वाचन का करावे?

"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही"
"इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!"
"पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!"
"मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर? आणि तुझ्या अनुभवातून आणि चुकांतून तू जो निष्कर्ष काढला तो जसाच्या तसा जर का या आधीच कुणी महान लेखकाने व्यवस्थित पुस्तकरूपात लिहून ठेवलेला असेल तर? तेवढा आपला वेळ नाही का वाचणार? एखादी चूक होण्यापूर्वीच आपण ती टाळू शकणार!"
"पण लेखकाची आणि आपली पार्श्वभूमी, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. लेखकाचे सगळे अनुभव आपल्याला कसे लागू होतील? सांग बरे?"
"अरे! सगळे अनुभव नाही लागू होणार पण काही टक्के तर नक्कीच होईल! पुस्तकातून आपल्याला प्रेरणा मिळते. शेवटी, लेखक हाही एक आपल्यासारखाच माणूसच असतो ना! त्याच्या भावना आणि आयुष्याच्या अवस्था- उदाहरणार्थ - प्रेम, लोभ, मत्सर, सुख, दु:ख, तारुण्य, बालपण वगैरे या आपल्या सारख्याच असतात की! सगळ्या माणसांच्या भावना शेवटी सारख्याच! त्यासंदर्भातील त्याचे अनुभव बऱ्याच प्रमाणात सगळ्या माणसांना लागू होणार नाहीत का? लेखक एलियन थोडेच असतो? माणूसच असतो. आपल्यासारखाच! आलं का लक्षात? आणि पुस्तकातून विचारांना चालना मिळते, आपण विशिष्ट प्रकारच्या संकुचित विचारांतून बाहेर पडून नवनवीन विचार स्वीकारायला शिकतो! आपल्या विचार कक्षा रुंदावतात!
"तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे असं वाटतंय बरं का!"
"आहे ना! चल मग कोणते पुस्तक वाचणार उद्यापासून?"
- Written by:
निमिष सोनार (एक पुस्तक प्रेमी आणि वाचन समर्थक!)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

वाचन का करावे यावर बऱ्याचदा ऐकलं आहे, कोणी वाचन का करू नये यावर नवीन काही मुद्दे लिहिले तर वाचायला इंटरेस्टिंग वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- बराच वेळ फुकट जातो. वाचलेल्यापैकी १० टक्के गोष्टी कामाच्या वा लक्षात ठेवाव्याशा वा आनंददायक असतात. बाकी कचरा.
- भाषा फुकटच्या फाकट पुस्तकी आणि कृत्रिम आणि जडबंबाळ होऊन बसते.
- प्रत्यक्ष करण्यापेक्षा वाचून काय तो सावध अंदाज घेऊन बघू, ही प्रवृत्ती बळावते.
- माणसाची नजर दोन प्रकारे चालते. एक म्हणजे एका बिंदूवर लक्ष्य केंद्रित करून पाहणारी नजर. दुसरी म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी टिपणारी परीघीय नजर (peripheral vision). पहिला प्रकार वाचनात उपयोगी येतो. दुसर्‍या प्रकारातून मोठ्या भूभागावर एकाच वेळी नजर ठेवण्यासारखी कामं करता येतात. अतिवाचनामुळे दुसर्‍या प्रकारची नजर वापरायची सवय जवळजवळ संपते. ('स्टिरिओग्राम' नामक दृष्टिभ्रमाकृती पाहायचा प्रयत्न करून पाहा. आपली नजर दोन्ही प्रकारात बदलताना किती कष्ट पडताहेत ते लक्ष्यात येईल.) गंमतीचा भाग असा (पडताळून पाहिलेलं नाही) की या दोन्ही नजरा लवचीकपणे वापरण्याची सवय डोळ्यांना लावली तर तो डोळ्यांसाठी उत्तम व्यायाम आणि विश्रांती असते आणि त्याने चश्म्याचा नंबरही कमी होऊ शकतो, असे दावे वाचले आहेत ('अनुभव'ची पीडीफ आवृत्ती जालावर प्रकाशित होत असे त्या काळातला एक लेख याबद्दल होता. आता तो हाताशी नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रोचक.

कधी काळी कोणतिही नवीन गोष्ट वाचून कळाली कि मी कल्पना करायचो की कोणी काय विचारले तर मला हे ज्ञान तिथे पाजाळत येइल.

माणसाची नजर दोन प्रकारे चालते. एक म्हणजे एका बिंदूवर लक्ष्य केंद्रित करून पाहणारी नजर. दुसरी म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी टिपणारी परीघीय नजर

मला आधी वाटलं की तुम्ही मेटाफोरिकली बोलत आहात Smile

अतिवाचनामुळे दुसर्‍या प्रकारची नजर वापरायची सवय जवळजवळ संपते

बहुदा खूप वाचन करणार्यांना वाहन चालवताना यामुळे त्रास होत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हो शालजोडीतले हाणता! पण मला हे अतिशयच इंट्रेष्टिंग वाटलं होतं तेव्हाही, हे खरंच आहे. या भौतिक तपशिलांवरून लेखकाने काही मेटाफोरिकल सिद्धान्तही मांडल्याचं आठवतं. पण त्यासाठी तो लेख हुडकावा लागेल. बाकी, वाहन चालवताना त्रास होतो की नाही याचा काही विदा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नाही, नाही, पहिले वाक्य तुम्हाला अनुसरून नव्हतं! ते मी असंच जनरल बोलत होतो तुमच्या पहिल्या पॉइंट वर. फक्त क्वोट न केल्याने गैरसमज झाला असावा.

वाचलेल्यापैकी १० टक्के गोष्टी कामाच्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile चालतंय वो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय वाचावे नि काय वाचू नै या बद्दल डहाक्यांची एक कविता :

झाड तोडायचे, कापायचे,
लगदा करायचा, कागद बनवायचा,
त्यावर लिहायचे, ते छापायचे,
मग वाचायचे.
एवढा खटाटोप कशासाठी?
सरळ
झाडच वाचावे!
झाड वाचताना
मला तुझाही अर्थ
उलगडत जातो.

- वसंत आबाजी डहाके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मला तुझाही अर्थ
उलगडत जातो.

कोणाला उदद्देशून आहे ही कविता ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तु्म्ही किंडलवर एक कविता कराच मुसुराव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या धाग्याच्या निमित्ताने एक जुना धागा पुन्हा वाचायला हरकत नाही.
अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ब्रिटन चे माजी पंतप्रधान आर्थर जेम्स बेल्फर यांनी १० डिसेंबर १८८७ ला सेंट अँड्र्युज विद्यापीठात एक व्याख्यान दिले होते. The Pleasures of Reading असे शीर्षक आहे त्याचे. त्या व्याख्यानाची प्रत (टेक्स्ट स्वरूपात) गुगलून मिळेल. युट्युब वर सुद्धा उपलब्ध आहे ते. झोपेची गोळी आहे. तुम्हाला झोप येत नसेल तर हे व्याख्यान (टेक्स्ट स्वरूपात) जरूर वाचा. ताबडतोब झोप येईल.

थोडक्यात सांगायचे तर येंज्वायमेंट साठी व एक्स्प्लोअर करण्यासाठी वाचावे. अनेक अनुभव की ज्यांच्यातून स्वतः न जावे लागता ते अनुभव घेण्यासाठी वाचन करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी का वाचतो. लहानपणी दिल्ली पब्लिक लायब्ररीत, पंखे होते आणि थंड पाण्याचा कूलर हि उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी 11 ते दुपारी ४-५ वाजे पर्यंत लायब्ररी बसून राहायचो. जे सामोरे दिसेल ते पुस्तक वाचायचो. नौकरी लागल्यावर १९८२-१९6६ कृषी भवन येथे होतो. शास्त्री भवनला भले मोठे केंद्र सरकारचे पुस्तकालय आहे. दुपारी वेळ घालविण्यासाठी आणि घरी सौ.शी वाद नको आणि घरचे कामे हि नको म्हणून पुस्तके वाचायचो. बाकी कागद वाचण्यापेक्षा लोकाना वाचायला येत असेल तर जीवनात काही मिळवू शकतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचायला खूप आवडतं म्हणून वाचते.
वेळ घालवायच्या आणि ज्ञान मिळवायच्या इतर असंख्य साधनांपैकी बाकी काही आवडत नाही म्हणून वाचते.
माझ्यासाठी वाचन का करावे याला काही कारण नाही.
लहानपणी चण्याच्या पुडीचा कागदही वाचणारी मंडळी असतात (भेळेचा कागदही म्हणतात काही जण) त्यातली एक होते.

आता हातात स्मार्ट फोन आल्यावर वाचनासाठी अक्षय पात्र मिळाल्यासारखे आहे.
पण रंगांमुळे उद्भवणारी मायग्रेन असल्याने ज्या ब्लॉग किंवा साईटसवर जास्त चित्रे , रंगांची झँगोमँगोगिरी, उगाचच चमकत रहाणारी ढिंचॅक चित्रे नसतात त्या साईट्स वाचते. पुस्तके डालो करून वाचते.
वर्तमानपत्रांच्या साईट्स, फेबु इत्यादी रंगित असल्याने त्या वाचत नाही.
(तरी म्हणे फेबुअप्पांनाही रेड ग्रीन ब्लाईंडनेस आहे म्हणून त्यांच्या साईटवर हे दोन रंग कमी आहेत.)

मी रेसिप्यांपासून मर्तिकाच्या विधींपर्यंत काहिही वाचू शकते म्हणून वाचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी रेसिप्यांपासून मर्तिकाच्या विधींपर्यंत काहिही वाचू शकते म्हणून वाचते.

ज्याचीतिची आवड! आणखी काय म्हणावे?

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणू शकता!
Smile

ज्याची- त्याची
आणि
जिची -तिची
असे जोडशब्द आहेत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आपापली आवड' म्हटलं की पीसीपणा साधत अनुप्रासाचा आनंद उचलता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी रेसिप्यांपासून मर्तिकाच्या विधींपर्यंत काहिही वाचू शकते म्हणून वाचते.

  • वकिलांच्या नोटिशी ("आमचे अशील श्री .... जमीन मौजे क्ष गट क्रमांक य ... पूर्वेकडे अमुक, पश्चिमेकडे तमुक, ... लीज, लीन, गहाणपत्र, साठेखत, वारसाहक्क, कच्ची पावती, .... पंधरा दिवसांत उत्तर न आल्यास...")
  • विवाहविषयक छोट्या जाहिराती ("प्रथमवर २९ दै कंपनी निमगो ४०ह आंतरजातीय चालेलसा. व्यंन. अनुभूती वि मं २३९६८२१८")
  • संस्कृत श्लोक (टिपिकली "नैनं छिन्दन्ति शस्त्राणं..." किंवा "वासांसि जीर्णानि...") लिहिलेल्या "उठामणा"च्या जाहिराती

...ही अक्षय मनोरंजनाची साधनं आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हल्ली भारतीय रेल्वे (किंवा मरे, परे, दमरे आदि प्राभागिक रेल्व्यांपैकी कोणतीही) टाइमटेबले छापते काय?

It used to be the greatest piece of fiction ever published in the English language - the US Constitution being a close second.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विवाहविषयक छोट्या जाहिराती"

या वरून प्रस्तुत कविताविषयक प्रयोगाची आठवण झाली. सोलंकी यांची एक कविता सरळसरळ या छोट्या जाहिरातींमधला मजकूरच आहे.

varjesh solanki poem

खालील पानावर अधिक माहिती मिळू शकेल :

http://www.poetryinternationalweb.net/pi/site/poem/item/3019/auto/0/POEM...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"कण्डुअतिशमनार्थ" या एका शब्दात वाचनच काय, प्रत्येक छंदामागील कारणमीमांसा सांगता यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं