदी सोयीस्कर वाटते.
मुळात मी केलेली सजेशन एकूण
मुळात मी केलेली सजेशन एकूण सदर चालवू इच्छिणार्या सर्वांच्याच दृष्टीने सुचवली होती. फक्त राकुंचे धागे ही जणू समस्या आणि हा तिजवर उपाय अशा प्रकारे नव्हेच. एकाखाली एक कंटेंट अॅड करत जाणं वाचक आणि लेखक दोघांनाही पीडादायक आहे. वेगवेगळ्या नव्याजुन्या विषयअक्षांवर ठिकठिकाणी प्रतिसाद पडणार, मग नेमका हवा तो भाग शोधणं लेख फॉलो करु इच्छिणार्यांना अवघड होणार. त्यापेक्षा "सदर" हा फॉर्मॅट केला तर हाच उद्देश अधिक स्ट्रक्चर्ड मार्गाने साध्य होईल.
दुसरा मुद्दा म्हणजे मुख्य ट्रॅकरची मर्यादित व्हिजिबिलिटी ऑपॉर्च्युनिटी एकाच लेखकाकडे अवास्तव जाऊ नये. (उदा. एअरस्पेसमधली सर्व विमानं आणि कंट्रोल टॉवर हे एकच फ्रीक्वेन्सी शेयर करतात. एकाने बटन दाबून धरलं आणि बोलायला सुरुवात केली की त्याने बटन सोडेपर्यंत इतर कोणीही बोलू शकत नाही, फक्त ऐकूच शकतात. जर एकच पायलट दोनदोन मिनिटांनी स्वतःची पोझिशन रिपोर्ट करु लागला तर बाकीचे आपोआप मुकेच होतील. तेव्हा सर्वांनी थोडा मर्यादित वेळ वापरुन ती शेयर करावी लागते) हा मुद्दाही रास्तच आहे. इथे हे बंधन ट्रॅकरवर समोर दिसू शकणार्या धाग्यांच्या लिमिटेड संख्येचं आहे. तर उपरोक्त "सदर" विभाग बॅनररुपात मुख्यपानावर ठेवून त्यातले धागे ट्रॅकरबाहेर ठेवले तर हाही हेतू साध्य होईल.
हे पहा राघाकाका, तुमचं संस्थळ
In reply to हे पाहा तैै, हे प्रैव्हेट by राजेश घासकडवी
हे पहा राघाकाका, तुमचं संस्थळ प्रैव्हेट असेल तर ते प्रैव्हेट ठेवा. लोकांना लिहायला संस्थळ मोकळं करून दिलंत तर आता पब्लिकचे नियम पाळा बघू.
त्यातून अस्वलरावांसारख्या साक्षेपी, समर्थ आणि सुज्ञ विचारवंताने तुमच्या संस्थळावर लिहायचं ठरवलं तर पहा, आजमितीस विश्वात असलेल्या अनेक गहन, गूढ आणि मानवी मतीला कुंठीत करून टाकणाऱ्या प्रश्नांचा यथायोग्य उहापोह व्हावा अशा उदात्त, देशप्रेमी आणि सुलक्षण हेतूने केलेलं लेखन हे संस्थळाला चार चाँद लावणारं आहे. हे काडेपेटीत मावणाऱ्या तलम मलमलीच्या साडीला ठिगळ म्हणून वापरण्यासारखी कृती करणं थांबवा.