Skip to main content

तीन मसाला डोसे

कवितांच्या एका पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत .
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?

अनु राव Fri, 20/05/2016 - 10:11

एक डोसा सुद्धा फार होतो हो, जास्तीत जास्त गाडीवरची अर्धी भेळ येइल कवितेच्या पुस्तकाच्या बदल्यात.

त्यात सुद्धा जर अश्या कविता असतील तर भेळवाला वैतागेल आणि त्याचा मार खायला लागेल कदाचित

तिरशिंगराव Fri, 20/05/2016 - 12:06

ऐसी च्या नभांगणात एकाचवेळेस, एवढी नक्षत्रे कधीच फुलली नव्हती. त्यामुळे हल्ली, रोज गच्चीत झोपल्यासारखं वाटतं.