लघुकथा - इच्छापूर्ती

(कथा लिहायचा पहिलाच प्रयत्न आहे. कुठेतरी वास्तवाशी मिळताजुळता प्रसंग. सहअनुभूतीतून सुचलेली काल्पनिक कथा आणि काल्पनिक पात्रे.)

भर दुपारी रस्त्याच्या कडेकडेने इकडे तिकडे बघत, वाटेत येणाऱ्या छोट्या छोट्या दगडांबरोबर फुटबॉल खेळत, हातातल्या काठीने चालता चालता मातीवर रेघोट्या ओढत चालणारा सुम्या (सुमीत) अचानक थबकला.

त्याच्यापुढे काही अंतरावर चालणाऱ्या काकांच्या खिशातून रुमाल काढताना पाकीट पडलेले त्याने पाहिले. धावत जाऊन त्याने ते उचलले आणि काकांना हाक मारली.
"ओ काका, पाकीट पडलं बघा."

काकांच्या डोक्यात कामाची घाई होती. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या कानातून मेंदूत हे वाक्य झिरपले नसावे. ते झपाझप चालत आपल्या जीपकडे पोहोचले. सुम्याने मग सुसाट धावत त्यांना गाठले आणि पाकीट परत केले.

सावळासा तरतरीत उन्हामुळे थकलेला सुम्या काकांना खूप आवडला. त्यानी पाकीट उघडून ५० रु ची एक नोट काढून त्याला दिली.
"हे तुला खाऊ साठी." आणि प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत मनोमन त्याला आशीर्वाद दिला.
सुम्या "नको नको" म्हणेपर्यंत काका निघून गेले.

सुम्याने ती नोट घट्ट पकडली आणि जवळच्याच थोरात यांच्या दुकानात गेला.
थोरात काका दुकान बंद करायच्या बेतात होते. त्यांनी घडलेला प्रसंग पाहिला होता.
"काका, मला एक द्या." सुम्याने एका बाटली कडे बोट दाखवून सांगितले आणि ५०रु ची नोट दिली.
थोरातांनी त्याला बाटली दिली. सुम्याने क्षणाचाही विलंब न करता ती अधाश्यासारखी उघडली. घट घट घट करत एका दमात संपवली.

थोरात काका त्याच्याकडे प्रेमाने बघत होते. त्यांच्या हातात सुट्टे पैसे होते. सुम्याने खुणेनेच "नको" असे सांगितले.
"अशा दोन मोठ्या बाटल्या अजून द्या. येतील ह्या पैशात? आई, बाबा आणि चिंगीसाठी पण पाहिजे."
थोरात काकानी त्याला हव्या त्या बाटल्या दिल्या. काकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

सुम्याने दोन्ही हातात एक एक बाटली पकडली. अत्यानंदाने डोळे भरून त्या बाटल्यांकडे पाहिले आणि घराकडे धूम ठोकली.

आज कितीतरी दिवसांनी त्याच्या घरचे मनसोक्त 'पाणी' पिणार होते.

- उल्का कडले

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

कटु सत्य.पाणीटंचाईच्या झळा बसत आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

नुसतं बाटली म्हटल्यावर अंदाज आला होता. पंच कसा बसतोय याचीच वाट पाहत होतो.

छान!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली. पाण्यासाठी दाही दिशा हीच परिस्थिती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलीये कथा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भन्नाट कथा आहे.

फक्त ५० रुपयात कसल्या तिन बाटल्या मिळाल्या ह्या प्रश्नानी सॉलिड सस्पेंस क्रीएट केला माझ्या डोक्यात. कारण बाटल्या म्हणले की त्यात गब्बुचे आवडते पेय असते इतकेच डोक्यात फिट बसले आहे ना.

शेवटच्या वाक्यानी निराश केले बर्‍यापैकी. ते वाक्य असे असते तर मजा आली असती

आज कितीतरी दिवसांनी त्याच्या घरचे मनसोक्त 'पाणी' पिणार होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादासाठी आभारी आहे.
मला दोन गोष्टी अभिप्रेत होत्या.
१. वाईट परिस्थितीत सुद्धा प्रामाणिकपणा टिकुन आहे.
२. 'पिण्यासठीसुद्धा पुरेसे पाणी न मिळणे' हे सध्या कटु सत्य आहे.
मिरजहुन लातुरला पाणी पोहोचलय. वाचुन आनन्द झाला. पुढच्या वर्षी भरपूर पाऊस पडुन मुबलक पाणी सर्वाना मिळो ही सदिच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

कथानायक मंद दिसतोय..
50 रु.पयात 20 ली..चे दोन जार आले असते पाण्याचे..4 दिवस भागले असते..

बाकी कथा अतिरंजीत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

कथानायक मंद नाहीये. ४० रुपयाची कंट्री मारली उभ्या उभ्याच आणि आई बापासाठी पाण्याच्या बाटल्या घेउन गेला १० रुपयाच्या.

वर घरी ५० रुपये मिळाले हे सांगायच्या ऐवजी १० रुपये मिळाले असेच सांगुन गुणी बाळ आहे हे प्रूव्ह केले असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंट्री 40/- ला मिळत नाही..
46 रु. लागतात..
40 रु मापात बसत नाहीत..
बाकी थोरात काका कंट्री च दुकान चालवत असतील अस वाटत नाही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं - ४६ रुपयाची कंट्री प्यायली असेल. ४ रुपयाच्या २ वापरलेल्या बाटल्या घेतल्या असतील. कुठले तरी पाणी भरुन दिले असेल आई बापांना?

जुन्या पुण्यात थोरातांचेच एक जोरदार दुकान कम हॉटेल होते, जे कधीच बंद होयचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होयचे नाही हा वाक्प्रचार पहील्यांदाच ऐकला. मी व्हायचे नाही लिहीले असते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0