महाभारतीय यक्षप्रश्नाबद्दल प्रश्न

'यक्षप्रश्न असणे' हा मराठीत बर्‍यापैकी वापरला जाणारा वाक् प्रचार आहे. यक्षप्रश्नाचे मूळ मिथक महाभारतात यक्ष आणि पांडव प्रमुख युधीष्ठीर यांच्यातील प्रसंग आणि प्रश्नोत्तर रुपी संवादातून येत असावे. मला संदर्भासाठी एक आठवणारा यक्ष प्रश्न मराठीतून गुगलून संदर्भ देण्याची गरज पडली तेव्हा यक्षप्रश्न हा वाक्प्रचार म्हणून मराठी आंजावर वापला जात असला तरीही महाभारतातील यक्ष-युधीष्टीर प्रश्नोत्तर संवाद आंतरजालावर मराठीतून सहज उपलब्ध नसावा.

या धागा लेखाची उद्दीष्ट्ये

१) यक्ष-युधीष्टीर प्रश्नोत्तर संवादातील जमतील तेवढी प्रश्नोत्तरे संकलीत करणे, (विकिच्या माध्यमातून प्रताधिकारमुक्त स्वरुपात उपलब्ध करणे)

२) यक्ष-युधीष्टीर प्रश्नोत्तर संवादातील कोणती प्रश्नोत्तरे आजच्या काळात तुम्हाला प्रस्तुत कोणती अप्रस्तुत वाटतात आणि तुम्हाला तसे वाटण्या मागची कारण मिमांसा

३) यक्ष-युधीष्टीर प्रश्नोत्तर संवादातील प्रश्नांना युधीष्टीराने दिलेली उत्तरे तर्कसुसंगत असल्याचा पुर्वग्रह सर्वसाधारणपणे दिसून येतो पण कोणकोणती प्रश्न-उत्तरे तर्क सुसंगत आहेत आणि कोणत्या उत्तरांमध्ये तार्कीक उणीव असण्याची शक्यता असू शकेल हे आजच्या काळात उपलब्ध तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवांच्या List of fallacies कसोटीवर तपासणे.

उदाहरणार्थ :

`माणसाने जावी अशी चांगली वाट कोणती?` यावर `धर्म म्हणजे नेमके कांय याबाबत श्रुती व विद्वज्जनही निःसंशय नसल्याने ज्या रस्त्याने पूर्वीची आदर्श माणसं गेली ती वाट चोखाळावी,` हे युधिष्ठिराचं उत्तर `महाजनो येन गत: स पंथ:`
संदर्भ

Argument from authority हि तार्कीक उणीव आहे का ? `महाजनो येन गत: स पंथ:` हे उत्तर बुद्धी प्रामाण्यवादाच्या आणि विवेकाच्या कसोट्यांना उतरते का ? की भारतीय संस्कृतीतील व्यक्तीपुजेतून येणारे हे उत्तर आहे या उत्तराबद्दल मी व्यक्तीशं: साशंकीत राहीलो आहे कदाचित मला स्वतःला व्यक्ती आदर जमला तरी व्यक्तीपुजा करणे आणि अमुक व्यक्ती तमुक म्हणते करते म्हणून मी ते माझ्या विवेकाच्या कसोट्यांवर न तपासता करणे मला बर्‍यापैकी जड जाते पण बरेच कदाचित बहुतांश लोक `महाजनो येन गत: स पंथ:` वर विश्वास ठेवत असल्यामुळे हे उत्तर अचूक वाटत असेल ?

४) चर्चेस अजून एक मुद्दा मिळावा आणि धागा प्रवाही रहावा म्हणून '`धर्म म्हणजे नेमके कांय याबाबत श्रुती व विद्वज्जनही निःसंशय ' हे यक्षप्रश्नातून आलेले वाक्य शब्द-पुस्तकपुजा नाकारणारे आहे पण युधिष्ठीराची उर्वरीत उत्तरे तशी वाटत नाहीत असे वाटते का ?

धागा लेखाच्या उद्दीष्टाला फाटेफोडणारे अथवा अनुषंगीका व्यतरीक्त अवांतर असलेले प्रतिसाद टाळण्यासाठी आभार.

यातील मुद्दा क्र १ संबंधीत प्रतिसाद विकिवर वापरावयाचे आहेत तर उर्वरीत चर्चा कदाचित इतरही मराठी संस्थळावर पुढील चर्चेसाठी वापरण्याचा हेतु आहे तेव्हा आपले या धाग्यावर आलेले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.

आपल्या चर्चा सहभागासाठी आभार,

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अ‍ॅथॉरिटी म्हणजे नेमके काय, याबद्दल अनेक मतमतांतरे प्राचीन भारतीय साहित्यात दिसतात. बुद्धिप्रामाण्यवादाला मारक आणि तारक अशी दोन्ही आहेत. तूर्तास तारक फक्त सांगतो, कारण मारक मते सांगून वाहवा मिळवणारे अनेक आहेत.

श्रुतिस्मृतिर्विरोधे तु श्रुतिरेव बलीयसी |
श्रुतिश्रुतिर्विरोधे तु युक्तिरेव बलीयसी ||

हिंदू धर्मात धर्मग्रंथांचे दोन भाग मानले जातात- श्रुति आणि स्मृति. श्रुति म्हणजे जे डायरेक्ट वायफाय कनेक्शनच्या थ्रू हॉटस्पॉट ऑन करून ऐकले गेले ते- वेद, आरण्यके आणि उपनिषदे. स्मृति म्हणजे जे जुन्या काळी सांगितले गेले त्याची मेमरी, अर्थात ब्याकप. अनेक पुराणे व अन्य ग्रंथ यात येतात. त्यामुळे श्रुति ही स्मृतिच्या तुलनेत वरचढ असे परंपरा मानते.

विथ धिस ब्याकग्रौंड, वरचा श्लोक सांगतो की जेव्हा एखाद्या कोर्स ऑफ अ‍ॅक्शनमध्ये श्रुति आणि स्मृति परस्परविरुद्ध असतील तेव्हा श्रुतिच बलवत्तर असते. आणि जिथे दोन श्रुति एकमेकांविरुद्ध बोलतात, तिथे युक्तीच बलवत्तर ठरते. बुद्धिप्रामाण्य बुद्धिप्रामाण्य ते यापेक्षा अजून वेगळे काय असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान प्रतिसाद आवडला. अर्थात एक बारीक शंका बाकी आहे चर्चा जरा पुढे गेल्यावर विचारतो तुर्तास त्यासाठी रुमाल तेवढा टाकून ठेवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मी जर आत्ता यक्ष असते तर दोनच प्रश्न विचारले असते आणि धर्मराज नक्की नापास झाला असता.

१. मा.म. साहेब हे असे धागे का काढतात?
२. मनोबाला इतके प्रश्न का पडतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(शंकाच नाही पण, महाभारतात प्रश्न विचारण्यासाठी यक्ष एकदाच आला होता, विक्रमादीत्याने धाग्यांवर उद्दीष्टाला फाटे फोडूनका असे स्वच्छ लिहिल्यानंतरही प्रत्येक नव्या धाग्यावर पुन्हा पुन्हा वापस येऊन अवांतर फाटेफोड प्रश्न विचारणार्‍यांना काय म्हणतात ? ह.घ्या.हेवेसानल Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.